Back
बिबट्या आतंक से स्कूलों में भय, देवगांव स्कूल ने एक लाठी से सुरक्षा बढ़ाई
SKSudarshan Khillare
Nov 20, 2025 04:18:48
Niphad, Maharashtra
बिबट्याच्या दहशतीमुळे शाळातील पटसंख्या झाली कमी... पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी सुरू केला ' एक काठी स्वसंरक्षणासाठी' उपक्रम..... अँकर IN: निफाड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आल्या असताना, देवगाव येथील एका शाळेने अनोखा उपाय शोधत विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी तयार केलेला हा स्पेशल रिपोर्ट… व्हॉइस-ओव्हर (V/O): नाशिकच्या निफाड तालुक्यात गेल्या महिनाभरात बिबट्याने तब्बल पाच वेळा मानवांवर हल्ले केले. तर पंधरा ते वीस पाळीव प्राण्यांचा बळी घेतला आहे. या हल्ल्यांमुळे पहाटे ते रात्रीपर्यंत नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या दहशतीचा परिणाम थेट शिक्षणावर दिसू लागला. अनेक गावांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शाळांच्या उपस्थितीत मोठी घट झाली होती. पालक मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत नव्हते. अशातच देवगाव येथील शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला — ‘एक काठी स्वसंरक्षणासाठी’. विद्यार्थ्यांना शाळेत येताना हातात काठी देण्यात येते, तसेच त्यांना स्वसंरक्षणाचे साधे तंत्र शिकवले जात आहे. बाईट:शिक्षक V/O (Visuals: काठी घेऊन जाणारे विद्यार्थी) या उपक्रमाचा अनपेक्षित सकारात्मक परिणाम दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुन्हा वाढ झाली आहे. V/O (Visuals: पिंजरा, बिबट्या पकडतानाचे फुटेज/फोटो) काही दिवसांपूर्वी याच शाळेच्या आवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले होते. तर दोन दिवसांपूर्वी एका शिक्षकावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. बाईट: स्थानिक नागरिक बाईट :- विद्यार्थी व विद्यार्थिनी, अँकर OUT: एकीकडे बिबट्याचे वाढते हल्ले… आणि दुसरीकडे गावकऱ्यांची व शिक्षकांची धैर्याने केलेली तोंड देण्याची तयारी. देवगाव शाळेचा ‘एक काठी’ उपक्रम हा तात्पुरता उपाय असला तरी, सुरक्षिततेसाठी पावले उचळण्याचा तो एक प्रयत्न आहे. निफाड सह राज्यातील बिबट्यांची संख्या आणि दहशत कधी नियंत्रणात येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
109
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 05:06:3864
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:06:2796
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 05:05:1432
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:04:0067
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 05:01:5555
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 05:00:4240
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 20, 2025 04:45:34112
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 04:32:03132
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 20, 2025 04:30:56150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 04:20:07186
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 20, 2025 04:17:27134
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 04:16:58167
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 04:15:53141
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 04:07:5871
Report