Back
जालना: वंदना मगरे महापौर, राजेश राऊत उपमहापौर; भाजपा की पहली एकहाती सत्ता
NMNITESH MAHAJAN
Feb 06, 2026 09:31:49
Jalna, Maharashtra
जालना : जालन्यात भाजपचे महापौर, उपमहापौर ठरले
कैलास गोरंटयाल समर्थक वंदना मगरे जालना महानगरपालिकेच्या पहिल्या mahापौर
उपमहापौरपदी राजेश राऊत,औपचारिक घोषणा बाकी
अँकर : जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी वंदना मगरे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे तर उपमहापौर पदी राजेश राऊत यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.वंदना मगरे या माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही मुदत 15 महिन्यांसाठी असणार आहे.जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी वंदना मगरे यांची तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांचे नाव निश्चित करण्याची शिफारस माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह भाजपा महानगराध्यक्ष भास्कर दानवेंनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार 15 महिन्यांसाठी महापौरपदी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांचे नाव निश्चित करण्यात आल्यानंतर आज महापौर पदासाठी वंदना मगरे आणि उपमहापौर पदासाठी राजेश राऊत या दोघांचेही अर्ज दाखल करण्यात आले.त्यांच्या विरोधात एकहीं अर्ज महापौर आणि उपमहापौर पदासाठी दाखल न झाल्यानं या दोघांच्याही निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे.दरम्यान जालना महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 9 फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे.त्यामुळे 9 फेब्रुवारी रोजी या निवडीबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.महानगरपालिका निवडणुकीत 65 पैकी 41 जागा जिंकून जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली आहे.दरम्यान या निवडीवर माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 11:04:340
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 11:03:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 10:50:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:46:580
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:34:570
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:33:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 06, 2026 10:23:080
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 10:22:170
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:21:350
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 06, 2026 10:21:170
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:15:500
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 06, 2026 09:50:390
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 06, 2026 09:33:390
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 09:33:070
Report