Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410401

लोणावळे के कार्ला किले पर एकविरा देवी का जागरण

CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 06, 2025 15:35:34
Pune, Maharashtra
Headline : लोणावळ्यातील कार्ला गडावर एकविरा देवीचा जागर लोणावळ्यातील पवित्र कार्ला एकविरा गडावर कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात भक्तिरस दाटून आलाय. सायंकाळी सात वाजता झालेल्या महाआरती दरम्यान आई एकविरा देवीचं मुख तेजोमय झळकत होतं. तसेच भक्तांच्या “जय एकविरा मातेचा” जयघोषात संपूर्ण गड भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Oct 06, 2025 17:33:41
Shirdi, Maharashtra:साई संस्थानाच्या सुरक्षा पर प्रश्नचिन्ह...? साई संस्थानात मला विना मोबदला नोकरी द्या ; सुजय विखेची साई संस्थान कडे मागणी... साई संस्थानाच्या रुग्णालयात फार भ्रष्टाचार , सुजय विखे यांचे साई संस्थान प्रशासनावर गंभीर आरोप.. साई दरबारी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची नोंदणी करा , सुजय विखेची संस्थानकडे मागणी.. डॉ.सुजय विखे पाटील भाषण पॉईंटर्स - जे भ्रष्टाचाराचे आरोप मंदिर प्रमुखावर झाले त्याबाबत निर्णय त्रिसदस्यीय समिती ठरवेल... सदर महिला हि सिसीटीव्हीत असुनही सापडत नाही , जर मंदिरात येवून त्या महिलेची ओळख पटत नसेल तर मंदिर सुरक्षेतबाबत मोठ प्रश्नचिन्ह निर्माण होतय... मी CEO यांना विनंती केली की सर्व साईभक्तांचे रजिस्ट्रेशन झालच पाहिजे , उद्या एखादी घटना घडली तर आम्हाला माहित नाही असे उत्तर प्रशासन देणार असेल तर ते चुकीचं... समिती अतिशय उत्कृष्ट काम करतेय , मात्र येणा-या काळात प्रत्येक साईभक्ताचे ओळखपत्र घेऊन रजिस्ट्रेशन होईल हि मला अपेक्षा... ऑन साईनाथ हॉस्पिटल भोंगळ कारभार - साईनाथ रुग्णालयात सात वर्षाचा मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्याचा पोस्टमार्टेम रिपोर्ट तो बघायचाय , नेमकी काय ट्रिटमेंट दिलीय त्यासंदर्भात काही चुकीचे असेल तर पोलिसांना फिर्याद दाखल करतील... साईनाथ रुग्णालयात जो कारभार , राजकारण सुरू आहे त्यामुळे जे नुकसान होतय त्यासाठी मला साईसेवक म्हणून मला रुग्णालयात घ्यावे ... आठवडयातून एक दिवस तरी सेवा या हेतूने रुग्णालयात काम करेल... आणि ते काम मलाच हाती घ्यावे लागेल तरच सुधारणा होईल ... रुग्णांची आणि भक्तांची हेळसांड होणार नाही असा माझा प्रयत्न राहिल... बघू आता माझ्या अर्जाचा काय निकाल लागतो.. मी 16 ऑक्टोबर पर्यंत महाशिवकथेच्या‌ आयोजनात व्यस्त आहे त्यानंतर मी माझी कथा सुरू करेल... महाकालने मला शांत रहायला सांगितलय त्यानंतर जिथे नियमावलीचे पालन होत नाही त्यावर कारवाई करू... Tiktak पण आहे आणि भाषण पण...
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 06, 2025 17:30:57
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी पोलीस ठाण्यात शिवसेना युबीटी च्या कार्यकर्त्यांनी मोठा जमाव केला आहे, शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या वाहनाचा ताफा अडविल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोडण्याची मागणी ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी केली आहे. जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात दुपारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे वाहन कडून शिवसैनिकांनी सडलेली पिके व काळे झेंडे त्यांना दाखविले होते. यावेळी पोलिसांनी जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे सह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र अद्याप पर्यंत त्यांची सुटका केली नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पोलीस ठाणे परिसरात प्रचंड जमाव करून शिवसैनिकांनी नारेबाजी केली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 06, 2025 17:00:58
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 06, 2025 14:45:25
Vasai-Virar, Maharashtra:तीन जण गंभीर जखमी , रुग्णालयात उपचार सुरू अज्ञात आरोपीने घरात शिरून केला हल्ला अँकर - विरारच्या अर्नाला गावातील एका गोवारी कुटुंबावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना विरारच्या संयोग रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लीला गोवारी, जगन्नाथ गोवारी, नेत्रा जगन्नाथ गोवारी अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. रात्री कुटुंब झोपलेले असताना अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून आरोपीविरोधात यातील जगन्नाथ गोवारी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. हा हल्ला नेमका कोणी व कोणत्या वादातून केला हे समजू शकलेले नाही.. अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.. बाईट- विश्वास किनी, स्थानिक नागरिक.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 14:09:57
Akola, Maharashtra:Anchor : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर जोडा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिवारी नावाच्या वकिलाच्या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प ) चे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.तिवारी यांची वकिलीची सनद तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात बहुजन समाजातील व्यक्ती सर्वोच्च पदावर असल्याचा राग मनात धरून तिवारी यांनी हे अमानुष कृत्य केले असावे, असा आरोपही मिटकरी यांनी केला.दरम्यान, या घटनेनंतर समाजात कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी संयम बाळगावा, अशी विनंतीही आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 13:00:23
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 12:54:02
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 12:50:10
Akola, Maharashtra:अकोल्याात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या प्रयत्नाचा निषेध केलाय. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ही घटना लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे आंदोलन करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक समोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला संताप व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी “लोकशाहीवर हल्ला बंद करा” अशा घोषणा देत घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 06, 2025 12:06:53
Washim, Maharashtra:अँकर:अनंत चतुर्दशी नंतर आलेल्या भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत चिमुकल्या मुलींच्या बाहुली उत्सवाला सुरुवात होते. या उत्सवाची सांगता पारंपरिकरित्या कोजागिरी पौर्णिमेला होते. मात्र यावर्षी मातीच्या बाहुल्यांचे दर गगनाला भिडले असून, त्यामुळे पालकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. गणेश विसर्जनानंतर लगेचच बाहुली उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. यंदा सतत झालेल्या संततधार पावसामुळे कुंभारांना मातीची मूर्ती तयार करण्यात अडचणी आल्या. परिणामी मातीच्या बहुल्यांच्या जोड्या 300 ते 400 रुपये दराने विकल्या जात आहेत. तसेच उत्सवात लागणारे ‘बत्तीस खाऊ’ देखील महागले आहेत. तरीही चिमुकल्या ‘लाडकीचा लाड’ पुरवण्यासाठी पालकांनी बाजारात उस, ज्वारीचे धांडे आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 06, 2025 12:05:55
Jalna, Maharashtra:जालना शशिकांत शिंदे: जरांगेंच्या आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग लागू नये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची जरांगेंवर टीका जरांगेंनी सरकाकडून जीआर दुरुस्त करून घ्यावा अँकर- मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग देऊ नये असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जरांगेंवर टीका केलीये.. मराठा समाजाचं वाटोळं हे शरद पवारांनी केलं असल्याचा आरोप जरांगेंनी केला होता. त्याला शशिकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर देत शरद पवार जेव्हा जरांगेंना भेटायला आले तेव्हा काय ऊर्जा आहे. असं जरांगे म्हणाले आता 1994 चा जीआर विषयी ते बोलतात. तर जरांगेंनी सरकारकून जीआर दुरुस्त करून घ्यावा. मात्र त्यांनी आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग देऊ नये असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी जरांगेंवर टीका केलीये..
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 06, 2025 12:04:50
Nanded, Maharashtra:नांदेडमध्ये आज मूळ आदिवासी समाजाने आदिवासी बचाव मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सामील झाले होते. आदिवासी समाजातून येणारे किनवट मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांच्या नेर्तृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. बंजारा जातीचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करू नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज मोर्चे काढत असल्याने त्याला प्रतिउत्तर म्हणून आता आदिवासी समुदाय मोर्चे काढत आहे. तालुका स्तरावर मोर्चा काढल्या नंतर आज आदिवासी बांधवानी नांदेड शहरात मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्याल्यावर काही वेळात हा मोर्चा धडकला. या मोर्चात पारंपरिक वेशभूषेत हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सामील झाले आहेत. ड्रोन दृश्यातून या मोर्चातील प्रचंड गर्दी दिसून आली. आदिवासी आरक्षण हे घटनात्मक आरक्षण असून कोणत्याही समाजाचा समावेश खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी आमदार भीमराव केराम यांनी दिला.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top