Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक में नकली कफ सिरफ पर बड़ा हमला: जांच, बैन और केंद्र को सूचना
YKYOGESH KHARE
Oct 13, 2025 08:39:07
Nashik, Maharashtra
Nashik breaking नरहरी झिरवाळ मंत्ती - कफ सिरफ आपल्या इथे तयार झाला नाही - त्याची चौकशी केली जाईल कसा प्रवास झाला याबाबत चौकशी केली जाईल - यामध्ये कोणी दोषी आढळतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल - तातडीने या कफ सिरफ वर बॅन करण्यात येईल - विक्रेत्यांना देखील डॉक्टर रिपोर्ट शिवाय औषध देऊ नये असे सांगण्यात येईल - बाहेरच्या राज्यातून भेसळ होतो त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला देखील याबाबत माहिती देऊ On भेसळ - एक महिन्या आधी उत्पादकांना आम्ही नोटीस दिले आहेत - भेसळ होऊ नये यासाठी आम्ही कारवाई सुरू केली आहे - बाहेरून जो माल येतो ते देखील भेसळयुक्त येत आहे त्यावर देखील आम्ही लक्ष ठेऊन आहे - याबत खोलवर जाण्यासाठी आम्ही यंत्रणा उभी केली आहे - नवीन लॅब साठी निधी देखील मंजुर झाला आहे On मैत्रीपूर्ण लढत - आजतरी महायुती मध्ये लढायला पाहिजे असे आमचं मत आहे - पण तसं झाले नाहीतर स्वतंत्र लढण्यासाठी देखील तयारी करू On निवडणूक आयोग भेट - विरोधकांचा प्रश्न याहे त्यांना भेटायचे असेल तर ते भेटतील On संग्राम जगताप - तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या जागी ते बरोबर असतील On निलंबित - विधानसभेत तो निर्णय झाला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Oct 13, 2025 10:52:09
Nashik, Maharashtra:जयंत पाटील यांच्याबाबत नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया जे काल परवा काही बोलले असतील जमीन जुमला च्या बाबतीत किंवा स्टडी च्या बाबतीत आरोप करत असताना काही आधार असेल आरोप केला असेल माहित नाही पण ज्या पद्धतीने ते भाषा वापरतात मागच्या वेळेला जसं बापूंच्या याच्यावर बोलले होते ते बोलणं बरोबर नाही त्यामुळे भाषा वापरताना इतरांना कोणाला त्यांना तर दुखावलं जाईलच पण इतर समाजही दुखावला जातो मागच्या प्रतिक्रिय आता तशा खराब होत्या माझ्यासहित बोलताना थोडसं तारतम्य ठेवलं पाहिजे आंबेडकर मुस्लिम वक्तव्य ते काय अभ्यास करतात कशाच्या आधारावर बोलतात मला ते सांगता येणार नाही मलाच नाही तर समाजात सहसच चर्चा होते तुमचं राजकारणी लोकांचं म्हणजे सरळ एकत्र केलं जात आहे की तुमच्या भाषेवर प्रभुत्व राहिलेलं नाही भाषेला कुठला तार मिळेल राहिलेला नाही फार खालच्या पातळीला बोलणं बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण पातळी सोडून जाऊ नये अशा पद्धतीची चर्चा होते
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 13, 2025 10:47:09
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 13, 2025 10:45:35
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करण्यासाठी राज्यात वेगवेगळे वाद निर्माण केले जात आहेत - राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी सरकारकडुन वाद उकरून काढतात, कधी आय लव मोहम्मद, कधी आय लव महादेव आणि आणखी काही, यासाठी सरकारक मार्फत काही लोकांना नेमण्यात आले आहे,असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केलाय.सरकारकडून नेमण्यात आलेल्यांमध्ये राम कदम,गोपीचंद पडळकर,सदाभाऊ खोत अशा पाच-सात लोकांचा समावेश असून त्यांच्याकडून वाद निर्माण केले जातात,असे देखील राजू शेट्टींकडून स्पष्ट करण्यात आला आहे,ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 13, 2025 10:34:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा आरक्षण विषययावरून आज संभाजी नगरात मराठा क्रांती ठोक मोर्चा ने आपली भूमिका जाहीर केली, आरक्षण विषय संपला नाही जरांगे च्या आंदोलनातून अवघे 10 टक्के लोकांचा प्रश्न सुटलाय मात्र 90 टक्के लोकांसाठी लढा सुरू राहील असे सांगत नव्या आंदोलनाची घोषणा केली, मात्र या सगळ्यातून आता जरांगे अडचणीत येतयात हे मात्र स्पष्ट होताय.. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट.. जारांगेच्या आंदोलनाचा अवघ्या 10 टक्के लोकांना फायदा ! मराठा क्रांती ठोक मोर्चाची जरांगे विरोधी भूमिका ? आरक्षण साठी आता दिल्ली दरबारी उपोषणाची घोषणा मराठा आरक्षणाहुन अजूनही घमासान सुरुय, हैद्राबाद गॅजेट हुन समाजाला भरपूर मिळाल्याचा दावा जरांगे पाटील करताय, मात्र यातून फारसे काहीही साध्य झाले नाही असे सूर आता उमटायला लागले आहेत, संभाजी नगरात आज मराठा क्रांती ठोक मोर्चाने पत्रकार परिषद घेत आरक्षण प्रश्न सुटला नसल्याचे सांगत दिल्ली दरबारी दिवाळी नंतर उपोषण आणि या आंदोलन करण्यात येईल असे भूमिका जाहीर केली.. जरांगे च्या आंदोलनातून फक्त नोंदी असलेल्याना कुणबी प्रमाण पत्र मिळतील मात्र बहुसंख्य मराठा समाज यापासून दूर आहे अवघ्या 10 टक्के लोकांना फायदा झाल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले , आणि सरकारला आंदोलनाचा इशारा देण्यात आला..
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 13, 2025 10:21:38
Akola, Maharashtra:अकोल्यात प्रधानमंत्री ई-वस सेवा योजनेंतर्गत ई-सिटी बस डेपोचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत अकोल्यात ४२ ई-बस सेवा नववर्षात कार्यान्वित होणार आहे. १० कोटी ९७ लाख रुपयांच्या या प्रकल्पास शासनाने मान्यता दिली असून, त्यात केंद्र शासनाचा ६ कोटी ५० लाख, तर राज्य शासनाचा ४ कोटी ४७ लाख इतका आर्थिक वाटा आहे. तसेच महानगरपालिका निधीतून २ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एकूण ४२ ई-बसेस मंजूर असून, त्यापैकी २८ बस ९ मीटर लांबीच्या आणि १४ बस १२ मीटर लांबीच्या आहेत. सध्या इमारतीची पायाभरणी पूर्ण झाली असून, रस्ते व पार्किंग शेडचे काम अंतिम टप्यात, तर इलेक्ट्रिक सब-स्टेशनच्या उपकरण जोडणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे अकोल्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 13, 2025 09:50:21
Shirdi, Maharashtra:अत्याचाराच्या शंभर केसेसमध्ये शंभर महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात.. आपल्यातीलच काही मानसिक खतना झालेले लोक आरोपींना पाठीशी घालतात असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलंय.. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी बोलताना संग्राम जगताप यांनी पुन्हा आपल्या शैलीत जोरदार टीका केली आहे.. जे हिरवे साप फणा काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे.. या लोकांना वेळोवेळी माफ करण्याचे पाप आमच्यासकट अनेकांनी केले मात्र आता प्रायश्चित करण्याची वेळ आली आहे.. असे देखील आमदार जगताप यांनी म्हटलंय.. आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी अजित पवार
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 13, 2025 09:47:40
Yavatmal, Maharashtra:मध्य प्रदेश मध्ये कफ सिरप मुळे लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ मध्येही एका लहान मुलाचा मृत्यू सर्दी खोकल्याचे औषध सुरु असताना झाल्याने खळबळ उडाली आहे. एफ डी ए ने रुग्णालयाच्या मेडिकल मधून औषधीचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून खबरदारीचा उपाय म्हणून या औषधांची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. या जिल्ह्यातील पिंपळखुटी येथील शिवम गुरुनुले या सहा वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याची औषधी घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश मध्ये कफ सिरप घेतल्याने बालकांचे मृत्यू झाल्यानंतर आता यवतमाळ मध्ये देखील असाच प्रकार घडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. मृत शिवम ने यवतमाळ शहरातील बालरोगतज्ज्ञाकडून ४ व ६ ऑक्टोबर रोजी दोन दिवस औषध उपचार घेतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाळाची प्रकृती बिघडली. पालकांनी त्याला बालरोगतज्ज्ञाकडे नेले, त्यांनी शिवम ला शासकीय रुग्णालयात रेफर केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिवम चा मृत्यू झाल्याने शवचिकित्सा केली. त्यानंतर एफडीएने संबंधित रुग्णालयातील मेडिकलमधून सहा औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहे. तसेच राज्यात या औषधांच्या विक्री व वापरावर अहवाल येई पर्यंत बंदी घातली आहे. या औषधी मुळे शिवम ला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. बाळाचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला, तर इतर अवयव हिट्रोपॅथालॉजीकडे तपासणीला दिले आहे. आरोग्य विभागाचे पथकही शिवमच्या घरी पोहोचले. सर्दी खोकल्याची औषधी घेत असतानाच अचानक शिवम चा मृत्यू झाल्याने धक्का बसला असून तपासणीत काय खरे आहे ते समोर यावे अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 13, 2025 09:47:23
Yavatmal, Maharashtra:मध्य प्रदेश मध्ये कफ सिरप मुळे लहान मुलांच्या मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ मध्येही एका लहान मुलाचा मृत्यू सर्दी-खोकल्याच्या औषध सुरु असताना झाल्याने खळबळ उडाली आहे. एफडीए ने रुग्णालयाच्या मेडिकल मधून औषधीचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून खबरदारीचा उपाय म्हणून या औषधांची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. या औषधी मुळे शिवम ला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. बाळाचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला, तर इतर अवयव हिट्रॉपॅथालॉजीकडे तपासणीला दिले आहे. आरोग्य विभागाचे पथकही शिवमच्या घरी पोहोचले. सर्दी-खॅंख्याची औषधी घेत असतानाच अचानक शिवम चा मृत्यू झाल्याने धक्का बसला असून तपासणीत काय खरे आहे ते समोर यावे अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 13, 2025 09:46:59
Kolhapur, Maharashtra:जिल्हा परिषद आरक्षण सोडत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडत प्रक्रिया पार पडली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणुका झाल्या नव्हत्या त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच इच्छुकांचे लक्ष या सोडतीकडे लागले होते. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग १८, खुला २०, खुला महिला १९, अनुसूचित जाती ४, अनुसूचित जाती महिला ६, अनुसूचित जमाती १ अशी सोडत पार पडली. तर पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण सोडत देखील आज निघाली यामध्ये सांगरूळ- पुरूष अनूसुचीत जाती हातकंणगले-अनुसुचित जाती महिला ओबीसी कागल-महिला चंदगड-पुरूष आजरा- महिलाओपण गागा बावडा- महिला शाहूवाडी-महिला शिरोळ-पुरूष *पन्हाळा :पुरूष* भुदरगड-महिला राधानगरी-पुरूष गडहिंग्गलज-पुरूष अशा पद्धतीने सोडत झाल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मनाप्रमाणे आरक्षण न पडल्यामुळे अनेक जण नाराज झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 13, 2025 09:46:46
Nashik, Maharashtra:रिल्स वायरल करणाऱ्या मुलींवर देखील पोलिसांकडून कारवाई अँकर गुन्हेगारी घटनांवर आधारित रिल्स वायरल करणाऱ्या मुलींवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे....गेल्या काही दिवसांपासून रिल्स viral करणाऱ्या तरुणांवर कारवाई पोलीस करत होते.. आता नाशिक पोलिसांनी काही तरुणींवर देखील कारवाई केली आहे.. दोन मुलींनी धमकी देणारा एक रील तयार करून तो व्हायरल केला होता... याच संदर्भात पोलिसांनी या दोन्ही मुलींना ताब्यात घेत कारवाई केलीये.....हे नाशिक आहे भावा तु येथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल, नाही तर, तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिविल ला भेटल हॅशटॅग नाशिक ... असं या तरीुणीने आपल्या रील मध्ये म्हटलंय... या मुलींचा शोध घेत पोलिसांनी खाकी दाखवतात नाशिक जिल्हा कायद्यांचा बाल किल्ला असे उदगार काढायला लावले.. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय....
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 13, 2025 09:46:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली पोलीसांनी पकडलेल्या बनावट नोटा प्रकरणी मुंबई कनेक्शन पुढे आले होते. मुंबईला जाण्याच्या आधीच सांगली पोलिसांकडून बनावट नोटा जप्त करण्यात आले आहेत.याप्रकरणी मुंबईतल्या नोटा तस्करी करणाऱ्या सिद्धेश म्हात्रेला आधीच अटक देखील करण्यात आली असून त्याच्याकडून तपासामध्ये पहिल्यांदाच बनावट नोटांची कन्साईनमेंट घेण्यात येत होती, अशी माहिती पुढे आली आहे.तर या टोळीकडून मुंबईला पहिल्यांदा बनावट नोटा पाठवण्यात येत होत्या,या आधी मुंबईला बनावट नोटा पाठवण्यात आल्या नाहीत,या अशी माहिती तपासार समोर आली आहे. बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश करत मुंबईकडे जाणाऱ्या 98 लाख 53 हजार बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. तर निवडणुकांच्या तोंडावर बनावट नोटा आणि मुंबईचे कनेक्शन समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 13, 2025 09:36:23
Thane, Maharashtra:शहापूरातील आसनगाव जवारी एस‌ के आय प्लास्टो वेअर कंपनीला भिषण आग... आगीत लाखोचे नुकसान... शहापूर तालुक्यातील आसनगाव औद्योगिक क्षेत्रात असलेल्या एस के प्लास्टो वेअर या कंपनीला सकाळी १०:३० च्या सुमारास भीषण आग लागली आहे. ही कंपनी प्लास्टिकच्या शालेय बॉक्स, बाटल्या, टिफिन, स्टेशनरी वस्तू या साहित्याचे उत्पादन करते. आग इतकी भीषण आहे की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत लाखोचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आग सतत वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच, भिवंडी, कल्याण- डोंबिवली येथील अग्निशमन दलाच्या पथकांसह जिंदाल कंपनीच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहेत. तसेच शहापूर तालुक्यातील टँकर देखील घटना स्थळी दाखल झाले आहेत. आगावर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. बाईट- परमेश्वर कासुळे, तहसीलदार शहापूर
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 13, 2025 09:21:14
Chendhare, Alibag, Maharashtra:स्‍लग – रायगड जिल्‍हा परीषद सदस्‍यपदांचे आरक्षण जाहीर ........ नवीन आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्‍छुकांचा हिरमोड .......... महिला आरक्षणाने स्‍वप्‍नांवर अनेक ठिकाणी इच्‍छुकांच्‍या स्‍वप्‍नांवर पाणी ......... राजकीय पक्षांकडून नवीन उमेदवारांचा शोध सुरू .......... अँकर – रायगड जिल्‍हा परीषदेच्‍या 59 सदस्‍यपदासाठी आज झालेल्‍या आरक्षण सोडतीने अनेक इच्‍छुक उमेदवारांच्‍या आशा आकांक्षांवर पाणी फेरले आहे. पुरूष उमेदवार इच्‍छुक असलेले मतदार संघ महिलांसाठी आरक्षित झाल्‍याने त्‍यांचा हिरमोड झाला आहे. काहीनी आपल्‍या पत्‍नीला उमेदवारी देण्‍याचा विचार सुरू केलाय तर काही ठिकाणी नवीन उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. आरक्षण जाहीर झाल्‍यानंतर राजकीय पक्षांनी आपली रणनीती ठरवायला सुरूवात केली आहे. आज अलिबाग येथील नियोजन समिती सभागृहात जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत आरक्षण निश्चित करण्‍यात आले. 59 पैकी 30 जागा महिलांसाठी राखीव झाल्‍या आहेत. अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 9 तर ओबीसी प्रवर्गासाठी 15 जागा राखीव झाल्‍या आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top