Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेड नगरपालिका में चव्हाण परिवार का राज; हेमंत पाटील बोले- बीओटी घोटाले के साक्ष्य

SMSATISH MOHITE
Nov 10, 2025 05:46:18
Nanded, Maharashtra
नांदेड महापालिकेवर मागच्या सत्तर वर्षापासून चव्हाण परिवाराची सत्ता आहे. अशोक चव्हाण यांनी बीओटी च्या नावावर महापालिकेच्या सार्वजनिक वापराच्या जागा बिल्डरांना विकलेल्या अशी टीका आमदार हेमंत पाटील यांनी केली. ज्या ज्या आयुक्तांनी या जागा देण्यासाठी चुकीची कामं केली त्यांच्याबद्दल येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार त्यांना सोडणार नाही असाही इशारा हेमंत पाटील यांनी दिला. नांदेड महापालिकेच्या ज्या जागा बीओटी वर देण्यात आल्या त्याची उदाहरणं पाटील यांनी दिली. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत हा मुद्दा राहणार असल्याचेही हेमंत पाटील म्हणाले. या आधीही आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांचे नाव घेऊन थेट निशाणा साधला होता. त्यामुळे येणाऱ्या नांदेड महापालिका निवडणुकीत शिंदे सेना और भाजप नांदेडमध्ये स्वबळावर लढणार असे दिसते.
9
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 10, 2025 07:15:50
Kolhapur, Maharashtra:राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धरतीवर कोल्हापुरात बांधलेल्या खासबाग कुस्ती मैदानाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. याचा निषेध म्हणून आज कोल्हापुरातील अनेक पैलवान आणि सजग कोल्हापूरकरानी एकत्र येत आंदोलन केलं. शाहू खासबाग मैदानात शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून निषेध नोंदविला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना वारंवार खासबाग कुस्त्यांचं मैदान दुरुस्त करून खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळेच आज अनेक पैलवानांनी शाहू खासबाग कुस्त्याच्या मैदानाकडे धाव घेऊन अभिनव आंदोलन केलं. यावेळी कुस्तीपटू आणि कुस्ती प्रेमींनी कोल्हापूर महानगरपालिकेला दोन दिवसात मैदान सुस्थितीत करून द्यावे अशी मागणी केलीय.. अन्यथा महाराष्ट्रातील पैलवानांना एकत्र आणून मोठा लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला.
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 10, 2025 07:03:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद ऑन शरद पवार मूळ ओबीसी प्राधान्य.. शरद पवार यांनी केलेला वक्तव्य सहज सहजी केलं निर्णय नाही. यामुळे इतर समाजामध्ये संभ्रम निर्माण केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा निर्णयाने जातीवादाला खतपाणी मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका सर्व पक्षाची असावी. - मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न,त्यांना सांगायचं दुसरे असते. अशा वक्तव्यामुळे चर्चा सुरू होते. ही त्यांच्या पक्षाची भूमिका... - कोणताही टॅग निघत नसतो, जाणीवपूर्वक केलेलं विधान आहे.. ऑन सामना लेख.. - संजय राऊत यांची ताब्यात चांगली नाही. उपचार घ्या. आजार पणात मी शांत बसत नाही हे दाखवण्याचे प्रयत्न आहे. प्रकरणाच्या चौकश्या सुरू आहेत. ऑन मुंबई भाजप निवडणूक... - सर्वच पक्ष निवडणुकिच्या तयारीला लागले आहे. - युती करताना कोणत्या जागा ठेवायच्या कोणत्या द्यायचा अजून ठरले नाही. मात्र आमचे प्रयत्न महायुती असणार आहे. - प्रत्येकाने आपापली ताकद आजमावले आहे. स्थानिक नेत्यांचे मते विचारात घेऊन ठरवणार असे भाजप म्हणाले तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतील. ओन वडेट्टीवार स्वबळ - वड्डेटीवर, भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यांचं तळ्यात मळ्यात चालू आहे. अनेक पक्षात अशी प्रकार घडतील. लोकशाही अपेक्षित निवडणुका होतील. ओन मोहन भागवत - मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्यात गैर काहीही नाही, त्याचा स्वागत केले पाहिजे. कटुता कमी होण्याचे संकेत होतात. ओन राज ठाकरे सुरक्षा - एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना समिती ठरवत असते सुरक्षा वाढवली जाते. जाणीवपूर्क असे होत नाही. गुप्त माहितीच्या आधारावर होत असते. On कडू - बच्चू कडू लोकप्रतिनिधी राहिलेले आहे. त्यांनी असे वक्तव्य करणे, त्यांच्याकडून असे वक्तव्य अपेक्षित नाही. त्यामुळे कार्यकर्त्यात चुकीचा संदेश जातो, असे वक्तव्य थांबवले पाहिजे. ओन पणन मंत्री सुनावणी - या संदर्भात मला कल्पना नाही. जे जे खाते पक्षाकडे आहे. त्यांनी तो निर्णय घ्यायचा असे आतापर्यंत आहे.. ओन पुणे लँड - अजित दादा यांनी वारंवार खुलासे केले आहे. जे प्रश्न आहेत. ते गांभीर्याने घेतले पाहिजे. यंत्रणेने आतापर्यंत काय काय केले हे आज स्पष्ट होईल. ऑन हर्षवर्धन सपकाळ. - सपकाळ यांची बालबुद्धी आहे. मोहन भागवत काय करू शकतात, त्यांच्या नेत्यांना पण समजणार नाही. त्याचं स्थान देशात अढळ आहे. ऑन सत्तार अडचण. - अब्दुल सत्तार यांनी काय दिले मला माहिती नाही, कोर्टाचे आदेश पाहून पुढील सांगता येईल. ऑन मातोश्री... - ड्रोन चे वावडे उठवणे योग्य नाही. त्यावर पडदा पाडा, तो सर्व्हे सुरू होत.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 10, 2025 06:48:47
Pimpri-Chinchwad, Maharashtra:शीतल तेजवानीच्या अटकेसाठी बावधन पोलिसांची दिरंगाई केली जात आहे. बावधन परिसरातील अमेडिया कंपनीशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पोलिसांकडून अटकेसाठी दिरंगाई केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या प्रकरणात बावधन पोलिसांकडे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाचा तपास चालू असल्याचं लक्षात येतं. त्या वेळी अजित पवारांचे पदाधिकारी आणि वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे व सुशील हगवणेला अटकेसाठी टाळाटाळ केली गेली. त्यावेळी पोलिसांवर राजकीय दबाव होता, अशाच दबावाचा आत्ता देखील संभव आहे. म्हणून शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अटकेची दिरंगाई केली जाते, हा प्रश्न उपस्थित केला जातो.
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 10, 2025 06:02:39
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात वनविभाग करणार हमखास व्याघ्रदर्शनाची सोय , 515 एकर परिसरात साकारणार चंद्रपूर टायगर सफारी, वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह साकारणार अमेरिकन, आफ्रिकन सफारी अँकर:--चंद्रपूरात वनविभाग हमखास व्याघ्रदर्शनाची सोय करणार आहे. चंद्रपूर शहराच्या सीमेवर 515 एकर परिसरात चंद्रपूर टायगर सफारी साकारणार आहे. यात वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह अमेरिकन, आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे. चंद्रपूर वाघांचा जिल्हा आहे. गेली 40 वर्षे उत्तम वने आणि वन्यजीव व्यवस्थापनामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे यात नियोजनबद्धता आली आहे. अशातच प्रादेशिक वनांत सहज वावरणाऱ्या वाघ आणि इतर वन्यजीवांशी मानवाशी होणारा संघर्ष ग्रामस्थांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी वाघांचे स्थलांतर केले जात आहे. मात्र एकीकडे समस्याग्रस्त वाघ- बिबटे यांना पकडून त्यांना या टायगर सफारीत सोडत पर्यटकांना पिंजरा असलेल्या वाहनातून फिरवत सफारी घडविण्यासाठी वनविभागाने पावले उचलली आहेत. यासाठी वनविकास महामंडळाला जबाबदारी देण्यात आली आहे. याच ठिकाणी एक मोठे वन्यजीव शुश्रूषा केंद्र देखील उभारले जाणार असून देश-विदेशातील पर्यटकांना उत्तम विरंगुळा केंद्र म्हणून चंद्रपूर टायगर सफारी विकसित केली जाणार आहे.
8
comment0
Report
UJUmesh Jadhav
Nov 10, 2025 05:52:10
8
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 10, 2025 05:51:54
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी कचरा दिसून येतो. त्यामुळे सजग कोल्हापूरकर हैरान झालेत. काही महाशयांनी रंकाळा चौपाटीवरच कचऱ्याचे ढीग मांडले. त्यामुळे हैरान झालेल्या काही लोकांनी या कचराच्या ढीगाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. ज्या रंकाळा चौपाटीवर या कचऱ्याचा ढीग होता त्याच ठिकाणी कचऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. कोल्हापूर महानगरपालिका कचरा न उचलल्यामुळे अशा अनोख्या पद्धतीने हा निषेध व्यक्त करण्यात आला. कचऱ्याची प्रतीकात्मक तिरडी सजवून त्यावर 'मला येथून कायमचा उचला' असा मजकूर देखील लिहिला. किमान या मस्कराचा विचार करून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आता तरी शहरातील कचरा योग्य नियोजन लावून उचलते का ? याकडे कोल्हापूर शहरातील नागरिकांचे लक्ष आहे.
6
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 10, 2025 05:51:41
Nanded, Maharashtra:Anchor - नांदेड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडेपुरी गावाजवळ काल रात्री बिबट्या आढळला. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या पायाथ्याशी बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. काल रात्री साडेसातच्या सुमरास एक व्यापारी कुटुंबं आपल्या कारामधून वडेपुरी भागातून जात असताना त्यांना अचानक बिबट्या दिसला. कर थांबवून त्यांनी या बिबट्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. माहिती मिळताच वन विभागाची टीम ya ठिकाणी पोहोचली. बिबट्याच्या पायाचे ठसे या भागात वनविभागाला आढळले. त्यामुळे बिबट्या या परिसरात आल्याचे स्पष्ट झाले. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबत्याला शोधण्यासाठी वन विभागाची टीम प्रयत्न करत आहे.
4
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 10, 2025 05:51:26
Nagpur, Maharashtra:नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा पहिला दिवस आहे.. मात्र अजूनही नागपूरसह विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये महायुती वा महाविकास आघाडी यांचे युती, आघाडी संदर्भातील चित्र अस्पष्ट आहे.. त्यामुळे सध्या तरी विदर्भात सर्वच पक्षांबद्दल सर्वत्र स्वबळ किंवा मैत्रीपूर्ण लढत असेच राजकीय समीकरण दिसून येत आहे... निवडणुकांचे अनुषंगाने नागपुरातील सध्याची राजकीय परिस्थिती *1) नागपूर :* --- नागपुरात भाजपा महायुतीमध्ये वरचढ आहे... -- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहे --- दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस मोठा भाऊ... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना काँग्रेसवर फारसा भरोसा ठेवायला तयार नाही.. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडीसुद्धा निर्माण करू शकते...
2
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 10, 2025 05:32:40
5
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 10, 2025 05:18:22
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरातील किल्ले भुदरगडावर साहसी खेळांच्या ॲक्टीव्हीटींचा शुभारंभ भुदरगड तालुक्याच्या पर्यटनात पडणार भर पालकमंत्री आबिटकरांनी घेतला पॅरामोटरिंगचा खेळचा रोमांचक अनुभव कोल्हापूरातील ऐतिहासिक किल्ले भुदरगडावर राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या साहसी खेळांच्या ॲक्टिव्हिटींचा शुभारंभ करण्यात आला.. देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भुदरगड किल्ल्यावर पॅरामोटरिंग, पॅराग्लायडींग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंग, टेलिस्कोप, फ्लोटिंग जेटी हे साहसी खेळांच प्रकार सुरू करण्यात आले आहेत.. शिवाय पर्यटकांचे आकर्षण असलेल्या दुधी तलावात मनमुराद बोटिंग चा अनुभव घेता यावा , यासाठी या ठिकाणी अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत..यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पॅरामोटरिंगचा रोमांचकारी अनुभव घेतला..एक कोटी 28 लाख रुपये खर्चून महाबळेश्वर, पानशेतच्या धरतीवर भुदरगड किल्ल्यावर साकारण्यात आलेल्या साहसी खेळांच्या ॲक्टीव्हीटींमुळे पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबितकर यांनी यावेळी व्यक्त केला..तसचं येणाऱ्या काळात भुदरगड आणि रांगणा किल्ल्याच्या विकासासह पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करण्यात असल्याचं प्रकाश आबिटकरांनी सांगितलं.. यावेळी पालकमंत्री आबिटकरांनी पॅरामोटरिंग खेळचा रोमांचक अनुभव घेतला.
8
comment0
Report
Advertisement
Back to top