Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

युद्ध के असर से महाराष्ट्र कांदा किसान परेशान, कीमतें घटने से लागत उठना मुश्किल

SKSudarshan Khillare
Mar 29, 2026 09:31:10
Yeola, Maharashtra
आखाती देशात सुरू असलेल्या अमेरिका-इजराइल-इराण संघर्ष ची झळ आता थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत… कारण महिनाभरात कांद्याच्या दरात तब्बल 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. 1600 ते 1800 रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा आज 300 ते 800 रुपयांवर आला आहे… उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत… नाशिक जिल्हा… देशातील सर्वात मोठ्या कांदा उत्पादन क्षेत्रांपैकी एक… मात्र सध्या बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळले आहेत… आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यात प्रभावित झाली… आणि त्याचा थेट फटका स्थानिक बाजाराला बसला… महिनाभरापूर्वी 1600 ते 1800 रुपये दर मिळणारा कांदा… आज केवळ 300 ते 800 रुपयांवर घसरला आहे… दरातील या मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे… साठवणूक, वाहतूक आणि मजुरी खर्चामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली है… बाईट (शेतकरी): "आम्ही एवढ्या मेहनतीने कांदा पिकवतो… पण आता बाजारात दरच मिळत नाही… खर्चही निघत नाही… सरकारने तातडीने मदत करावी…" दरम्यान, राज्य कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे… संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे मागणी केली आहे… बाईट :- रमेश सोनवणे, कांदा उत्पादक शेतकरी बाईट :- कांदा व्यापारी येवला, बाजार हस्तक्षेप योजना म्हणजेच MIS लागू केल्यास शेतकऱ्यांना किमान आधार मिळू शकतो… मात्र, सरकारने यावर तातडीने निर्णय घेतला नाही… तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप उफाळून येण्याची शक्यता आहे… एकीकडे युद्धाचे परिणाम जागतिक पातळीवर दिसत असताना… दुसरीकडे त्याची किंमत मात्र आपल्या शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे… आता सरकार तातडीने निर्णय घेणार का… की शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे…
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Mar 29, 2026 10:48:36
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 29, 2026 10:48:13
Beed, Maharashtra:बीड: खून, हाणामाऱ्यांनी हादरला बीड जिल्हा; ग्रामसभेत झालेला वाद उफाळून आला दोन गटात हाणामारी; जखमींवर उपचार सुरू... व्हिडिओ व्हायरल कधी खून तर कधी खुणाचा प्रयत्न आणि मारहाणी यामुळे बीड जिल्हा पुरताच हादरला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे भीषण चित्र समोर येत आहे. बीड तालुक्यातील कुमशी गावात दोन गट आपापसात भिडल्याने पाच जण जखमी आहेत. त्यातील दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत. कुमशी गावात ग्रामसभे दरम्यान करपे नामक गटाने गावातील कामांबाबत सरपंचाच्या गटाला जाब विचारला. यावरूनच दोन्ही गटात वाद निर्माण झाला एकमेकांवर दगडफेक आणि लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय. या घटनेत जखमी व्यक्तींवर उपचार सुरू असून पोलिसांकडून जखमींचा जबाब घेतला जातोय. पोलीस तपासात परस्पर विरोधी गुन्हा नोंदवला जाईल अशी माहिती देण्यात आली.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 29, 2026 09:50:41
Yeola, Maharashtra:जयकुमार रावल ऑन ऑपरेशन टायगर ऑपरेशन तूतारी होणार ज्योती वाघमारे महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत स्थिर आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली... सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काम करतय.... सर्व फोकस हा विकासावर आहे सामान्य लोकांना न्याय देण्यावर आहे... त्यामुळे अशा विषयाला वेळ नाही व त्यात तथ्य नाही जयकुमार रावल ऑन भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आहे. भोंदू प्रकार चाललेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे... कायद्याच्या चाकोरीत या सर्वांवर कारवाई होणार..... जसा जसा काळ वेळ जाईल तसे तसे प्रकरण उघडतील व जे कोणी दोषी असतील... मदतगार असतील त्यांच्यावर कायद्याचा बडगा होणार ... जयकुमार रावल ऑन झिरवळ प्रकरण व्यक्तिगत कोणाबद्दल काही सांगता येणार नाही.... सामाजिक कामात अनेक लोक भेटतात त्यांचा परिचय नसतो.... जोपर्यंत त्यांच्या कनेक्शन, त्यांच्या आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कोणावर आरोप लावणं योग्य होत नाही..... कायदा सर्वांसाठी समान आहे कोणी चुकीचे काम केले असेल तर कारवाई होणार... जयकुमार रावल ऑन कांदा प्रश्न युद्ध मुळे नक्कीच कांदा सह इतर पिकांना देखील परिणाम होतोय... मुख्यमंत्र्यांनी कांदा संदर्भात बैठक घेतली... कांदा संदर्भात शॉर्ट व लॉन्ग टर्म योजनांवर चर्चा झाली... तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. . त्याकरता कृषी सचिव पणन सचिव यांची समिती... नेमून अहवाल द्यावा व त्यानंतर शेतकऱ्यांना काय भरीव मदत देता येणार ती सरकार देणार...
1095
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 29, 2026 09:50:20
Bhandara, Maharashtra:Anchor – मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. समजा हे खरे असेल तर कारवाई होईल अशा सूचना दिल्या आहेत. या सरकारमध्ये अशा घटना होणं, आणि स्वतःला ही सरकार हिंदू धर्माचे पाईक आहोत म्हणणं. या पद्धतीचं सत्यव्रतीपना दाखवतात हे महाराष्ट्रात कुठेच नाही. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशी विचारायची वेळ आली आहे. त्यामुळे खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. आणि त्या भोंदू बाबा बरोबर भाजप आणि सत्तेतल्या अनेक नेत्यांच्या संबंध राहिलाय. या सरकारच हे सगळं पापाचं भांडं फोडायची वेळ आली आहे. यात ज्या पद्धतीने राजकारण केलं जातय. हे सगळे प्रकरण चाललं असताना फडणवीसांचे पोलीस झोपले होते का? सरकारच या व्यवस्थेला पाठीशी घालते का? हे सर्व प्रश्न आहेत. नरहरी झिरवड यांच्या वायरल व्हिडिओ बाबत विचारले असता‌... नाना पटोले बोलत होते. नाना पटोले, (1:42) ... Anchor – घरात आमच्या जे काही घडामोडी आहेत वागणं आहे. ज्या पद्धतीने ओशो ने पाणी दिले जायचं. त्यातच सगळं आहे त्या पद्धतीच्या संबंध ज्या लोकांचे त्याच्या आश्रम आणि ऑफिसमध्ये होते अमित शहा उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री हे पाहायला मिळतात. रूपाली चाकणकर ही महिला आहे त्यामुळे तिच्यावर आधी ॲक्शन घेऊन पदमुक्त केलं गेलं... मग बाकी लोकांना का बर पदमुक्त केलं नाही...? या पद्धतीच्या ही प्रश्न निर्माण होतो... मंत्रिमंडळात असलेल्या अमित शहाचा का राजीनामा घेतला जात नाही?? Anchor – मला असं वाटतंय की योजना सुरू झाल्या की त्यांनी बोंबाबोंब केली जात नाही. आमच्या काळात संजय गांधी निराधार योजना सुरू केली त्यामध्ये अनेक महिला पुरुष निर्धार होते पण काँग्रेसने कधीच या हप्त्यात पैसे सोडतो अशी प्रसिद्धी दिली नाही. त्यासाठी हे आपल्या घरचे पैसे देत नाहीयेत. जे सांगितलं होतं सत्ता आल्यानंतर 2100 रुपये देणार आता तर पंधराशे देत आहेत तेही तीन तीन महिन्यानंतर देतात ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना त्रास होऊन पैसे दिले जातात आणि अपात्रतेची यादी काढून अर्ध्यापेक्षाही कमी पात्र संख्या केली. त्या लाडक्या बहिणींशी यांनी धोकादायी केली आहे काँग्रेसने सत्तेच्या काळात कधीच असं केलं नाही. त्यावेळी ज्या योजना सुरू झाल्या त्या लोकांच्या योजना होत्या. भाजप दिखावा करते. मुख्यमंत्र्यांची घोषणा दिखाव्याची आहे. महागाई वाढली आहे त्याच बहिणीकडून पाच हजार रुपये दर महिन्याचे काढले जात आहेत त्यावरही त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. पुढील तीन दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.... यावर नाना पटोले बोलत होते. Anchor – एफ्स्टिन फाईल जी आहे, त्यात स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि आपल्या पंतप्रधानांचे नाव आहे. आणि जे ते हातात घेतात आणि पूर्ण करतात असं बोलत आहेत. ट्रम्पचं म्हणणं नेमकं काय याचा त्यांनी खुलासा करावा.... त्याच ट्रंम्पनी पाच मिनिटात मी मोदींचे राजकारण संपवू शकतो असं बोलले होते. ते कशासाठी बोलले होते..? आज देशात ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेल आणि गॅसचा तुटवडा आहे, सामान्य माणसं त्यात भरडली जात आहे त्याचे उत्तर देणार नाही का?? एकीकडे गोदी मीडिया ज्या पद्धतीने तारीफ केली तर वावाही दाखवतात... पण आता सामान्य जनता अडचणीत आहे त्यांच्या तोंडाचा घास हिसकावला जातोय सिलिंडर साठी लाईन लागल्यात ब्लॅक मार्केटिंग चालत आहे त्याच्यावरही उत्तर दिलं पाहिजे... हे सगळं पाप ट्रम्प आणि मोदींमुळे आहे आणि त्याचा परिणाम देश भोगत आहे.... Anchor – सरकारचे पद त्याच्या रुपयाचा निच्चांक होते त्याच्यावरून सरकारची पद कळते. असे हेच नरेंद्र मोदी काँग्रेस सरकारच्या वेळी सांगायचे.... आता नरेंद्र मोदींची पद संपली काय?? आणि त्यामुळे आता रुपया खाली पडत आहे. डॉलरच्या किमती वाढत आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे..... उद्या शंभर रुपयांवर येईल आपल्या रुपयाची शून्य किंमत झाली तेही नाकारता येणार नाही.... हेच मोदी त्यावेळी म्हणून भारताची मनमोहन सिंगवर आरोप करत होते मग आता नरेंद्र मोदी का बोलत नाही?? भारताची आणि देशाच्या रुपयाची पद घालवण्याचे काम नरेंद्र मोदी आणि भाजप करत आहे त्याच्या परिणाम देशातील सर्वसामान्य नागरिकांना भोगाव लागत आहे.... Anchor – अधिवेशनामध्ये सरकारने जी मनमानी केली, महाराष्ट्राच्या लोकशाहीची जी खून करण्याची पद्धत आपण पाहिली..... विरोधी पक्ष नेता नेमला गेला नाही, आणि त्यामुळे कामकाज पाहिजे तसा घेतला, दुरगामी परिणाम होतील असे कायदे राज्य सरकारने निर्माण केले त्यामध्ये धर्म स्वतंत्र्याचा कायदा, सहकारातला एक कायदा आणला असे खूप सारे कायदे महसूल चे कायदे त्यात व्यापाऱ्यांना उद्योगांना मोठा लोकांना फायदा होईल शेतकऱ्यांना बरोबर करायचं ठरवलं.... नगरपालिका महानगरपालिका च्या भागात त्यांनी टॅक्स वाढवण्यासाठी कायदे आणले.... सर्वसामान्य नागरिकांना लुटायचं आणि बहुमताच्या आधारावर हे कायदे पारित करायचे... पण विरोधी पक्ष जर सभागृहात असता तर कुठलाही कायदा आणायच्या आधी सरकारला विरोधी पक्षाला विचारावं लागतं... हे सरकार आहे हे लोकशाहीला मानणारं नाही त्यामुळे त्यांनी विरोधी पक्ष नेता नेमला नाही.... Anchor – भंडारा जिल्हा परिषदेच्या निधी वाटपात काही जिल्हा परिषद सदस्यांवर अन्याय झाला.... जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी या अन्याय विरोधात उपोषण सुरू केले आहे यावर नाना पटोले बोलत होते. Anchor – भंडारा नगरपरिषद जेव्हापासून भाजपच्या ताब्यात गेली तेव्हापासून तिला भ्रष्टाचाराची कीड लागली. तिरंगा झेंडा उभा केला त्यातही पैसे खाल्ले....नालीच्या कचऱ्यातही पैसे खाल्ले.... जी गटार योजना आणली गेली त्यातही पैसे खाल्ले.... सत्यनाश करून ठेवला.... आता भाजपला दोष द्यायचा की कुणाला दोष द्यायचा हेच कळत नाही.... आणि इतका भ्रष्टाचार असून सुद्धा पुन्हा राज्यात ते सत्तेत बसत असेल तर यावर विचार मंथन करायची वेळ आली आहे.... Anchor – हे रॉकेल तेल 80 रुपये लिटर मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं. आता गॅस तर सर्वांच्या घरी आहे, आणि सिलेंडर वाल्यांना जर रॉकेल दिले जात नाही तर हे रॉकेल कुणासाठी आणलं जात आहे?? हे अजून स्पष्ट केलं नाही. आता 86 रुपये लिटर हे रॉकेल मिळणार आहे हे कुणाला दिले जाईल? कुणाला पात्र ठरवलं जाईल? हे सर्व प्रश्न आले आहेत. हे स्पष्ट झाल्यावर हे सरकार गरिबांसाठी आहे की मोठ्या लोकांसाठी आहे हे त्यावेळी कळेल....
1024
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 29, 2026 09:50:00
Kalyan, Maharashtra:ANC- कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकां संपताच राजकीय घडामोडींना वेग आला असून, डोंबिवलीत उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठाचे डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष दिपेश म्हात्रे उपस्थित होते. या प्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकाश तेलगोटे यांनी उबाठा सोडण्यामागे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मनमानी आणि कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.
1069
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 29, 2026 09:17:02
Akola, Maharashtra:गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे अकोला जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून अन्वी मिर्झापूर येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळपासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांना चक्कर आल्याने ते कोसळले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि नियोजनाच्या पूर्ण अभावावर संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाट यांना गॅस सिलेंडरसाठी OTP मिळालेला होता. मात्र OTP मिळूनही त्यांनी सिलेंडर देण्यात आला नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गॅस एजन्सीकडे वारंवार चकरा मारूनही सिलेंडर मिळत नसल्यामुळे ते सकाळपासून रांगेत होते. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. उपस्थित नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “OTP मिळाल्यानंतरही नागरिकांना सिलेंडरसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असेल तर ही व्यवस्था कोणासाठी आहे?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळेच हा मृत्यू झाल्याचा थेट आरोप करण्यात येत आहे. शिरसाट यांच्या निधनानंतर गावात शोककळा पसरली असून आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेमुळे गॅस तुटवड्याचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागरिकांना OTP मिळूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप खरा असेल, तर ही केवळ निष्काळजीपणा नसून थेट प्रशासनाचे अपयश मानावे लागेल, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
1020
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 29, 2026 08:33:09
Pune, Maharashtra:Headline : कामकाज करत असताना दादांची उणीव भासत आहे. - सुनील शेळके Anchor : -दादांच अपघाती निधन झालं. त्यांनतर शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी चर्चा झाली सांगितलं. दादांसोबत भेट झाली सांगितलं. दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. -dदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा. -ती भूमिका वरिष्ठ नेत्यांनी पार पाडली. -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, आनंद आहे. -राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होईल -व्यक्तिगत स्वार्थ असलेला विरोध करेल. -सुनेत्रा पवार यांचा नेतृत्व मान्य असेल तर एकसंघ होतील. नेतृत्व मान्य नसेल तर दुसऱ्या पक्षाचा पर्याय शोधला जाईल. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित दादांच्या अपघातच सत्य सर्वांसमोर आणतील. बाईट : सुनील शेळके, आमदार, मावळ (file no.01)
1097
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 29, 2026 08:31:59
Varasoli, Maharashtra:रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवार, अजित पवारांसह पक्ष श्रेष्टींचे फोटो गायब झाल्याचे समोर आले आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघांतील इंदापुर येथे माणगांव तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपिठावरील बॅनरवर खा. सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले मात्र या बॅनरवर स्वर्गीय अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आले नाहीत. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब होत असल्याने राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
971
comment0
Report
RMRavindra Manohar Kokate
Mar 29, 2026 08:21:53
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात दोन पर्यटक बुडाले. एकाचा मृत्यू, दुसऱ्याला वाचविण्यात यश. घटनेची माहिती आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या sुमारास झाली. स्थानिक ग्रामस्थ आणि येथील पोलिस पाटील आदेश कदम यांनी दोघांना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष शशिकांत भानुशाली असं मृत व्यक्तीचं नाव असून ते पालघरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सुयोग राजेश भानुशाली असं बचावलेल्या तरुणाचं नाव आहे. पालघर येथून हे कुटुंब रविवारी सकाळी आरे वारे येथे दाखल झाले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोघे समुद्रात बुडाले. यातील एकाचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं.
1057
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 29, 2026 08:20:52
1064
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 29, 2026 08:16:17
Ahilyanagar, Maharashtra:आखाती देशात सुरू झालेल्या युद्धामुळे देशातील इंधनावर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे प्रामुख्याने एलपीजी गॅस बाबत देशभरात खबरदारी घेतली जात आहे घरगुती वापरासाठी एलपीजी गॅस मिळत असला तरी व्यावसायिक गॅस वितरण बंद करण्यात आला आहे याचा फटका प्रामुख्याने हॉटेल व्यवसायिकांना बसला आहे त्यामुळे हॉटेल व्यवसायिक असा जळाऊ लाकडाचा वापर करून व्यवसाय करत आहेत. अचानक जळाऊ लाकडाची मागणी वाढल्यामुळे सॉ मिल मध्ये चालकाचे व्यवस्थापन बिघडत आहे कारण ग्रामीण भागातून मिळणार जळावू लाकूड ग्रामीण भागातच विकला जात आहे आणि शहरातून देखील जळावू लाकडाची मागणी वाढत आहे सॉ मिल वरून याच वाढलेल्या जळाऊ लाकडाच्या मागणीचा आढावा घेऊन मालकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
1062
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 29, 2026 07:47:22
Beed, Maharashtra:बीड: चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात; पंकजा मुंडेंचा अंबाजोगाईत कार्यकर्त्यांना सज्जड दम अंबाजोगाईत भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आणि कठोर संदेश दिला आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगातच असते, असा थेट इशारा त्यांनी दिला. ज्याची ऐपत दहा पैशांची आहे त्याने पंधरा पैसे कमवावेत, पण दहा पैशांची ऐपत असताना शंभर रुपये कमवण्याचा मोह केला तर त्याचे ठिकाण तुरुंगातच असते, असेही त्या म्हणाल्या. चुकीची कामे सांगू नका, प्रामाणिकपणे काम करा आणि समाजासाठी कार्य करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. राजकारणात काही जण कारस्थाने करतात, पण ज्याच्या मनात पाप नसते त्याला देवाचा आशीर्वाद असतो, असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला.
1096
comment0
Report
Advertisement
Back to top