Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: आनंदभारत गैस गोदाम से 110 सिलिंडर चोरी, पुलिस ने मामला दर्ज किया

NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 02:02:56
Jalna, Maharashtra
जालना : ब्रेकिंग | गैस गोदाऊनमधून 110 सिलेंडर चोरीला गोडाऊन फोडून सिलेंडर चोरले अज्ञात चोरट्यांनी लंपास केले गॅस सिलेंडर रामनगरच्या आनंद भारत गॅस गोडाऊन मधील घटना गॅस टंचाईच्या काळात सिलेंडर चोरीला गेल्याने खळबळ मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गॅसच्या गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी भरलेले 110 गॅस सिलिंडर लंपास केल्याची घटना जालन्यातील रामनगर येथे घडली आहे.गोडाऊन फोडून हे सिलिंडर लंपास करण्यात आले आहेत. त्यात 14 किलो वजनाचे 96, तर 5 किलो वजनाचे 2 आणि 19 किलो वजनाचे 12 सिलिंडर आहेत. ही घटना जालना तालुक्यातील रामनगर परिसरातील आनंद भारत गॅस गोडाऊनमध्ये 14 ते 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरट्यांनी गोडाऊनचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. 4 लाख 51 हजार 543 रुपये इतक्या किंमतीचे सिलिंडर चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात सिद्धार्थ आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोडाऊनमधून यापूर्वीही गॅस सिलिंडर चोरीला गेल्याच्या घटना घडलेल्या आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर टंचाई निर्माण झाली असून, या काळातच चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 03:31:25
Nashik, Maharashtra:नाशिकच्या बापू पुलाजवळ गोदावरी नदीत आदळला मृत माशांचा खच गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने आजवर कोट्यवधी रुपये खर्च केले, गोदावरीचे प्रदुषण रोखण्यासाठी खास गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली आहे. गोदावरीवरील बापू पुलाजवळील पात्रात पाण्यातील मासे मृतावस्थेत तरंगताना आढळले. यामुळे संवर्धन कक्षावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सावरकरनगर जवळच्या बापू पुलाजवळ नदीकाठी मृत माशांचा ढीग सापडला. रसायनमिश्रित सांडपाणी थेट गोदावरीत सोडण्यात येते. यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने माशांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 17, 2026 03:30:14
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पूर्वी रोज 2 लाख गॅस बुकिंग मात्र आता टंचाईच्या भीतीपोटी दररोज तब्बल 17 लाख गॅसची होतेय बुकिंग - घरगुती गॅस सिलेंडर टंचाईच्या भीतीपोटी नागरिकांकडून पॅनिक बुकिंगला सुरवात - पूर्वी रोज सरासरी 2 लाख गॅसचे होत होते बुकिंग आता मात्र दररोज 17 लाख घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग - टंचाईच्या भीतीपोटी गॅस बुकिंगची संख्या वाढल्याने सर्व्हर मंदावला तर दुसरीकडे गॅस वितरणाचा बोजवारा उडाल्याच चित्र - सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आपत्कालीन कक्षाची स्थापना तर नागरिकांना गॅस वितरण बाबत तक्रारी करण्यासाठी हेल्पलाइन नंबरची घोषणा - परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पुरवठा अधिकारी, महापालिका आयुक्त यांची समिती स्थापन
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 03:21:03
200
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 17, 2026 03:19:27
201
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 03:03:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषदेच्या युतीबाबत अडीच वर्षांच्या फॉर्म्युलामध्ये अध्यक्षपद कुणाला द्यायचे, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. बुधवारी याबाबत निवडणूक आहे, त्यामुळे भाजप, शिवसेना आणि उद्धवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सहलीवर पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत अजूनही शिवसेना आणि भाजपची एकत्रित बैठक झालेली नाही. मात्र, कुठलीही गडबड होऊ नये यासाठी पूर्ण नियोजन दोन्ही पक्षांनी केले आहे. गेल्या वेळी तीन पंचायत समिती सदस्य फुटल्यामुळे उद्धवसेनेने चार दिवसांपासून सदस्य सहलीवर पाठवले आहेत. बुधवार रोजी विशेष सभा होईल त्यात अध्यक्ष निवडण्यात येणार आहे...
927
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 17, 2026 03:02:20
Bhandara, Maharashtra:अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास आठ दिवसांत तीव्र आंदोलनाचा इशारा. हजारो शेतकऱ्यांचा सहभाग. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ अर्जुनी/मोरगाव व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ यांच्या संयुक्तरित्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आठ दिवसांच्या आत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
853
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 17, 2026 03:00:23
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील बोपाबोडी येथे वन विभागाच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. शेकडो गावकऱ्यांनी घटनास्थळी जमा होत मोजणीला विरोध दर्शविल्याने अखेर भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. श्रीरामनगर गावाचे पुनर्वसन सौंदड परिसरात करण्यात आले होते. त्यावेळी सौंदड व बोपाबोडी येथील वन विभागातील तब्बल १२ गट श्रीरामनगर येथील नागरिकांना शेतीसाठी देण्यात असल्याचे सांगितले जाते. मात्र बोपाबोडी गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की शासनाने कार्यालयात बसूनच हे गट श्रीरामनगर गावाला दिले असून त्यात स्थानिक ग्रामस्थांच्या हक्काच्या जमिनींचाही समावेश करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मते, बोपाबोडी गावाची हद्द वनजमिनीपर्यंत मर्यादित ठेवून त्यापुढील जमीन श्रीरामनगर गावाला देण्यात यावी. म्हणून जामीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांनी विरोध केला.
877
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 17, 2026 02:48:40
921
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 17, 2026 02:34:08
947
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 17, 2026 02:32:26
Ahilyanagar, Maharashtra:जिल्हाधिकारी कार्यालय समोर जागरण गोंधळ आंदोलन अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पतसंस्थांच्या बोगस वसुली दाखल्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील काही पतसंस्थांकडून बोगस वसुली दाखले दाखवून कर्जदारांची लूट केली जात असल्याचा आरोप सह्याद्री छावा संघटनेने केला आहे. संघटनेकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले ल. संबळ आणि हलगीच्या वाजवत आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. एनपीएचे निकष डावलून आणि नियमांचे उल्लंघन करून कर्जदारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या प्रकरणांचे फेर लेखापरीक्षण आणि फॉरेन्सिक ऑडिट करावे अशी मागणी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
1055
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 02:31:24
1058
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 02:18:25
Shirur, Maharashtra:सध्या पुणे नाशिक महामार्गवरून खासगी प्रवासी वाहतूकित वाढली असून अनेक मोठ्या ट्रॅव्हल्स ह्या पूर्ण क्षमतेने भरून जातं आहेत, मात्र काही खासगी वाहून कंपन्या मात्र नियमांना हरताळ फासत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी ओव्हरलोड करत अवैध वाहतूक करत आहेत. प्रवासी घेऊन प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. पुणे नाशिक महामार्गांवर स्लीपर कोच वाहने धावण्याचे प्रमाण सायकाळ नंतर मोठ्या प्रमाणावर असते, दररोज पुण्याहून जळगाव, धुळे, तसेच अगदी इंदोर पर्यंत या गाड्या धावत असतात, मात्र काही प्रवासी बसमध्ये गाडीच्या पुढील बाजूस चालका शेजारी अगदी जिन्यांवर बसून प्रवासी वाहतूक केली जातं असून जिथे फक्त चालकाला मदत म्हणून एक व्यक्ति सोबत घेऊन प्रवास करण्याची मुभा आहे तिथे १० ते १५ जण बसवून प्रवासात केला जातं आहे.
1095
comment0
Report
Advertisement
Back to top