Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
कोल्हापुर महानगर पालिका ने चार वार्ड की मतदाता सूची जारी, आपत्तियाँ 27 नवंबर तक
PNPratap Naik1
Nov 20, 2025 03:36:27
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने चार सदस्य प्रभागासाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध केली जाणार आहे. शहरातील चार विभागीय कार्यालयात, ताराबाई पार्क परिसरातील मुख्य निवडणूक कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ही मतदार yादी पाहता येणार आहे. उद्यापासून 27 नोव्हेंबरपर्यंत या मतदार यादी संदर्भात हरकत आणि सूचना दाखल केल्या जाणार आहेत
122
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Nov 20, 2025 05:06:38
Navi Mumbai, Maharashtra:कोपरखैरणे और वाशी पुलिस ठाण्यात भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी बॉबी शेख आणि त्यांचा मुलगा यश बॉबी शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला “कपडे काढून तुझी धिंड काढेल” अशी धमकी दिली गेली असे गंभीर आरोप झाले. घटनेची माहिती पीडित मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान वाशीमध्ये घडली. आरोपी यश शेखने मुलीच्या मित्रांना धमकी दिली की तिला सोबत रहा, नाहीतर कपडे काढून धिंड काढेल अशी धमकी दिली. यावर पीड़ित मुलीच्या मित्रांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आरोपीने मित्रांना मारहाण केली. पीडित मुलीने पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून वाशी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीचा वडील बॉबी शेख यांनीही पीडित मुलीच्या मित्रांच्या पालकांना फोनवर दमदाटी करण्याचा आरोप केला असून, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे.
34
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 20, 2025 05:06:27
Ratnagiri, Maharashtra:कोकणातल्या मंदिरांमध्ये सध्या त्या त्या ग्रामदेवतांच्या जत्रा सुरू झाल्या आहेत... गावच्या जत्रांचा हा उत्सव अनेक ठिकाणी दोन ते तीन दिवसांपर्यंत चालतो... इथल्या प्रत्येक जत्रेबरोबर एक अनोखी परंपरा जोडलीगेलीय... गुहागर तालुक्यातील नरवण गावातील व्याघ्रंबरी देवी नवसाला पावते.. म्हणुनइथे नवस बोलायला येणा-यांची मोठी संख्या आहे... मात्र नवस पुर्ण झाला तर तो फेडण्याची पद्धत मात्र अनोखी आहे... देवीच्या प्रांगणात नवस फेडणा-याच्या पाठीत हुक अशा पद्धतीने अडकवला जातो... की रक्ताचा एक थेंबही येत नाही.... हुक अडकवलेल्या व्यक्तीला मंदिराच्या प्रांगणातउभारलेल्या लाटेवर बांधले जाते... व ही लाट तीस ते चाळीस फुटापर्यंत उंच उचलत गोल फिरवली जाते...नवसपूर्ण झालेला प्रत्येक व्यक्ती अशा पद्धतीने नवस फेडू शकत नाहीत... अशा वेळी अशा व्यक्तीच्या वतीने ग्रामदेवतेच्या गावच्यापिसारातील कुठल्याही व्यक्तीने हा नवस फेडून चालतो... मात्र जी व्यक्तीनवस फेडण्यासाठी पाठीवर हुक अडकवून घेतली तीला त्या दिवशी सकाळपासून अन्न पाण्यावीना कडक उपवास करावा लागतो...कोकणातल्या जत्रांमध्ये वर्षांनुवर्षांच्या या अनोख्या परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपल्या जातात... इथे घडणा-या प्रत्येक गोष्टीलावैज्ञानिक आधार असतो... पाठिला हुक अडकवून घेवून लाटेवर फे-या मारतानाची दृष्य पाहण्याकरीता विविध गावातून इथे गर्दी करीत असतात... अर्थात इथे लाटेवर पहिली फेरी कोणी मारायची आणि नवस फेडणा-याच्या पाठित हुक कोणी अडकवायचा याचा परंपरागत मान निश्चित असतो...आपल्या अशा अनोख्या परंपरा जपत साजरा होणा-या कोकणातल्या जत्रा त्यांच्या या वेगळेपणामुळेच आर्षणाच्या विषय ठरतात...
71
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 20, 2025 05:05:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शाळेच्या त्रासाला कंटाळून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दिल्लीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शौर्य प्रदीप पाटील, असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातला खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाय निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीवनगर भागात वास्तव्यास होता. तो दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून त्याने खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शौर्य ने एक दीडपणाची सुसाईड नोट देखील लिहिली आहे. ज्यामध्ये शाळेतील प्राचार्य दाह चार शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे लिहिले आहे. या प्रकरणी राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज ढवळेश्वर या मूळगावी शौर्य याच्या वर अंत्यसंस्कार होणार आहेत.
32
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 20, 2025 05:04:00
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाणांचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक रत्नागिरीतल्या महायुतीच्या मेळाव्यात सामंत यांच्याकडून रविंद्र चव्हाणांवर स्तुती सुमने शिवसेनेच्या पदाधिकार्याला सुद्धा तुमचा अभिमान कोकणातला एक सहकारी जगातल्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्र पदाच्या अध्यक्ष पदावर बसलाय हि आमच्यासाठी अतिशय महत्वाची बाब, य़ुती टिकावी यासाठी महाराष्ट्रातील पहिला प्रचार रत्नागरीतून सुरु केला त्याबद्दल धन्यवाद भाजप सारख्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद रवींद्र चव्हाण त्यामुळे आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने रविंद्र चव्हाणच मोठे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात केली होती तक्रार
67
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 20, 2025 05:01:55
Washim, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर व मुंबई विभागातील संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने एका ‘ओव्हरएज’ खेळाडूला मैदानात उतरविल्याचा गंभीर आरोप मुंबई विभागाच्या प्रशिक्षकांनी केल्यामुळे संभाजीनगरचा संघ आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई संघाच्या म्हणण्यानुसार, संबंधित खेळाडूच्या जन्म दाखल्यात तसेच निर्गम उताऱ्यामध्ये फेरबदल करण्यात आले असून, दस्तऐवजांवरील शाळेचा शिक्का आणि सही योग्यरीत्या उपलब्ध नाही. त्यामुळे कागदपत्रांची विश्वसनीयता संशयास्पद असल्याचे आरोप प्रशिक्षक मनोज पाटील यांनी करत स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, सदर खेळाडू आणि संपूर्ण संघावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकरणावर वाशिमचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे म्हणाले की, सदर खेळाडूने शिक्षण विभागाकडे उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांवर आधारित जन्मतारीख अधिकृतरीत्या बदलण्यात आली आहे, त्यामुळे तो विद्यमान १९ वर्षांखालील गटात खेळण्यासाठी पात्र ठरतो. मात्र, कागदपत्रांत कोणतीही फसवणूक किंवा अनियमितता आढळल्यास त्याच्यावर तसेच संघावर कठोर कारवाई केली जाईल. गरज भासल्यास तीन वर्षांसाठी स्पर्धेतून बाद करण्याची तरतूदही आहे. या संपूर्ण प्रकरणाने राज्यस्तरीय स्पर्धेतील कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या वादाचा सर्वंकष तपास क्रीडा विभागाने करून नेमके तथ्य समोर आणणे गरजेचे आहे.
52
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 20, 2025 04:32:03
Navi Mumbai, Maharashtra:खारघर टेकडी पर चाफेवाडी पाड्यात ग्रामस्थांच्या निदर्शनास बिबट्या दिसून आल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वनविभागाकडून ठोस उपाययोजना करुन बिबटयांना बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। खारघर डोंगरावर विभागाकडून रोप लागवड करण्यात आली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून झाडे मोठी झाल्यामुळे घनदाट जंगलाचे जाळे पसरले आहे। विशेष म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खारघर, Navi Mumbai, रोहिजण आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे। कामाच्या खडखडाटामुळे आश्रयासाठी बिबट्या, कोल्हा आदी वन्यजीव डोंगरावरील जंगलात वास्तव्य करीत असावे अशी चर्चा परिसरात सुरु आहे। चार महिन्यापूर्वी चाफेवाडी कडून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसून आल्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पान थळ जागी सिसिटीव्ही तसेच पायाचे ठसे शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती; परंतु काही निदर्शनास आले नाही. त्यानंतर पुन्हा मंगळवार 18 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता चाफेवाडी पाडा लगत ग्रामस्थांच्या बिबट्या निदर्शनास आल्यामुळे फणसवाडी आणि चाफेवाडी पाड्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबटयांना बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
79
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 20, 2025 04:30:56
Satara, Maharashtra:सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या वाघीण STR T-04 म्हणजेच तारा हिला नियंत्रित पिंजऱ्यातील (Soft Release Enclosure) अनुकूलन पूर्ण केल्यानंतर आज नैसर्गिक जंगलात यशस्वीरीत्या मुक्त करण्यात आले. 18 नोव्हेंबरपासून एनक्लोजरचा दरवाजा उघडा ठेवूनही दोन दिवस तारा ही आतच थांबली होती. अखेर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता वाघीण डौलदारपणे बाहेर पडली आणि जंगलाच्या दिशेने मार्गस्थ झाली. वाघीणीच्या अनुकूलन काळात तिचे वर्तन, शिकार प्रवृत्ती, हालचाल आणि आरोग्य यांचे वन्यजीव तज्ज्ञ आणि WII पथकाने नियमित निरीक्षण केले. तिला पूर्णतः तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. वाघीणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आला असून Satellite Telemetry आणि VHF Tracking द्वारे तिच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.
98
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 20, 2025 04:20:07
186
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 20, 2025 04:18:48
Niphad, Maharashtra:बिबट्याच्या दहशतीमुळे शाळातील पटसंख्या झाली कमी... पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी सुरू केला ' एक काठी स्वसंरक्षणासाठी' उपक्रम..... अँकर IN: निफाड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आल्या असताना, देवगाव येथील एका शाळेने अनोखा उपाय शोधत विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी तयार केलेला हा स्पेशल रिपोर्ट… व्हॉइस-ओव्हर (V/O): नाशिकच्या निफाड तालुक्यात गेल्या महिनाभरात बिबट्याने तब्बल पाच वेळा मानवांवर हल्ले केले. तर पंधरा ते वीस पाळीव प्राण्यांचा बळी घेतला आहे. या हल्ल्यांमुळे पहाटे ते रात्रीपर्यंत नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या दहशतीचा परिणाम थेट शिक्षणावर दिसू लागला. अनेक गावांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शाळांच्या उपस्थितीत मोठी घट झाली होती. पालक मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत नव्हते. अशातच देवगाव येथील शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला — ‘एक काठी स्वसंरक्षणासाठी’. विद्यार्थ्यांना शाळेत येताना हातात काठी देण्यात येते, तसेच त्यांना स्वसंरक्षणाचे साधे तंत्र शिकवले जात आहे. बाईट:शिक्षक V/O (Visuals: काठी घेऊन जाणारे विद्यार्थी) या उपक्रमाचा अनपेक्षित सकारात्मक परिणाम दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुन्हा वाढ झाली आहे. V/O (Visuals: पिंजरा, बिबट्या पकडतानाचे फुटेज/फोटो) काही दिवसांपूर्वी याच शाळेच्या आवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले होते. तर दोन दिवसांपूर्वी एका शिक्षकावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. बाईट: स्थानिक नागरिक बाईट :- विद्यार्थी व विद्यार्थिनी, अँकर OUT: एकीकडे बिबट्याचे वाढते हल्ले… आणि दुसरीकडे गावकऱ्यांची व शिक्षकांची धैर्याने केलेली तोंड देण्याची तयारी. देवगाव शाळेचा ‘एक काठी’ उपक्रम हा तात्पुरता उपाय असला तरी, सुरक्षिततेसाठी पावले उचळण्याचा तो एक प्रयत्न आहे. निफाड सह राज्यातील बिबट्यांची संख्या आणि दहशत कधी नियंत्रणात येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
109
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 20, 2025 04:17:27
134
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 20, 2025 04:16:58
Shirdi, Maharashtra:पक्ष विरोधी कारवाई केल्याने पक्षातून हकालपट्टी... उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निष्ठावान सैनिकांची हकालपट्टी... पक्षाने हकालपट्टी केल्याने शिवसैनिकांच्या डोळ्यात आश्रू.... पत्रकार परिषदेत शिवसैनिक ढसाढसा रडले... राहाता नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे , माजी नगरसेवक सागर लुटे , उज्ज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी... नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र पठारे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार... तर लुटे आणि सौ.होले नगरसेवक पदाचे उमेदवार... महाविकास आघाडीत सामिल न होता पक्षाचा एबी फॉर्म भरल्याने कारवाई... एबी फॉर्म चोरल्याचा अनिल देसई यांचा पदाधिका-यांवर आरोप... राहाता - शिर्डी ठाकरे सेनेत बाळासाहेब थोरात यांचा मोठा हस्तक्षेप... ही ठाकरे सेना नाही तर KT सेना ( कोल्हे - थोरात सेना ) पठारे यांचा घणाघाची आरोप... गेल्या 30 वर्षापुंर राजेंद्र पठारे हे निष्ठावान शिवसैनिक.... जिल्हा उपप्रमुखासह अनेक पदे भुषवलीत.. विखे समर्थकांनी माझे घर जाळले , आंदोलनात अनेक केसेस अंगावर घेतल्या मात्र पक्ष सोडला नाही... निष्ठावान शिवसैनिकांना असा न्याय मिळत असेल तर ते अयोग्य... जिल्हयातील ठाकरे सेना संपवण्याचा थोरातांचा डाव... राजेंद्र पठारे यांची थोरातांवर घणाघाती टिका... bite - राजेंद्र पठारे , माजी उपनगराध्यक्ष
167
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 20, 2025 04:15:53
141
comment0
Report
Advertisement
Back to top