Back
OTP मिलने के बाद भी गैस नहीं मिला, अकला में बुजुर्ग की मौत पर आक्रोश
JJJAYESH JAGAD
Mar 29, 2026 09:17:02
Akola, Maharashtra
गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे अकोला जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून अन्वी मिर्झापूर येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळपासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांना चक्कर आल्याने ते कोसळले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि नियोजनाच्या पूर्ण अभावावर संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाट यांना गॅस सिलेंडरसाठी OTP मिळालेला होता. मात्र OTP मिळूनही त्यांनी सिलेंडर देण्यात आला नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गॅस एजन्सीकडे वारंवार चकरा मारूनही सिलेंडर मिळत नसल्यामुळे ते सकाळपासून रांगेत होते. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. उपस्थित नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “OTP मिळाल्यानंतरही नागरिकांना सिलेंडरसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असेल तर ही व्यवस्था कोणासाठी आहे?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळेच हा मृत्यू झाल्याचा थेट आरोप करण्यात येत आहे. शिरसाट यांच्या निधनानंतर गावात शोककळा पसरली असून आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेमुळे गॅस तुटवड्याचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागरिकांना OTP मिळूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप खरा असेल, तर ही केवळ निष्काळजीपणा नसून थेट प्रशासनाचे अपयश मानावे लागेल, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 29, 2026 10:48:360
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 29, 2026 10:48:130
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 10:47:240
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 10:17:381061
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:50:411095
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 29, 2026 09:50:201026
Report
ABATISH BHOIR
FollowMar 29, 2026 09:50:001069
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:31:101052
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 29, 2026 08:33:091097
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 29, 2026 08:31:59971
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 08:21:531057
Report
JMJAVED MULANI
FollowMar 29, 2026 08:20:521064
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 29, 2026 08:16:171062
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 29, 2026 07:47:221096
Report