Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
कोल्हापुर में बकाया भुगतान न भरने पर पंपिंग स्टेशनों की सील, पानी सप्लाई बाधित
PNPratap Naik1
Mar 20, 2026 08:02:00
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर महानगरपालिकेवर नामुष्कीची वेळ ओढवली असून पाटबंधारे विभागाने थकीत बिलांमुळे थेट कारवाई करत शहराचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईमुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाने नागदेववाडी, शिंगणापूर, बालिंगा आणि काळम्मावाडी येथील उपसा केंद्रांवर धडक कारवाई करत संबंधित पंपिंग स्टेशन सील केली आहेत. अचानक झाल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाटबंधारे विभागाचे तब्बल 166 कोटी रुपये थकीत असल्याचे उघड झाले आहे. वारंवार सूचना देऊनही थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई केल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. थकीत रक्कम भरल्याशिवाय सील हटविण्यात येणार नाही, अशी ठाम भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली असून, या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनावर आता मोठा दबाव निर्माण झाला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Mar 20, 2026 09:00:33
Amravati, Maharashtra:मंत्री संजय शिरसाट और विरोधात भीम ब्रिगेड संघठनाक्रम; अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समोर जाळला शिरसाठ यांचा प्रतिकात्मक पुतळा अँकर :- शहरात आज भीम ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री शिरसाट यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. अधिवेशनादरम्यान ॲट्रॉसिटी कायद्याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे अनुसूचित जाती समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बंदोबस्तात हे आंदोलन पार पडले.
916
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 08:51:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : उद्धव ठाकरे च्या शिवसेनेचे संभाजी नगरात शिंदे सेनेच्या साथीने सत्ता स्थापनेचा मनसुबे होते मात्र भाजपने हे मनसुबे उधळून लावले त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आता कलह सुरू झाला आहे आमचे सदस्य अंबादास दानवे यांनी विकायला काढले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे च्याच एका सदस्यांना केला आणि त्यावर खुलासा करण्याच्या दारुण प्रयत्नात उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या सदस्यांकडून सगळीच पोलखोल झाली, पाहूयात काय झालंय नक्की प्रकार ( संजय निकम याच्या बाईट्ने सुरुवात करा ) अंबादास दानवे वर आरोप करणारे हे आहेत संजय निकम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, दानवेंनी आमच्या नवनिर्वाचित सर्व सदस्यांचा सौदा केला होता. त्यानंतर दानवेंनी आम्हाला डांबून ठेवलं, वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन गेली अनेक दिवस आम्हाला फिरवलं. कुणाशीही संपर्क होऊ नये म्हणून आमचे मोबाईल देखील काढून घेतले होते असा सनसनाटी आरोप केला त्यामुळं आधी असे काहीच नाही म्हणणारी उद्धव ठाकरे यांची सेने अडचणीत आली, अंबादास दानवे त्यांच्या तावडीतून आम्ही सुटका केली आणि हा सगळा प्रकार उद्धव ठाकरे यांना सांगितला असल्याचा आरोपही ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी केला आहे. Vo 2.. यामुळं अडचणीत आलेल्या ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या आरोपांवर मौन बाळगले आणि इतर सदस्यांना पूढे केले मात्र इतर सदस्यांनी यावर खुलासा करताना होय आम्ही सत्तेसाठी हालचाली करत होतो अशी जाहीर कबूलीच दिली, याबाबत उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे याना माहिती ही दिली होती मात्र आम्हाला सत्तेत जायचे होते त्यामुळं आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र आमचे 2 सदस्य भाजपने फोडले आणि अडचण झाल्याचीही कबुली त्यांनी दिली , आणि उद्धव यांच्या सेनेचा सगळं प्लॅन च उघड झाला... Vo 3... खरंतर ही पत्रकार परिषद दानवे यांच्यावर खोटे आरोप केले हे सांगण्यासाठी या सदस्यांनी घेतली मात्र या सगळ्यात नक्की काय ठरले होते याची कबुलीच त्यांनी दिली त्यामुळं भाजपने जे आरोप दोन्ही शिवसेनेवर केले होते त्यालाही पुष्टी मिळाली , सारवासारव करण्याचा नादात पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेने सगळंच उघड केले आणि पून्हा तोंडावर पडले अशाच चर्चा या निमित्ताने सुरू झाल्या आहेत... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
910
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 20, 2026 08:36:03
Vasai-Virar, Maharashtra:वसईत गवराई पाडा येथे जमीन וादातून महिलांवर जीवघेणा हल्ला महिलांवर फावडे आणि लाकडी दांडक्यानी जीवघेणा हल्ला महिलांवर निर्दयी हल्ल्यामुळे परिसरात तणाव वसई पूर्वेच्या गवराई पाडा जीवन नगर परिसरात जमीनीच्या वादातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर होऊन काही महिलांवर अक्षरशः फावडे आणि लाकडी दांडक्यानी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे विडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जमीन मालकी हक्काच्या वादातून दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. वाद वाढत जाऊन परिस्थिती बिघडली आणि काही महिलांना लक्ष्य करत त्यांच्यावर घातक हल्ला करण्यात आला. या घटनेत काही महिला जखमी झाल्याचे समजते असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
1067
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 08:16:14
Solapur, Maharashtra:सोलापूरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम अवकाळी पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील शेतकरी अंकुश सिरसट यांची तब्बल तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. या घटनेत जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. यंदा द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळत असताना शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची जोपासना केली होती; परंतु सणासुदीच्या दिवशी आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आशा उद्ध्वस्त झाल्या आहेत. रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळीसह वांगी, रानमसले, कळमण, बीबी दारफळ, वडाळा, बाणेगाव आणि मार्डी परिसरांनाही पाडला आहे. अंकुश सिरसट यांच्या बेदाणा रॅकचेही मोठे नुकसान झाले असून, त्यावर ठेवलेला माल 50 ते 60 लाख रुपयांचा खराब झाला आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.
1045
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 08:15:57
Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यात आधीच शेतकरी अवकाळी पाऊसाने उध्वस्त होत असतांना आता धुळे तालुक्यातील साजोरी या गावी रात्री हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये सात बकऱ्या ठार झाल्या असून, शेतकरी दीड लाख रुपयांचा नुकसान झाले आहे. शेतकरी दीपक मोतीराम ठाकरे यांच्या शेतात गोठ्यामध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात सात बकऱ्या ठार झाल्या असून शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरला आहे. सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार दीपक ठाकरे यांच्या लक्षात आला. गेल्या काही दिवसापासून सांजोरी गावाकडे बिबट्याच दर्शन गावकऱ्यांना झालं होतं. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात या बकऱ्या ठार झाल्या असून पंचनामा करून आम्हाला मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गावकाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरला आहे.
1086
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 20, 2026 08:15:34
Washim, Maharashtra:वाशीम: अंतर्गत धुमका ते बोराळा या वाशीमला जोडणाऱ्या सुमारे सहा ते सात किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताच्या घटना घडत आहेत. या जीवघेण्या खड्यामुळं वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून वाशीमला जाणाऱ्या स्थानिक नागरिक, प्रवासी आणिशाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षांपासून जड वाहतुकीमुळे रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली जासत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आमचे वाशिम प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी …
1089
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 08:04:15
Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यात वादळी वाऱ्याने काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाली आहेत. तालुक्यातील जापी, शिरढाने, कुंडाणे शिवारात बहुसंख्य क्षेत्रात मक्याचे पीक भुईसपाट झाले आहे. जिल्ह्यात बहुसंख्य भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात सर्वाधिक नुकसान साक्री तालुक्याचे झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरावला. साक्री तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट पेरेजपूर, कावठे आणि अष्टानेसह बहुसंख्य क्षेत्रात काढणीला आलेले पीक जमीनदोस्त. तर धुळे तालुक्यात देखील मक्का पिकासह गव्हाचे नुकसान झाले आहे. बहुसंख्य मक्याचे पीक जमीनदोस्त झाले आहे. जापी शिवारात मक्याचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
1045
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 20, 2026 08:03:57
1073
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 08:02:42
1031
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 08:01:46
Dhule, Maharashtra:भीषण आरोग्य सुधाराच्या शक्यतेसाठी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी शनिदेवाच्या चरणी साकडे घातले आहे. नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ येथे जाऊन त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करत डॉ. गावित यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी केवळ डॉ. गावित यांच्या प्रकृतीसाठीच नव्हे, तर जिल्ह्यावर आलेली संकटेही लवकर दूर व्हावीत, अशीही शनिदेवाकडे प्रार्थना केली. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, यासाठी हिना गावित यांनी विशेष पूजा केली. शनिमंदिरात पार पडलेल्या या पूजेदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विजयकुमार गावित यांच्या आरोग्यासाठी जिल्हाभरातून प्रार्थना व्यक्त केली जात असून, त्यांच्या लवकर बरे होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
1017
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 07:48:54
1054
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 07:48:13
Dhule, Maharashtra:धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला मातीमोल दर दिले जातं आहेत. गेल्या वर्षी 2700 रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा गहू आता केवळ 2200 रुपये प्रति क्विंटल विकला जातं आहे. युद्धाचा गहू बाजारावर परिणाम झाला असून, बिस्किट कारखाने गहू खरेदी करत नसल्याने गव्हाचे दर कमी झाल्याचे व्यापारी सांगून न परवडणाऱ्या दरात गहू खरेदी करीत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. रक्ताचे पाणी करून वाढवळेलता पिकाला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सपाडाला आहे. गव्हाची उचल नसल्याने कमी भाव आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे बिस्कीट बनवणाऱ्या कंपन्या गहू खरेदी करत नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या गावाला क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांचा तोटा सहन करावा लागतो आहे. सध्या गहू 2200 ते 2400 रुपये क्विंटल दर कृषी उत्पन्न बाजार समितीने मिळतो आहे.
960
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 20, 2026 07:40:05
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर काही अधिकारी, कर्मचारी व शिक्षक सेवाविषयक विविध प्रकारचे लाभ घेत आहेत. या प्रकारामुळे खर्‍या दिव्यांग लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अश्या 490 दिव्यांगाची तपासणी आरोग्य विभागाचे उपसंचालक अकोला यांच्याकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिकारी आणि कर्मचारी यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविली अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी झालेल्या कागदपत्रांच्या तपासणीत 21 शिक्षक, कर्मचार्‍यांकडे युडीआयडी कार्ड आढळून आले नाही. अशा कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु इतरही विभागातील लाभ घेणार्‍या शिक्षक, कर्मचार्‍यांची तपासणी करावी, अशी मागणी सुरू होती. त्यामुळे 490 दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची लाक्षणिक तपासणी करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी घेतला आहे.
1058
comment0
Report
Advertisement
Back to top