Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

अजित पवार बोले- 70 हजार करोड़ के भ्रष्टाचार के आरोप निराधार

HCHEMANT CHAPUDE
Dec 01, 2025 08:02:29
Shirur, Maharashtra
अजित पवार *प्रशासन मला टरकून राहतं, अजित दादा असं का म्हणाले....!* - मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र काही लोकं माझ्यावर आरोप करतात. मी असा आहे, तसा आहे, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. पण मी एक रुपयांचा मिंदा नाही. तुम्ही दाखवून द्या, की मी कामं करताना कोणाकडून पैसे घेतले. किंवा चिरीमिरी द्यावी लागली. उलट प्रशासन मला टरकून राहतात. Sound Byte: अजित पवार उपमुख्यमंत्री
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Dec 01, 2025 08:12:01
Pandharpur, Maharashtra:सांगोला नगरपालिका मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना धाड सत्र, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे आरोप तर विरोधकांनी सुद्धा दिले जोरदार प्रत्युत्तर सांगोला नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार शहाजी पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार उभे केले आहेत. तर भाजप , शेकाप आणि राष्ट्रवादी यांनी सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. काल रात्री माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरी निवडणूक भरारी पथक, LCB पथक यांनी तपासणी केली. यामुळे शहाजी बापू यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर आरोप केले आहेत. या दोघांचं हे कारस्थान असल्याचे ते म्हणतात. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी याला जोरदार उत्तर दिले आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू माझ्यामुळे आमदार झाला तेव्हा मी चाललो. शहाजी बापूला आता वेड्याच्या इस्पितळात दाखल करावे लागेल. त्यांचा लबाड बोलण्यात एक नंबर माणूस आहे. कांगावा करण्याची त्यांच्या जुनी सवय आहे. पराभव दिसत असल्याने ते अशी विधाने करून सहानुभूती मिळवत आहेत. आता सत्ता नाही टक्केवारीच राजकारण त्यांनी आमदार असताना केले. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी पाटील यांच्यावर घर फोडण्याचा आरोप केला आहे. बंधू डॉ अनिकेत देशमुख याचे कान भरून गणपतराव देशमुख यांच्या नातवात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. धाड पडल्याचे सहानुभूती मिळवण्यासाठी ते वापर करत आहेत. सांगोला शहरात सर्वच राजकीय कार्यालयाची तपासणी झाली आहे. यात वेगळे काही नाही.
63
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 01, 2025 08:08:52
Nashik, Maharashtra:बिहार आणि कॅनडातुन कुरियरने पाठविला 'ट्रीपल तलाक' अँकर - शहरातील मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विवाहितेला तिच्या पतीने थेट बिहार आणि कॅनडामधून 'ट्रीपल तलाक'चे स्वहस्ताक्षरातील लेखी कागद कुरियरद्वारे पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन तिच्या पतीसह सासु, सासऱ्याविरुद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शादी डॉट कॉम वरून ओळख झाल्यानंतर २४ जानेवारी २०२२ ला विवाहितेचा मुस्लिम पद्धतीनुसार संशयित आरोपीसोबत विवाह (निकाह) झाला होता तेव्हापासून आजपर्यंत पीडितेचा पतीसह तिचे सासू-सासरे यांनी बिहार व कॅनडामध्ये शारिरिक-मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नवा व्यवसाय सुरू करण्याकरिता माहेरच्यांकडून विवाहितेने पैसे आणून दिले नाही, म्हणून सासु-सासऱ्यांसह पतीने शिवीगाळ व मारहाण करत छळ केला. तसेच लग्नात मिळालेले आठ तोळ्यांचे दागिनेदेखील बळजबरीने अंगावरुन काढून घेत हाकलून दिले. त्यानंतर पतीने लेखी स्वरुपात स्वतःच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह ट्रीपल तलाकचे पत्र कुरियरद्वारे पत्र पाठविले. त्यानंतर पीडित महिलेने महिला सुरक्षा शाखेकडेही अर्ज केला होता. त्यानंतर मुंबईनाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यांतर्गत कलम ४ आणि भारतीय न्यायसंहिता कलम ८५ नुसार विवाहितेला कुरपणे वागविणे, तिचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलााय. बाईट -
157
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 01, 2025 07:18:48
Kalyan, Maharashtra:पत्निचा खून करून पतीची आत्महत्या डोंबिवली येथे कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीने ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या पोलीस तपासात आरोपीची ओळख पटली; तणावातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय Anc..डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात एका ३९ वर्षीय पतीने आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर, स्वतः ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचे घटन समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पोपट दिलीप दहिज असे आरोपी मयत पतीचे नाव असून २६ नोव्हेंबर रोजी त्याने घरात झालेल्या किरکوळ वादातून पत्नी ज्योती दहिज हिच्यावर धारदार Shस्त्राने हल्ला करत तिचा गळा दाबून तिची हत्या करत तिचा मृतदेह घरात ठेवून तो फरार झाला होता मात्र याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी याप्रकरणी हत्याचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीचा शोध सुरू केला होता याच दरम्यान पोलिसांना भांडुप रेल्वे स्थानक परिसरात एका व्यक्तीने ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सदर व्यक्तीचा तपास करत माहिती मिळवली असता पत्नीचा हत्या करणारा तोच आरोपी पोपट असल्याची माहिती मिळाली आणि या हत्याचा गुन्ह्याचे उघड झाली सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे
90
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 07:15:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया. निवडणूक आयोग रेड. चौकशी होईल त्यामध्ये एवढं सिरीयस घेण्यासारखं काही नाही. फडणवीस भेट. मी अगोदर आलो होतो मुख्यमंत्री नंतर आले, पैठणमध्ये दोघांच्याही सभा आहेत... फोनवर आमची चर्चा होत असते. आमची चर्चा रोज चालू असते. महायुती आरोप प्रत्यारोप. आरोप प्रत्यारोप मी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेत का? ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. स्थानिक प्रश्न वेगळे असतात, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. डेव्हलपमेंट वर आमचा प्रचार सुरू आहे. निवडणुका स्थगिती. निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर निवडणुका कधीही थांबवल्या जात नाही पण यावेळेस निवडणुका थांबवल्या गेल्या त्यावर मी माहिती देतो. संजय राऊत 35 आमदार फुटणार. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नावर हात जोडले आणि हसले, त्यानंतर मी त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया दिली.
164
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 01, 2025 07:00:50
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले में कल चुनाव: 9 नगर परिषद और 1 नगर पंचायत के लिए मतदान. जिल्ह्यात उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 9 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातून मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. मतदान असलेल्या नगर परिषद, पंचायत क्षेत्रात मतदान कर्मचारी सुरक्षा दले आणि क्षेत्रीय अधिकारी यांची तैनाती सुरू झाली आहे. विविध वाहनांच्या माध्यमातून पथके पोचविली जाणार असुन प्रत्यक्ष मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा युध्द पातळीवर कामाला लागली आहे. जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलली आहे. घुग्गुस येथे आता 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
249
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 01, 2025 06:47:43
Akola, Maharashtra:अकोट नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अकोट शहरात तणाव वाढवणारी घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 15 ‘अ’च्या एमआयएम पक्षाच्या अधिकृत उमेदवार उज्वला राजेश तेलगोटे यांचे पती राजेश तेलगोटे यांच्यावर कालवाडी रोडवरील रामनारायण फार्मजवळ अज्ञात चार ते पाच व्यक्तींनी पाठीमागून हल्ला केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेनंतर गंभीर अवस्थेत राजेश तेलगोटे यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या सध्या उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना निवडणूक प्रचार चूरशीला पोहोचलेल्या काळात घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. सुरक्षा वाढविण्यात आली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. या घटनेमुळे प्रभाग 15 ‘अ’ मध्ये तणावाचे वातावरण असून एमआयएमच्या प्रचारावरही याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर हा एक राजकीय हल्ला असल्याचा एमआयएम ने शक्यता वर्तविली आहे.
125
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 01, 2025 06:47:22
Wardha, Maharashtra:वर्ध्यात नगराध्यक्ष निवडणुकीत तिहेरी लढत भाजप, काँग्रेस, सेनेत होणार थेट लढत ; राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक वर्ध्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी दोन उपमुख्यमंत्री,पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षाची प्रतिष्ठापणाला चारही उमेदवार नेत्यांच्या खेम्यातले असल्यानं निवडणूक होणार चुरशीची खासदार, आमदाराच्या नावावर उमेदवारांचे दावे - प्रतिदावे वर्ध्यात पालकमंत्री यांची प्रतिष्ठापणा वर्ध्यातले सहाही नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकविणार;पालकमंत्री भोयर यांचा दावा वर्ध्याच्या इतिहासात पहिल्यांदा नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. चारही उमेदवार थेट हायकमांडच्या जवळचे असल्यानं उमेदवारापेक्षा याठिकाणी नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागल्याचं चित्र दिसतय. त्यामुळं थंडीच्या गारठ्यात राजकीय वातावरण चांगलंच तापायला लागलं आहे ...वर्ध्याची यावेळची नगर पालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक हायप्रोफाइल मानल्या जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारीच्या रुपात गिफ्ट मिळालंय... तर दांडगा जनसंपर्क असणारे काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगुळ यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वात आधी जाहिर करून सर्वांनाच धक्का दिला. भाजपाचे निलेश किटे हे पालकमंत्री पंकज भोयर यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. किटे यांची निवडणूक ही पालकमंत्री भोयर यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानल्या जाते. त्यामुळं तिनही नेत्यांचं लक्ष हे वर्ध्याच्या नगर पालिकेच्या निवडणुकीकड असल्याचं दिसून येते.. वर्ध्यात तिहेरी लढत होत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संतोष ठाकूर महत्वाची भूमिका वठविणार आहे.
118
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 01, 2025 06:46:58
86
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 01, 2025 06:46:28
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री - नागपूर जिल्ह्यातील 27 नगरपालिका नगरपंचायत निवडणूक मध्ये आपल्या मतदाराने जनतेने मतदान करून आमचे उमेदवार नगराध्यक्ष निवडून आणावे अशी मी विनंती केली - ड double इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित नगरपालिकेचा जो आराखडा आपण तयार करणार आहोत - त्या नगरपालिका 2047 पर्यंत विकसित करण्याचा आराखडा तयार करायचा आहे,त्यासाठी मतदारांनी आम्हाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. On संजय राऊत - - एकनाथ शिंदे आमचे महत्वाचे नेते आहेत, आणि आमचा केंद्रातील नेतृत्व NDA च्या घटक पक्षांना नेहमीच झुकते माप देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळकट करण्याचं काम आमच्या नेतृत्वाने केला आहे - त्यामुळे एकनाथ शिंदे हे आमचे एनडीएचे प्रमुख नेते आहेत On भाजप सर्व्हे - - महाराष्ट्रातील जनतेने शेवटी आम्ही महायुती मध्ये मोठे भाऊ आहोत, त्यामुळे मोठे भाऊ म्हणून महायुतीच्या घटक पक्षांना सांभाळताना आमचाही पक्षात संघटन वाढले पाहिजे ही आमची भूमिका आहे - महाराष्ट्रामध्ये मला विश्वास आहे, विधानसभेत तीन कोटी १८ लाख मत घेऊन महाराष्ट्र राज्य सरकार आलं तसंच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमताने निवडून येईल On निवडणूक आयोग ( निवडणुकांना स्थगिती ) - - ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने शेवटच्या 48 तासपूर्वी अशा निर्णय घ्यायचे हे अनाकलनीय आहे - निवडणूक आयोगाने असे निर्णय करणे योग्य नाही, ते कुठल्या नियमातून केला त्याचा अभ्यास करावा लागेल - निवडणूक आयोगाने 23 तारखेलाच हा विचार केला असता तर एवढी तारांबळ उडाली नसते - मतदानाच्या एक दिवसा अगोदर असे धक्के देणे योग्य नाही On शहाजी बापू पाटील - - कोणीतरी तक्रार करतो मग आयोगाला आपली कारवाई करावी लागते, हे कोणी व्यक्तीने केला असं नाहीये - तिथे काही लोक आल्यावर झालं असेल तर माहिती नाही On नागपूर निवडणूक सर्व्हे - - नागपूरच्या जनतेला मुख्यमंत्री फडणवीस नितीन गडकरी आणि आम्ही सुरू केलेल्या विकास योजनेवर विश्वास आहे, मी पालकमंत्री म्हणून जे अधिकार मला प्राप्त आहेत, त्या अधिकारांचा उपयोग नगरपालिकेला करण्याचा मी प्रयत्न करतोय - महसूल विभाग म्हणून मी काम करतोय त्यामुळे जनतेला विश्वास आहे - नागपूरचे जनतेचे वर्षानुवर्षे भाजप मागे उभे राहिल On महायुती कटुता - - तीन तारखेला निकालाच्या दिवशी कळेल, संध्याकाळी आम्ही बसू, चार तारखेला बसू, महायुतीत ठरलं होतं ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष त्या त्या ठिकाणी राज्यातील महायुतीला नगरपालिका निवडणुकीत ज्या मतेमतांतरे झाले त्याचा काही फरक पडणार नाही. On नाना पटोले - - नाना पटोले हे जे बोलतात, खरंतर दोनशे मते घेऊन नाना पटोले जिंकून आले, वैफल्य ग्रस्त परिस्थितीमध्ये नाना पटोले बोलत आहेत - नाना पाटोले यांच्या साकोल्यातील लोकांनी काँग्रेस सोडली, काँग्रेस किंचित होत चालली आहे - ऑपरेशन लोटस करायची काही गरज नाही, भाजपमध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे नगरसेवक त्यांचे नेते त्यांना सांभाळत नाही, विसंवाद आहे,त्यामुळे अनेकजण भाजपात प्रवेश करतील - निवडणुका झाल्यावर त्यांचे काँग्रेस पक्ष राहिलाय तो देखील येणाऱ्या निवडणुकीत जो पराभव होणार आहे त्या परभावानंतर काँग्रेसमध्ये मोठा खिंडार पडेल अशी भीती नाना पटोले यांना वाटते, म्हणून नाना पटोले ऑपरेशन लोटस म्हणतात On काँग्रेस नेते भाजप प्रवेश - - काँग्रेसमध्ये विसंवाद आहे नेत्यांचा,विसंवाद आहे कोणाकडे कळत नाही म्हणून पुढच्या काळात काँग्रेसचे अनेक लोक भाजपमध्ये येतील - आम्हाला खूप लोक भेटले, ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि त्यांना सांगितलं दोन तारखे नंतर विचार करू - नाना पटोले काँग्रेस बद्दल बोलले, ते अजित पवार आणि शिंदे बद्दल नाही बोलले, काँग्रेसचे अनेक नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मागे उभे राहतील, - काँग्रेस बचाव मोहीम सुरू आहे, काँग्रेस फुटणार आहे तिथे नेत्यांना वाटते म्हणून अशा पद्धतीने नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला On नितेश राणे (हिंदी) - स्थानिक परिस्थिती पाहून म्हटला असेल, स्थानिक पातळीवर अनेक युती झाल्या आहेत - मतभेद झालेल्या ठिकाणी तेथे 2 तारखे नंतर सगळे निपटवू
137
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 01, 2025 06:20:16
161
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 06:19:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट Byte.... सभा सुरू आहे, थोडा आराम करतात, सकाळी भेटू अशी भावना होती त्यामुळे भेट झाली नाही, शिंदे ,पवार फडणवीस संबंध चांगले आहे, बेबनाव असल्याच्या बातमीत तथ्य नाही संजय राऊत आजार पणातून बाहेर आल्यावर शुभ बोलले पाहिजे, अमित शाह आणि शिंदे संबंध चांगले आहे, युती असल्याने आम्ही सहकार्य करतो, *ऑन दिल्ली बैठक महायुती वाद मिटवावे* फडणवीस-शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे, स्थानिक निवडणूक है, त्यामुळे स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यायचे, खालच्या पातळीवर टीका करू नयेत आशा सूचना दिल्या होत्या.... ऑन संजय राऊत 35 आमदार फोडणार, 10 आमदार फोडणार...हे आकडे असतात, असे होत नाही, कार्यपद्धती आमच्याकडून शिका, दीड वर्ष सराव करून कसे गेलो, तुमच्या बुडाला कळले सुद्धा नाही.... ऑन शाहजी बापू कारवाई शाहजी बापू यांनी म्हटणे आणि त्यानंतर झालेली कारवाई शंका घेण्यासारखी आहे, एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे.... संजय राऊत बळ नाही मग कशाला शिंदे यांच्याबद्दल बोलतात, शिंदे यांचे नाव घेतल्या शिवाय तुमचा दिवस जात नाही आणि हीच शिंदे यांची ताकद आहे, शिंदे यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न करतात, पण शिंदे यांना जेवढा टार्गेट करताल ते आणखी उंचीवर जातील....शिंदे सर्वाना पुरून उरतील... ऑन देवेंद्र फडणवीस पक्ष नंबर वन त्यांना नंतर कळेल, आम्ही कधी असा आग्रह केला नाही आणि बोललो नाही.... आज उबाठा काय परिस्थिती आहे, उमेदवार माघार घेत आहे,,,, भाजप मुंबई सर्वे सर्वच पक्ष सर्व्हे करतात, आम्ही आकडेवारी वर जात नाही, आम्ही मेहनतवर लक्ष देतो, आकडेवर आम्ही जात नाही.... ओमराजे निंबाळकर शिंदे मिमिक्री मिमिक्री करतील, शिंदे यांचा सर्व कंट्रोल मंत्रीवर आहे, त्यांचा आदेश पाळला जातो, पण जे मिमिक्री करतात त्यांचा फोन त्यांचे नेते घेतात का? मातोश्रीवर आत घेतात का? शिंदे साहेब एकदा शब्द दिल्यावर काम झालेच पाहिजे... ऑन निवडणूक आयोग लोक न्यायालयात गेले होते, हा निकाल आम्हाला धक्कादायक वाटत आहे, त्यांनी असा निर्णय कसा घेतला... आम्ही देखील भ्रमात होतो की उद्या मतदान आहे, अचानक निकाल आलं, निवडणूक आयोगाने कसा निर्णय घेतला ऑन निवडणूक पैसे घेऊन निवडणूक जिकायचे असते तर टाटा बिर्ला नेते झाले असतात... संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्याकडे काय काय आहे, हे तपासणीसाठी संजय राऊत आधी ठणठणीत व्हा...
148
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 06:19:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया ऑन प्रचार सभा निवडणुकीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायला पाहिजे तसा माझा प्रयत्न आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे... आपल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते मेहनत करतात, धावपळ करतात त्यांची अपेक्षा असते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यामुळे मी प्रयत्न करतो आहे. ऑन महायुती सभा टीका मी मित्रांवर टीका केलेली नाही आमच्यात एकमेकांमध्ये टीका नाही.... मित्र पक्षांवर तर सोडा मी विरोधकांवर देखील टीका केली नाही. एकही माझं वाक्य सांगा की मी एखाद्या नेत्याच्या आणि पक्षाचे विरोधात बोललो... सकारात्मक मत मी माझे मांडत आलो आहे त्यामुळे कुणावर टीका करत नाही. मी कुणावर बोलत नाही बोलण्याचे कारण नाही. ऑन निवडणूक आयोग रेड मला निवडणूक आयोगाच्या छाप्या बद्दल माहिती नाही पण कुणी सत्तेत आहे कुणी सत्तेत नाही यावरून रेड ठरत नसते, आमच्याही कार्यकर्त्यांच्या बाबतीत तक्रार आली तर चौकशी होते, अनेक वेळा माझी ही गाडी तपासण्यात आली. सत्ता विरोधक अशा कुठल्या गोष्टी चौकशीसाठी नसतात. ऑन शिंदे भेट आम्ही दोघे भेटले नाही हे दिवसभरासाठी तुम्हाला खाद्य भेटले आहे. मी रात्री उशिरा आलो आणि त्यांच्यापेक्षा लवकर निघालो आहे त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही आम्ही उद्या भेटू.... दोघेही प्रचारात मग्न आहोत फोनवर आमचे दररोज बोलणे होते. मी लवकर जात असल्यामुळे भेट झाली नाही एवढेच. ऑन निवडणük रद्द माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा वेळी कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल असे आजपर्यंत कधीच झाले नाही. निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. जेवढा मी कायदा बघितला माझा अभ्यास आहे वकिलांसोबत बोललो त्या सगळ्यांच्या मतानुसार असे कुणीही न्यायालयात गेले तर निवडणुका रद्द होत नाही. निलंग्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, आणि ज्याचे नामनिर्देशन रद्द झाले होते तो न्यायालयात गेला, त्याचे नामनिर्देशन रद्द झाले, मग अशावेळी ज्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले त्यांना प्रचाराचा वेळ मिळाला, अर्ज परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, कुणीतरी पार्टी केली म्हणून निवडणूक पुढे ढकलणे हे अत्यंत चुकीचे आहे. निवडणूक आयोग स्वायुक्त आहे त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. कायदेशीर रित्या या निवडणुका पुढे ढकलले आहेत त्या पूर्णपणे चुकीचे आहे. त्या उमेदवारांवर मोठा अन्याय आहे ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी निवडणुकीसाठी केल्या. त्यांची मेहनत त्यांनी घेतलेले कष्ट निवडणुकीच्या एक दिवस अगोदर वाया गेले पुन्हा पंधरा दिवस त्यांनी त्या सगळ्या गोष्टी करायच्या हे अतिशय चुकीचे आहे. या निवडणुकीनंतर आम्ही निवडणूक आयोगाला एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला देऊ. अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलने चुकीचे आहे. जिल्लााऱ्यांनी देखील निवडणूक आयोगाला आपले मत कळवले मात्र त्यांनी त्यांचा निर्णय घेतला ते स्वायुक्त आहे त्यामुळे तो निर्णय मान्य करावा लागेल. ऑन भाजपा सर्वे असा कुठला सर्वे मला माहित नाही. पण नंबर एकचा पक्ष भाजप राहील आणि दोन्ही मित्र पक्ष त्याच्या खालोखाल राहील. या निवडणुकीत महायुतीचे तीनही पक्ष मिळून 70 ते 75 टक्के जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील हा माझा विश्वास आहे. ऑन संजय राऊत संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट आहे. ते त्यांचे काम करतात आम्ही आमचे काम करतो, पण कुणीही आमचा शत्रू नाही ते राजकीय विरोधक आहे. कुठलाही राजकीय विरोधक आजारी पडला तर तो लवकर बरा झाला पाहिजे ही आमची अशी आहे. ते रोज काही काही बोलतात त्यावर मी उत्तर देत नाही त्यांच्या आरोप उत्तर देण्याच्या लायकीचे मी समजत नाही. ऑन राणे बंधू भांडण मी सगळ्यांच्या पाठीशी आहे जो चांगला वगैरे त्याच्या पाठीशी मी आहे. कोणी चुकला तर त्याला मी सांगेल मग तो माझा पक्षातला असला तरी त्याला मी सांगेल, खरंतर दोन्ही बंधूंमधील ती परिस्थिती चांगली नाही राणे विरुद्ध राणे हे चांगले नाही या निवडणुकीनंतर आम्ही सर्वांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. ऑन विरोधक प्रचार ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जे कार्यकर्ते आपल्यासाठी राबराब राबतात हाडाचे पाणी करतात त्यांच्या निवडणुकीत आपण फिरायचे नाही त्यांना मदत करायचे नाही ही गोष्ट योग्य नाही. पण याचे मुख्य कारण अशी आहे की, ते या निवडणुकीत हारणार आहे विरोधकांचा पराभव होणार आहे. त्यामुळे पराभवाचा शिक्का माथी लावून घ्यायचा नाही. कारण उद्या माध्यमे दाखवतील की पवार ठाकरे फिरले तरी हरले हा शिक्का त्यांच्या माथी लावून घ्यायचा नाही....... आपण कधी जिंकतो कधी हारतो त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातून निघून जायचे, निवडणुकीतून माघार घ्यायची, प्रचाराला पाठ दाखवायची हे योग्य नाही. कार्यकर्ते शेवटी लक्षात ठेवतात जेव्हा आमची वेळ होती तेव्हा आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही.
180
comment0
Report
Advertisement
Back to top