Back
वाशिम बाजार में सोयाबीन दामों ने किसानों के चेहरों पर मुस्कान ला दी
GMGANESH MOHALE
Nov 10, 2025 04:47:15
Washim, Maharashtra
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या बाजारपेठेतील वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन बीजवाई उन्नती या वाणाला तब्बल आठ हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. या दरवाढीमुळे वाशिमसह हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी वाशिमकडे धाव घेतली आहे. काल सायंकाळपासून बाजार समितीत प्रथमच ३० ते ३२ हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे. बाजार परिसरात ट्रॅक्टर आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या बाजारात दरात चढ-उतार सुरू असून शेतकऱ्यांना नेमका किती दर मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम बाजार समितीतील ही विक्रमी आवक आणि वाढता दर पाहता, आगामी दिवसांत सोयाबीन बाजाराचा कल काय राहतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आमच्या सोयाबीन लवकर लिलाव करुन मोजून घेऊ चांगला दर देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 10, 2025 06:02:394
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 10, 2025 05:52:104
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 05:51:544
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 10, 2025 05:51:411
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 05:51:261
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 10, 2025 05:46:355
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 10, 2025 05:46:185
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 10, 2025 05:32:404
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 05:31:46Jalna, Maharashtra:जालना : जालन्यात आज ओबीसी,भटके विमुक्तांचा मोर्चा
ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी मोर्चा
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
वाक थ्रू
5
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 05:18:225
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 05:17:375
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 04:48:2211
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 04:20:0313
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 04:19:0514
Report