Back
गांधीली गांव में कीर्तनकार की भीड़ ने घर में घुसकर मारपीट की, वीडियो पर विवाद
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 08:34:55
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर | किर्तनकाराचं कीर्तनात महिलेविषयी वादग्रस्त वक्तव्य, संतप्त जमावाची कीर्तन काराला मारहाण(पॅकेज)
कीर्तनात कीर्तनकारांचं महिलेविषयी वादग्रस्त वक्तव्य,कीर्तनकाराला घरात घुसून जमावाकडून मारहाण, कीर्तनातील वक्तव्यावरून वाद; मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावातील घटना
कीर्तनामध्ये महाराजांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिलेच्या एका व्हिडीओवरून केलेल्या वक्तव्यावरून ही मारहाण करण्यात आली.बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या गांधीली गावात एका कीर्तनकाराला संतप्त जमावाने बेदम मारहाण केलीय.कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर असं मारहाण झालेल्या कीर्तनकारांचं नाव आहे.महाराजांनी काही दिवसांपूर्वी एक कीर्तन केलं होतं.या किर्तनात त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका महिलेच्या चंद्रग्रहणातील भाजी कापतानाच्या व्हिडीओचा दाखला दिला.चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी भाजी कापू नये असा समज मानला जातो.मात्र या महिलेचा भाजी आणि फळ कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं महाराजांनी तिची खिल्ली उडवत ती महिला आपल्या धर्माची नव्हती असं सांगत व्हिडीओमध्ये महिलेच्या पाठीमागे दिसणाऱ्या गौतम बौध्द यांच्या मूर्तीकडे अंगुली निर्देश केले
साऊंड बाईट : निवृत्ती महाराज वाडेकर,(किर्तनाचा व्हिडीओ चालवावा)
आमच्या धर्मावर आणि संतांवर कुणी आक्षेप घेतला तर सहन केला जाणार नाही असाही ईशारा महाराजांनी त्यांच्या कीर्तणातून दिला.त्यामुळे संतप्त जमावाने निवृत्ती महाराज वाडेकर यांचं घर गाठत घरावर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलंय. दरम्यान आपल्या कुटुंबातील महिलांना देखील मारहाण करण्यात आली असून ही मारहाण चुकीची असल्याच निवृत्ती महाराजांनी म्हटलंय.कीर्तनात केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्याबद्दल माफीही मागितल्याची कबुली महाराजांनी दिली
बाईट : निवृत्ती महाराज वाडेकर,मारहाण झालेले महाराज
दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.मारहाण करणाऱ्या लोकांविरोधात जाऊन आपल्याला वाद वाढवायचा नसल्याचं वाडेकरांनी म्हटलंय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 12, 2026 09:47:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 12, 2026 09:33:580
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 09:23:490
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 12, 2026 09:19:070
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 09:18:560
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 09:18:410
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 12, 2026 08:50:530
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 12, 2026 08:50:340
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 12, 2026 08:47:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:47:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 08:46:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:30:270
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 08:21:280
Report
KJKunal Jamdade
FollowMar 12, 2026 08:20:540
Report