Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपूर के वरोरा में विनयभंग मामला: अभिजित कुडे फरार

AAASHISH AMBADE
Oct 13, 2025 06:51:15
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिले के वरोरा तालुक्यात विनयभंग की घटना उजागर हुई है. रा. कॉ. अजित पवार गट में हाल ही में प्रवेश किए गए युवा नेता अभिजित कुडे के विरुद्ध अपराध दर्ज किया गया है; कुडे फरार है. पीड़ित एक विवाहित महिला है, जिसने न्याय की मांग की है. फेसबुक पर जान-पहचान के आधार पर किये गए शारीरिक संबंधों की रिकॉर्डिंग वायरल करने की धमकी देकर इस युवा नेता ने विवाहित महिला के साथ बार-बार अत्याचार किया. वरोरा पुलिस ने भारतीय न्याय सहिता 2023 के अनुसार 74, 64(2)m, 351(2) गुन्हा नोंद किया है. आगे की तपास जारी है.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Oct 13, 2025 09:36:23
Thane, Maharashtra:शहापूरातील आसनगाव जवारी एस‌ के आय प्लास्टो वेअर कंपनीला भिषण आग... आगीत लाखोचे नुकसान... शहापूर तालुक्यातील आसनगाव औद्योगिक क्षेत्रात असलेल्या एस के प्लास्टो वेअर या कंपनीला सकाळी १०:३० च्या सुमारास भीषण आग लागली आहे. ही कंपनी प्लास्टिकच्या शालेय बॉक्स, बाटल्या, टिफिन, स्टेशनरी वस्तू या साहित्याचे उत्पादन करते. आग इतकी भीषण आहे की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत लाखोचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आग सतत वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच, भिवंडी, कल्याण- डोंबिवली येथील अग्निशमन दलाच्या पथकांसह जिंदाल कंपनीच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहेत. तसेच शहापूर तालुक्यातील टँकर देखील घटना स्थळी दाखल झाले आहेत. आगावर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. बाईट- परमेश्वर कासुळे, तहसीलदार शहापूर
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 13, 2025 09:21:14
Chendhare, Alibag, Maharashtra:स्‍लग – रायगड जिल्‍हा परीषद सदस्‍यपदांचे आरक्षण जाहीर ........ नवीन आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्‍छुकांचा हिरमोड .......... महिला आरक्षणाने स्‍वप्‍नांवर अनेक ठिकाणी इच्‍छुकांच्‍या स्‍वप्‍नांवर पाणी ......... राजकीय पक्षांकडून नवीन उमेदवारांचा शोध सुरू .......... अँकर – रायगड जिल्‍हा परीषदेच्‍या 59 सदस्‍यपदासाठी आज झालेल्‍या आरक्षण सोडतीने अनेक इच्‍छुक उमेदवारांच्‍या आशा आकांक्षांवर पाणी फेरले आहे. पुरूष उमेदवार इच्‍छुक असलेले मतदार संघ महिलांसाठी आरक्षित झाल्‍याने त्‍यांचा हिरमोड झाला आहे. काहीनी आपल्‍या पत्‍नीला उमेदवारी देण्‍याचा विचार सुरू केलाय तर काही ठिकाणी नवीन उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. आरक्षण जाहीर झाल्‍यानंतर राजकीय पक्षांनी आपली रणनीती ठरवायला सुरूवात केली आहे. आज अलिबाग येथील नियोजन समिती सभागृहात जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत आरक्षण निश्चित करण्‍यात आले. 59 पैकी 30 जागा महिलांसाठी राखीव झाल्‍या आहेत. अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 9 तर ओबीसी प्रवर्गासाठी 15 जागा राखीव झाल्‍या आहेत.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 13, 2025 09:04:04
Pune, Maharashtra:मावळ पंचायत समितीवर महिलाराज... बहुतांश सदस्यपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. सध्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण जाहीर होत आहे. आज मावळ पंचायत समितीचेही आरक्षण जाहीर झाले आहे. सभापती (अध्यक्ष) पद नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आले असून गणनिहाय आरक्षण सोडत ही पार पडली. यामध्ये अनेक गणांमध्ये “कही खुशी, कही गम” अशी स्थिती पाहायला मिळाली. वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे प्रांताधिकारी सुरेंद्रकुमार नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गणनिहाय आरक्षण सोडत पार पडली. अतिशय नियोजनबद्ध आणि शांततामय वातावरणात ही सोडत जाहीर झाली. दरम्यान, या आरक्षण सोडतीत महिलांना प्राधान्य मिळाले असून तालुक्यातील राजकीय समीकरणांनी आता वेग घेतला आहे. मावळ मधील गणनिहाय पंचायत समिती आरक्षण - १) नाणे - अनुसूचित जमाती स्त्री २) वराळे - सर्वसाधारण ३) इंदोरी - सर्वसाधारण ४) कार्ला - सर्वसाधारण स्त्री ५) कुसगांव बु.- सर्वसाधारण ६) काले - सर्वसाधारण स्त्री ७) सोमाटणे - नागरिकांचा मागास प्रवर्ग ८) चांदखेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ९) खडकाळा - अनुसूचित जाती १०) टाकवे बु. - सर्वसाधारण स्त्री
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 13, 2025 08:39:07
Nashik, Maharashtra:Nashik breaking नरहरी झिरवाळ मंत्ती - कफ सिरफ आपल्या इथे तयार झाला नाही - त्याची चौकशी केली जाईल कसा प्रवास झाला याबाबत चौकशी केली जाईल - यामध्ये कोणी दोषी आढळतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल - तातडीने या कफ सिरफ वर बॅन करण्यात येईल - विक्रेत्यांना देखील डॉक्टर रिपोर्ट शिवाय औषध देऊ नये असे सांगण्यात येईल - बाहेरच्या राज्यातून भेसळ होतो त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला देखील याबाबत माहिती देऊ On भेसळ - एक महिन्या आधी उत्पादकांना आम्ही नोटीस दिले आहेत - भेसळ होऊ नये यासाठी आम्ही कारवाई सुरू केली आहे - बाहेरून जो माल येतो ते देखील भेसळयुक्त येत आहे त्यावर देखील आम्ही लक्ष ठेऊन आहे - याबत खोलवर जाण्यासाठी आम्ही यंत्रणा उभी केली आहे - नवीन लॅब साठी निधी देखील मंजुर झाला आहे On मैत्रीपूर्ण लढत - आजतरी महायुती मध्ये लढायला पाहिजे असे आमचं मत आहे - पण तसं झाले नाहीतर स्वतंत्र लढण्यासाठी देखील तयारी करू On निवडणूक आयोग भेट - विरोधकांचा प्रश्न याहे त्यांना भेटायचे असेल तर ते भेटतील On संग्राम जगताप - तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या जागी ते बरोबर असतील On निलंबित - विधानसभेत तो निर्णय झाला आहे
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 13, 2025 08:37:24
Yeola, Maharashtra:येवला ( नाशिक ) : ब्रेकिंग मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद.. मंत्री छगन भुजबळ On स्थानिक पातळीवर युती, मैत्रीपूर्ण लढती.. मी वर्तमानपत्र यातून वाचले.. तिन्ही पक्षांची युती होईलच असे नाही.. तिथली परिस्थिती बघून निर्णय घेतील काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे - अजित दादा यांची युती होईल.. तर काही ठिकाणी भाजप व अजित दादा युती होईल शिंदे बाजूला असतील असेही होवू शकते.. स्थानिक पातळीवर काहीही होऊ शकते.. मंत्री छगन भुजबळ On पालकमंत्री नाशिक जिल्हा ( महाजन - भुसे महाजन, भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहे ka ? मी काही एवढ्या लांब जाऊ शकत नाही.. मी आपला अजित पवार, देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे यांना जाईल.. फार फार तर मोदी साहेबांकडे जाईल.. यापेक्षा लांब मी जाणार नाही.. मंत्री छगन भुजबळ On गोपीचंद पडळकर वक्तव्य असे काही वाक्य नाही..मी पुस्तक वाचणार आहे.. मंत्री छगन भुजबळ On पडळकर वक्तव्य मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतो.. सुधाकर नाईक हे शिकारी होते तेव्हापासून या वाक्याचा वाद आहे.. शिकार हा नाईक यांचा छंद ते म्हणायचे टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करायचा नाही सांगली लोकल वादळ आहे.. मंत्री छगन भुजबळ On रमेश पोडवाल यांची जमीन हडपली मला त्याची कल्पना काही नाही मंत्री छगन भुजबळ On ओबीसी बीड मोर्चा.. लोकशाही आहे, मला काही कळत नाही.. स्टेजवर मंत्र्यांनी जायचे नाही..हे कोण सांगणार आंदोलन सगळ संपल्यावर मग जरांगे भेटीसाठी विखे पाटील कसे जाऊ शकता.. आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नव्हतो, बोललो नाही.. आम्ही हायकोर्टात जाऊ, चॅलेंज करू त्यानंतर बघू.. आम्ही गप्प बसतो, पण जरांगे माझे नाव घेऊन बोलतो, त्यामुळे मला बोलावे लागले... मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे.. मी मराठा आरक्षण विरोधी नाही.. मंत्री छगन भुजबळ On छठ पूजा.. हा कार्यक्रम या वर्षाचा नाही.. अनेक वर्ष हा कार्यक्रम मुंबईमध्ये करतात. युपी, चे लोक मुंबई शहरात आलेले आहे, आणखी काही शहरांमध्ये आहेत..तो धार्मिक कार्यक्रम आहे.. मंत्री छगन भुजबळ On कबूतर ( जैन मुनी..शांती पक्ष ) सध्या हत्ती, कुत्रे, कबूतर अशीच चर्चा आहे.. मला वाटत चिमणी पार्क, पोपट पार्क काढावा.. एक कावळा पार्क आहे तो दहाव्याच्या दिवशी लागतो, त्याचा ही पार्क करावा मंत्री छगन भुजबळ On ठाकरे बंधू भेटी.. मला आणि माझ्या कुटुंबियांना या गोष्टीचा आनंद आहे माझ्या मिसेस पण कुंदा वाहिनी त्यांच्या मैत्रिणी आहेत ठाकरे घराण्यात ज्येष्ठ म्हणून कुंदा वाहिनी आहेत मंत्री छगन भुजबळ On संग्राम जगताप...( सुप्रिया सुळे वक्तव्य ) त्याच्या त्या विधानाशी आम्ही सहमत नाही एकाने चूक केली ती दुसऱ्याने नाही केली पाहिजे.. फुले, शाहू, आंबेडकर तत्वाचे आम्ही आहोत.. pत्याच्या फायदा होईल असे वक्तव्य त्यांनी करावे.. त्यानाविषयी आमचे अध्यक्ष अजित पवार हे बघतील मंत्री छगन भुجبळ On सपकाळ..नथुराम त्यात काही अर्थ नाही.. मंत्री छगन भुजबळ On राजन विचारे, एकनाथ शिंदे यांचेवर आरोप एकनाथ शिंदे मला काही माहिती नाही, मंत्री छगन भुजबळ On आत्राम पराभूत असे वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे.. आमच्या पक्षातील काही लोकांनी जरांगेच्या सांगण्यानुसार प्रचार केला.. काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत.. मंत्री छगन भुजबळ On शेतकरी - बच्चू कडू.. विरोधी पक्षातील काही नेते कडक भूमिका घेतात.. निवडणुका जवळ आल्या की सगळेच पक्ष विधाने करत असतात..काही फायदेचे बोलतात.. मंत्री छगन भुजबळ On शिंदेंच्या योजना बंद.. आनंद शिधा यावेळी अडचणीत आहे.. लाडकी बहीण ४५ हजार कोटी रुपये खर्च.. सध्या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी अडचणीत, ३२ हजार कोटी वाटायचे आहे.. त्यामुळे काही योजना अडचणीत आहे.. पुढच्या वेळी नक्की विचार करू... मंत्री छगन भुजबळ On मराठा ओबीसी वाद.. महाज्योती अजित पवार..विद्यार्थी आरोप हे आरोप करतात.. बजेट मध्ये त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील मंत्री छगन भुजबळ on अजित पवारांची शरद पवारांसमोर फटकेबाजी... कोणते काम हाती घेतले की 100% पूर्ण करतो नाहीतर हातात घेत नाही मला काही माहिती नाही... पण दादा सुद्धा पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले आहेत. मंत्री छगन भुजबळ on कर्नाटक मध्ये शाळेत संघाच्या कार्यक्रमावर बंदी मला नाशिक आणि महाराष्ट्र मध्ये अडचणीचे झाले तिकडचे काय विचारात आणखीन... मंत्री छगन भुजबळ on नाना पटोले, अजित पawar मुळे पक्ष फुटला कोणाचे काय असो जाऊंद्या तिकडे…
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 13, 2025 08:22:24
Chendhare, Alibag, Maharashtra:दानवे यांना सरकार विरोधात बोलावं लागणार नाहीतर त्याचं पद टिकणार नाही. भरत गोगावले यांचा अंबादास दानवे यांना टोला. सरकारच्या मोठ्या योजना सुरूच आहेत. एखादी योजना बंद पडली तर काय झालं? अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सावरलं पाहिजे. योजना बंद करण्यावरून दानवे यांनी केली होती सरकारवर टीका. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील योजना आताच्या सरकारने बंद केल्यावरून दानवे यांनी सरकारवर टीका केली. महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत, मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना या मोठ्या योजना सुरूच आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांना सरकार सावरत आहे याकडे मंत्री भरत गोगावले यांनी लक्ष वेधलं.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 13, 2025 08:18:55
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात प्रवेश करताना लागणाऱ्या रेल्वे फाटकावर उड्डाण पुलाला मंजुरी, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश अँकर:--राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात प्रवेश करताना अडचण ठरलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात ३१ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या कामाबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अधिकृत पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली आहे. मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग एनएच ९३० वरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. GCF १२३ येथे हा उड्डाणपुल उभारला जाणार आहे. या ठिकाणी अवजड वाहने आणि इतर वाहतुकीमुळे वारंवार अडथळे निर्माण होत होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचा मनस्वी आनंद असल्याची भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 13, 2025 08:18:19
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्यांच्या अवस्थेच्या विरोधात कोल्हापुरात खड्ड्याचा बर्थडे साजरा करून अभिनव आंदोलन करण्यात आलं. शहरातील अनेक मार्गावरील खड्ड्यांमध्ये रोज अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि नवे रस्ते बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेला मिळत आहे. अस असताना कोल्हापूर महानगरपालिका या रस्त्यांची डागडुजी आणि नव्याने होणाऱ्या रस्त्यांचा दर्जा व्यवस्थित राखण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच कोल्हापुरातील शाहू सेनेच्या वतीने उद्योग भवन समोर अभिनव आंदोलन करत खड्ड्यांचा बर्थडे साजरा केला आहे. यावेळी आंदोलकांनी खड्या भोवती रांगोळी काढून खड्ड्यात केक ठेवला आणि हैपी बर्थडे खड्डे म्हणत खड्ड्याचा वाढदिवस साजरा केला. कोल्हापूर महानगरपालिकेने या आंदोलनाची दखल घेत तातडीने हे रस्ते सुधारावेत अन्यथा महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा खड्डे बर्थडे साजरा करू असा इशारा ज्यावेळी आंदोलकांनी दिलाय.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 13, 2025 08:16:47
Ratnagiri, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले गावात रस्त्यावर येणाऱ्या गुरांना वाचवण्याचा प्रयत्न करताना एका कारचा अपघात झाला है. रविवारी संध्याकाळी झालेला हा अपघात कारच्या डॅश कॅमेरामध्ये कैद झाला है. मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तरुण मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतेही जीवित हानी झाली नाही. तसेच कुणालाही गंभीर इजा झाली नाही. पण कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई गोवा महामार्ग, तसेच रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर आणि होणारे अपघात यांचं प्रमाण वाढत आहे. याबाबतीत ठोस उपाय होण्याची मागणी सध्या जोर धरत आहेत.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 13, 2025 08:05:19
Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरार पालिका क्षेत्रातील बांधकाम घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत, पालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह १८ भूमाफिया आणि अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात ३४१ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ईडीच्या आरोपपत्रानुसार, आयुक्त पदावर असताना अनिलकुमार पवार यांनी प्रत्येक कामासाठी मोठी लाच घेतली आणि भ्रष्टाचारासाठी एक यंत्रणा उभी केली होती. ४१ हून अधिक अनधिकृत इमारतींकडे डोळेझाक करण्यासाठी आणि त्यांना परवानगी देण्यासाठी पवार यांनी कोट्यवधी रुपये लाच घेतल्याचा ठपका ठेवला आहे. या लाचेच्या पैशातून पवारांनी लक्झरी कार, महागड्या साड्या आणि सोन्या-हिऱ्यांचे दागिने खरेदी करून मोठी उधळपट्टी केल्याचेही तपासात समोर आले आहे. ईडीने आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित ७१ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. सध्या अनिलकुमार पवार, वाय. एस. रेड्डी आणि भूमाफिया सीताराम गुप्ता व अरुण गुप्ता तुरुंगात आहेत. भ्रष्टाचाराचे 'रेट कार्ड' - या प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी याने ईडीच्या चौकशीत भ्रष्टाचाराच्या वाटपाचा धक्कादायक 'रेट कार्ड'च उघड केला आहे. आयुक्त : प्रत्येक बांधकाम परवानगीसाठी प्रति चौरस फूट २० ते २५ रुपये. नगररचना उपसंचालक : प्रति चौरस फूट १० रुपये. सहायक संचालक : प्रति चौरस फूट ४ रुपये. कनिष्ठ अभियंता : प्रति चौरस फूट १ रुपया.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 13, 2025 07:19:41
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ऑक्टोंबर 2025 या संपूर्ण महिन्यात करण्यात येणार विविध सायबर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन अँकर:–गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन करण्यात आले. दिवसेंदिवस सायबर अपराधांचे तसेच इंटरनेट व समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या मार्गदर्शनाखाली, ऑक्टोबर 2025 हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून संपूर्ण देशभरातील सर्व जिल्ह्रामध्ये साजरा करण्यात येत आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले. सायकल रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्ह्रांचे प्रमाण देखील वाढत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या महिन्यात विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृती मोहिम, ऑनलाईन वेबिनार्स तसेच सोशल मिडियावरील प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. आशीष अंबाडे झी मीडिया गडचिरोली
1
comment0
Report
Advertisement
Back to top