Back
नवी मुंबई क्लीनर अपहरण केस: दिलीप खेडकर का जमानत आवेदन विचाराधीन
SNSWATI NAIK
Oct 06, 2025 18:18:24
Navi Mumbai, Maharashtra
क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या दोघांविरोधात सुरु असलेल्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. आरोपी दिलीप खेडकरने बेलापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, न्यायालयाने या अर्जावर अद्याप निर्णय न देता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.
दरम्यान, मुख्य आरोपींपैकी एक असलेली मनोरमा खेडकर अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर पोलिस तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ती मुद्दाम निर्धारित वेळ संपल्यानंतर म्हणजेच संध्याकाळीच रबाळे पोलिस ठाण्यात हजर झाली. परिणामी, “संध्याकाळी 6 नंतर महिलांची चौकशी करता येत नाही” या नियमाचा लाभ घेण्याचा तिचा हेतू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलीप खेडकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. तथापि, पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल करून त्यांनी न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी यांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालात, मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करत नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य फिर्यादी प्रल्हाद कुमार याने भीतीमुळे गावाकडे निघून गेल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
क्लीनरच्या अपहरणाशी संबंधित हा संपूर्ण प्रकार नवी मुंबई पोलिसांच्या रडारवर असून, मनोरमा आणि दिलीप खेडकर या दोघांच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. येत्या 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowDec 07, 2025 03:31:270
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 03:22:1224
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 07, 2025 03:21:5894
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 03:19:34208
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 07, 2025 03:00:0865
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 07, 2025 02:15:42183
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 07, 2025 02:15:17179
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 07, 2025 02:01:37107
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 06, 2025 16:31:57130
Report
WJWalmik Joshi
FollowDec 06, 2025 14:48:19115
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 06, 2025 14:15:55217
Report
ABATISH BHOIR
FollowDec 06, 2025 14:02:07145
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 06, 2025 13:48:05Yeola, Maharashtra:केमिकल युक्त द्राक्षां संदर्भात डॉ. श्रीकांत काकड (एमडी मेडिसिन ,) संचालक साई सिद्धी हॉस्पिटल, येवला यांची मुलाखत
159
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 06, 2025 13:46:37131
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 06, 2025 13:46:2368
Report