Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501
बाढ़ प्रभावित छात्रों के लिए फीस माफी की घोषणा, जीआर न मिलने से परीक्षा फीस रोक संभव
DPdnyaneshwar patange
Mar 25, 2026 07:33:15
Dharashiv, Maharashtra
धाराशिवध्ये अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफी हवेतच धाराशिवमध्ये परीक्षा फीची सक्ती सुरूच फी न भरल्यास हॉलतिकीट अडवण्याची भीती सरकारच्या धोरणामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात अँकर : धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जाहीर झालेली फी माफी अद्याप कागदावरच असल्याचं चित्र आहे. सरकारकडून घोषणा झाली असली तरी अधिकृत जीआर नसल्यामुळे महाविद्यालयांकडून परीक्षा फीची सक्ती सुरूच आहे. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 55 महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. फी माफीची घोषणा होऊनही राज्यातील 419 महाविद्यालयांपर्यंत त्याचा लाभ पोहोचलेला नाही. 7 एप्रिलपासून महाविद्यालयीन परीक्षा सुरु होत असताना फी न भरल्यास हॉलतिकीट अडवण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. अधिकृत आदेश नसल्यामुळे फी घेणे भाग असल्याचं प्राचार्य सांगत आहेत, तर विद्यार्थ्यांनी सरकारच्या घोषणेनंतरही फीची सक्ती होत असल्याने संताप व्यक्त केला आहे. घोषणा आणि अंमलबजावणीतील तफावत स्पष्ट होत असून, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Mar 25, 2026 08:50:08
232
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 25, 2026 08:34:18
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी नागरिकांना रात्रभर एजन्सी कार्यालयासमोर अंथरून पांघरून घेऊन थांबावे लागत असल्याचे विदारक दृश्य समोर आले आहे. गॅस एजन्सीवर गर्दी होऊ नये यासाठी टोकन सिस्टीम लागू करावी तसेच बुकिंगनंतर ८ दिवसाच्या आत ग्राहकाला सिलंडर उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी एजन्सी चालकांना दिल्या होत्या मात्र त्याची कुठलीही अंमलबजावणी जिल्ह्यात होत नसल्याचे दिसून येत आहे. सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे शासन प्रशासन सांगत असले तरी, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे तीव्र पडसाद ग्रामीण भागात उमटताना दिसत आहेत. सिलेंडर मिळविण्यासाठी नागरिकांना गॅस एजन्सीच्या गोडाऊनसमोरच अंथरूण-पांघरूण घेऊन रात्र काढावी लागत आहे. चिचगाव, धनज, माणिकवाडा, चिखली कान्होबा, वटफळी, जवळगाव यांसह अन्य गावांतील ग्रामस्थांनी शहरापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या गॅस एजन्सीच्या गोडाऊनसमोरच मुक्काम ठोकला आहे. अनेकजण आपल्या सोबत जेवणाचे डबे, पिण्याचे पाणी तसेच अंथरूण-पांघरूण घेऊन येत असून, रात्रभर गोडाऊनसमोर थांबून आहेत.
970
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 25, 2026 08:34:04
930
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 25, 2026 08:03:59
976
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 25, 2026 07:34:06
Akola, Maharashtra:अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचा मोठा परिणाम आता जागतिक इंधन बाजारावर होताना दिसत आहे. एलपीजी गॅससह पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.भारतामध्ये या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही शहरांमध्ये नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र अकोला शहरात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता समजूतदारपणाचे उदाहरण दिले आहे. Vo 1 : महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कालपासून पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र अकोला शहरात परिस्थिती पूर्णपणे वेगळी पाहायला मिळत आहे. अकोल्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर नागरिकांनी कोणतीही अनावश्यक गर्दी केलेली नाही. काही पेट्रोल पंप चालकांनी देखील ध्वনिक्षेपकाद्वारे नागरिकांना आवाहन करत अफवांवर विश्वास ठेऊ नये असे सांगितले आहे.आवश्यक असेल तेवढेच पेट्रोल आणि डिझेल भरावे तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पेट्रोल टाकी पूर्ण भरू नये, असा सल्लाही देण्यात येत आहे. Byte : राहुल सहसनानी, पेट्रोल पंप मालक. Vo 2 : दरम्यान, अकोला शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ग्राहकांना इंधन भरण्यासाठी कोणताही विलंब होत नसून नागरिकांनी शांतता आणि संयम राखल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. Byte : निलेश माळी, ग्राहक. Final Vo : देशातील अनेक शहरांमध्ये अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असताना अकोलेकरांनी मात्र अफवांवर विश्वास न ठेवता समजूतदारपणाचे उदाहरण घालून दिले आहे. शांतता, संयम आणि जबाबदारीने वागणाऱ्या अकोलेकरांचे हे वर्तन इतर शहरांसाठीही आदर्श ठरत असून अकोल्यातील सर्व पेट्रोल पंपांवर सध्या इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला
1091
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 25, 2026 07:33:03
Vasai-Virar, Maharashtra:मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आता थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. इराण–इस्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम डिझेल दरांवर झाला आहे. २० मार्च २०२६ पासून बल्क ग्राहकांसाठी डिझेल दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारांना प्रति लिटर तब्बल २२ रुपयांची अतिरिक्त झळ सहन करावी लागत आहे. सामान्य नागरिकांना डिझेल सुमारे ९० रुपयांना मिळत असताना, मच्छिमारांना तेच डिझेल ११२ रुपयांपेक्षा अधिक दराने घ्यावे लागत आहे. इंधन खर्च वाढल्याने मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, अनेक मच्छिमार तोट्यात गेले आहेत. काही ठिकाणी तर होड्या समुद्रात न जाता किनाऱ्यावरच उभ्या असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मच्छिमार संघटनांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यातील मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.
1044
comment0
Report
SKShubham Koli
Mar 25, 2026 07:22:52
Thane, Maharashtra:ठाण्यात वर्गणीवरून वाद चॉपरने डोक्यात वार, एक जण जखमी ठाणे शहरातील गावदेवी परिसरात वर्गणी मागण्याच्या कारणावरून एक धक्कादायक हल्ल्याची घटना समोर आली आहे. साई मंदिरात आयोजित भजन-कीर्तन सोहळ्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचे सभासद ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गावदेवी मार्केट परिसरात वर्गणी मागण्यासाठी गेले होते. यावेळी नवनाथ वायकर नावाच्या व्यक्तीने अचानक चॉपरने किशोर अंकुश नरे यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात किशोर नरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोर नवनाथ वायकर याच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे ठाण्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
1063
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 25, 2026 07:22:32
1095
comment0
Report
Advertisement
Back to top