Back
अकोला नगर निगम में आठ स्वीकृत नगरसेवक चयन, विभिन्न दलों में नाराजगी
JJJAYESH JAGAD
Mar 09, 2026 09:49:22
Akola, Maharashtra
राज्यसभा आणि विधान परिषदेसारखेच महापालिकेतही विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याची तरतूद आहे. साहित्य, कला, विज्ञान ,सहकार, सामाजिक कार्य, वैद्यकीय, शिक्षण, अभियांत्रिकी किंवा विधी क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्त करता येते. मात्र अकोला महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत या निकषांचे पालन झाले आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अकोला महानगरपालिकेच्या विशेष सभेत आठ स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. या पदांसाठी एकूण 19 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी भाजपप्रणीत शहर सुधार आघाडीकडून अॅड. देवाशिष काकड, माजी नगरसेवक गिरीश गोखले, सामाजिक कार्यकर्त्या चंदा शर्मा आणि माजी नगरसेवक सुनील मेश्राम यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी आज निवड निश्चित झाली आहे. काँग्रेसकडून सामाजिक कार्यकर्ते आकाश कवडे आणि काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे निकटवर्तीय इलियास खान उर्फ गुड्डू पठाण यांची निवड करण्यात आली. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून काँग्रेसमधून काही महिन्या पूर्वी प्रवेश केलेल्या शंकर लंगोटे यांना संधी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने बांधकाम व्यावसायिक सुनील इन्नानी यांना उमेदवारी देत त्यांची निवड केली.
पक्षांच्या शिफारशींनुसार अर्ज पात्र ठरल्याने या आठही स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा सभेत करण्यात आली.मात्र या निवडीवरून काही पक्षांमध्ये नाराजीही उफाळून आली आहे. शिवसेना (उबाठा) मध्ये उमेदवारी न मिळाल्याने सुमारे 25 पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.तर काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनाम दिला आहे.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने बांधकाम व्यावसायिकाला उमेदवारी दिल्याने शहरात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 10:34:470
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 09, 2026 10:33:560
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 10:01:310
Report
PNPratap Naik1
FollowMar 09, 2026 09:55:550
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 09, 2026 09:55:270
Report
ABATISH BHOIR
FollowMar 09, 2026 09:46:310
Report
PNPratap Naik1
FollowMar 09, 2026 09:36:180
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 09, 2026 09:21:390
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 09:21:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 09, 2026 09:20:560
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 09:17:480
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 09, 2026 09:16:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 09:09:030
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 09:05:140
Report