Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

पुणे में बैनर फाड़ने पर प्रचार युद्ध गरम, दो उम्मीदवारों के पोस्टर तोड़े गए

HCHEMANT CHAPUDE
Feb 04, 2026 09:45:43
Shirur, Maharashtra
पुणे... पुण्याच्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार प्रदीप वसंत कंद आणि पंचायत समिती चे उमेदवार लोचन शिवले या उमेदवारांचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याने एकच खळबळ उडालीय,समोरच्या उमेदवारांची पायाखालची वाळू सरकली असून समोर आपला पराभव दिसत असल्याने समोरच्यांकडून अशा प्रकारचे बॅनर फाडण्याची दुष्कृत्य केले जातंय मात्र बॅनर फाडऊन जनतेच्या मनातील अजितदादांचे विचार तुम्ही पुसू शकत नाही अशा शब्दात आमदार माऊली कटके यांनी बॅनर फाडणाऱ्यांवरती निशाणा साधत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी आमदार कटके यांनी केलीय
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Feb 04, 2026 11:07:39
Chendhare, Alibag, Maharashtra:मंत्री भरत गोगावले यांच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांचाही भाजप नेतृत्वावर हल्लाबोल ...... रायगडच्या भाजपमध्ये आंधळे , बहिरे, मुक्यांचं राजकारण ....... रवींद्र पाटील यांचे घराणे संपवण्याचा विडा भाजप वाल्यांनी उचलला ...... आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला संशय ....... राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊन शिवसेनेला बाजूला ठेवले ........ रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद सर्वश्रुत असतानाच आता शिवसेना आणि भाजप मधील दरीही वाढत चालली आहे. मंत्री भरत गोगावले यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर हल्लाबोल केला असतानाच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्ह्यातील भाजप नेतृत्वावर तोफ डागली आहे. रायगडच्या भाजपमध्ये आंधळे, बहिरे आणि मुक्यांचं राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊन आलेल्या नेत्यांनी शिवसेनाला बाजूला ठेवल्याचा आरोप आमदार दळवी यांनी भाजप नेते सतीश धारप यांचं नाव न घेता केलाय. आपण एकत्र येऊन असा प्रस्ताव मी आमदार रवींद्र पाटील यांच्या समोर ठेवला होता. पण भाजप मधील काही लोकांनी रवींद्र पाटील यांच्या घराण्याला संपवण्याचा विडा उचलला असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केलाय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 04, 2026 11:03:59
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग अँकर - आमच्यासारखे 242 आमदार आहेत,म्हणून मुख्यमंत्री आहेत,असं वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे सांगलीच्या खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी केलंय,तसेच मुख्यमंत्र्यांना विचारा,सुहास बाबर कोण आहेत,असं चॅलेंज आमदार बाबर यांनी विरोधकांना दिलंय.सांगली जिल्हा परिषद निवडणुकी निमित्ताने खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी येथे आयोजित सभेतून आमदार सुहास बाबरांनी हे विधान केलं आहे.तसेच आपण काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार, अजित पवार पक्ष,ठाकरे गट आणि भाजपा चालवतो,असं देखील आमदार बाबर यांनी सांगितले.विटयाचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे नेते वैभव पाटलांच्यावर टीका करताना बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत हे भाष्य केले आहे. साऊंड बाईट - सुहास बाबर - आमदार- शिवसेना शिंदे - विटा-खानापूर
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 04, 2026 11:02:48
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 04, 2026 11:00:43
Beed, Maharashtra:बीड - जोपर्यंत माझे पैसे निघणार नाहीत तोपर्यंत मी पाणी सोडणार नाही, गावाला काय प्यायला द्यायचे तर द्या-ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्याचे वक्तव्य. - बीडच्या अंथरवण पिंपरी तांडा गावातील प्रकार. बीडमधील एका बेताल आणि किळसवाण्या वक्तव्याची... जोपर्यंत माझे पैसे निघणार नाहीत तोपर्यंत मी पाणी सोडणार नाही, गावाला काय प्यायला द्यायचे तर द्या असं म्हणत ग्रामपंचायत सदस्याने गावकऱ्यांना एकप्रकारे धमकी दिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहुयात वाचाळवीर ग्रामपंचायत सदस्याची कहाणी...!! @@ हजाराच्या आतमध्ये लोकसंख्या असलेले हे अंथरवण पिंपरी नावाचे गाव... बीड शहरापासून दोन कोसावर असलेल्या या गावात पेयजल योजना मंजूर झालिये. त्याचे काम देखील झाले आहे. योजनेंतर्गत गावाला पाणी देखील मिळाले आहे. योजना पूर्ण झाले असताना देखील निधी मात्र अद्याप मिळाला नाही. आणि याच निधीवरून ग्रामपंचायत सदस्य असलेल्या दिनेश पवार यांची जीभ घसरली... आता मी तसा बोललोच नाही. व्हिडिओ मध्ये छेडछाड करून माझी बदनामी केल्याचा दावा दिनेश पवार यांनी केला आहे. बाईट: दिनेश पवार, ग्रामपंचायत सदस्य.. @@ गेल्या दहा वर्षापासून गावात कोणीही घरपट्टी किंवा नळपट्टी देत नाहीत त्यामुळे ग्रामपंचायतीवर मोठा बोजा झाला आहे. त्याच अनुषंगाने मी ग्रामस्थांनी कर भरणा करावा अशी मागणी केली. मात्र माझा संपूर्ण व्हिडिओ न व्हायरल करता त्यामध्ये छेडछाड करून चुकीचे अर्थ काढत व्हिडिओ व्हायरल करून माझी बदनामी केली. याप्रकरणी मी रीतसर तक्रार करणार असल्याचेही दिनेश पवार म्हणाले.. बाईट: दिनेश पवार, ग्रामपंचायत सदस्य.. @@ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदस्य दिनेश पवार यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली असली तरी त्यांनी केलेलं हे वक्तव्य किळसवाणेच आहे. जोपर्यंत माझे पैसे निघणार नाहीत तोपर्यंत मी पाणी सोडणार नाही, गावाला काय प्यायला द्यायचे तर द्या असं वक्तव्य करून नेमके गावाला काय पाजायचे होते हे मात्र त्यांनाच ठाऊक...!! महेंद्रकुमार मुधोळकर, झी 24 तास बीड
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 04, 2026 10:49:06
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यातील वैराग मधील महाआघाडीच्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब - बार्शी तालुक्यातील वैराग मध्ये आज महाआघाडीच्या जाहीर सभेचे आयोजन - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा असल्याने उद्धव ठाकरेंचा फोटो गायब केल्याची चर्चा - बार्शी तालुक्यात जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र - बार्शी तालुक्यातील ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येतेय निवडणूक - मात्र दिलीप सोपल यांना आपल्याच पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि माशालीचा पडला विसर - भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना अशी होतेय निवडणुक
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 04, 2026 10:33:07
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार दिपाली पाटील यांचे पती उदय पाटील यांना पोलिसांनी आज अचानक हद्दपारची नोटीस बजावल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मतदानाच्या ऐन तोंडावर उमेदवाराच्या पतीला हद्दपारची नोटीस देण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. नोटीस मिळताच उदय पाटील यांच्या घराबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, पराभवाच्या भीतीपोटी विरोधी उमेदवारांनीच पोलिसांवर दबाव टाकून ही हद्दपारची कारवाई करवून घेतल्याचाbola आरोप समर्थकानी केलाय
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 04, 2026 10:32:05
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबईत भाजपाला मोठा धक्का. नवी मुंबई महापालिकेतील प्रभाग क्र. 23ब च्या नगरसेवक पदाला न्यायालयाची स्थगिती. न्यायालयाने 12 फेब्रुवारी पर्यंत दिला तात्पुरता स्थगिती आदेश. नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामा संदर्भात त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या उमेदवार अश्विनी माने यांनी नायालयात केली होती याचिका दाखल. त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पदावर न्यायालयाने घातली तात्पुरती स्थगिती पुढील सुनावणी होईपर्यंत स्वतःला नगरसेवक म्हणून सादर करू शकणार नाहीत रुपाली भगत नगरसेवक पदाशी संबंधित कोणतेही अधिकृत कामकाज करू शकणार नाहीत रुपाली भगत असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 04, 2026 10:18:35
Kolhapur, Maharashtra:Kop Rendal ZP Feed : WhatsApp Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ पंचायत समिती मतदारसंघ संपूर्ण राज्यात चर्चेला आला आहे... कारण या पंचायत समिती मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दिव्यांग तरुणाला उमेदवारी दिली आहे... जमीर माणकापुरे असं उमेदवाराचे नाव असून हा तरुण जन्मापासून दिव्यांग आहे... जमीर हा केवळ निवडणूक लढवत नसून प्रचारामध्ये देखील त्याने आघाडी घेतली आहे... दोन्ही पाय आणि एक हात नसलेला जमीर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करतो...जमीर हा उच्चशिक्षित असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलचे काम जमीर गेल्या अनेक वर्षांपासून करतो... जमीर याची सामाजिक कार्यातील धडपड बघून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जमीर याच्यावरती विश्वास टाकला आहे....इतकच नाही तर मुश्रीफ यांनी जमीरच्या विजयासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे... प्रचार करताना देखील नागरिक जमीर यांचे कौतुक करत आहेत.. Byte :- जमीर माणकापुरे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 04, 2026 09:49:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये महापौर साठी भाजपकडे बहुमतासाठी एक जागा कमी आहे आणि हीच संधी साधण्याचा एमआयएम प्रयत्न करत असल्याचं दिसतेय, येत्या निवडणुकीत भाजप विरोधी सर्वच पक्षांचे एकजूट करून उमेदवार उभे करणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी दावा केला आहे दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं , आम्ही एकत्र येतो ज्याला भाजप नकोय त्या सगळ्यांनी एकत्र यावं आपण महापौर पदासाठी उमेदवार उभा करू असे त्या जलील यांचे म्हणणं आहे, आकडे भाजपाच्या बाजूने असले तरी विरोधी आकडे आमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे निश्चितपणे फरक पडेल असे जलील यांचं म्हणणं आहे.. खरं तर भाजपला महापौर पदासाठी एक जागा कमी आहे त्यात शिंदे ची शिवसेना भाजपाला समर्थन करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे त्यामुळे इम्तियाज जलील यांचा दावा कितपत चालतो हेच पाहणं महत्त्वाचं असेल...
0
comment0
Report
Advertisement
Back to top