Back
यवतमाल में जनवरी में 22 किसानों ने आत्महत्या, कृषि संकट गहराने लगा
SRSHRIKANT RAUT
Feb 06, 2026 10:23:08
Yavatmal, Maharashtra
देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी दुर्दैवी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. विविध सरकारी योजनांवर वारेमाप खर्च होत असतानाही शेतकरी आत्महत्यांचे सत्र मात्र थांबता थांबत नसल्याने कृषी संकट गडद झाले असून शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
यवतमाळच्या लोणी येथील सुनील चव्हाण या 35 वर्षीय शेतकरी पुत्राने शेतीतील उत्पन्न घटल्यामुळे आपली जीवन यात्रा संपविली आहे. सुनील कडे वडिलोपार्जित दहा एकर शेत असून त्यात सोयाबीन आणि कापूस या पिकाची लागवड केली. मात्र झालेल्या अति पावसामुळे पिकांचे उत्पन्न घटले, लागवडीसाठी त्यांनी खाजगी व बँकेकडून कर्ज घेतले होते, शेतीवर झालेला खर्च भरून न निघाल्यामुळे चिंताग्रस्त सुनीलने विष प्राशन करून आत्महत्या केली.
यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. नैसर्गिक अवकृपा आणि ठोस उपाय योजना अभावी सुनील प्रमाणेच शेतकरी आर्थिक विवंचनेचे बळी ठरू लागले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलाबाळांचे शिक्षण त्यांचे विवाह, आरोग्यावर होणारा खर्च पेलवेनासा झाला असल्याने शेतकरी वर्ग चिंतामग्न झाला आहे. शेतीमालाच्या आयात निर्यात धोरणात देखील शेतकरी भरडल्या जात आहे. सरकारच्या योजना आहेत मात्र त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत अशी कबुली राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली असून शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तर सरकार शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून काम करीत आहे, त्यामुळे आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा केला होता, तो फसला. कारण शेतकरी मूळ समस्यांमधून बाहेर आलेला नाही. शेतकरी कष्टाळू आहे, तो रक्ताचे पाणी करून शेती कसतो. अशा अन्नदात्या शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी लोकप्रतिनिधी शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 12:08:280
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 11:35:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 11:04:340
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 11:03:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 10:50:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:46:580
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:34:570
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:33:420
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 10:22:170
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:21:350
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 06, 2026 10:21:170
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:15:500
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 06, 2026 09:50:390
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 06, 2026 09:33:390
Report