Back
गडचिरोली पुलिस ने साइबर जागरूकता साइकल रैली से अक्टूबर 2025 साइबर जागरूकता महीना शुरू किया
AAASHISH AMBADE
Oct 13, 2025 07:19:41
Gadchiroli, Maharashtra
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ऑक्टोंबर 2025 या संपूर्ण महिन्यात करण्यात येणार विविध सायबर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन अँकर:–गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन करण्यात आले. दिवसेंदिवस सायबर अपराधांचे तसेच इंटरनेट व समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या मार्गदर्शनाखाली, ऑक्टोबर 2025 हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून संपूर्ण देशभरातील सर्व जिल्ह्रामध्ये साजरा करण्यात येत आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले. सायकल रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्ह्रांचे प्रमाण देखील वाढत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या महिन्यात विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृती मोहिम, ऑनलाईन वेबिनार्स तसेच सोशल मिडियावरील प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. आशीष अंबाडे
झी मीडिया
गडचिरोली
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowOct 13, 2025 09:46:460
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 13, 2025 09:46:300
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 13, 2025 09:36:230
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 09:22:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 09:21:140
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 13, 2025 09:04:500
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 13, 2025 09:04:040
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 08:39:070
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 08:37:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 08:22:240
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 08:18:550
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:18:310
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 08:18:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 13, 2025 08:05:190
Report