Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
कोल्हापुर में ईंधन संकट: पेट्रोल-डिज़ेल पंपों पर लंबी लाइनें
PNPratap Naik1
Mar 25, 2026 06:00:38
Kolhapur, Maharashtra
कोल्हापुरात देखील इंधन टंचाई होईल या भीतीपोटी ग्राहक पेट्रोल आणि डिझेल पंपावर मोठी गर्दी केली आहे.. सकाळपासूनच प्रत्येक जण गाडीमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येऊन थांबला आहे.. इथल्या ग्राहकांना पेट्रोल मिळेल याची खात्री आहे, तरीदेखील तो पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लाईन मध्ये उभा आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 25, 2026 07:34:06
Akola, Maharashtra:अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचा मोठा परिणाम आता जागतिक इंधन बाजारावर होताना दिसत आहे. एलपीजी गॅससह पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.भारतामध्ये या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही शहरांमध्ये नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र अकोला शहरात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता समजूतदारपणाचे उदाहरण दिले आहे. Vo 1 : महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कालपासून पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र अकोला शहरात परिस्थिती पूर्णपणे वेगळी पाहायला मिळत आहे. अकोल्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर नागरिकांनी कोणतीही अनावश्यक गर्दी केलेली नाही. काही पेट्रोल पंप चालकांनी देखील ध्वনिक्षेपकाद्वारे नागरिकांना आवाहन करत अफवांवर विश्वास ठेऊ नये असे सांगितले आहे.आवश्यक असेल तेवढेच पेट्रोल आणि डिझेल भरावे तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पेट्रोल टाकी पूर्ण भरू नये, असा सल्लाही देण्यात येत आहे. Byte : राहुल सहसनानी, पेट्रोल पंप मालक. Vo 2 : दरम्यान, अकोला शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ग्राहकांना इंधन भरण्यासाठी कोणताही विलंब होत नसून नागरिकांनी शांतता आणि संयम राखल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. Byte : निलेश माळी, ग्राहक. Final Vo : देशातील अनेक शहरांमध्ये अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असताना अकोलेकरांनी मात्र अफवांवर विश्वास न ठेवता समजूतदारपणाचे उदाहरण घालून दिले आहे. शांतता, संयम आणि जबाबदारीने वागणाऱ्या अकोलेकरांचे हे वर्तन इतर शहरांसाठीही आदर्श ठरत असून अकोल्यातील सर्व पेट्रोल पंपांवर सध्या इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 25, 2026 07:33:15
Dharashiv, Maharashtra:धाराशिवध्ये अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफी हवेतच धाराशिवमध्ये परीक्षा फीची सक्ती सुरूच फी न भरल्यास हॉलतिकीट अडवण्याची भीती सरकारच्या धोरणामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात अँकर : धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जाहीर झालेली फी माफी अद्याप कागदावरच असल्याचं चित्र आहे. सरकारकडून घोषणा झाली असली तरी अधिकृत जीआर नसल्यामुळे महाविद्यालयांकडून परीक्षा फीची सक्ती सुरूच आहे. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 55 महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. फी माफीची घोषणा होऊनही राज्यातील 419 महाविद्यालयांपर्यंत त्याचा लाभ पोहोचलेला नाही. 7 एप्रिलपासून महाविद्यालयीन परीक्षा सुरु होत असताना फी न भरल्यास हॉलतिकीट अडवण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. अधिकृत आदेश नसल्यामुळे फी घेणे भाग असल्याचं प्राचार्य सांगत आहेत, तर विद्यार्थ्यांनी सरकारच्या घोषणेनंतरही फीची सक्ती होत असल्याने संताप व्यक्त केला आहे. घोषणा आणि अंमलबजावणीतील तफावत स्पष्ट होत असून, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 25, 2026 07:33:03
Vasai-Virar, Maharashtra:मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आता थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. इराण–इस्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम डिझेल दरांवर झाला आहे. २० मार्च २०२६ पासून बल्क ग्राहकांसाठी डिझेल दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारांना प्रति लिटर तब्बल २२ रुपयांची अतिरिक्त झळ सहन करावी लागत आहे. सामान्य नागरिकांना डिझेल सुमारे ९० रुपयांना मिळत असताना, मच्छिमारांना तेच डिझेल ११२ रुपयांपेक्षा अधिक दराने घ्यावे लागत आहे. इंधन खर्च वाढल्याने मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, अनेक मच्छिमार तोट्यात गेले आहेत. काही ठिकाणी तर होड्या समुद्रात न जाता किनाऱ्यावरच उभ्या असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मच्छिमार संघटनांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यातील मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.
0
comment0
Report
SKShubham Koli
Mar 25, 2026 07:22:52
Thane, Maharashtra:ठाण्यात वर्गणीवरून वाद चॉपरने डोक्यात वार, एक जण जखमी ठाणे शहरातील गावदेवी परिसरात वर्गणी मागण्याच्या कारणावरून एक धक्कादायक हल्ल्याची घटना समोर आली आहे. साई मंदिरात आयोजित भजन-कीर्तन सोहळ्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचे सभासद ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गावदेवी मार्केट परिसरात वर्गणी मागण्यासाठी गेले होते. यावेळी नवनाथ वायकर नावाच्या व्यक्तीने अचानक चॉपरने किशोर अंकुश नरे यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात किशोर नरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोर नवनाथ वायकर याच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे ठाण्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
542
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 25, 2026 07:22:32
589
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 25, 2026 07:21:33
Nashik, Maharashtra:रूपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या .....भगूरच्या नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांची मागणी अँकर रूपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाका अशी मागणी नाशिकच्या भगूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रेरणा बलकवडे ही मागणी केलीये... त्याचबरोबर रूपाली चाकणकर या जर जिल्हा दौऱ्यावर आला तर आम्ही बहिष्कार टाकू असं देखील प्रेरणा बलकवडे म्हणाल्यात रूपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचं देखील बलकवडे यांनी म्हटलं आहे... महिला प्रदेशाध्यक्ष पद काढून दुसऱ्या कुठल्या महिलेला हे पद द्यावं असं देखील बलकवडे म्हणालया आहेत.... यासंदर्भात प्रेरणा बलकवडेंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
470
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 25, 2026 07:02:11
961
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 25, 2026 06:22:33
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- छत्तीसगड राज्यातील शेवटचा नक्षल कमांडर पापाराव आज करणार आत्मसमर्पण, राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा उपस्थित राहण्याची शक्यता, छत्तीसगड मधील 25 लाख रकमेसह संपूर्ण देशात दोन कोटी एवढे आहे त्याच्यावर बक्षीस, पापाराव यांच्या आत्मसमर्पणानंतर छत्तीसगडमधील नक्सल चळवळ संपुष्टात येण्याचा गृहमंत्री विजय शर्मा यांचा दावा अँकर:--छत्तीसगड राज्यातील शेवटचा नक्षल कमांडर पापाराव आज त्याच्या 20 सहका-यांसह आत्मसमर्पण करणार आहे. छत्तीसगड राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा यांची यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. छत्तीसगड मधील 25 लाख रकमेसह संपूर्ण देशात त्याच्यावर दोन कोटी एवढे बक्षीस आहे. पापाराव यांच्या आत्मसमर्पणानंतर छत्तीसगडमधील नक्सल चळवळ संपुष्टात येण्याचा दावा गृहमंत्री विजय शर्मा यांनी केला आहे. नक्सल चळवळ संपुष्टात येण्याची गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेली 31 मार्च 2026 ही डेडलाईन आता अगदी निकट आली आहे. त्यामुळे पाच दशकांपासून देशातील अनेक भागांमध्ये व विशेषतः दंडकारण्य भागामध्ये सुरू असलेल्या नक्सल चळवळीचा खात्मा करण्याचा दावा केंद्र व राज्य सरकारांनी केला आहे. गेले दोन वर्ष यासंदर्भात मोठे एन्काऊंटंटर्स व आत्मसमर्पण मोहिमा राबवून याकडे वाटचाल सुरू आहे. काही प्रमुख नक्सलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवण्यास होकार दिला असून शिल्लक राहिलेल्या नक्सल चळवळीतील बंदूक विरुद्ध संविधान असा संघर्ष सुरू आहे. काही आत्मसर्पण हे दहशतीने तर काही खुल्या वातावरणातील आयुष्याच्या ओढीने होत आहे. विविध राज्यांची पुनर्वसन धोरणे देखील यासाठी कारणीभूत असून सरकार देखील रक्तपात न होता बंदूक खाली ठेवून हा प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलत आहे. छत्तीसगड हे नक्षल चळवळीच्या प्रारंभापासून महत्त्वाची भूमिका असलेले राज्य होते. त्यातील सर्वात शेवटचा कमांडर पापाराव जंगलातून बाहेर निघून आता छत्तीसगड राज्याच्या गृहमंत्री व पोलीसदलासमोर आत्मसमर्पण करणार असल्याने संपूर्ण देशातील नक्सल चळवळीला हा मोठा हादरा मानला जात आहे.
971
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 25, 2026 06:00:30
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील सावर्ला जंगल परिसरात सरपण वेचणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. सावर्ला तलावाजवळील कक्ष क्रमांक ८९ मध्ये ही घटना उजेडात आली. मृत महिलेचे नाव प्रमिला अरुण वाडगुरे (वय ४६, रा. तळोधी बाळापुर चिटणीसपुरा) असे आहे. प्रमिला वाडगुरे या नेहमीप्रमाणे इतर पाच ते सहा महिलांसोबत जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सर्व महिलांनी काड्या जमा करून परतीची तयारी सुरू केली होती. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. तसेच वन विभागाला तात्काळ कळविण्यात आले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
947
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 25, 2026 05:34:09
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशीम जिल्ह्यात २०२५ मध्ये सरासरी १२३ टक्के पर्जन्यमान होऊनही सध्या शहरे आणि तीस गावांमध्ये जलसंकट निर्माण झाले आहे. भूजल पातळी १.५२ मीटरपेक्षा अधिक खाली गेल्याने पुढील काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. वाशीम जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांसह ७७ जलाशयांमध्ये मार्चच्या तिसऱ्या पंधरवड्यात केवळ ३०टक्के जलसाठा शिल्लक आहे. जल जीवन मिशन अंतर्गत ५७२ योजनांपैकी १८८ पूर्ण झाल्या असून १८० योजना ७५-८०टक्के प्रगतीवर आहेत. महाराष्ट्रीयन जीवन प्राधिकरणाच्या २२ पैकी १८ योजनांतून पाणीपुरवठा सुरू आहे, तर ५० पैकी ४६ गावांना पाणी मिळत आहे; मात्र ४ योजना अपूर्ण आहेत. २०२१-२३ दरम्यान पाझर तलावांचे रूपांतर, ४० हजार शोषखड्डे, अनियंत्रित विहिरी व विंधन विहिरी आणि नियोजनशून्य नळयोजनांमुळे भूजल व्यवस्थेचे संतुलन बिघडल आहे.
1087
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 25, 2026 05:33:34
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात पेट्रोल टंचाईची अफवा आणि पंपांवरील गर्दी सलग चौथ्या दिवशी कायम, शहरातील अनेक पेट्रोल पंप साठा संपल्याने झाले बंद चंद्रपुरात पेट्रोल टंचाईची अफवा आणि पंपांवरील गर्दी सलग चौथ्या दिवशी कायम आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंप साठा संपल्याने बंद झाले आहे. जवळचे सर्व पेट्रोल पंप बंद झाल्याने शहराबाहेरून पेट्रोल भरून आणताना दुचाकीस्वार आणि वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. तास- दोन तास रांगेत उभे राहिल्यावर साठा संपल्याचे सांगितले जात असल्याने वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे. आता केवळ अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल शिल्लक राहिले आहे. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र टंचाईची स्थिती नसून नागरिकांनी घाबरून साठा करू नये असे आवाहन केले आहे. प्रत्यक्षात यावर उपाययोजना शून्य आहेत.
1027
comment0
Report
Advertisement
Back to top