Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपुर में कांग्रेस ने घरेलू गैस दर वृद्धि के विरोध में जोरदार प्रदर्शन किया
AKAMAR KANE
Mar 12, 2026 07:03:42
Nagpur, Maharashtra
घरगुती गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसने आज नागपूरात जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात जोरदार आंदोलन केले.. हातात सिलेंडर घेऊन, तसेच गळ्यात भाज्यांची माळ घालून आंदोलकांनी घरगुती गॅस दरवाढ बाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.... तसेच जिल्हाधिकारी परिसरातच रिकामा गॅस आणि बाजूला भाज्या कशा शिजवायचा असा डेमो सादर करत घरगुती दरवाढ आणि सिलेंडरची टाळ बाजारी याबाबत सरकारच निषेध केला आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 08:34:55
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | किर्तनकाराचं कीर्तनात महिलेविषयी वादग्रस्त वक्तव्य, संतप्त जमावाची कीर्तन काराला मारहाण(पॅकेज) कीर्तनात कीर्तनकारांचं महिलेविषयी वादग्रस्त वक्तव्य,कीर्तनकाराला घरात घुसून जमावाकडून मारहाण, कीर्तनातील वक्तव्यावरून वाद; मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावातील घटना कीर्तनामध्ये महाराजांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिलेच्या एका व्हिडीओवरून केलेल्या वक्तव्यावरून ही मारहाण करण्यात आली.बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या गांधीली गावात एका कीर्तनकाराला संतप्त जमावाने बेदम मारहाण केलीय.कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर असं मारहाण झालेल्या कीर्तनकारांचं नाव आहे.महाराजांनी काही दिवसांपूर्वी एक कीर्तन केलं होतं.या किर्तनात त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका महिलेच्या चंद्रग्रहणातील भाजी कापतानाच्या व्हिडीओचा दाखला दिला.चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी भाजी कापू नये असा समज मानला जातो.मात्र या महिलेचा भाजी आणि फळ कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं महाराजांनी तिची खिल्ली उडवत ती महिला आपल्या धर्माची नव्हती असं सांगत व्हिडीओमध्ये महिलेच्या पाठीमागे दिसणाऱ्या गौतम बौध्द यांच्या मूर्तीकडे अंगुली निर्देश केले साऊंड बाईट : निवृत्ती महाराज वाडेकर,(किर्तनाचा व्हिडीओ चालवावा) आमच्या धर्मावर आणि संतांवर कुणी आक्षेप घेतला तर सहन केला जाणार नाही असाही ईशारा महाराजांनी त्यांच्या कीर्तणातून दिला.त्यामुळे संतप्त जमावाने निवृत्ती महाराज वाडेकर यांचं घर गाठत घरावर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलंय. दरम्यान आपल्या कुटुंबातील महिलांना देखील मारहाण करण्यात आली असून ही मारहाण चुकीची असल्याच निवृत्ती महाराजांनी म्हटलंय.कीर्तनात केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्याबद्दल माफीही मागितल्याची कबुली महाराजांनी दिली बाईट : निवृत्ती महाराज वाडेकर,मारहाण झालेले महाराज दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.मारहाण करणाऱ्या लोकांविरोधात जाऊन आपल्याला वाद वाढवायचा नसल्याचं वाडेकरांनी म्हटलंय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 12, 2026 08:30:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:गैस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे चूल आंदोलन.. अँकर - आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे भारतातल्या इंधन दरामध्ये वाढ झाली आहे.घरगुती गॅस सिलेंडरचे झालेल्या वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने सांगलीत चूल आंदोलन करण्यात आले. शहरातल्या स्टेशन चौक येतील गांधी पुतळ्यासमोर शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्यावतीने चूल पेटवून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला आहे. बाईट - राजेश नाईक - शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 12, 2026 08:21:28
Washim, Maharashtra:अँकर:इराण,इजरायल और अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची चर्चा होत असताना वाशिम जिल्ह्यातील गॅस एजन्सींवर ग्राहकांच्या रांगा लागल्यााचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस सिलेडर मिळेल का नाही या भीतीने नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीवर गर्दी करत आहेत. मात्र जिल्ह्यात गॅसचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गॅस नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळपासून अनेक नागरिक एजन्सीबाहेर रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण तातडीने दूर करा किंवा ऑफलाइन नोंदणी करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 12, 2026 07:56:03
Nanded, Maharashtra:गोदावरी नदीचे नाभिस्थान असलेले नांदेड शहर. गोदावरी नदी म्हणजे नांदेड शहराची ओळख. पण नांदेड शहरातील सत्या नाल्यांचे घाण पाणी थेट गोदावरी नदीत मिसळत असल्याने पवित्र गोदावरी नदीची गटारगंगा झालीये. नदीत नाल्यांचे पाणी मिसळू नये यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेली योजना काही दिवसातच बंद पडली. आता पुन्हा नव्याने सतरा कोटी रुपये खर्चून नवीन उपाययोजना केली जात आहे. पूर्वी नदीपत्राच्या जवळच पाईपलाईन टाकण्यात आल्याने ही पाईपलाईन नदीला पाणी आल्यानंतर गाळ साचून निकामी झाली होती. आता थोड्या वरच्या बाजूस नवीन पाईपलाईन टाकली जात आहे. तीन नाल्यांसाठी पॉकेट एस टी पी करण्यात आलाय तर चौदा नाल्यांचे पाणी पाईपলাইन्​dद्वारे बोंधार येथील एसटीपी मध्ये नेला जाऊन घाण पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. नव्याने करण्यात येणारी पाईपलाईन अत्यंत निकृष्ट दर्जाची असून काम पूर्ण झाले असतानाही नाल्यांचे पाणी नदीत मिसळत असल्याची तक्रार नगरसेविकेने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलीये. नव्यानेच काम झालेले असतानाही घाण पाणी नदीत मिसळत असल्याने कामाची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीये. परंतु काम संपत आले असून काम पूर्ण झाल्यानंतर घाण पाण्याचा एकाही थेंब नदीत मिसळणार नाही असा दावा प्रशासनने केलाय.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 07:52:43
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 12, 2026 07:52:23
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 12, 2026 07:50:05
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवल्यातील मटन खानावळ या राज्यात प्रसिद्ध असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून खवय्ये मटण खाण्यासाठी येवल्यात येत असतात मात्र गेल्या दोन दिवसांपासून कमर्शियल गॅस चा पुरवठा बंद झाल्यामुळे खानावळी बंद ठेवण्याची वेळ हॉटेल मालकांवर आली होती दरम्यान बाहेर गावावरून आलेल्या खवय्यांचा हिरमोड होत असल्याने येवल्यातील हॉटेल मालकांनी आता सर्व स्वयंपाक चुलीवर सुरू केला असून कमर्शियल गॅस चा पुरवठा होईपर्यंत किमान घरगुती गॅस वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल मालकांनी केली आहे या संदर्भात या मालकांसोबत conversation केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 07:34:43
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरातील हॉटेल व्यवसायिकांना गैस सिलिंडर पुरवठ्याचा फटका बसला आहे. या निमित्ताने कोविडच्या परिस्थितीची आठवण झाली आहे. होटल कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गैस सिलिंडर हॉटेल चालकांना मिळत नाहीत. त्यामुळे हॉटेलमध्ये आता नवीन पदार्थ बनवणे बंद झाले आहे. स्वीट मार्ट आणि मिठाई तयार करणाऱ्या दुकानातील कामगारांना गैस सिलेंडर टंचाईमुळे सध्या नवीन पदार्थ बनवण्याचे काम नाही. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका स्वीट मार्ट मिठाई दुकानदारांना बसला आहे. परराज्यातून विविध प्रकारच्या मिठाई बनवण्यासाठी कामगार आणले आहेत. मात्र व्यावसायिक गैस सिलिंडरचा पुरवठा नसल्याने हे कामगार बसून आहेत. याचा फटका स्वीट مار्ट चालकांना कामगारांनादेखील बसत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 12, 2026 07:34:01
Nagpur, Maharashtra:कमर्शियल LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे चुलीवर स्वयंपाकसाठी लागणाऱ्या लाकडांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय.. गेल्या दोन दिवसात 30 ते 40 टक्के लाकडांची विक्री जास्त झाल्याची माहिती नागपूरातील वखार मालकांनी दिलीय.. खास करून कॅटरिंग व्यवसायिकांनी चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांच्या ऑर्डरची पूर्तता करावी लागत आहे... त्याकरता वखार मधून लाकड खरेदी करण्यासाठी ते पोहोचत आहे... इस्त्राइल, अमेरिका विरुद्ध इराण युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झालाय .. कॅटरिंग आणि हॉटेल व्यवसायावर तर मोठे संकट ओढवले आहे... त्यामुळे प्रामुख्याने हे व्यवसायिक चुलीवर खाद्यपदार्थ तयार करून ग्राहकांना खाद्यपदार्थांची मागणी पूर्ण करताय.. त्याकरता वखारीतून आवश्यक लाकूड खरेदी करत आहे.... दरम्यान गल्फ वॉरनंतर पहिल्यांदाच इतकी मोठी लाकडांची खरेदी झाल्याचे वखार मालक सांगताय... नागपुरातील एका वखारी मधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 07:31:49
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेची ऑनलाईन नोंदणी १३ मार्चपासून सुरू,चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्र प्रारंभापर्यंत पूजेचा कालावधी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेचेच चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे रु.२१,०००/- व रु.९,०००/- इतके देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी करताना अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयामार्फत मार्गदर्शन व नोंदणीस सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर पूजेबाबतची सविस्तर माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी भाविकांनी दूरध्वनी क्र. ०२१८६-२९९२९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 12, 2026 07:25:31
Wardha, Maharashtra:वर्धा स्टोरी - युद्धजन्य परिस्थितीचा कॅटरिंग व्यवसायाला फटका अँकर - देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता विविध व्यवसायांवर दिसून येत असून वर्धा जिल्ह्यातील कॅटरिंग व्यवसायालाही त्याचा मोठा फटका बसत आहे. व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने कॅटरिंग व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलिंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने अनेक नियोजित ऑर्डर रद्द करण्याची वेळ कॅटरिंग व्यावसायिकांवर आली आहे. गेल्या काही दिवसांचं व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी कॅटरिंग सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेळेवर सिलिंडर उपलब्ध न झाल्यास कार्यक्रमांसाठी आवश्यक अन्नपदार्थ तयार करणे कठीण होत असल्याने काही ठिकाणी ऑर्डर कॅन्सल करण्याची वेळ येत आहे. वर्धा जिल्ह्यात जवळपास 250 कॅटरिंग व्यावसायिक कार्यरत आहेत. या व्यवसायावर थेट किंवा अप्रत्यक्षरित्या पाच ते दहा हजार लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. स्वयंपाकी, मदतनीस, भांडी धुणारे, सामान वाहून नेणारे तसेच इतर कामगार या व्यवसायाशी जोडलेले आहेत. त्यामुळे सिलिंडर पुरवठ्यातील अडचणीमुळे केवळ कॅटरिंग व्यवसायिकच नव्हे तर या व्यवसायाशी संबंधित हजारो कामगारांवरही आर्थिक संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 12, 2026 07:20:39
Bhandara, Maharashtra:आखाती देशात सुरू असलेला युद्धाचा फटका भंडाऱ्यातील तांदूळ निर्यातीवर.... मजुरांना काढले कामावरून... शेतकरी देखील अडचणीत येणार.... आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक देशांसह भारताला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे... भंडारा जिल्हा हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातून तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात होती. मात्र आता युद्धामुळे तांदळाची मागणी कमी झाली आहे. भंडारा जिल्ह्यातून तांदूळ रशिया, आफ्रिका, सुडान या देशात जहाजाच्या सहाय्याने तांदूळ निर्यात केला जात आहे. पण आता अनेक कंटेनर अडकून असल्याने तांदुळाची मागणी कमी झाली असून याचा सरळ परिणाम तांदूळ निर्यातदारांवर झाला आहे. म्हणून तांदळाची भरडाई कमी झाली असल्याने अनेक मजुरांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे... आता जर युद्ध बंद झाले नाही तर तांदळ मिल बंद पडण्याची वेळ येणार आहे. व याची झळ शेतकऱ्यांना देखील बसणार आहे.. तांदळ मिलमधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी.....
0
comment0
Report
Advertisement
Back to top