Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
मध्य प्रदेश के बच्चे की नागपुर एम्स में कफ सिरप मामले में मौत
AKAMAR KANE
Feb 04, 2026 06:15:56
Nagpur, Maharashtra
नागपूर एम्स में कफ सिरप प्रकरण से मध्य प्रदेश के चार वर्षीय बच्चे की मौत की खबर सामने आई है। चार माह से अधिक समय तक गंभीर स्थिति में कोमा में उपचार चला, मौत हो गई। बच्चे का नाम हर्ष यादव है, वह Betul जिले के टिकाबरी गाँव का निवासी था। छिंदवाड़ा जिले में कफ सिरप सेवन से स्थिति बिगड़ गई थी और Coldrif कफ सिरप लेने के बाद बीमारी बढ़ गई। सोमवार को नागपूर में शवविच्छेदन कर शव परिवार के सुपुर्द कर दिया गया। मौत का कारण पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद ही स्पष्ट होगा। सोमवार को अंत्यसंस्कार कर दिया गया, परिवार पर शोक की लहर है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Feb 04, 2026 09:45:43
Shirur, Maharashtra:पुणे... पुण्याच्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार प्रदीप वसंत कंद आणि पंचायत समिती चे उमेदवार लोचन शिवले या उमेदवारांचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याने एकच खळबळ उडालीय,समोरच्या उमेदवारांची पायाखालची वाळू सरकली असून समोर आपला पराभव दिसत असल्याने समोरच्यांकडून अशा प्रकारचे बॅनर फाडण्याची दुष्कृत्य केले जातंय मात्र बॅनर फाडऊन जनतेच्या मनातील अजितदादांचे विचार तुम्ही पुसू शकत नाही अशा शब्दात आमदार माऊली कटके यांनी बॅनर फाडणाऱ्यांवरती निशाणा साधत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी आमदार कटके यांनी केलीय
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 04, 2026 09:31:45
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या मुख्य शहरातून वाहणाऱ्या जयंती नदीचे गेल्या काही वर्षात नाल्यात रूपांतर झालं आहे. त्यामुळे जयंती नदीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या जयंती नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा sाठला आहे ज्यामध्ये पाण्याच्या बॉटल, प्लास्टिक, मेडिकल वेस्ट आणि इतर साहित्यांचा समावेश आहे. एकीकडे कोल्हापूर महानगरपालिका नालेसफाई वेळेवर करत असल्याचा दावा करत आहे, पण दुसरीकडे जयंती नाल्याची दृश्य पाहिल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन नालेसफाई संदर्भात किती कुचकामी ठरले आहे हे दिसून येत आहे. याच जयंती नाल्याचे पाणी विना प्रक्रिया पंचगंगेपर्यंत देखील पोहोचत आहे, त्यामुळे डोळे झाकून बसलेले प्रशासन कधी जागे होणार असा प्रश्न कोल्हापूरकर विचारत आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 04, 2026 09:15:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:निवडणुकांमुळे थांबलेली छत्रपती संभाजी नगरची अतिक्रमण कारवाई आता पुन्हा सुरू होणार आहे मात्र यावेळेस प्रशासनाला sगळ्यात मोठा ताण आहे तो निवडून आलेल्या नगरसेवकांचा मात्र नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केल्यास त्यांच्या पदाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे अतिक्रमणात हस्तक्षेप, नगरसेवक पद जाणार महापालिकेचा नवनिर्वाचित नगरसेवकांना इशारा शहरातील 8 रस्ट्यांवर लवकरच होणार मोठी कारवाई छत्रपती संभाजी नगरची अतिक्रमण कारवाई राज्यभर गाजली अनेक वर्षांपासून रस्त्यावर असलेला अतिक्रमण महापालिकेने मोडून काढलं.. संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता मात्र मध्येच महापालिका निवडणुका आल्या आणि ही कारवाई थांबली, मात्र आता निवडणुका संपल्या आहेत आणि पुन्हा नव्याने आठ प्रमुख रस्त्यावर ही कारवाई सुरू होणार आहे तथापि काही नगरसेवकांनी महापालिकेला पत्र दिले आहे कारवाई करू नका अशा पद्धतीचं नगरसेवकांचे म्हणणं आहे, यावर महापालिका आक्रमक झाली आहे, नियमानुसार महापालिका अतिक्रमण कारवाई करत असताना नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये अन्यथा त्यांच्या पद रद्द करण्याबाबतची शिफारस केली आजही असा इशाराच महापालिका आयुक्तांनी दिला आहे शहरातील अतिक्रमण कारवाईला एमआयएम वगळता सर्वच पक्षांनी समर्थन दिलेला आहे शहरातील अरुंद रस्ते मोकळे करण्याचा ही एक महत्त्वाची कारवाई होती मात्र रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली नाही तेही खरं आहे, त्यातून पुन्हा नव्याने कारवाई सुरू होणार आहे त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना डोकेदुखी होणार आहे हीच खरी स्थिती
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 04, 2026 09:05:16
Akola, Maharashtra:दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन अकोला जिल्ह्यातील वाघा येथील काटेपूर्णा प्रकल्पात करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या सहकुटुंब या अस्थींचे विधीवत विसर्जन केले. या वेळी धार्मिक विधी पार पाडण्यात आले असून संपूर्ण वातावरण शोकमय झाले होते. अस्थी विसर्जनाच्या वेळी आमदार अमोल मिटकरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना भावनांना आवर घालणे कठीण झाले होते. दिवंगत नेत्याच्या आठवणीनं उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. अजित पवार यांच्या निधनाने राज्यात शोककळा पसरली असून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विविध ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. काटेपूर्णा प्रकल्पात पार पडलेले हे अस्थी विसर्जन भावनिक क्षणांच्या साक्षीदार ठरले. तर अजित पवारांची महाराष्ट्रासाठी बघितलेली स्वप्न अस्थी विसर्जन सोबतच विसर्जित झाल्याची भावना यावेळी अमोल मिटकरींनी व्यक्त केली, तर या घटनेचा गूढचा उलगडा जोपर्यंत होत नाही तो पर्यंत आपण लढा देणार असल्याचंही ते म्हणाले..
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 04, 2026 09:01:02
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्तेत सहभागी होण्याचा राष्ट्रवादीतील काही नेते करत असते तर तो अजित पवारांचा अपमान...! पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून विरोधी पक्ष नेते पदी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आलीय... महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जोरदार टीका केली होती आणि ती एकट्यानेच केली होती. आता महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवणे हीच अजित दादांना श्रद्धांजली असेल असं मत नवनिर्वाचित विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले आहे. महापालिकेत भाजपबरोबर सत्तेत जाण्याचा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा प्रयत्न असेल तर तो अजित पवारांच्या विचारांचा अपमान असल्याचेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर भाऊसाहेब भोईर यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी!
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 04, 2026 08:34:29
Yeola, Maharashtra:भारताचा सर्वात मोठा कांदा आयतदार देश असलेल्या बांगलादेशात स्थानिक कांदा उत्पादन सुरू झाले असून भारताच्या दक्षिणेकडील राज्यात देखील नवीन कांदा निघायला सुरुवात झाली आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळत असून गेल्या सप्ताहात पंधराशे रुपयांना विकणारा कांदा अवघा पाचशे ते सातशे रुपयांना विकला जात आहे त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन देखील केले मात्र कांदा दरात कोणतीही सुधारणा झाली नाही आता शेती विकून आत्महत्या करावी का ..? असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी....
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 04, 2026 08:20:21
Ambernath, Maharashtra:बदलापूर नगरपालिका मध्ये स्वीकृत नगरसेवक पदाचा तिढा अखेर सुटलाय. भाजपचे प्रवीण राऊत यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलंय. तुषार आपटे यांच्या राजीनामामुळे रिक्त होतं स्वीकृत नगरसेवकपद. भाजपचे वादग्रस्त स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त होतं. त्यांच्या जागी प्रवीण राऊत यांची वर्णी लागलीय. प्रवीण राऊत हे यापूर्वी शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते. अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी शिवसेना सोडून अलीकडेच भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपकडून त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालीय. स्वीकृत नगरसेवक पदाची घोषणा होताच राऊत समर्थकांनी पालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत एकच जल्लोष केला.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 04, 2026 08:19:56
Sinnar, Maharashtra:माळेगाव एमआयडीसी येथील 'शुक्रा कॉप धनश्री पेपर रोल' कंपनीला सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. पेपर रोलच्या ज्वलनशील साठ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. विशेष म्हणजे, ही आग नाशिक महानगरपालिकेच्या गॅस कंपनीजवळ लागल्याने परिसरात भीतीय वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच सिन्नर व नाशिक येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणांच्या कडक तपासणीची मागणी आता जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 04, 2026 08:19:39
Yavatmal, Maharashtra:केंद्र सरकारने शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प सादर केला आहे, त्यात राज्य सरकारच्या सहाय्याने यवतमाळ जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क निर्माण व्हावे शिवाय वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे संपर्क मंत्री प्राचार्य अशोक उईके यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी उद्योग रोजगार व्यवसाय वाढीस यावे यासाठी मुख्यमंत्र्यांपुढे नियोजन मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या हिताचा असल्याचे यावेळी भाजपाचे प्रदेश आर्थिक प्रकोष्ट प्रमुख मिलिंद कानडे यांनी सांगितले.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 04, 2026 06:33:54
Chendhare, Alibag, Maharashtra:अँकर - जिल्हा परिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच रायगड जिल्ह्यात महायुती मधील घटक पक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. पोलादपूर इथल्या प्रचार सभेत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट भाजपवर हल्ला चढवलाय. ज्याच्यासाठी आम्ही उठाव करून एकत्र आलो त्यांनी थोडी तरी जाणीव ठेवली पाहिजे असा टोला मंत्री गोगावले यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांना लगावला आहे. तुम्ही कधीतरी अमावास्या पौर्णिमेला गावाकडे येता आणि काहीतरी सांगून जाता, यांना मुंबईत शोधायचं कुठं असा सवालही गोगावले यांनी उपस्थित केलाय. आमच्यासाठी कुणी, किती काम केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे असं सांगत गोगावले विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 04, 2026 05:31:54
0
comment0
Report
Advertisement
Back to top