Back
मराठवाडा में अतिवृष्टी: खरीप पिकें उध्वस्त, नुकसान करोड़ों में
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 02:15:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn marathwada loss av
Use file footage
मराठवाड्यात खरीप पीक पूर्णतः वाया गेले असल्याचे चित्र आहे, सरासरीच्या तुलनेत दीडपट जास्तीचा पाऊस झाल्यामुळे जोमात आलेले खरीप हंगामातील पीक आडवे झाले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत ५ हजार ३२० गावांतील पिक उध्वस्त केली, .
२२ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९, जालन्यातील १०, बीडमधील २९, लातूरमधील ३, धाराशिवमधील २१ तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर १३ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. पैठण तालुक्यातील आपेगाव मंडळात १६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये एकाच दिवसात ७५ मंडळांत अतिवृष्टी होण्याचा यंदा विक्रम झाला आहे.
मराठवाड्यात गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ६७९ मि.मी. पाऊस झालेला तर यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत २२ सप्टेंबरपर्यंत ७६९ मि.मी. म्हणजे ११७ टक्के पाऊस झाला होता.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील २२ तारखेपर्यंत मिळून २० लाख ९९ हजार ३०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ४ लाख ९१ हजार हेक्टरवरील पिके मागील नऊ दिवसांत हातून गेली आहेत.
तीन महिन्यांतील नुकसानीच्या तुलनेत विभागीय प्रशासनाने शासनाकडे २,३०० कोटींची नुकसान भरपाई मिळावी, असा अहवाल पाठविला आहे. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील ५० टक्के म्हणजेच ७०० कोटींच्या नुकसान भरपाईला मंजुरी मिळाली. मात्र तुलनेत नुकसानीचे आकडे मोठे आहेत, या 3 दिवसात नुकसानीत झपाट्याने वाढ झाली आहे...
गेल्या नऊ दिवसांतील अतिवृष्टीने सुमारे ५,३२० गावांतील खरीप हंगामातील पिके संपविली. २६६ मंडळांत अतिवृष्टीने थैमान घातले
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:17:460
Report
SKShubham Koli
FollowSept 23, 2025 10:02:030
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:01:160
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 09:39:310
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:18:140
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 09:17:230
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:17:120
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:17:060
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 09:16:520
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 09:16:330
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 23, 2025 09:15:400
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 23, 2025 09:02:320
Report
KJKunal Jamdade
FollowSept 23, 2025 09:00:560
Report
PNPratap Naik1
FollowSept 23, 2025 09:00:370
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 23, 2025 08:51:290
Report