Back
सतपड़े के आदिवासी सुहास वसावे ने एमPSC में नौवां स्थान पाया, आयुक्त बनने की राह
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 11:08:57
Dhule, Maharashtra
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये प्राथमिक शिक्षण सातपुड्यातील सुहासने गगनभरारी घेतली आहे. गरीबीवर मात करत, आदिवासी यां तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात 9 वा क्रमांक पटकवट सुहासने सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर नियुक्ती मिळवली आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून आलेल्या एका जिगरबाज तरुणाने आपल्या athक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांच्या जगात एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे. मोलगी परिसरातील सोराचापडा या छोट्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या सुहास धरमसिंग वसावे या तरुणाने, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात नववा 9 वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले असून, त्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर त्याची नियुक्ती होणार आहे. सुहास वसावेच्या या यशाने सातपुड्याच्या कुशीत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुहास वसावे यांचे वडील धरमसिंग वसावे हे कोरडवाहू शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. वडिलांच्या संघर्षातून प्रेरणा घेत सुहासने आपला शिक्षणाचा प्रवास खडतर परिस्थितीतून पूर्ण केला. आर्थिक किंवा भौगोलिक अडचण यशाच्या मार्गात बाधा आणू शकत नाही. आदिवासी पाड्यातून आलेल्या या तरुणाने परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या दैदিপ्यमान यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी भागातील तरुणांसाठी आशेचा एक नवा किरण निर्माण झाला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 05, 2025 13:11:560
Report
ABATISH BHOIR
FollowNov 05, 2025 13:03:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 12:41:460
Report
ABATISH BHOIR
FollowNov 05, 2025 12:41:340
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 05, 2025 12:29:360
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 12:06:460
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 05, 2025 11:42:380
Report
AKAMAR KANE
FollowNov 05, 2025 11:42:020
Report
JMJAVED MULANI
FollowNov 05, 2025 11:41:350
Report
JMJAVED MULANI
FollowNov 05, 2025 11:41:220
Report
SKShubham Koli
FollowNov 05, 2025 11:40:260
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 05, 2025 11:36:240
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 05, 2025 11:32:310
Report
PNPratap Naik1
FollowNov 05, 2025 11:07:490
Report