Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

राहाता में गैस वितरण के दौरान भारी भीड़, पुलिस के बेरिकेट्स के बीच भारी हंगामा

KJKunal Jamdade
Mar 12, 2026 08:20:54
Shirdi, Maharashtra
गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी... लांबच लांब रांगा, पोलिस बंदोबस्तात गॅस वाटप... राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी... गॅस वितरक आणि ग्राहकांमध्ये शाब्दिक चकमक... अनुचित प्रकार टाकण्यासाठी पोलिस बंदोबस्तात गॅस वितरण...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 12, 2026 09:47:26
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 12, 2026 09:33:58
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 12, 2026 09:23:49
Nagpur, Maharashtra:बाईट – डॉ. विपीन इटनकर,जिल्हाधिकारी, नागपूर नागपूर - - नागपुरात सध्या एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली असून, याबाबत प्रशासनाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. - गॅसची अवैध साठवणूक करून काळाबाजार карданиाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. - गरजेनुसार व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. - गॅसचा तुटवडा होणार नसल्याने घाबरून जाऊन कोणीही गॅस खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. - सध्या नागपुरात एकही हॉटेल बंद नसल्याची माहितीही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. - शाळा, आरोग्य विभाग आणि इतर अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 12, 2026 09:18:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स मध्ये कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक, हॉटेलमध्ये मिळणारे 60 टक्के पदार्थ बंद. आखाती देशांमध्ये सुरू असणाऱ्या युद्धाचा परिणाम आता सांगली जिल्ह्यातील हॉटले व्यवसायावर देखील होऊ लागलाय. जिल्ह्यातील हॉटेलला पुरवठा करण्यात येणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा जवळपास ठप्प होत आला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स मध्ये सध्या कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करण्याचे काम सुरू आहे. तसेच मोठया हॉटेल मध्ये नाष्टासह ,चायनीज पदार्थ व चहा बंद करण्यात आला आहे.यामुळे सांगलीतील हॉटेल व्यवसाय आता 40 टक्क्यावर आला आहे,तुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत येत असल्याचे हॉटेल मालक सांगत आहेत.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 12, 2026 08:50:53
Beed, Maharashtra:बीड: जर आपल्यावर कोणी हल्ला करत असेल तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा, लक्ष्मण हाके यांचे चितावणीखोर आवाहन.... ANC -महाराष्ट्रात मेंढपाळांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांबाबत संताप व्यक्त करत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी धनगर समाज बांधवांना आवाहन केले आहे. “राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कोणी जर आपल्यावर हल्ला करत असेल तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा. मी चिथावणी देत नाही, तर जबाबदारीने बोलत आहे,” असेही ते म्हणाले. माजलगाव तालुक्यात मेंढपाळांना मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रा. हाके यांनी माजलगाव पोलीस ठाण्यात भेट देत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. आरोपींवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला. या मारहाण प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात आली नाही, तर धनगर समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, प्रा. हाके यांनी मारहाण झालेल्या बीटे बंधूंच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बीटे बंधूंचे आजोबा यांनीही आपल्या भावना व्यक्त करत “आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही तो सहन करणार नाही,” असे सांगितले. बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. बाईट: लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक.. बाईट: पीडित कुटुंब
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 12, 2026 08:50:34
Pune, Maharashtra:मावळच्या इंद्रायणी तांदळाचा सुगंध सात समुद्रापार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरवळतो. मात्र आखाती देशांतील युद्धाच्या काळ्या ढगांमुळे या सुगंधी तांदळाच्या निर्यातीवर संकट ओढावू लागलं आहे. मावळ तालुक्यात पिकणारा इंद्रायणी तांदूळ आपल्या उत्कृष्ट चव, नैसर्गिक सुगंध आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. विशेषतः युनायटेड किंगडम आणि युनायटेड अरब अमिराती या देशांमध्ये या तांदळाची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. मात्र युद्धामुळे मावळच्या इंद्रायाणी तांदळाच्या निर्यातीवर देखील परिणाम झाल्याचे चित्र आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे ७७ टक्के तांदूळ युनायटेड किंगडमला तर जवळपास २३ टक्के तांदूळ युनायटेड अरब अमिरातीमध्ये निर्यात केला जातो. यामुळे मावळातील राईस मिल मधील काम देखील ठप्प पडल्याचे चित्र आहे. या राईस मिल चालकांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. मात्र सध्या आखाती भागातील युद्ध परिस्थितीचा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. निर्यात केलेला इंद्रायणी तांदूळ जेएनपीटी बंदरावर अडकून पडल्याने भात गिरण्या, व्यापारी आणि शेतकरी सगळेच चिंतेत आहेत. परिणामी पुणे मार्केट यार्ड आणि नवी मुंबईतील एफएमसी मार्केट यार्डमध्येही व्यवहार मंदावले असून बाजारपेठेत एक प्रकारची शांतता पाहायला मिळत आहे. स्थानिक बाजारात या तांदळाची किंमत साधारण ५० ते ६० रुपये प्रति किलो असून, गुणवत्ता आणि पॉलिशिंगनुसार निर्यात बाजारात ती तब्बल १२५ रुपयांपर्यंत पोहोचते. मात्र सध्या निर्यात बंद असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. End Vo: मावळ भागातील हवामान आणि जमीन इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. त्यामुळे येथील शेतकरी सुमारे साडे बारा हजार हेक्टर क्षेत्रात हा सुगंधी, मध्यम आकाराचा आणि चिकट पोत असलेला तांदूळ पिकवतात. नैसर्गिक सुगंध, पौष्टिकता आणि फायबरयुक्त गुणधर्मांमुळे या तांदळाची मागणी देशासह परदेशात सातत्याने वाढत आहे. मात्र मावळच्या सुगंधी इंद्रायणी तांदळावर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींची सावली पडल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 12, 2026 08:47:47
Amravati, Maharashtra:Vo१: अमरावतीच्या वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खारतळेगाव येथे ही घटना घडली. मंगेश देविदास गोटे, वय 45 वर्षे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश गोटे यांना दारू पिण्याचे व्यसन होते. यामुळे घरामध्ये पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुन्हा एकदा दारूच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीमुळे मंगेश गोटे यांची प्रकृती गंभीर बिघडली आणि त्यांची मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, पत्नीने पतीला मारहाणीची कबुली दिल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी वलगाव पोलीस अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. Vo२: घरगुती वाद आणि दारूच्या व्यसनातून घडलेल्या या घटनेमुळे खारतळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वलगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 12, 2026 08:47:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - सांगलीच्या मिरज पंचायत सभापती निवडणुकी दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या सदस्याच्या झालेल्या अपहरणाच्या निषेधार्थ बुधगाव सह आसपासच्या सहा गावांमध्ये बंद पाळत निषेध नोंदवण्यात आला आहे. बुधगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेले शिवसेना शिंदे पक्षाचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचा सभापती निवडीच्या आदल्या दिवशी अपहरण करण्यात आलं होतं आणि यानंतर त्यांचे सभापती निवड झाल्यानंतर सुटका करण्यात आली होती.या प्रकारामुळे मिरज पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली,त्यामुळे भाजप-सेना युतिचे सभापती निवडून येऊ शकले नाहीत,मिरज पंचायत समितीमध्ये महायुतीला सभापती पदापासून मुकावे लागलं,असा आरोप करत अपहरण प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीने बुधगाव सह आसपासच्या गावात आज बंद पापुकारण्यात आला होता,त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला,यावेळी शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीने यावेळी निदर्शने देखील करण्यात आली. बाईट - पांडुरंग इंगळे - अपहरण झालेले पंचायत समिती सदस्य. बाईट - बजरंग पाटील - जिल्हािपुः शिवसेना शिंदे पक्ष,सांगली.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 12, 2026 08:46:47
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 08:34:55
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | किर्तनकाराचं कीर्तनात महिलेविषयी वादग्रस्त वक्तव्य, संतप्त जमावाची कीर्तन काराला मारहाण(पॅकेज) कीर्तनात कीर्तनकारांचं महिलेविषयी वादग्रस्त वक्तव्य,कीर्तनकाराला घरात घुसून जमावाकडून मारहाण, कीर्तनातील वक्तव्यावरून वाद; मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावातील घटना कीर्तनामध्ये महाराजांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिलेच्या एका व्हिडीओवरून केलेल्या वक्तव्यावरून ही मारहाण करण्यात आली.बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या गांधीली गावात एका कीर्तनकाराला संतप्त जमावाने बेदम मारहाण केलीय.कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर असं मारहाण झालेल्या कीर्तनकारांचं नाव आहे.महाराजांनी काही दिवसांपूर्वी एक कीर्तन केलं होतं.या किर्तनात त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका महिलेच्या चंद्रग्रहणातील भाजी कापतानाच्या व्हिडीओचा दाखला दिला.चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी भाजी कापू नये असा समज मानला जातो.मात्र या महिलेचा भाजी आणि फळ कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं महाराजांनी तिची खिल्ली उडवत ती महिला आपल्या धर्माची नव्हती असं सांगत व्हिडीओमध्ये महिलेच्या पाठीमागे दिसणाऱ्या गौतम बौध्द यांच्या मूर्तीकडे अंगुली निर्देश केले साऊंड बाईट : निवृत्ती महाराज वाडेकर,(किर्तनाचा व्हिडीओ चालवावा) आमच्या धर्मावर आणि संतांवर कुणी आक्षेप घेतला तर सहन केला जाणार नाही असाही ईशारा महाराजांनी त्यांच्या कीर्तणातून दिला.त्यामुळे संतप्त जमावाने निवृत्ती महाराज वाडेकर यांचं घर गाठत घरावर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलंय. दरम्यान आपल्या कुटुंबातील महिलांना देखील मारहाण करण्यात आली असून ही मारहाण चुकीची असल्याच निवृत्ती महाराजांनी म्हटलंय.कीर्तनात केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्याबद्दल माफीही मागितल्याची कबुली महाराजांनी दिली बाईट : निवृत्ती महाराज वाडेकर,मारहाण झालेले महाराज दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.मारहाण करणाऱ्या लोकांविरोधात जाऊन आपल्याला वाद वाढवायचा नसल्याचं वाडेकरांनी म्हटलंय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 12, 2026 08:30:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:गैस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे चूल आंदोलन.. अँकर - आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे भारतातल्या इंधन दरामध्ये वाढ झाली आहे.घरगुती गॅस सिलेंडरचे झालेल्या वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने सांगलीत चूल आंदोलन करण्यात आले. शहरातल्या स्टेशन चौक येतील गांधी पुतळ्यासमोर शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्यावतीने चूल पेटवून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला आहे. बाईट - राजेश नाईक - शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 12, 2026 08:21:28
Washim, Maharashtra:अँकर:इराण,इजरायल और अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची चर्चा होत असताना वाशिम जिल्ह्यातील गॅस एजन्सींवर ग्राहकांच्या रांगा लागल्यााचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस सिलेडर मिळेल का नाही या भीतीने नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीवर गर्दी करत आहेत. मात्र जिल्ह्यात गॅसचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गॅस नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळपासून अनेक नागरिक एजन्सीबाहेर रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण तातडीने दूर करा किंवा ऑफलाइन नोंदणी करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top