Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Hingoli431513

हिंगोली में पेट्रोल-डिज़ल की कमी, पंपों पर भीड़ और शून्य स्टॉक सामने

GMGajanan MAchindar
Mar 25, 2026 10:32:58
Hingoli, Maharashtra
अँकर - हिंगोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला आहे, सकाळपासून अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा संपल्याने अनेक पेट्रोल पंपावर शुकशुकाट पसरला आहे तर बहुतांश पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिक कॅन मध्ये डिझेल भरण्यासाठी गर्दी करत आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल संपल्याने शुकशुकाट पसरला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Mar 25, 2026 11:46:22
Beed, Maharashtra:बीड: अखेर सीआइडीने देखील गुडघे टेकले, फरार आरोपी कृष्णा आंधळेचा माग सांगा अन् लाखाचं बक्षीस मिळवा... सीआइडीची घोषणा... PKG ग्राफिक्स फरार आरोपी कृष्णा शामराव आंधळे वाल्मिक कराडचा निकटवर्तीय असलेला कृष्णा, धारूर-परळी परिसरात सक्रिय असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अवघ्या २० व्या वर्षी गुन्हेगारीत पाऊल टाकलेल्या कृष्णावर बीड जिल्ह्यात अनेक मारामारी, गुंडगिरी आणि भाईगिरीचे गुन्हे आहेत. ९ डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी असून, तो दिड वर्षांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत फरार आहे. २०२३ मध्ये हत्येचा प्रयत्न (कलम ३०७) केल्याचा गुन्हाही त्याच्यावर नोंदवला गेला होता....
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 25, 2026 11:38:36
Navi Mumbai, Maharashtra:भोंदूगिरीतून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांच्या मालमत्तेचे धागेदोरे आता पनवेलपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सातबाऱ्याची नोंद झाल्याचे उघड झाले असून या जमीन व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये दिल्याची चर्चा आहे. नोंदणी प्रक्रिया तातडीने करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी यामध्ये मदत केल्याची चर्चा आहे. दरम्यान पनवेलमध्ये वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिक नफा मिळवण्यासाठी खरात याने गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र या व्यवहारासाठी वापरलेली कोट्यवधींची रक्कम कुठून आली याची देखिल चौकशी करण्याची मागणी होतेय.
348
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 25, 2026 11:23:03
Shirdi, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथे भोंदूबाबा अशोक खरात याच्या साम्राज्यावर नवे प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. शिवनिका संस्थानच्या माध्यमातून उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिर परिसरात अघोरी तंत्र-मंत्र केल्याची चर्चा आधीच सुरू असताना , आता मंदिरामागील विहीर संशयाच्या केंद्रस्थानी आली आहे. फार्महाऊस आणि मंदिराच्या मधोमध असलेल्या या विहीरीजवळ भोंदूबाबा अघोरी पूजा करत असल्याची चर्चा सुरू असून पोलिसांनी व्यक्त केलेला नरबळीचा संशय अधिकच गडद होतो आहे. शेतात किंव्हा विहीरीत काही गुपित दडलं असल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिस तपासाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी घेतलाय आढावा
904
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 25, 2026 10:35:36
Jalna, Maharashtra:जालना : महापालिकेतील विषय समित्यांचे सभापती अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर(पॅकेज) बसण्यासाठी खुर्च्या मिळत नसल्याने सभापती हतबल सभापती, विरोधी पक्षनेत्यांना, केबिन मिळेना अँकर: जालना महापालिका अस्तित्वात येऊन आता 3 वर्ष उलटलेत. मात्र तरीही महापालिका प्रशासनाने विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतीना दालनाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे महापालिकेत बसावं तरी कुठे असा प्रश्न पडलेल्या सभापतींनी थेट त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून खुर्च्या बळकावणं सुरू केलंय. बाईट: विरेंद्र धोका, नगरसेवक, भाजपा(हिरवा शर्ट असलेले) ग्राफिक्स व्हिओ: महापालिका अस्तित्वात येऊन कुणाला केबिन मिळाली आणि कुणाला नाही यावर एक नजर टाकूयात महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह भाजप गटनेते महेश निकम आणि स्वच्छता सभापती कपिल भुरेवाल यांनाच केबिन मिळालीय. स्थायी समितीचे सभापती- अशोक पांगारकर पाणीपुरवठा सभापती - पूनम स्वामी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते - कमलेश खैरे बांधकाम सभापती- माया जोशी बांधकाम उपसभापती- ऐश्वर्या आडेकर स्वच्छता आणि आरोग्य उपसभापती अनामिका पांगारकर यांच्यासह शिक्षण विभागाच्या सभापतींना केबिन मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जालना महापालिकेत अधिकाऱ्यांच्या केबिन आणि खुर्च्या बळकावण्याची वेळ विषय समित्यांच्या सभापतीवर आलीय. दरम्यान, महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्यानं आयुक्तांचा अतिरिक्त पदभार हा जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वच सभापतीसाठी केबिनची मागणी करण्यात आली असून महिनाभरात सर्व सभापती, विरोधी पक्षनेत्यांच्या केबिनची व्यवस्था होईल अशी प्रतिक्रिया स्थायी समिती सभापती अशोक पांगारकरांनी दिलीय. व्हिओ: विषय समित्यांचे सभापती, विरोधी पक्षनेमधील गटनेते, विरोधी पक्षनेते यांना केबिन न मिळाल्यानं सध्या महापालिकेत अधिकारी विरुद्ध सभापती असा सुप्त संघर्ष सुरुय. अधिकारी त्यांच्या केबिन आणि खुर्च्या सोडायला तयार नाही. आणि सभापती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही अशी स्थितीय.
1046
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 25, 2026 10:35:02
955
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 25, 2026 10:20:51
Malegaon, Maharashtra:नाशिक के मनमाड शहर के अंकई शिवार में शेतातून जाणाऱ्या इंधन वाहिनी पाईपलाईनला अचानक गळती होऊन आग लागलेची धोक्याची घंटा वाजली. सर्वत्र धावपळ सुरू झाली. अग्निशमन दल व रुग्णवाहिका वाहने सायरन बजवून गावात पोहचलीं. गावातून जाणाऱ्या तेल कंपनीच्या वाहिनीला आग लागल्याच्या चर्चेने ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु ही आग नसून इंधन वाहून नेणाऱ्या वाहिनीला अचानक गळती होऊन आग लागल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जीआयंट ऑफ साइट मॉक ड्रिल अर्थात प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे समजतात. शेतात इंधन वाहिनीला गळती होऊन आग लागते. आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याचे चित्तथरारक प्रत्य SXाक्षिके यावेळी सादर करण्यात आली. या प्रात्यक्षिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
1067
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 10:07:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर तब्बल ३ हजार २०० कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पातून शहराच्या सर्वांगीण आधुनिकीकरणावर भर ANCHOR: छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. तब्बल ३ हजार २०० कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पातून शहराच्या सर्वांगीण आधुनिकीकरणावर भर देण्यात आला असून महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्थायी समितीसमोर हा अर्थसंकल्प सादर केला. शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा करण्यावर प्रशासनाचा विशेष फोकस दिसून येत आहे. या अर्थसंकल्पात सिटी सेंट्रल पार्क, मल्टी लेव्हल पार्किंग प्रकल्प, पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी EV चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला आहे. महापालिकेच्या वीज खर्चात बचत करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, अतिक्रमणमुक्त DP रस्त्यांची रुंदीकरण यालाही प्राधान्य देण्यात आले आहे. पर्यटनवाढीच्या दृष्टीने शहरात डबलडेकर बस सुरू करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्थायी समितीने या अर्थसंकल्पावर सखोल चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा करून अंतिम मंजुरी दिली आहे.
1086
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 25, 2026 10:07:09
Akola, Maharashtra:मध्य-पूर्व भागात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता इंधन बाजारावरही दिसून येत आहे. एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम झाल्याने अकोला शहरातील अनेक गॅस पंपांवर सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे ऑटो चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून काही ठिकाणी गॅससाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अकोला शहरातील एलपीजी गॅस पंपांवर सध्या गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे ऑटो चालकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. शहरातील विविध गॅस पंपांवर ऑटो रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी ही रांग दीड ते दोन किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. भर उन्हात चालकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत असल्याने त्यांच्या दैनंदिन कमाईवरही मोठा परिणाम होत आहे. अनेक चालकांनी गॅस वेळेवर न मिळाल्यामुळे दिवसभराचा व्यवसाय ठप्प झाल्याची नाराजी व्यक्त केली आहे. युद्ध परिस्थितीमुळे इंधन पुरवठा विस्कळीत होत असल्याचे सांगितले जात असले तरी स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता ऑटो चालकांकडून केली जात आहे.
985
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 25, 2026 10:02:51
Kolhapur, Maharashtra:व्यावसायिक गैसचा पुरवठा ठप्प झाल्याने कोल्हापुरातील होटल आणि केटरिंग व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सध्या शहरातील केवळ 30 टक्के हॉटेल्स सुरू असून उर्वरित व्यवसाय ठप्प आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या GR नुसार व्यावसायिक गॅसचा नियमित पुरवठा करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, केटरिंग ओनर्स असोसिएशन आणि हॉटेल मालक संघाने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे. हॉटेल आणि केटरिंग व्यवसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. LPG गॅसअभावी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना तात्काळ व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देत व्यवसायांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
1018
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 25, 2026 09:34:08
Kalyan, Maharashtra:डोंबिवली के पार्किंग में चुल्हे, गैस टंचाईमुळे हॉटेल्सच्या पार्किंगमध्ये पेटल्या चुली. धुरामुळे कर्मचारी आजारी, हॉटेल व्यवसायावर बंद होण्याची वेळ येत आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल संघर्षाचे पडसाद आता थेट सामान्य माणसाच्या ताटापर्यंत आणि हॉटेल व्यावसायिकांच्या चुलीपर्यंत पोहोचले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून, डोंबिवलीतील हॉटेल व्यावसायिकांवर अडचण आली आहे. ज्या ठिकाणी हाय-टेक गॅस यंत्रणा होती, तिथे आता पार्किंगमध्ये चुली पेटवून स्वयंपाक करावा लागत आहे. हॉटेल चालकांनी सिलेंडरवर उपाय निघाला, पार्किंगमध्ये चुली मांडली मात्र या चुलीमुळे धुराने कर्मचारी आजारी पडत आहे आणि ग्राहकांनीही पाठ फिरवल्याने हॉटेल मालक हतबल झाले. युद्ध देशांच्या सीमेवर होतंय, पण त्याची झळ डोंबिवलीतील रेस्टॉरंट्सना बसत आहे. इंधन तुटवड्यामुळे व्यावसायिक सिलेंडर्सचा पुरवठा ठप्प झाला आहे. हॉटेलच्या पार्किंगमध्ये रिकाम्या सिलेंडर्सची रांग लागली, परंतु त्यात गॅस नाही. परिणामी, नाईलाजास्तव हॉटेल मालकांनी पार्किंगच्या जागेतच चुली पेटवल्या. शेफ स्टार हॉटेल्समध्ये एसी किचनमध्ये बसून डिशेस बनवायचे, तेच आता पार्किंगमध्ये धुराच्या लोटात बसून चुलीवर मटण-भाकरी बनवत आहेत. लाकडे आणणे, कुऱ्हाडीने तोडणे, ते पेटवणे यात कर्मचाऱ्यांचा निम्मा वेळ जात आहे.
944
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 25, 2026 09:22:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:विविध प्रलंबित मागण्यासाठी आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन. आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यासाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये अशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या. थकीत मानधन त्वरित देण्यात यावा व मानधन वेळेत जमा करावं, शासनाच्या विविध आरोग्य योजना अंमलबजावणीचे मानधन देखील तातडीने देण्यात यावे, मात्रा ॲप व्यवस्थित चालू राहण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करावी,म्हणून मानधन वाढीची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
997
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 25, 2026 09:22:36
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ-बदलापूरमध्ये पेट्रोलसाठी झुंबड, अफवांनी नागरिकांमध्ये घबराट अंबरनाथ-बदलापूरमध्ये पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा अंबरनाथ तालुक्यात काही पेट्रोल पंप बंद अंबरनाथ तालुक्यात सध्या पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी आणि गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे राज्यभर पसरलेल्या अफवा आणि इंधन कंपन्यांनी क्रेडिट लिमिट बंद करून तात्काळ पैसे भरण्याची अट लागू केल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या नव्या नियमामुळे अनेक पेट्रोल पंपचालक आर्थिक अडचणीत सापडले असून त्याचा थेट परिणाम इंधनपुरवठ्यावर झाला आहे. परिणामी अंबरनाथ आणि विशेषता: बदलापूर येथे पेट्रोल साठी नागरिकांची झुंबड उडालेली दिसत आहे. बदलापूर मध्ये परिस्थिती आणखी तनापुर्ण झाली असून पुढील चार दिवस पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा आणि प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याचेही समोर आलं आहे. दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरज नसताना पेट्रोल साठवू नये अस आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असलं तरी पेट्रोलचा संभाव्य तुटवडा आणि दरवाढीच्या चर्चांमुळे नागरिक पेट्रोल पंपाकडे धाव घेत असल्याने शहरात एक प्रकारे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
1026
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 25, 2026 09:17:44
1084
comment0
Report
Advertisement
Back to top