Back
केडीएमसी के ठेकेदार मजदूरों का वेतन रुकना, शहर में कचरा जमा
ABATISH BHOIR
Mar 18, 2026 08:50:41
Kalyan, Maharashtra
केडीएमसी अंतर्गत कचरा उचलणाऱ्या सुमित कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे वेतन रखडल्याने शहरातील कचरा व्यवस्थापन यंत्रणा ठप्प होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. अचानक पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आजच पगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, पगार न मिळाल्यास उद्यापासून एकही कचरा गाडी रस्त्यावर उतरू देणार नाही, असा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.
केडीएमसी हद्दीत कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन पुन्हा एकदा रखडल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली. वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ कामगारांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारल्याने सकाळपासूनच शहरातील कचरा उचलण्याची संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली.या आंदोलनाचा फटका नागरिकांना बसला असून शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. विशेषतः डोंबिवली-ठाकुरली परिसरात परिस्थिती गंभीर बनली असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान, लोकनेते पुंडलिकशेठ म्हात्रे संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यानंतर कामगार संघटनेचे पदाधिकारी, भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे और केडीएमसीचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सुमित कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेनंतर आजच कामगारांचा पगार देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले.या आश्वासनानंतर कामगारांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले असले तरी, आज पगार न मिळाल्यास उद्यादून एकही कचरा गाडी रस्त्यावर येऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे. तसेच पुढील काळातदर महिन्याच्या दहाव्या तारखेपर्यंत पगार न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
उपायुक्त घनकचरा विभाग
यावेळी केडीएमसी प्रशासनानेही सुमित कंपनीला कडक शब्दांत इशारा दिला. कामगारांना वेळेवर वेतन देणे ही कंपनीची जबाबदारी असून त्यात कसूर झाल्यास पुढील महिन्यापासून कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त रामदास कोकरे यांनी स्पष्ट केले. तसेच पालिकेला वेळेवर बिल न सादर करता कामगारांना वेतन न देणे आणि अशा प्रकारे कामबंद आंदोलन घडवून आणणे सहन केले जाणार नाही, असेही घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले आहे.एकूणच, या संपूर्ण प्रकारामुळे केडीएमसीच्या कचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:02:440
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 09:39:181005
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 09:38:53887
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 18, 2026 09:31:59929
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 09:31:08908
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 09:20:40939
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 08:50:06951
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 08:49:461062
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 08:37:111059
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 18, 2026 08:18:281027
Report
KPKAILAS PURI
FollowMar 18, 2026 07:50:021091
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 07:05:541093
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 07:03:211002
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 06:48:031071
Report