Back
महाविकास अघाडी के ठोस फैसलों के साथ मुंबई-नाशिक में स्थानीय चुनाव लड़ाई
AKAMAR KANE
Nov 10, 2025 08:18:11
Nagpur, Maharashtra
नागपूर -
बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
On नाशिक आघाडी -
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या त्या त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे
--- नाशिक मधील काँग्रेसच्या नेत्यांनी मनसे सोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो नाशिक पुरता असे आम्ही मानतो
--- स्थानिक लेव्हलवर सगळे राजकीय परिस्थिती बघून घेतलेला तो निर्णय आहे, त्यामुळे फार वाद निर्माण होईल अशी परिस्थिती नाही
--- मनसे सोबत जाण्याचा किंवा न जाण्याचा ची चर्चा वारंवार केली जाते, नेत्यांनी मिळून भूमिका स्पष्ट केली आहे
--- आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाना ज्यांना या निवडणुकीत आघाडी करायचा आहे त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आहे
- आमचा विरोध करण्याचा अधिकार नाही त्यांना अधिकार दिल्यावर संबंध नाही
- भाजप, अजित दादा आणि शिंदे यांच्या बाबत करायचे नाही... पण बीएसपी, वंचित किंवा मनसे असेल हे जरी महाविकास आघाडीत नसले तरी त्यांच्याबरोबर युती करायला हरकत नाही अशी आमची भूमिका आहे
On चिमूर एसडीपीओ कारवाई -
- हा एसडीपीओ भ्रष्टाचारी माणूस आहे, चोर आहे, यांनी तिकडे धिंगाणा घातला आहे परंतु त्याला सत्तेतील एका लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद आहे
- त्याची बदलीसुद्धा इशारावर करून घेतली म्हणून त्याची हिंमत वाढलेली आहे आणि तो वागतो त्याच्यावर त्वरित मी आता गृहमंत्र्याला आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांच्यावर निलंबनाचे कारवाई त्वरित करावे अशी मागणी करणार आहे
On बच्चू कडू आयोग -
- निवडणूक आयोगाची भूमिका ही स्वच्छ नाही ही प्रामाणिक दिसत नाही आम्हाला धरून दिसत नाही,
- मतदार नोंदणीची 25 जुलै नंतर मतदार नोंदणी करू नये, मतदार यादी काढण्यासाठी ज्यादा स्वच्छ करण्यासाठी आम्ही सांगितलं ते काहीच केलं नाही
- बोगस मतदार याद्यांच्या नावावर निवडणूक असेल तर ते योग्य आहे का? बच्चू कडू जाहीर करत असेल त्यांच्याकडे काही पुरावे असतील
On सुनील तटकरे -
- आता सर्व भांडवलदार, जमीनदार, सुभेदार, सरदार असे मिळून झालेला हा पक्ष आहे त्यामुळे यामध्ये चढाओढ होत असते
---- एकमेकांच्या सीमेत एकमेक घुसत असतात, त्यातून त्यांचे मतभेद तयार होत असतात आणि त्यातून एकमेकांचा घात करत असतात
(On मुंबई मनपा निवडणुक - )
- आमच्या मुंबईच्या नेत्यांनी ठरवल आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळं कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही
On नाना पटोले -
- ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो त्यावेळी कोणी कोणाला कमकुवत करण्यापेक्षा आपण कसं मजबतो याचा विचार अधिक प्रकर्षने करण्याची गरज आहे
On प्रताप सरनाईक जमीन -
- त्या संदर्भातील ती जमीन प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूल च्या नावाने घेतली आहे, शासकीय जमीन होती, आरक्षण होतं ते आरक्षण बदलल्या गेल्या आणि ती कारवाई महिना दीड महिन्यात पार पाडले गेले
- सर्व जमीन त्यांच्या संस्थेला चार कोटी 78 लाख वगैरे मध्ये दिल्या गेली, मुळात असा प्रश्न आहे मंत्री म्हणून स्वस्तात स्वतःच्या संस्थेच्या नावाने ती जागा घेऊ शकतात का ?
--- त्या जागेची किंमत आता बाजारभावाप्रमाणे निश्चितच 8 हजार 800 मीटरची जागा आहे, दोन एकरचा जास्त जागा आहे आणि साधारणतः 50 कोटी रुपये त्याचा एकराचा दर आताचा आहे
--- --मुळात प्रश्न असा आहे की त्यांनी मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अशा जमिनी लाटता येतात का घेता येतात का सेल्फ इंटरेस्ट साठी हा खरा प्रश्न आहे त्याची चौकशी होणे आवश्यक आहे
On अजित पवार पुणे जमीन -
--- अधिकाऱ्यांनी केला असेल तर कुठला चौकात आणि कुठे फाशी द्यायची अधिकाऱ्यांना तेही सांगायला पाहिजे, मग आम्ही त्यांना फास तयार करून देतो, जो करणार आहे अजित दादांना माहीत नव्हते मग त्यांची पुत्र असू द्या किंवा त्यांच्या कोणी अधिकारी असू दे
--- बिना पैशाने व्यवहार केला असेल आणि जमीन हडपणाचा जो काही प्रकार झाला, सर्व माहिती झाल्यामुळे जनतेच्या पुढे उघड झाल्यामुळे संपूर्ण प्रकरण किंवा ती जमीन परत करता आले
On पार्थ -अंबादास दानवे -
- दोषी तो दोषी, चोरीचा माल परत केल्यावर त्याला निर्दोष ठरवता येतं का हा खरा प्रश्न आहे, त्यामुळे चोर केली तो चोरच आहे तो कोणाचाही पुतण्या वाचा किंवा नातेवाईक असतो त्याच संरक्षण होता कामा नये
On महसूल विभाग हेअरिंग पेंडींग -
- महसूल मंत्र्यांना जे अधिकार आहेत ते कवासी जुडी शहरी अधिकाऱ्यात त्यामुळे अधिकाराचा वापर करून ते हेअरिंग घेतात आणि निर्णय देतात त्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात हायकोर्टात दरवाजे खुले असतात
- पण अनेक वर्ष पेंडिंग असेल तर 14 पासून आतापर्यंत बारा वर्षे त्यांचेच महसूल मंत्री होते
- दोन वर्ष सोडले तर 9 वर्षे त्यांचेच मंत्री महसूल् विभागात होते, बावनकुळे यांची स्पीड चांगली आहे त्यांनी तशीच स्पीड कायम ठेवावी पटापट निर्णय घ्यावे
(On मुंबई महापालिका - )
- आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबईत स्वबळाचा निर्णय घेतलाय..मनसे बरोबर जाण्याचा आता तरी कुठला प्रस्ताव आणि विचार नाही.. हे स्पष्ट आहे
(- On मूळ ओबीसी उमेदवारी - )
- आता मूळ ओबीसी ते शरद पवार साहेब कोणाला म्हणतात, आमचं म्हणणं आहे की मुळ ओबीसी म्हणजे बारा बलुतेदार, छोट्या छोट्या जाती आणि त्यातल्या त्यात 294 च्या सूची प्रमाणे पाहिलं तर ते मूळ ओबीसी म्हणून पण आता पवार साहेब मुळ ओबीसी कोणाला देतात आमची सुद्धा मागणी आहे मूळ ओबीसीलाल दिला पाहिजे
--- तुमच्या हैदराबाद गॅझेट वापरून कुणबी- मराठा, मराठा-कुणबी असेल तर पवार साहेब त्यांना उमेदवारी देणार का ते आम्ही बघू, आता पवार साहेबांची आणि आमची भूमिका क्लियर आहे आम्ही सर्वांनी मिळून मूळ ओबीसींना न्याय दिला पाहिजे त्याचा आम्ही स्वागत करतो आणि आमची भूमिका तीच राहील
On मनपा निवडणूक -
- sगळीकडेच आमचे भूमिका ठरले आहे, आमचे अधिकार स्थानिक पातळीवर सोडलेले आहेत त्यामुळे ते जो निर्णय घेतील,
- भाजप, शिंदे, अजित पवार यांना सोडून महानगरपालिकेमध्ये त्यांना इतर पक्षांसोबत जाण्याचा निर्णय देण्यात आला आहे एमआयएम सोबत जाता येईल समाजवादी पक्षासोबत जाता येईल केवळ त्यांनी आमची औपचारिक मान्यता घ्यावी एवढेच आम्ही ते म्हटल आहे
On राज सुरक्षा -
- आता ती वाढ सुरक्षेची आहे की त्यांना बंदिस्त करण्याची आहे याचा खुलासा लवकरच होईल, त्यांना भीती आहे म्हणून वाढ केले की सत्ताधाऱ्यांना भीती आहे म्हणून
On मोहन भागवत -
- आरएसएस भूमिका आहे कट्टर हिंदूंची आ,हे त्यांच्या माणूस इतर जात इतर धर्म त्यांना या देशात नको अशी त्यांची भूमिका दिसते त्यांनी हा देश संविधानावर चालतो हे लक्षात घेतलं पाहिजे
- घटनेने सर्वांना समान हक्क दिला आहे जातीभेद किंवा धर्माबाद करून संघाची भूमिका मांडणे हे संविधानाचा अपमान आहे असं मी मानतो
On शरद पवार ओबीसी उमेदवारी -
- खरा ओबीसी साठी त्यांची बघायला पाहिजे, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सहा महिन्यांची मुदत वाढ देण्याची गरज नव्हती
- जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र असतं ते मूळ ओबीसी
- ज्याच्याकडे प्रमाणपत्र असल्यावर मूळ कसं म्हणायचं आणि खोटं कसं शोधायचं, म्हणून सरकारला आमचे विनंती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय त्या उमेदवाराला पात्र ठरवू नये तरच यावर ओरिजनल ओबीसींना न्याय मिळेल
On मुंबई bmc -
- हाय कमांड बरोबर चर्चा केल्यावरच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आणि आमच्या लोकांनीही तेच ठरवलं आहे मुद्दे खूप आहे मुंबईची तिजोरी खाली झाली आहे मुंबईत भ्रष्टाचाराचे प्रकरण भरपूर आहेत
- आता एकच विषय नाही... मुंबईच्या विकासाला आणि आर्थिक सोबत त्याला सगळे प्रकार मागच्या सरकारच्या काळात झाले आहेत आताच्या सरकारमध्ये होत आहेत
- मुंबईत पाणी तुंबले, नाल्यांचा प्रश्न आहे, डिपॉझिट काढून घेतल्या गेले, अनेक प्रश्न आहेत
- मित्र पक्ष प्रस्ताव आला तर याबाबत चर्चा होईल, शरद पवारांनी करून चर्चा प्रस्ताव आला तर विचार करू
- आम्ही नेहमी लढत आलो आहे.. 30-35जागा निवडून येतात...महायुतीतीलही तीनही पक्ष वेगळे लढण्याची तयारी करत आहेत त्यांचे विभाजन होत नाही तर आमच्याच विभाजनाची चिंता कशाला?
- मुंबई महानगरपालिकेत अजून वेळ आहे पण आम्ही सगळ्यांनी अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यांच्याबरोतर चर्चा करून जे आमचे समविचारी पक्ष आहेत त्यांच्या प्रस्ताव आल्यास त्यांच्या सोबत चर्चा करू आणि निवडणुकीत आघाडी करण्याच्या वर बोलू
- हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे. हा एक प्रश्न, जिंकणे हे सेकंडरी आहे. कार्यकर्त्यांना न्याय देणे हा उद्देश आहे
--- स्थानिक स्वराज्य संस्थांचेही महाविकास आघाडी आहे. देशपातळीवर इंडिया आघाडी आहे त्या इंडियाकडे जे पक्ष आहे ती युती आणि आघाडी कायम आहेत
---- उद्धव ठाकरे मनसे बरोबर युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला असेल तर आमचे स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवू त्यांची सहमती घेऊ आणि पुढे जाऊ
On विखे पाटील -
- गाड्या फोडायचं नको पण एक आहे की विखे पाटलांना आजकाल फार बोलायची सवय जडली आहे. शेतकऱ्यांप्रति रोग झाल्यासारखं ते बोलत आहे
--- कर्जमाफी वर बोलत असताना शेतकरी कर्ज पचवतात असेही बोलतात सोसायटी काढतात कर्जमाफीसाठी मागे लागतात शेतकरी काय भिकारी आहेत काय?
- विखे पाटलांना लाज वाटत नाही का वारंवार शेतकऱ्यांचा अवमान का करतात त्यांना कोणी अधिकार दिला आणि तुमच्या बाप जाद्याचे पैसे शेतकऱ्यांनी पचवलेत का?
--- दम असेल तर हमीभावाने खरेदी करा... मग शेतकरी तुमच्याकडे भीक मागणार नाही, सर्जा साठी येणार नाही.तुम्ही लुबाडायचा आणि उद्योगपतींचे घर भरायचे त्यांचे कर्ज माफ करायचे नाही आणि शेतकऱ्यांचा अवमान करायचं हे बरोबर नाही
--- बच्चू कडू यांचा बोलणं वाईट आहे असं मानत नाही.. पण गाड्या फोडणे उचित नाही, शेतकऱ्यांची माती झाली आहे त्यामुळे विखे पाटलांना चिखलाचा प्रसाद द्यावा या मताचा मी आहे
On नाना पटोले(हिंदी)
आघाडी का धर्म लेकरं पुष्पक राव हो ऐसी भूमिका नही लेनी चाहिये
On अमोल मिटकरी (हिंदी)
- ही भीती फडणवीस यांना सतावत असेल, अमोल मिटकरी यांचा वक्तव्य ऐकल्यानंतर ते ते तीन दिवसांपासून झोपले नसतील, त्यासाठी त्यांना दोन वेळा गोळी खावी लागली असेल असं मी ऐकले आहे
- पार्थ पवार यांच्यावर कारवाई न होण्यामागे म्हणजे फडणवीस अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याला घाबरले असतील, सरकार पडेल या भीतीपोटी हे मिटकरी यांच्या वक्तव्याने सिद्ध होत आहे
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 09:58:330
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 10, 2025 09:46:590
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 09:41:000
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:40:420
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 09:37:590
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 10, 2025 09:33:030
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 10, 2025 09:22:090
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:21:520
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 10, 2025 09:19:360
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 09:14:230
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:01:330
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 10, 2025 08:56:582
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 10, 2025 08:45:334
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 10, 2025 08:44:033
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 08:42:584
Report