Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

सरपंच आरक्षण में चूक: तहसीलदार को कार्यमुक्त कर दूसरे जिले में भेजा गया

SMSATISH MOHITE
Nov 05, 2025 09:47:11
Nanded, Maharashtra
सरपंच आरक्षण में चूक के कारण एक तहसीलदार को कार्यमुक्त किया गया। नांदे जिले के हदगांव स्थित तहसीलदार सुरेखा नांदे ने सरपंच आरक्षण में जानबूझकर गलत आरक्षण किए जाने की शिकायतें प्राप्त होने पर कार्रवाई की गई थी। राज्य निर्वाचन आयोग ने इस संदर्भ में जांच के आदेश दिए थे। जिलाधिकारी ने एक जांच समिति नियुक्त की। समिति की जांच में तहसीलदार नांदे ने आरक्षण प्रक्रिया में बड़ी गलतियां पाईं। इसके अनुसार उन्हें कार्यमुक्त कर दूसरे जिले से संबद्ध किया गया है, यह जानकारी जिलाधिकारी कर्डीले ने दी।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Nov 05, 2025 12:29:36
Chandrapur, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीजवळ 'नागेपल्ली' येथील आशीर्वाद हॉस्टेलवर ऐतिहासिक कारवाई, मान्यता नसताना ख्रिश्चन संस्थेने चालविले होते अवैध हॉस्टेल, बहुतांश आदिवासी मुलेमुली होती दाखल, शासकीय पथकाने 91 बालकांचे केले स्थानांतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन, पोलीस आणि बालकल्याण विभागाची संयुक्त कारवाई. बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि अनधिकृत संस्थांवर कारवाईचा बडगा उगारत, गडचिरोली जिल्हा प्रशासनाने अहेरी तालुक्यात मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. शासकीय सर्वेक्षणात अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील आय. टी. आय. (ITI) जवळ असलेले 'आशीर्वाद हॉस्टेल' हे अनधिकृत बालगृह असल्याचे उघड झाले. या संस्थेवर धाड टाकून 49 मुली व 42 मुले अशा एकूण 91 निराधार बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या सुटका करण्यात आली आहे. ही संस्था बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम तरतुदींचे सर्रास उल्लंघन करून विनापरवाना चालवत होती. अशा विनापरवाना संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवून त्यांचे शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक शोषण होण्याचा धोका असल्याने, प्रशासनाने तातडीने कठोर भूमिका घेतली. 11 वर्षांपासून सुरू असलेल्या या हॉस्टेलमध्ये एकूण 90 मुले (48 मुली, 42 मुले) दाखल असल्याचे आढळले. संस्थेकडे कोणतीही अधिकृत मान्यता किंवा नोंदणी प्रमाणपत्र नव्हते. या संस्थेत केवळ ख्रिश्चन धर्म प्रसाराचे साहित्य आढळून आले. अनधिकृत संस्थेतील सर्व संबंधित दस्तऐवज तातडीने ताब्यात घेण्यात आले. सर्व बालकांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी तात्पुरत्या निवारा आणि पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 12:06:46
Jalna, Maharashtra:जालना : सुरक्षा रक्षकाकडून 60 वर्षीय वृद्धाला अमानुष मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू; मध्यरात्री गुन्हा दाखल, भोकरदन बस स्थानकावरील घटना अँकर : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील बस स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. बसस्थानकामध्ये सुरक्षा रक्षकाने केलेल्या मारहाणीत 60 वर्षीय मजीद खा अन्वर खा या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय. मजीद खा लघुशंकेसाठी जात असताना सुरक्षा रक्षक सुरेश वनारसे याला संशय आला. त्याने कोणतीही चौकशी न करता लाठीने वृद्धाला बेदम मारहाण केली.यानंतर गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.या घटनेची माहिती पोलिसांना रात्री उशिरा मिळाली, त्यानंतर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र उपचारादरम्यान पहाटे मजीद खा यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिक आणि नातेवाईकांनी आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 05, 2025 11:42:38
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये प्रदूषणाचा रात्रीस खेळ चाले! रात्री २ वाजेपर्यंत एमपीसीबी अधिकाऱ्यांकडून पाहणी अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री पुन्हा एकदा प्रदूषणकारी कंपन्यांनी गॅस उत्सर्जन केल्यामुळे संपूर्ण शहरात रासायनिक धूर और उग्र दर्प पसरला होता. याची तक्रार एमपीसीबीकडे केल्यानंतर रात्री २ वाजेपर्यंतएमपीसीबी अधिकाऱ्यांनी संपूर्ण अंबरनाथ शहरात प्रदूषणाची पाहणी केली. अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतून मागील काही दिवसात सातत्याने गॅस सोडण्याच्या घटना घडत असून एमपीसीबी कडून कंपन्यांवर कारवाई होऊन देखील प्रदूषण मात्र कायम आहे. मंगळवारीही मोरीवली एमआयडीडीसीतून अशाच पद्धतीने सोडण्यात आलेला गॅस संपूर्ण अंबरनाथ शहरात पसरला होता. याची माहिती एमपीसीबी अधिकाऱ्यांना देताच एमपीसीबी अधिकाऱ्यांनी निसर्ग ग्रीन परिसरात येऊन रात्री दोन वाजेपर्यंत पाहणी केली. या प्रदूषणकारी कंपन्यांवर केवळ कागदी कारवाई न करता कठोर कारवाई तातडीने करावी अशी मागणी नागरिकांनी केली. त्यामुळे एमपीसीबीच्या कारवाईलाही न घाबरणाऱ्या प्रदूषणकारी कंपन्यांवर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 05, 2025 11:42:02
Nagpur, Maharashtra:नागपुर नागनदी के प्रश्न पर कांग्रेस ने नागपुर में पर्यावरण विभाग को निवेदन दिया। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ने देशभर की प्रदूषित नदियों की सूची जारी की है, जिसमें नागपुर की नागनदी का उल्लेख नहीं है। कांग्रेस ने इस मुद्दे पर केंद्रीय पर्यावरण मंत्रालय पर निशाना साधा है। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के सचिव केतन विकास ठाकरे के नेतृत्व में कांग्रेस कार्यकर्ताओं ने पर्यावरण विभाग के अधिकारियों को 9 सील बंद Botty में नाग दी के दूषित पानी के नमूने सौंपे। कांग्रेस कार्यकर्ताओं ने Civil Lines, नागपुर स्थित केंद्रीय सचिवालय के पर्यावरण विभाग में धावा बोला। कांग्रेस के प्रतिनिधि मंडल ने नाग नदी के विविध स्थानों से इकट्ठे किए गए दूषित जल नमूनों को पर्यावरण मंत्रालय के अधिकारियों को सौंपा और केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव के नाम एक निवेदन भी दिया। नाग नदी की वास्तविक स्थिति और प्रदूषण स्तर आधिकारिक रिकॉर्ड में प्रतिबिंबित नहीं होने का मुद्दा कांग्रेस ने गंभीरता से उठाया। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ने हाल ही में देशभर के 271 प्रदूषित नदियों की सूची जारी की है, जिसमें महाराष्ट्र के 54 नदियाँ शामिल हैं, फिर भी नागपुर की नाग नदी इस सूची में नहीं होने पर स्थानीय नागरिकों और पर्यावरण प्रेमियों के अनुसार स्थिति अत्यंत दयनीय है। वहां का पानी गंभीर रूप से दूषित है और स्वास्थ्य के लिए हानिकारक माना जाता है। निरंतर दुर्गंध, कचरा और शहर के untreated wastewater के प्रवाह के कारण नाग नदी का स्वरूप पूरी तरह बदल गया है। इस स्थिति में इस नदी को प्रदूषित नदियों की सूची में स्थान न मिलना पर्यावरण विभाग के अधिकारियों की कार्यशैली पर सवाल उठाता है।
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 05, 2025 11:41:22
Baramati, Maharashtra:पुण्याच्या इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग.... शहा परिवाराकडून घरोघरी जात प्रचाराचा शुभारंभ...... माजी नगराध्यक्ष अंकिता शहा करतायेत भरत शहांचा प्रचार..... पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न..... माजी उपनगराध्यक्ष भरत शहा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार.... इंदापूर नगर परिषदाच्या निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदासाठी इंदापूर मधील शहा परिवार मैदानात उतरला आहे. शहा परिवारातील इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इंदापूर मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून शहा परिवारांन प्रचाराचा शुभारंभ देखील केलाय.... माजी नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा आणि वैशाली शहा यांसह शहा समर्थक घरोघरी जाऊन पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहेत.शहा परिवारातील अंकिता मुकुंद शहा या इंदापूर नगरपरिषदेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष होत्या. मागील पाच वर्ष इंदापूर नगर परिषदेवरती शहा परिवाराची सत्ता राहिली आहे. आता त्याच कुटुंबातील माजी उपनगराध्यक्ष भरत शहा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 05, 2025 11:36:24
Washim, Maharashtra:अँकर: राज्यामध्ये नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. बैठकनंतर माध्यमाशी संवाद साधताना कृषिमंत्री भरणे म्हणाले की, "कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर निवडणूक लढवण्याची असली, तरी युती संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघे मिळून घेतील." **केंद्राच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर प्रतिक्रिया** सोलापूर जिल्ह्यात केंद्राच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्याबाबत बोलताना मंत्री भरणे म्हणाले की, "केंद्राच्या पथकाने दिवसभर पाहणी केली आणि रात्री टॉर्चच्या प्रकाशात काही भागांची पाहणी केली. पाहणी कोणत्या वेळी केली हा मुद्दा महत्त्वाचा नाही; शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळणं हेच अधिक महत्त्वाचं आहे." ते पुढे म्हणाले, “निकषांच्या आधारे निश्चितच केंद्र सरकारकडून राज्याला मदत मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. **उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर प्रतिक्रिया** उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याबाबत विचारले असता मंत्री भरणे म्हणाले की, "लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपापल्या पद्धतीने दौरे करण्याचा अधिकार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पाठीशी पाठीशी उभ राहून त्यांच्या समस्या सोडविने गरजेचं आहे, हे सरकार 30 जूनच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी करेल असं वक्तव्य मंत्री भरणे यांनी केलं आहे."
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 05, 2025 11:32:31
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात निवडणुकीचा बिगुल, दहा नगरपरिषद व एका नगरपंचायतीत २ डिसेंबरला मतदान अँकर:---तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, तत्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, चिमूर, मूल, नागभीड या दहा नगरपरिषदांसह भिसी नगरपंचायतीत मतदान पार पडणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे अनेक इच्छुक नगरसेवक आणि नगराध्यक्ष उमेदवारांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. अखेर निवडणुकीची घोषणा झाल्याने त्यांची प्रतीक्षा संपली असून राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राजकीय दृष्ट्या पाहता, चंद्रपूर जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्र भाजपच्या ताब्यात आहेत — बल्लारपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आणि चंद्रपूर. तर ब्रह्मपुरी हे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखालील एकमेव मतदारसंघ आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे. तसेच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठीही ही निवडणूक एक महत्त्वाची कसोटी ठरणार आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप-महायुती सरकारमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल लोकसभेचा परावर्तक ठरेल की विधानसभेचा, हे मतदारच ठरवणार आहेत. दरम्यान, घुग्घुस आणि भिसी येथे ऐतिहासिक निवडणुका होणार आहेत. घुग्घुस ग्रामपंचायाचीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर येथे प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर भिसी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर तेथील ही पहिलीच निवडणूक असल्याने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या सार्वत्रिक निवडणुकीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले असून, आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे कशी पालटतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 11:08:57
Dhule, Maharashtra:सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये प्राथमिक शिक्षण सातपुड्यातील सुहासने गगनभरारी घेतली आहे. गरीबीवर मात करत, आदिवासी यां तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात 9 वा क्रमांक पटकवट सुहासने सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर नियुक्ती मिळवली आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून आलेल्या एका जिगरबाज तरुणाने आपल्या athक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांच्या जगात एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे. मोलगी परिसरातील सोराचापडा या छोट्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या सुहास धरमसिंग वसावे या तरुणाने, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात नववा 9 वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले असून, त्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर त्याची नियुक्ती होणार आहे. सुहास वसावेच्या या यशाने सातपुड्याच्या कुशीत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुहास वसावे यांचे वडील धरमसिंग वसावे हे कोरडवाहू शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. वडिलांच्या संघर्षातून प्रेरणा घेत सुहासने आपला शिक्षणाचा प्रवास खडतर परिस्थितीतून पूर्ण केला. आर्थिक किंवा भौगोलिक अडचण यशाच्या मार्गात बाधा आणू शकत नाही. आदिवासी पाड्यातून आलेल्या या तरुणाने परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या दैदিপ्यमान यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी भागातील तरुणांसाठी आशेचा एक नवा किरण निर्माण झाला आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 05, 2025 11:07:21
Chendhare, Alibag, Maharashtra:Slg - रायगडात राष्ट्रवादी शिवसेना वाद संपेना ...... महेंद्र दळवी यांचे सुनीل तटकरे यांच्यावर टीकास्त्र ...... ठाकरे गटाशी केलेल्या युतीला जशास तसे उत्तर देऊ ......महेंद्र दळवी यांचा इशारा ...... अँकर - रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद संपायचं नाव घेत नाही. अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आज पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. आमच्याशी वैर असणाऱ्यांशी युती करणं हे त्यांचं नेहमीचच आहे. कर्जत मध्ये ठाकरे गटाशी जी राष्ट्रवादीची युती झाली आहे ती जगजाहीर आहे. त्या बैठकीचे फोटो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले आहेत. आणि त्यामागे सुनील तटकरे हेच आहेत असा आरोप महेंद्र दळवी यांनी केलाय. महायुतीत सत्तेत आहेत मात्र आम्ही मात्र युतीचा धर्म पाळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सुनील तटकरे यांनी ठाकरे गटाशी युती केली आहे त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिलाय. बाईट - महेंद्र दळवी
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 10:59:22
Dhule, Maharashtra:अर्जेंटिनाच्या क्रुषी खात्याचे ॲटेच मंत्री मेरीडाने बहरीन यांनी धुळे जिल्ह्यातील केशरानंद जिनींग ला भेट दिली असून, त्यांनी दाऊळ गावातील शेतकरी बांधव यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. शेतकरी जे काम शेतात करतात आणि ज्याप्रकारे ते हवामान, पाऊस, थंडी आणि उन्हाळा अशा सगळ्या परिस्थितींना सामोरे जातात, ते काम जगात कुठेही अत्यंत कठीण असते. इथे भारतात लोक शेतकऱ्यांबद्दल जो आदर आणि प्रेम बाळगतात, तो खरोखरच कौतुकास्पद आहे, असं त्यांनी उवेळी सांगितले. मला वाटते की भारतात राजकारणदेखील शेतीशी खूप जवळून जोडलेले आहे, कारण शेतकरी हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत, असं बहरीन यांनी सांगितले. माझ्यासाठी इथे येऊन तुम्हाला भेटणे, आणि तुम्ही कापूस कसा पिकवता, शेती कशी करता हे पाहणे, हा एक सन्मान आहे, असल्याचे बहरीन यांनी सांगितले. भारत आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 05, 2025 10:51:48
0
comment0
Report
Advertisement
Back to top