Back
छत्तीसगढ़: आख़िरी नक्सल कमांडर पापाराव आज आत्मसमर्पण, बडी रकम और डेडलाइन को लेकर चर्चा
AAASHISH AMBADE
Mar 25, 2026 06:22:33
Gadchiroli, Maharashtra
टायटल:-- छत्तीसगड राज्यातील शेवटचा नक्षल कमांडर पापाराव आज करणार आत्मसमर्पण, राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा उपस्थित राहण्याची शक्यता, छत्तीसगड मधील 25 लाख रकमेसह संपूर्ण देशात दोन कोटी एवढे आहे त्याच्यावर बक्षीस, पापाराव यांच्या आत्मसमर्पणानंतर छत्तीसगडमधील नक्सल चळवळ संपुष्टात येण्याचा गृहमंत्री विजय शर्मा यांचा दावा
अँकर:--छत्तीसगड राज्यातील शेवटचा नक्षल कमांडर पापाराव आज त्याच्या 20 सहका-यांसह आत्मसमर्पण करणार आहे. छत्तीसगड राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा यांची यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. छत्तीसगड मधील 25 लाख रकमेसह संपूर्ण देशात त्याच्यावर दोन कोटी एवढे बक्षीस आहे. पापाराव यांच्या आत्मसमर्पणानंतर छत्तीसगडमधील नक्सल चळवळ संपुष्टात येण्याचा दावा गृहमंत्री विजय शर्मा यांनी केला आहे. नक्सल चळवळ संपुष्टात येण्याची गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेली 31 मार्च 2026 ही डेडलाईन आता अगदी निकट आली आहे. त्यामुळे पाच दशकांपासून देशातील अनेक भागांमध्ये व विशेषतः दंडकारण्य भागामध्ये सुरू असलेल्या नक्सल चळवळीचा खात्मा करण्याचा दावा केंद्र व राज्य सरकारांनी केला आहे. गेले दोन वर्ष यासंदर्भात मोठे एन्काऊंटंटर्स व आत्मसमर्पण मोहिमा राबवून याकडे वाटचाल सुरू आहे. काही प्रमुख नक्सलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवण्यास होकार दिला असून शिल्लक राहिलेल्या नक्सल चळवळीतील बंदूक विरुद्ध संविधान असा संघर्ष सुरू आहे. काही आत्मसर्पण हे दहशतीने तर काही खुल्या वातावरणातील आयुष्याच्या ओढीने होत आहे. विविध राज्यांची पुनर्वसन धोरणे देखील यासाठी कारणीभूत असून सरकार देखील रक्तपात न होता बंदूक खाली ठेवून हा प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलत आहे. छत्तीसगड हे नक्षल चळवळीच्या प्रारंभापासून महत्त्वाची भूमिका असलेले राज्य होते. त्यातील सर्वात शेवटचा कमांडर पापाराव जंगलातून बाहेर निघून आता छत्तीसगड राज्याच्या गृहमंत्री व पोलीसदलासमोर आत्मसमर्पण करणार असल्याने संपूर्ण देशातील नक्सल चळवळीला हा मोठा हादरा मानला जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 07:34:24510
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 25, 2026 07:34:06609
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 25, 2026 07:33:15585
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 25, 2026 07:33:03634
Report
SKShubham Koli
FollowMar 25, 2026 07:22:521020
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 25, 2026 07:22:321051
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 25, 2026 07:21:33927
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 25, 2026 07:02:111020
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 06:19:341086
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 06:19:241028
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 06:00:381099
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 25, 2026 06:00:30980
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 25, 2026 05:34:091087
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 25, 2026 05:33:341027
Report