Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक में फर्जी शालार्थ IDs से 150 करोड़ के घोटाले, 841 से बढ़कर 1531 बोगस शिक्षक भर्ती
SGSagar Gaikwad
Mar 15, 2026 03:31:56
Nashik, Maharashtra
शालार्थ आयडी अपहाराची व्याप्ती वाढली; ८४१ नव्हे तर १५३१ बोगस शिक्षकांची भरती अँकर बोगस शालार्थ आयडी दाखवत नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमधील शाळा, आश्रमशाळांमध्ये ८४१ बोगस शिक्षक भरती करत शासनाचा १५० कोटींचा अपहार केल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या तपासात बोगस शिक्षक भरतीचा आकडा वाढला असून, आणखी ६९० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे फसवणुकीच्या आकड्याची रक्कम वाढणार आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार तत्कालीन उपसंचालक बी. बी. चव्हाण ४ महिन्यापासून फरार असून त्याच्या मागावर पथक आहे.याप्रकरणी शिक्षण विभागाचे श्रीधर देवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिक विभागात बनावट शालार्थ आयडी तयार करत बोगस भरती करून शासनाची दीडशे कोटींची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तत्कालीन उपसंचालक, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि बोगस शिक्षकांसह शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 15, 2026 05:34:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेाच्या घडामोडींना वेग; काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. सांगली जिल्हा परिषदेत सप्तचा तिढा कायम आहे. 18 फेब्रुवारी रोजी अध्यक्षपदाच्या निवडी होणार असून सत्ता स्थापनेच्या हालचालीना वेग आला आहे. दरम्यान काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे; भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून 36 जिल्हा परिषद सदस्य अज्ञात स्थळे रवाना झाले असून 18 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी हजर राहतील, असे सांगितले जाते. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला घेऊन महाविकास आघाडीकडून सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करत भाजपाला धक्का देण्यात येईल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
167
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 15, 2026 05:02:37
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... घाण गटारीत पडलेली फळे पुन्हा विक्रीसाठी… व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विक्रेत्यांची जाहीर माफी.... उदगीरमध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळ...ZEE 24 तासने ही बातमी नंतर फळ विक्रेत्यांची माफी पण प्रशासनाची कारवाई कुठे ?... व्हिडिओ व्हायरल होताच उदगीरमध्ये खळबळ... लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उदगीर शहरात घाण गटारीत पडलेली फळे पुन्हा विक्रीसाठी काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ZEE 24 तासने ही बातमी दाखवताच उदगीर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित फळ विक्रेत्यांनी आपली चूक मान्य करत जाहीररीत्या माफी मागितली आहे. मात्र जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार ? असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
133
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 15, 2026 04:47:22
Dharashiv, Maharashtra:घोरपोच गैस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्याने धाराशिव मध्ये गैस वितरण विस्कळीत. गैस एजन्सी बाहेर सकाळपासूनच लांबच लांब रांगा. गैस पुरवठा करणारे कर्मचारी गैस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप. धाराशिव मध्ये मुबलक गैस पुरवठा असताना घरपोच सुविधा बंद का ग्राहकांचा सवाल. धाराशिव मध्ये मुबलक गैस पुरवठा असल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मात्र दुसरीकडे घरपोच गैस पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गैस वितरणामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून गैस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच गैस साठी लोक रांगेत उभे आहेत. गैस वितरण करणारे कर्मचारी ओळखीच्या लोकांना हेराफेरी करून गैस पुरवठा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दुसरीकडे तासंतास रांगेत ताटकळत राहावं लागत असल्याने नागरिक संतप्त आहेत.
168
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 15, 2026 04:32:03
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात २१५ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पोलीस भरतीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आज होत आहे. मैदानी चाचणीत घाम गाळल्यानंतर २३२१ उमेदवार लेखी परीक्षेच्या मैदानात उतरणार आहेत. पुरुष उमेदवारांसाठी चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज तर महिलांसाठी सरदार पटेल महाविद्यालय हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनाने परीक्षेसाठी 'हायटेक' सुरक्षा तैनात केली आहे. बायोमॅट्रिक हजेरीपासून ते सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे. राज्यभरातून पात्र युवक चंद्रपुरात दाखल झाले असून पोलिस दलात स्थान मिळवण्याच्या जिद्दीने आज लेखी परीक्षेत उतरणार आहेत.
102
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 15, 2026 04:31:13
Satara, Maharashtra:सातारा -दहिवडी विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री गोरेंनी भूमिपूजन स्थळी कुदळ मारली. त्यानंतर भूमिपूजन सोहळ्याच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकारिणी आजी माजी सदस्य उपस्थित होते. १९४७ ची स्थापना असलेल्या कै.साहेबराव इंगळे यांच्या नावाने असलेल्या सोसायटीचे नुतनीकरण करण्यासाठी मंत्री गोरेंच्या माध्यमातून ६२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. यावेळी मंत्री गोरेंनी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिल. यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आता शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं असून जे नियमित कर्ज भरत आहे त्यांना ५०००० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
190
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 15, 2026 03:48:52
Beed, Maharashtra:बीड:संतापजनक; विवाहितेवर अत्याचार करून गावच्या चावडीत बांधून ठेवण्याचा प्रकार पोलिस तपासा दरम्यान पीडित महिला अल्पवयीन असल्याचं आलं समोर बीडमध्ये मानवतेला काळीमा फासणारी आणि संताप जनक घटना समोर आलीय. एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिला गावच्या चावडीत बांधून ठेवण्याचा प्रकार समोर आला. या गंभीर घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय. ज्यात पीडित महिलेच्या हाताला आणि पायाला दोरखंड बांधलेला आहे. पीडित महिला आपल्या पती समवेत घरात झोपलेली असताना आरोपीने घरात घुसून गावाबाहेर नेत अत्याचार केला. त्यानंतर तिला गावच्या चावडीवरील खांबाला बांधून ठेवले गेले. हा प्रकार ग्रामस्थांच्या सकाळी निदर्शनास आला त्यानंतर पीडीतेची सुटका करण्यात आली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत वैभव पटेकर नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित पीडित महिलेकडे पोलिसांची चौकशी सुरू असून व्हिडिओच्या माध्यमातून घटनेचा अधिक तपास केला जात आहे. तर पोलीस तपासात सदरील पीडित महिला ही अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. बाईट: मधुसूदन घुगे - सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळनेर पोलीस ठाणे
121
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 15, 2026 03:46:19
Kolhapur, Maharashtra:बेळगाव जिल्ह्यातिल श्री रेणुका यल्लम्मा मंदिर येथे भक्तांकडून तब्बल ३ कोटी ७ लाख रुपयांचे विक्रमी दान अर्पण करण्यात आले आहे. यल्लम्मा मंदिरातील दानपेट्यांमधील देणग्यांची अलीकडेच मोजणी करण्यात आली. या मोजणीत एकूण ३.०७ कोटींची देणगी जमा झाल्याचे समोर आले आहे. या देणगीत २.७८ कोटी रोख रक्कम, सुमारे १६.१६ लाख किमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच १२.३५ लाख किमतीचे ४ किलो ५४७ ग्रॅम चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. दानपेट्यांतील रकमेची मोजणी मंदिर प्रशासनाच्या देखरेखीखाली करण्यात आली. यामध्ये मंदिर कर्मचारी तसेच स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा मंदिर हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक असून वर्षभर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
198
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 03:45:48
144
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 15, 2026 03:35:15
Bhandara, Maharashtra:भंडारा जिले के सामाजिक न्याय विभाग के वसतिगृहों में स्व cooking के लिए घरेलू गैस सिलिंडर के उपयोग का मामला सामने आया है। नागरिक गैस सिलिंडर के लिए लांबा समय तक लाइनों में खड़े दिख रहे हैं, जबकि कंत्राटदारों को पांच सिलिंडर उपलब्ध हो रहे हैं। प्रशासन के दावे के बावजूद वसतिगृहों में स्वयंपाक के लिए घरेलू गैस सिलिंडर का उपयोग हो रहा है और यह सिलिंडर कंत्राटदार द्वारा संचालित संस्थान के लिए आवंटित किया गया है। गृहपालों से पूछताछ में प्रतिक्रिया मिली कि व्यावसायिक सिलिंडर मुहैया कराने के बजाय घरेलू सिलिंडर का प्रयोग आत्मसात किया जा रहा है। एक तरफ गैस सिलिंडर की कमी ने नागरिकों को परेशान किया हुआ है तो दूसरी तरफ वसतिगृह के लिए ठेकेदार को पांच सिलिंडर कैसे मिल गए, यह विषय सार्वजनिक ध्वनि के दायरे में है।
207
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 15, 2026 03:32:32
Yeola, Maharashtra:अँकर :- दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी उशिराने पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांपैकी यंदा दहा ते बारा गावातील ग्रामपंचायतींनी टँकर साठी प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल केले राजापूर, कोळम बुद्रुक, अंकाई यासह दहा ते बारा गावातील ग्रामपंचायतींनी येवला पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव दाखल केले आहे येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ आणि येवला तहसीलदार हे दोघेही संबंधित टंचाईग्रस्त टँकरचे प्रस्ताव मागणी करणाऱ्या गावांची पाहणी करून नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी घेत आठ ते दहा दिवसातच संबंधित त्यांचे ग्रस्त गावांना पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करण्यात येईल अशी माहिती येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली बाईट :- संदीप वायाळ ( गटविकास अधिकारी, येवला पंचायत समिती )
160
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 15, 2026 03:16:13
Nashik, Maharashtra:भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी नाशकात लवकरच 'डॉग हाऊस तयार करण्यात येणार आहे...जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी ६,५०० श्वानदंशाच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत न्यायालयाने संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसस्थानके व रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार येथील धोकादायक कुत्र्यांना कायमस्वरपी बंदिस्त ठेवण्याची परवानगी दिल्याने मनपातर्फे नाशिकच्या विल्होळी जकात नाका येथील जागेत कुत्र्यांना ठेवण्यासाठी 'डॉग हाऊस' प्रस्तावित करण्यात आले आहे....राज्यभरात वाढलेल्या श्वानदंशाच्या घटनांमुळे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करीत काही सूट देत धोकादायक कुत्र्यांना कायमस्वरूपी बंदिस्त ठेवण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी स्वतंत्र जागेवर बांधकाम करीत त्या कुत्र्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांभाळावी असे निर्देश देण्यात आले असून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळेचे बंधनही घालण्यात आले आहे....
195
comment0
Report
Advertisement
Back to top