Back
हादसे में भयावह बस-ट्रक हॉस्पिटल, चालक की सुरक्षा पर सवाल
PPPRASHANT PARDESHI
Feb 02, 2026 05:03:44
Dhule, Maharashtra
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 असलेल्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. महामार्गावरील पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या एसटी बसला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे बस समोर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली आणि दोन अवजड वाहनांच्या मध्ये अक्षरश चिरडली गेली. हा अपघात इतका भयानक होता की, समोरच्या ट्रकचा 10 ते 12 फुटांचा लोखंडी रॉड अँगल.बसचे लोखंडी पत्रे फाडून थेट केबिनमध्ये घुसला. यामुळे बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला असून चालक महेंद्र लांजा गावित यांचा पाय केबिनमध्ये अडकून पडला होता. स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून चालकाला सुखरूप बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच जामनपाडा सरपंच प्रियंका गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी तातडीने आपल्या खासगी वाहनातून गंभीर जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळू शकले. घटनास्थळी परिवहन विभागाचे निरीक्षक मुकेश देवरे दाखल झाले असून ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णत ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 02, 2026 07:00:390
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 02, 2026 06:48:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 06:47:400
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 06:33:020
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 06:32:43Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मध्ये महिलांच्या टोळक्यांकडून जीन्स कारखान्यात चोरी
कॅम्प 5 चिराग हॉटेल जवळील घटना
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मध्ये कैद
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 06:20:590
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 06:17:370
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 02, 2026 06:05:280
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 02, 2026 06:01:230
Report
PNPratap Naik1
FollowFeb 02, 2026 05:46:170
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 02, 2026 05:35:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 02, 2026 05:35:030
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 02, 2026 05:18:210
Report
AKAMAR KANE
FollowFeb 02, 2026 05:18:030
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 05:04:590
Report