Back
चंद्रपूर में चुनाव बिगुल: 2 दिसम्बर को 10 नगरपरिषद और एक नगर पंचायत में मतदान
AAASHISH AMBADE
Nov 05, 2025 11:32:31
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात निवडणुकीचा बिगुल, दहा नगरपरिषद व एका नगरपंचायतीत २ डिसेंबरला मतदान अँकर:---तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, तत्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, चिमूर, मूल, नागभीड या दहा नगरपरिषदांसह भिसी नगरपंचायतीत मतदान पार पडणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे अनेक इच्छुक नगरसेवक आणि नगराध्यक्ष उमेदवारांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. अखेर निवडणुकीची घोषणा झाल्याने त्यांची प्रतीक्षा संपली असून राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राजकीय दृष्ट्या पाहता, चंद्रपूर जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्र भाजपच्या ताब्यात आहेत — बल्लारपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आणि चंद्रपूर. तर ब्रह्मपुरी हे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखालील एकमेव मतदारसंघ आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे. तसेच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठीही ही निवडणूक एक महत्त्वाची कसोटी ठरणार आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप-महायुती सरकारमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल लोकसभेचा परावर्तक ठरेल की विधानसभेचा, हे मतदारच ठरवणार आहेत. दरम्यान, घुग्घुस आणि भिसी येथे ऐतिहासिक निवडणुका होणार आहेत. घुग्घुस ग्रामपंचायाचीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर येथे प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर भिसी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर तेथील ही पहिलीच निवडणूक असल्याने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या सार्वत्रिक निवडणुकीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले असून, आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे कशी पालटतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowNov 05, 2025 13:32:050
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 05, 2025 13:27:270
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 13:27:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 05, 2025 13:25:540
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 05, 2025 13:25:330
Report
AKAMAR KANE
FollowNov 05, 2025 13:11:560
Report
ABATISH BHOIR
FollowNov 05, 2025 13:03:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 12:41:460
Report
ABATISH BHOIR
FollowNov 05, 2025 12:41:340
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 05, 2025 12:29:360
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 12:06:460
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 05, 2025 11:42:380
Report
AKAMAR KANE
FollowNov 05, 2025 11:42:020
Report
JMJAVED MULANI
FollowNov 05, 2025 11:41:350
Report
JMJAVED MULANI
FollowNov 05, 2025 11:41:220
Report