Back
कल्याण के द्वारली पाडा में भूमाफियाओं ने अतिक्रमण, किसानों-तबेला चालक का उग्र आंदोलन
ABATISH BHOIR
Mar 09, 2026 09:46:31
Kalyan, Maharashtra
कल्याण जवळील द्वारली पाडा येथील गुरचरण जमिनीवर भूमाफियांचे अतिक्रमण आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तक्रार देऊन प्रशासन लक्ष देत नसल्याने अखिल संतप्त शेतकरी स्थानिक नागरिकांनी म्हैस घेऊन KDMC आयप्रभाग कार्यालयासमोर आंदोलन केले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध करण्यात आला. सात दिवसांच्या आत कारवाई केली नाही तर आयुक्ताच्या घराबाहेर म्हशीचा ताबेला सुरु करणार असल्याचा इशारा देण्यात आला. कल्याणपूर्वेतील गुरांच्या चरण्यासाठी राखीव असलेल्या गुरचरण जमिनीवर अतिक्रमण करून अनेक चाळी उभारल्यामुळे या भागातील शेतकरी आणि तबेला चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या अतिक्रमणामुळे गुरांना खाण्यासाठी जागा उरली नसल्याने आता गुरे कुठे चारायची असा प्रश्न उपस्थित झाला. महानगरपालिका आणि तहसीलदार कार्यालयाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी आणि स्थानिक रहिवासी मार्गदर्शनाखालीर सौरभ पांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. त्यांनी एक म्हैस घेऊन केडीएमसीच्या आयप्रभाग कार्यालयावर धडक आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान एका म्हशीच्या पाठीवर “KDMC कमिशनर” असे लिहिण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” असे टी-शर्ट परिधान केले. त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात म्हशीकडून अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सात दिवसांच्या आत गुरचरण आणि शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्यास तबेल्यातील सर्व म्हशी आयुक्तांच्या बंगल्यावर नेऊन तिथेच तबेला सुरू करणे असे इशारे देण्यात आले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 10:34:470
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 09, 2026 10:33:560
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 10:01:310
Report
PNPratap Naik1
FollowMar 09, 2026 09:55:550
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 09, 2026 09:55:270
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 09:49:220
Report
PNPratap Naik1
FollowMar 09, 2026 09:36:180
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 09, 2026 09:21:390
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 09:21:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 09, 2026 09:20:560
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 09:17:480
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 09, 2026 09:16:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 09:09:030
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 09:05:140
Report