Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
बेपत्ता माजी सरपंच के पीछे प्रशासन की ढिलाई, कोल्हापुर में उबाल
PNPratap Naik1
Mar 09, 2026 09:36:18
Kolhapur, Maharashtra
भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून अद्यापही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संविधान हक्क संघर्ष समितीाच्या वतीने कोल्हापुरातील दसरा चौकात निदर्शन झाले. या आंदोलनात महेश पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ आणि प्रभावी तपास करावा, तसेच महेश पिळणकर यांचा शोध लावावा या मागणीसाठी संविधान हक्क संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूरातील दसरा चौकात निदर्शने करण्यात आली. आंदोलनात पिळणकर कुटुंबीयांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनात महेश पिळणकर यांचा मुलगा पारस पिळणकर देखील उपस्थित होता. वडिलांचा शोध लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होतेय का असा सवाल ठाकरे सेनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस पक्षाच्या माजी सरपंच दोन महिने गायब आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाने देखील आवाज उठवावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान पिळणकर यांचे कुटुंबीय आणि आंदोलकांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तातडीने चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली. यावेळी कोल्हापुरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महेश पिळणकर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं सांगत कुटुंबीयांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. महेश पिळणकर यांचे नेमकं काय झाले याचे उत्तर कुटुंबीयांकडे नाही, त्यामुळे दररोज कुटुंबीय त्याची वाट पहात आहेत. पोलीस मात्र तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं सांगत लवकरच महेश पिळणकरांचा शोध घेऊ अस अस्वासन देत आहेत.. पण पोलिसांनी कसव वतीने तपास न करता युद्ध पातळीवर महेश पिळणकर याचे काय झाले ? याचा शोध घेतला पाहिजे. अन्यथा त्यांच्या गायब होण्याचे गूढ वाढतच जाईल.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Mar 09, 2026 12:15:33
Baramati, Maharashtra:बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयास दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने देण्यात आलेल्या निर्णयाच्या बारामतीतल्या नेत्यांच्या युक्तिवादाचे विस्तार रुजला. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी कडाडून विरोध व्यक्त केला. या महाविद्यालयाला 2024 मध्ये राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्यात आले होते, परंतु यामध्ये छेडछाड झाली तर तीव्र आंदोलनाची धमकी देण्यात आली. बारामतीत धनगर समाजाच्या नेत्यांनी या प्रकरणाला वेगवेगळे विचार व्यक्त केले. बारामतीत काही नेते आणि समाजघटक या निर्णयाला पाठिंबा देत आहेत, तर काहींनी विरोध दर्शवला.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 09, 2026 11:51:14
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव–कोटमगाव रोडवरील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. उपकेंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वाळलेल्या गवताला आग लागून ती वेगाने पसरली होती. घटनेची माहिती मिळताच लासलगाव येथील सिद्धवीर हनुमान अग्निशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाने तत्पर कारवाई करत आग आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. उपकेंद्र परिसरात सुमारे १६३० सोलर पॅनल बसविण्यात आले असून आगीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती; मात्र वेळीच आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत वीज वितरण कंपनीचे किरكوळ नुकसान झाल्याची माहिती समोर आली.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 09, 2026 11:35:37
Junnar, Pune, Maharashtra:युद्धाचा फटका साखर उद्योगाला ही बसला असून आखाती देशातील साखर निर्णात ठप्प झाल्याने साखरेचे बाजारभाव किलोमागे चार ते पाच रुपयांनी गडगडलेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणी ही घटली असून साखरेला उठाव नाही तर दुसरीकडे यावर्षी साखर कारखान्यांना ऊस गाळपा साठी कमी प्रमाणात आल्याने साखरेचे गाळप ही कमी झालंय तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे,सततच्या पावसामुळे ऊसाचं वजन घटल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय साखर कारखान्यांना ही रिकवरी हि कमी प्रमाणात मिळाल्याने साखरेचं आर्थिक गणितचं कोलमडलं असून साखर उद्योग संकटात आल्याचं विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी म्हटलंय याच संदर्भात त्यांच्या शी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 09, 2026 11:35:24
Dhule, Maharashtra:नंदुरबार शहरातील शिवसेना शिंदे गट एक सुप्त शीतयुद्धाच्या अडकत चालला आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे. नंदूरबारात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर ऐट्रोसिटीचा गुन्हा महिन्याभरात दुसऱ्यांदा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या शिवसेना शिंदे गटाचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू रवींद्र चौधरी यांच्यावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काहीही संबंध नसताना राजकीय सूडभावने हे गुन्हा दाखल होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते करीत आहेत. पोलीस प्रशासनाची चुप्पी मात्र पडद्या मागे कोण आहे हे सांगत आहे. भाजपाला झोबीपछाड देत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता आणली. भाजपाला धक्का देत शिवसेनेचा हा विजय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जिव्हारी लागला. त्यानंतर उपनगरध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि शिवसेना शिंदे गटामागे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु झाले. आता पुन्हा बाबा रिसॉर्ट येथे झालेल्या चौधरी समाजाच्या कार्यक्रमात अनुसूचित जातीच्या महिलेचा अपमान करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांवर करण्यात आला आला आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . तक्रारदार महिला उपनगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर एट्रोसिटी चे गुन्हा दाखल झाला आहे.. उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी आणि नगरसेवक गौरव चौधरी यांच्यावर दोन महिन्यांपूर्वीही एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातच पुन्हा एकदा गुन्हा नोंद झाल्याने नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सध्या भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा राजकीय सामना आहे. त्यातूनच हे घडत आहे का? भाजपच्या अदृश्य शक्ती शिंदे गटाच्या नेत्या-यांना टार्गेट करताय का ? असे प्रश्न जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. येणाऱ्या काळात शिंदे गटाच्या नेत्यांना अश्याच पद्धतीने पुन्हा पुन्हा अडचणीत आणले गेले तर येणाऱ्या काळात हा संघर्ष शिगेला पोहचेल असे दिसत आहे. पोलीस यंत्रणेला देखील हे राजकीय युध्य असल्याची जाणीव आहे, मात्र गुन्हा दाखल करून घेणे आणि तपास करणे ही त्यांची चौकट आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा या गुन्हांबद्दल काही बोलायला तयार नाही. पोलीस यंत्रणा यां राजकीय सुप्त संघर्षातून आरोपीचे धनी होत आहेत.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 11:35:00
Jalna, Maharashtra:जालना | लक्ष्मण हाके यांच्या बारामती येथे सुरूलेल्या आंदोलनाला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या पाठिंबाला घेणे... राजमाता अहिल्यादेवीं होळकर यांचे नाव पुसू देणार नाही... मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला स्व. अजीत पवार यांच्या नाव देण्याच्या हालचालीला विरोध.. पालकमंत्री पंकजा मुंडे यांना दिला गेला मोलाचा सल्ला, अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, वडिलांचा वारसा जपा - वाघमारे ओबीसी नेते अँकर- बारामती येथे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनात कारण या रुग्णालयाला आणि मेडिकल कॉलेजला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिलेले आहे, परंतु राज्य सरकार हे नाव मिटवून या ठिकाणी स्वर्गीय अजित पवार यांच्या नाव देण्याच्या हालचालीत आहे, हे प्रकरण प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या कानावर पडल्याच त्यांनी लोकशाही मार्गाने या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव पुसण्याला विरोध केला असून राजमाता अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण गोरगरिबांच्या तसेच जनतेच्या मनातील राजमाता आहे, त्यामुळे तेांचे नाव कदापि आम्ही उठवू देणार नाही, असा इशारा देत त्यांनी आंदोलन केले असून या आंदोलनाला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पाठिंबा दिलेला आहे. तसेच मनोज जरांगे यांनी शिंदे समितीवर आणि राज्यातील अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे, कारण या समितीकडून तसेच अधिकाऱ्यांकडून मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी दिरंगाई केली जात आहे, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, मात्र या पाचवी नापास मनोज जरांगेला कुठलाही कायद्याचा अभ्यास नाही , अधिकाऱ्यांना संवैधानिक मार्गाने आपली नोकरी करावी लागते, त्यामुळे अधिकारी आणि शिंदे समिती ही संविधानावर चालणारी समिती आहे, मात्र जरांगे हा जाणून-बुजून यामध्ये दुजाभाव तयार करून राज्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, असा टोला सुद्धा यावेळी त्यांनी जरांगेंना लगावला आहे.. नुकताच औरंगाबाद खंडपीठाने जालना डीपीटीसीत मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली आहे.जालनाच्या जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांना नोटीसा सुद्धा बजावले आहे,या नोटिसा अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे तसेच घेवरेपणामुळे आलेले आहे, त्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाकडे थोडे लक्ष द्यावे तसेच आपल्या लोकनेते वडिलांची वारसा जपावा, असा सल्ला सुद्धा यावेळी त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना दिला आहे..
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 09, 2026 11:30:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यातील अध्यात्मिक नगरी पैठण येथे नाथषष्ठी निमित्त लाखो वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या असून संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे. नाथसंप्रदायाचे संत संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळामुळे श्रीक्षेत्र पैठणला विशेष धार्मिक महत्त्व आहे. नाथषष्ठी निमित्त दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात वारकरी आणि भाविकांची गर्दी उसळते. यंदाही राज्यभरातून शेकडो दिंड्या टाळ-मृदंगाच्या गजरात पैठणमध्ये दाखल झाल्या आहेत. वारकऱ्यांच्या मुखी हरिनाम, हातात भगवे पताके आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून पाणी, आरोग्य आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 09, 2026 10:34:47
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात नशेखोर तरुणांचा सफाई कामगारावर चाकुने हल्ला , हल्ल्यात सफाई कामगाराचा मृत्यू सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद क CAMP क्रमांक ३ मध्ये ही धक्का दायक घटना घडली आहे. महादू जगताप असे त्या मृत कामगाराच नाव असून तो कोणार्क इन्व्हायरो कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. पॅनल क्रमांक ११ मध्ये कामावर असताना ही घटना घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 09, 2026 10:33:56
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा घेऊन तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. - एक लाख रुपये द्या अन तीन लाख रुपये मिळवा - होय ही ऑफर ऐकून तुम्ही देखील चक्रावलात ना ? - एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्यास तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणारी टोळी गजाआड - बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचे राज्यात रॅकेट ? ... सोलापूरात पोलिसांना देखील चक्रावून टाकणारी घटना समोर आलीय. एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्यानंतर त्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आम्हीच दाखवणाऱ्या टोळीला सोलापूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ... एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणारी टोळी सोलापुरात सक्रिय होत असतानाच शहर पोलिसांनी घटनेचे वेळीच गांभीर्य ओळखात दोघा जणांना अटक केलीय. पोलिसांच्या माहितीनुसार संशयीतांनी बनावट नोटा पांढऱ्या कागदावर कलर झेरॉक्स केल्या. दोन कागद एकमेकांना चिकटवून हुबेहूब नोटा तयार करण्यात अल्या होत्या. जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना त्या नोटा खराच वाटल्या पाहिजेत अशी पुरेपूर काळजी या प्रक्रियेत घेण्यात आली होती. नोटांवर सिरीयल क्रमांक होता पुढच्या आणि मागच्या बाजूला कलर झेरॉक्स असलेल्या 300 हून अधिक कागदाच्या पती सापडल्या आहेत. एकूण 1 लाख 10 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जपत केल्या आहेत. बनावट नोटा चलनात आणण्यात प्रयत्नात असलेल्या राजू चोरमोले आणि अतुल तावरे या दोघांना जेलरोड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आलाय. बाईट - एम. राजकुमार ( पोलीस आयुक्त सोलापूर शहर ) सदरच्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील व्यापारी चांगलेच धास्तावले असून या बनावट नोटांचे बळी आपण तरी नाही ना? अशी भिती त्यांच्या मनात निर्माण झालीय. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांची सिरीज जाहीर करण्याची मागणी चेंबूर ऑफ कॉमर्सच्या वतीने करण्यात आलीय. अत्यंत गंभीर प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणल्याबद्दल सोलापूर शहर पोलिसांचे अभिनंदन करत व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाईट - राजू राठी ( अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सोलापूर ) सध्या सदर प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अशा पद्धतीच्या बनावट नोटा त्यांनी कोणाकोणाला दिल्या आहेत ? सदरच्या रॅकेटमध्ये आणखीन कोणा कोणाचा हात आहे ? त्या पुढे कुठे चलनात गेल्या का? त्यांचे पुढे काय झाले? या सर्व बाबींचा सोलापूर शहर पोलीस कसून तपास करीत आहेत. End P2C अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 10:01:31
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... छावणी परिसरातील घराला भीषण आग अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात एका घराला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. घराच्या तिसऱ्या मजल्यावर मंडपासाठी लागणारे कपडे आणि डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने मोठा भडका घेतला आणि आगीचे लोट बाहेर पडताना दिसत होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे तसेच यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 09, 2026 09:55:55
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिले में पिछले बारह महीनों में पुलिस ने गावठी पिस्तुलें और जिंदा कारतूस बड़ी मात्रा में जपत किए हैं। अपराधियों के द्वारा गावठी पिस्तुलों का इस्तेमाल बढ़ रहा है, और औसतन हर महीने रिकॉर्डेड अपराधियों के कब्जे से दो पिस्तुलें बरामद हो रही हैं, जिससे चिंता बढ़ी है। पुलिस कार्रवाइयों के बावजूद यह सवाल बना हुआ है कि यह गावठी पिस्तुलें कहां से आ रही हैं और कौन सप्लाई कर रहा है, इसका स्पष्ट उत्तर अभी तक नहीं मिल रहा। बड़े पैमाने पर हथियार-सामग्री बरामद होने से नागरिकों में भी भय और चिंता है। हालिया घटनाओं में इचलकरंजी शहर के एक मामले में एक आरोपी के साथ गोलीबारी का आरोप सामने आया। पुलिस ने कुख्यात शस्त्र तस्कर को भी गिरफ्तार किया, जिससे जप्त किए गए हथियारों के तस्करी से जुड़े मुद्दे सामने आए हैं। इसके साथ ही अन्य मामलों में भी गावठी पिस्तुलों, जिंदा कारतूस और घातक शस्त्र रखने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग तेज है।
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 09, 2026 09:55:27
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या रेती घाटां वर नियमबाह्य रेतीचा उपसा होत असल्याचा प्रकार पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बंसल यांनी उघडकीस आणला आहे. पोलीस व महसूल पथकाला सोबत घेऊन त्यांनी वडकी परिसरातील वर्धा नदीच्या रोहिणी घाटावर संयुक्त धाड मारली. खाजगी वाहनाने जात मारलेल्या या छाप्यात रेती वाहतूक करणारे 11 ट्रक, रेती उपसा करणाऱ्या दोन बोटी, दोन पोकलेन मशिन अशी एक कोटी 42 लाख रुपये किमतीची वाहने जप्त केली. या प्रकरणी 20 जणांवर वडकी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यात उमरखेड, वणी, बाभूळगाव, आर्णी येथील अनेक घाटांवर नियमांची ऐसी तैशी करून बेसुमार रेतीचा उपसा करून त्याचा साठा केल्या जात असतानाच झालेल्या या एका कारवाईमुळे रेती माफीयांचे धाबे दणाणले आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 09, 2026 09:49:22
Akola, Maharashtra:राज्यसभा आणि विधान परिषदेसारखेच महापालिकेतही विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याची तरतूद आहे. साहित्य, कला, विज्ञान ,सहकार, सामाजिक कार्य, वैद्यकीय, शिक्षण, अभियांत्रिकी किंवा विधी क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्त करता येते. मात्र अकोला महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत या निकषांचे पालन झाले आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अकोला महानगरपालिकेच्या विशेष सभेत आठ स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. या पदांसाठी एकूण 19 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी भाजपप्रणीत शहर सुधार आघाडीकडून अॅड. देवाशिष काकड, माजी नगरसेवक गिरीश गोखले, सामाजिक कार्यकर्त्या चंदा शर्मा आणि माजी नगरसेवक सुनील मेश्राम यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी आज निवड निश्चित झाली आहे. काँग्रेसकडून सामाजिक कार्यकर्ते आकाश कवडे आणि काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे निकटवर्तीय इलियास खान उर्फ गुड्डू पठाण यांची निवड करण्यात आली. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून काँग्रेसमधून काही महिन्या पूर्वी प्रवेश केलेल्या शंकर लंगोटे यांना संधी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने बांधकाम व्यावसायिक सुनील इन्नानी यांना उमेदवारी देत त्यांची निवड केली. पक्षांच्या शिफारशींनुसार अर्ज पात्र ठरल्याने या आठही स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा सभेत करण्यात आली.मात्र या निवडीवरून काही पक्षांमध्ये नाराजीही उफाळून आली आहे. शिवसेना (उबाठा) मध्ये उमेदवारी न मिळाल्याने सुमारे 25 पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.तर काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनाम दिला आहे.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने बांधकाम व्यावसायिकाला उमेदवारी दिल्याने शहरात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 09, 2026 09:46:31
Kalyan, Maharashtra:कल्याण जवळील द्वारली पाडा येथील गुरचरण जमिनीवर भूमाफियांचे अतिक्रमण आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तक्रार देऊन प्रशासन लक्ष देत नसल्याने अखिल संतप्त शेतकरी स्थानिक नागरिकांनी म्हैस घेऊन KDMC आयप्रभाग कार्यालयासमोर आंदोलन केले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध करण्यात आला. सात दिवसांच्या आत कारवाई केली नाही तर आयुक्ताच्या घराबाहेर म्हशीचा ताबेला सुरु करणार असल्याचा इशारा देण्यात आला. कल्याणपूर्वेतील गुरांच्या चरण्यासाठी राखीव असलेल्या गुरचरण जमिनीवर अतिक्रमण करून अनेक चाळी उभारल्यामुळे या भागातील शेतकरी आणि तबेला चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या अतिक्रमणामुळे गुरांना खाण्यासाठी जागा उरली नसल्याने आता गुरे कुठे चारायची असा प्रश्न उपस्थित झाला. महानगरपालिका आणि तहसीलदार कार्यालयाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी आणि स्थानिक रहिवासी मार्गदर्शनाखालीर सौरभ पांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. त्यांनी एक म्हैस घेऊन केडीएमसीच्या आयप्रभाग कार्यालयावर धडक आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान एका म्हशीच्या पाठीवर “KDMC कमिशनर” असे लिहिण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” असे टी-शर्ट परिधान केले. त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात म्हशीकडून अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सात दिवसांच्या आत गुरचरण आणि शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्यास तबेल्यातील सर्व म्हशी आयुक्तांच्या बंगल्यावर नेऊन तिथेच तबेला सुरू करणे असे इशारे देण्यात आले.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 09, 2026 09:21:39
Malegaon, Maharashtra:राज्य के बजट में वस्त्र उद्योग को कुछ भी राहत नहीं मिली, मालगांव टेक्सटाइल हब में नाराजगी फैल गई। पिछले दौर में टेक्सटाइल मंत्री चंद्रकांत पाटील ने मालगांव का दौरा कर बड़े आश्वासनों की रेखा खींची थी, पर उद्योगपतियों और मजदूरों के लिए अभी तक कुछ भी ठोस नहीं मिला। हर साल करोड़ों रुपए GST टेक्सटाइल उद्योग के जरिये सरकार को जाते हैं, पर कारखानेदारों और मजदूरों को उसी अनुपात में सुविधाएं नहीं मिल रहीं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार ने अर्थसंकल्प में यंत्रमाग उद्योग को कोई रियायत नहीं दी, जिससे मालगांव के कारखानेदारों में नाराजी है। बजट में स्पिनिंग मिल्स के लिए सुविधाओं की मांग तो की गई है, लेकिन पावरलूम कारखानों और मजदूरों को अभी भी पर्याप्त राहत नहीं मिली है। बिजली के मीटर में परिवर्तन के कारण बिल बढ़ने जैसी परेशानियाँ भी सामने आ रही हैं।
0
comment0
Report
Advertisement
Back to top