Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नासिक में गुलाबी ठंड ने लोगों को चौंका दिया, पारा 10.8° तक गिरा
YKYOGESH KHARE
Nov 10, 2025 04:15:11
Nashik, Maharashtra
नाशिक मध्ये तापमान 10.8 तर निफाड मध्ये पारा 9.5 अंशावर यंदाच्या मोसमतील नीचांकी तापमान पारा घसरत असल्याने नाशिककरांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे नाशिक मध्ये गुलाबी थंडीचे आगमन पारा घसरत असल्याने थंडीत वाढ गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी शहरातील अनेक मैदानांवर कसरतीसाठी नागरिकांची गर्दी
12
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Nov 10, 2025 06:02:39
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात वनविभाग करणार हमखास व्याघ्रदर्शनाची सोय , 515 एकर परिसरात साकारणार चंद्रपूर टायगर सफारी, वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह साकारणार अमेरिकन, आफ्रिकन सफारी अँकर:--चंद्रपूरात वनविभाग हमखास व्याघ्रदर्शनाची सोय करणार आहे. चंद्रपूर शहराच्या सीमेवर 515 एकर परिसरात चंद्रपूर टायगर सफारी साकारणार आहे. यात वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह अमेरिकन, आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे. चंद्रपूर वाघांचा जिल्हा आहे. गेली 40 वर्षे उत्तम वने आणि वन्यजीव व्यवस्थापनामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे यात नियोजनबद्धता आली आहे. अशातच प्रादेशिक वनांत सहज वावरणाऱ्या वाघ आणि इतर वन्यजीवांशी मानवाशी होणारा संघर्ष ग्रामस्थांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी वाघांचे स्थलांतर केले जात आहे. मात्र एकीकडे समस्याग्रस्त वाघ- बिबटे यांना पकडून त्यांना या टायगर सफारीत सोडत पर्यटकांना पिंजरा असलेल्या वाहनातून फिरवत सफारी घडविण्यासाठी वनविभागाने पावले उचलली आहेत. यासाठी वनविकास महामंडळाला जबाबदारी देण्यात आली आहे. याच ठिकाणी एक मोठे वन्यजीव शुश्रूषा केंद्र देखील उभारले जाणार असून देश-विदेशातील पर्यटकांना उत्तम विरंगुळा केंद्र म्हणून चंद्रपूर टायगर सफारी विकसित केली जाणार आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Nov 10, 2025 05:52:10
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 10, 2025 05:51:54
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी कचरा दिसून येतो. त्यामुळे सजग कोल्हापूरकर हैरान झालेत. काही महाशयांनी रंकाळा चौपाटीवरच कचऱ्याचे ढीग मांडले. त्यामुळे हैरान झालेल्या काही लोकांनी या कचराच्या ढीगाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. ज्या रंकाळा चौपाटीवर या कचऱ्याचा ढीग होता त्याच ठिकाणी कचऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. कोल्हापूर महानगरपालिका कचरा न उचलल्यामुळे अशा अनोख्या पद्धतीने हा निषेध व्यक्त करण्यात आला. कचऱ्याची प्रतीकात्मक तिरडी सजवून त्यावर 'मला येथून कायमचा उचला' असा मजकूर देखील लिहिला. किमान या मस्कराचा विचार करून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आता तरी शहरातील कचरा योग्य नियोजन लावून उचलते का ? याकडे कोल्हापूर शहरातील नागरिकांचे लक्ष आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 10, 2025 05:51:41
Nanded, Maharashtra:Anchor - नांदेड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडेपुरी गावाजवळ काल रात्री बिबट्या आढळला. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या पायाथ्याशी बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. काल रात्री साडेसातच्या सुमरास एक व्यापारी कुटुंबं आपल्या कारामधून वडेपुरी भागातून जात असताना त्यांना अचानक बिबट्या दिसला. कर थांबवून त्यांनी या बिबट्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. माहिती मिळताच वन विभागाची टीम ya ठिकाणी पोहोचली. बिबट्याच्या पायाचे ठसे या भागात वनविभागाला आढळले. त्यामुळे बिबट्या या परिसरात आल्याचे स्पष्ट झाले. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबत्याला शोधण्यासाठी वन विभागाची टीम प्रयत्न करत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 10, 2025 05:51:26
Nagpur, Maharashtra:नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा पहिला दिवस आहे.. मात्र अजूनही नागपूरसह विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये महायुती वा महाविकास आघाडी यांचे युती, आघाडी संदर्भातील चित्र अस्पष्ट आहे.. त्यामुळे सध्या तरी विदर्भात सर्वच पक्षांबद्दल सर्वत्र स्वबळ किंवा मैत्रीपूर्ण लढत असेच राजकीय समीकरण दिसून येत आहे... निवडणुकांचे अनुषंगाने नागपुरातील सध्याची राजकीय परिस्थिती *1) नागपूर :* --- नागपुरात भाजपा महायुतीमध्ये वरचढ आहे... -- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहे --- दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस मोठा भाऊ... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना काँग्रेसवर फारसा भरोसा ठेवायला तयार नाही.. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडीसुद्धा निर्माण करू शकते...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 10, 2025 05:46:18
Nanded, Maharashtra:नांदेड महापालिकेवर मागच्या सत्तर वर्षापासून चव्हाण परिवाराची सत्ता आहे. अशोक चव्हाण यांनी बीओटी च्या नावावर महापालिकेच्या सार्वजनिक वापराच्या जागा बिल्डरांना विकलेल्या अशी टीका आमदार हेमंत पाटील यांनी केली. ज्या ज्या आयुक्तांनी या जागा देण्यासाठी चुकीची कामं केली त्यांच्याबद्दल येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार त्यांना सोडणार नाही असाही इशारा हेमंत पाटील यांनी दिला. नांदेड महापालिकेच्या ज्या जागा बीओटी वर देण्यात आल्या त्याची उदाहरणं पाटील यांनी दिली. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत हा मुद्दा राहणार असल्याचेही हेमंत पाटील म्हणाले. या आधीही आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांचे नाव घेऊन थेट निशाणा साधला होता. त्यामुळे येणाऱ्या नांदेड महापालिका निवडणुकीत शिंदे सेना और भाजप नांदेडमध्ये स्वबळावर लढणार असे दिसते.
1
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 10, 2025 05:32:40
2
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 10, 2025 05:18:22
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरातील किल्ले भुदरगडावर साहसी खेळांच्या ॲक्टीव्हीटींचा शुभारंभ भुदरगड तालुक्याच्या पर्यटनात पडणार भर पालकमंत्री आबिटकरांनी घेतला पॅरामोटरिंगचा खेळचा रोमांचक अनुभव कोल्हापूरातील ऐतिहासिक किल्ले भुदरगडावर राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या साहसी खेळांच्या ॲक्टिव्हिटींचा शुभारंभ करण्यात आला.. देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भुदरगड किल्ल्यावर पॅरामोटरिंग, पॅराग्लायडींग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंग, टेलिस्कोप, फ्लोटिंग जेटी हे साहसी खेळांच प्रकार सुरू करण्यात आले आहेत.. शिवाय पर्यटकांचे आकर्षण असलेल्या दुधी तलावात मनमुराद बोटिंग चा अनुभव घेता यावा , यासाठी या ठिकाणी अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत..यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पॅरामोटरिंगचा रोमांचकारी अनुभव घेतला..एक कोटी 28 लाख रुपये खर्चून महाबळेश्वर, पानशेतच्या धरतीवर भुदरगड किल्ल्यावर साकारण्यात आलेल्या साहसी खेळांच्या ॲक्टीव्हीटींमुळे पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबितकर यांनी यावेळी व्यक्त केला..तसचं येणाऱ्या काळात भुदरगड आणि रांगणा किल्ल्याच्या विकासासह पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करण्यात असल्याचं प्रकाश आबिटकरांनी सांगितलं.. यावेळी पालकमंत्री आबिटकरांनी पॅरामोटरिंग खेळचा रोमांचक अनुभव घेतला.
3
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 10, 2025 04:48:22
Satara, Maharashtra:सातारा: जगातील सर्वात लहान उंची असणारी जिवंत पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातल्या मलवडीच्या 'राधा' ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या 'राधा'ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून प्रत्येक प्रदर्शनात ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मलवडीतील शेतकरी आणि पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हैशीच्या पोटी 19 जून 2022 रोजी 'राधा'चा जन्म झाला. 'राधा' दोन-अडीच वर्षाची झाल्यावर तिच्या उंचीतील बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने 'राधा'ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. 21 डिसेंबर 2024 सोलापूर येथील सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा 'राधा'ने सहभाग घेतला. अन् 'राधा'चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी कृषी प्रदर्शन व कर्नाटकातील निपाणी येथील कृषी प्रदर्शनासह एकूण १३ कृषी प्रदर्शनात खास आकर्षण म्हणून 'राधा'ला निमंत्रित करण्यात आले. 24 जानेवारी 2025 रोजी 'राधा'ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने 'राधा'च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. आणि 12 सप्टेंबर २०२५ ला 'राधा'ची पाहणी करुन अहवाल पाठवला. 20 सप्टेंबरला कागदपत्रे सादर केली. आणि 'राधा'ची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. यामुळे यानंतर राधाचे म्हशीचे मालक यांच्यावर कौतुकांचा वर्ष होताना पाहायला मिळत आहे बाईट: अनिकेत बोराटे ('राधा' म्हैशीचे मालक) नाव - राधा वैशिष्ट्य - जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस उंची - 83.8 सेमी (2 फूट 8 इंच) ठिकाण - मलवडी, ता. माण, जि. सातारा, महाराष्ट्र
11
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 10, 2025 04:47:15
Washim, Maharashtra:पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या बाजारपेठेतील वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन बीजवाई उन्नती या वाणाला तब्बल आठ हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. या दरवाढीमुळे वाशिमसह हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी वाशिमकडे धाव घेतली आहे. काल सायंकाळपासून बाजार समितीत प्रथमच ३० ते ३२ हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे. बाजार परिसरात ट्रॅक्टर आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या बाजारात दरात चढ-उतार सुरू असून शेतकऱ्यांना नेमका किती दर मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम बाजार समितीतील ही विक्रमी आवक आणि वाढता दर पाहता, आगामी दिवसांत सोयाबीन बाजाराचा कल काय राहतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आमच्या सोयाबीन लवकर लिलाव करुन मोजून घेऊ चांगला दर देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
12
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 10, 2025 04:19:05
Ratnagiri, Maharashtra:युतीच्या घोषणे आधीच खेड मध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारा ठरल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता. नव्याने भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकर यांच्याकडून त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख असलेले फोटो वायरल. तर शिंदेच्या शिवसेनेकडून माधवी बुटाला खेडचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार......... महायुतीमधील दोन महत्वाच्या पक्षांकडून वेगवेगळे उमेदवार समोर आल्यामुळे राजकीय गोटात चर्चांना उधाण. स्वतंत्र उमेदवारांची नावे समोर आल्यामुळे खेडमध्ये महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता. वैभव खेडेकर यांनी पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख करत व्हॉटस् अँप स्टेट्स केले अपडेट.....तर तिकडे शिंदेच्या शिवसेनेच्या माधवी बुटाला यांचे बॅनर देखील झाले वायरल.खेड मध्ये योगेश कदम विरूुद्ध भाजपा संघर्ष वाढण्याची चिन्हे
14
comment0
Report
Advertisement
Back to top