Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639
खेड में महायुती के उमेदवार चयन को लेकर घमासान, वैभव-वैभवी विवाद
PPPRANAV POLEKAR
Nov 10, 2025 04:19:05
Ratnagiri, Maharashtra
युतीच्या घोषणे आधीच खेड मध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारा ठरल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता. नव्याने भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकर यांच्याकडून त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख असलेले फोटो वायरल. तर शिंदेच्या शिवसेनेकडून माधवी बुटाला खेडचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार......... महायुतीमधील दोन महत्वाच्या पक्षांकडून वेगवेगळे उमेदवार समोर आल्यामुळे राजकीय गोटात चर्चांना उधाण. स्वतंत्र उमेदवारांची नावे समोर आल्यामुळे खेडमध्ये महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता. वैभव खेडेकर यांनी पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख करत व्हॉटस् अँप स्टेट्स केले अपडेट.....तर तिकडे शिंदेच्या शिवसेनेच्या माधवी बुटाला यांचे बॅनर देखील झाले वायरल.खेड मध्ये योगेश कदम विरूुद्ध भाजपा संघर्ष वाढण्याची चिन्हे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGajanan MAchindar
Mar 17, 2026 02:48:40
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 17, 2026 02:34:08
704
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 17, 2026 02:32:26
Ahilyanagar, Maharashtra:जिल्हाधिकारी कार्यालय समोर जागरण गोंधळ आंदोलन अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पतसंस्थांच्या बोगस वसुली दाखल्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील काही पतसंस्थांकडून बोगस वसुली दाखले दाखवून कर्जदारांची लूट केली जात असल्याचा आरोप सह्याद्री छावा संघटनेने केला आहे. संघटनेकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले ल. संबळ आणि हलगीच्या वाजवत आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. एनपीएचे निकष डावलून आणि नियमांचे उल्लंघन करून कर्जदारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या प्रकरणांचे फेर लेखापरीक्षण आणि फॉरेन्सिक ऑडिट करावे अशी मागणी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
659
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 02:31:24
765
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 02:18:25
Shirur, Maharashtra:सध्या पुणे नाशिक महामार्गवरून खासगी प्रवासी वाहतूकित वाढली असून अनेक मोठ्या ट्रॅव्हल्स ह्या पूर्ण क्षमतेने भरून जातं आहेत, मात्र काही खासगी वाहून कंपन्या मात्र नियमांना हरताळ फासत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी ओव्हरलोड करत अवैध वाहतूक करत आहेत. प्रवासी घेऊन प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. पुणे नाशिक महामार्गांवर स्लीपर कोच वाहने धावण्याचे प्रमाण सायकाळ नंतर मोठ्या प्रमाणावर असते, दररोज पुण्याहून जळगाव, धुळे, तसेच अगदी इंदोर पर्यंत या गाड्या धावत असतात, मात्र काही प्रवासी बसमध्ये गाडीच्या पुढील बाजूस चालका शेजारी अगदी जिन्यांवर बसून प्रवासी वाहतूक केली जातं असून जिथे फक्त चालकाला मदत म्हणून एक व्यक्ति सोबत घेऊन प्रवास करण्याची मुभा आहे तिथे १० ते १५ जण बसवून प्रवासात केला जातं आहे.
1063
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 17, 2026 02:17:32
Beed, Maharashtra:बीडमध्ये गॅस टंचाईविरोधात अनोखे आंदोलन; नाल्याच्या गॅसवर ‘चाय पे चर्चा’..! ANC - बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली “नाल्याच्या गॅसवरील चाय पे चर्चा” या नावाने हे आंदोलन करण्यात आले. सध्या बीड जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषतः हॉटेल आणि खानावळींना गॅसचा पुरवठा बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी खानावळींवर जेवणासाठी अवलंबून असल्याने त्यांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाल्यातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवून प्रतीकात्मक निषेध नोंदवला. “चाय पे चर्चा” करत सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. बाईट: गणेश ढवळे, आंदोलकर्ते
1017
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 02:02:56
Jalna, Maharashtra:जालना : ब्रेकिंग | गैस गोदाऊनमधून 110 सिलेंडर चोरीला गोडाऊन फोडून सिलेंडर चोरले अज्ञात चोरट्यांनी लंपास केले गॅस सिलेंडर रामनगरच्या आनंद भारत गॅस गोडाऊन मधील घटना गॅस टंचाईच्या काळात सिलेंडर चोरीला गेल्याने खळबळ मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गॅसच्या गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी भरलेले 110 गॅस सिलिंडर लंपास केल्याची घटना जालन्यातील रामनगर येथे घडली आहे.गोडाऊन फोडून हे सिलिंडर लंपास करण्यात आले आहेत. त्यात 14 किलो वजनाचे 96, तर 5 किलो वजनाचे 2 आणि 19 किलो वजनाचे 12 सिलिंडर आहेत. ही घटना जालना तालुक्यातील रामनगर परिसरातील आनंद भारत गॅस गोडाऊनमध्ये 14 ते 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरट्यांनी गोडाऊनचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. 4 लाख 51 हजार 543 रुपये इतक्या किंमतीचे सिलिंडर चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात सिद्धार्थ आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोडाऊनमधून यापूर्वीही गॅस सिलिंडर चोरीला गेल्याच्या घटना घडलेल्या आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर टंचाई निर्माण झाली असून, या काळातच चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
1014
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 17, 2026 02:01:46
Dharashiv, Maharashtra:दुकानासमोर कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्याला हजार रुपये दंड कळंब नगरपालिकेने व्यापाऱ्यांना दिल्या नोटीसा दुकानदारांना कचरा वर्गीकरण सक्तीचं. नियम पाळला नाही तर थेट दंड कळंब नगरपरिषदेचा कडक इशारा कळंब शहरात स्वच्छता मोहिमेला गती देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. दुकानदारांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे बंधनकारक करण्यात आले असून नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नियम न पाहणाऱ्या व्यापाऱ्यांना हजार रुपये दंड केला जाणार असल्याचं मोठी नमूद करण्यात आले आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करूनच तो नगरपरिषदेकडे द्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छ शहर अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंड आकारण्यात येणार आहे.
962
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 01:48:14
Jalna, Maharashtra:जालना : शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांनी घेतली धनगर आंदोलकांची भेट,पाठपुरावा करण्याचं दिलं आश्वासन धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या उपोषण स्थळी अर्जुनराव खोतikar यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करत त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी , या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण सुरू असल्याचे दिपक बोऱ्हाडे यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असल्याने समाजात तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आंदोलनकर्त्यांना धनगर समाजाच्या न्याय्य मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून त्याबद्दल योग्य पाठपुरावा करण्यात येईल. तसेच समाजाच्या भावना शासन दरबारी मांडून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलं.
973
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 17, 2026 01:48:05
Satara, Maharashtra:सातारा: सातारकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने "तुमच्या दारी मोफत डिजिटल आरोग्य तपासणी व्हॅन" सुरू करण्यात आली आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या व्हॅनचे थाटात लोकार्पण करण्यात आले.यावेळी खा.उदयनराजे यांनी देखील या सुसज्ज व्हॅन द्वारे आपली आरोग्य तपासणी केली.रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांच्या संकल्पनेतून ही अत्याधुनिक वैद्यकीय व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये डिजिटल ब्लड तपासणीसह प्राथमिक आरोग्य तपासणीची सर्व साधने उपलब्ध आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना विनामूल्य और जलद आरोग्य सेवा पुरवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट चौदावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांचे चिरंजीव छ. विरप्रतापसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'रक्षक प्रतिष्ठान'च्या वतीने हा स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यावेळी रक्षक प्रतिष्ठानने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत शासनाने सुद्धा हा उपक्रम राबवावा असे आवाहन यावेळी उदयनराजे यांनी केले आहे.
993
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 16, 2026 18:16:13
Kalyan, Maharashtra:केडीएमसी के उबाठा नगरसेवक मधुर म्हात्रे का शिवसेना में प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों, विधायक राजेश मोरे की उपस्थिति में पक्ष प्रवेश। आज मधुर म्हात्रे उबाठ से हकालपट्टी की खबर आई थी। कल कल्याण डोंबिवली महापालिका में स्थायी समिती और सभागृह नेता के लिए महासभा बुलाई गई थी। महासभा समाप्त होते ही शिवसेना को ubt को बड़ा झटका लगा। इसके बाद शाम को मधुर म्हात्रे ने उपमुख्यमंत्री शिंदे के हाथों शिवसेना में प्रवेश किया, जिससे ubt के खिलाफ कार्रवाई के संकेत मिलने लगे। हालांकि हकालपट्टी के पहले ही मधुर म्हात्रे ने शिवसेना में प्रवेश कर ubt की भूमिका पर नई स्थिति बना दी।
1094
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 16, 2026 17:30:23
Wardha, Maharashtra:सावंगी रुग्णालयात स्टाफ नर्सचा आत्महत्येचा प्रयत्न; मानसिक त्रासाचा आरोप अँकर - वर्ध्याजवळील सावंगी येथील रुग्णालयात कार्यरत असलेल्या स्टाफ नर्सने मानसिक त्रासाला कंटाळून रुग्णालय परिसरातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्विनी मनोहरराव चतुर (दुधनकर) असे त्या स्टाफ नर्सचे नाव असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी रुग्णालयातील एका सुरक्षारक्षकासोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. या चौकशीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांकडून वारंवार मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान पैशांची मागणी तसेच आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे त्या मानसिक तणावाखाली गेल्याची माहिती समोर येत आहे.या त्रासाला कंटाळून अश्विनी चतुर यांनी रुग्णालयातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी या संदर्भात एक सुसाइड नोटही लिहून ठेवली असून त्यामध्ये संबंधित अधिकारी व सुरक्षारक्षकांची नावे नमूद केल्याची माहिती आहे.या प्रकरणी अश्विनी चतुर यांच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच या प्रकरणामागील नेमके कारण समोर येणार आहे.
1053
comment0
Report
Advertisement
Back to top