Back
युद्ध के प्रभाव से LPG आपूर्ति घटी, अकोला के गैस पंपों पर ऑटो चालकों की कतारें
JJJAYESH JAGAD
Mar 25, 2026 10:07:09
Akola, Maharashtra
मध्य-पूर्व भागात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता इंधन बाजारावरही दिसून येत आहे. एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम झाल्याने अकोला शहरातील अनेक गॅस पंपांवर सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे ऑटो चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून काही ठिकाणी गॅससाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अकोला शहरातील एलपीजी गॅस पंपांवर सध्या गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे ऑटो चालकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. शहरातील विविध गॅस पंपांवर ऑटो रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी ही रांग दीड ते दोन किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. भर उन्हात चालकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत असल्याने त्यांच्या दैनंदिन कमाईवरही मोठा परिणाम होत आहे. अनेक चालकांनी गॅस वेळेवर न मिळाल्यामुळे दिवसभराचा व्यवसाय ठप्प झाल्याची नाराजी व्यक्त केली आहे. युद्ध परिस्थितीमुळे इंधन पुरवठा विस्कळीत होत असल्याचे सांगितले जात असले तरी स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता ऑटो चालकांकडून केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 25, 2026 11:23:030
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 25, 2026 10:35:36980
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 25, 2026 10:35:02954
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 25, 2026 10:32:581014
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 25, 2026 10:20:511067
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 10:07:231065
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 10:02:511007
Report
ABATISH BHOIR
FollowMar 25, 2026 09:34:08944
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 25, 2026 09:22:55997
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 25, 2026 09:22:361026
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 09:22:091006
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 25, 2026 09:17:441084
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 25, 2026 09:06:451095
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 25, 2026 09:06:281055
Report