Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

नंदूरबार में शिवसेना शिंदे गट के नेताओं पर एट्रोसिटी केस: राजनीतिक संघर्ष और गरमाहट

PPPRASHANT PARDESHI
Mar 09, 2026 11:35:24
Dhule, Maharashtra
नंदुरबार शहरातील शिवसेना शिंदे गट एक सुप्त शीतयुद्धाच्या अडकत चालला आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे. नंदूरबारात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर ऐट्रोसिटीचा गुन्हा महिन्याभरात दुसऱ्यांदा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या शिवसेना शिंदे गटाचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू रवींद्र चौधरी यांच्यावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काहीही संबंध नसताना राजकीय सूडभावने हे गुन्हा दाखल होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते करीत आहेत. पोलीस प्रशासनाची चुप्पी मात्र पडद्या मागे कोण आहे हे सांगत आहे. भाजपाला झोबीपछाड देत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता आणली. भाजपाला धक्का देत शिवसेनेचा हा विजय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जिव्हारी लागला. त्यानंतर उपनगरध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि शिवसेना शिंदे गटामागे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु झाले. आता पुन्हा बाबा रिसॉर्ट येथे झालेल्या चौधरी समाजाच्या कार्यक्रमात अनुसूचित जातीच्या महिलेचा अपमान करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांवर करण्यात आला आला आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . तक्रारदार महिला उपनगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर एट्रोसिटी चे गुन्हा दाखल झाला आहे.. उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी आणि नगरसेवक गौरव चौधरी यांच्यावर दोन महिन्यांपूर्वीही एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातच पुन्हा एकदा गुन्हा नोंद झाल्याने नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सध्या भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा राजकीय सामना आहे. त्यातूनच हे घडत आहे का? भाजपच्या अदृश्य शक्ती शिंदे गटाच्या नेत्या-यांना टार्गेट करताय का ? असे प्रश्न जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. येणाऱ्या काळात शिंदे गटाच्या नेत्यांना अश्याच पद्धतीने पुन्हा पुन्हा अडचणीत आणले गेले तर येणाऱ्या काळात हा संघर्ष शिगेला पोहचेल असे दिसत आहे. पोलीस यंत्रणेला देखील हे राजकीय युध्य असल्याची जाणीव आहे, मात्र गुन्हा दाखल करून घेणे आणि तपास करणे ही त्यांची चौकट आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा या गुन्हांबद्दल काही बोलायला तयार नाही. पोलीस यंत्रणा यां राजकीय सुप्त संघर्षातून आरोपीचे धनी होत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 09, 2026 13:18:50
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात कचरा टाकण्याचा वाद विकोपाला सफाई कामगाराची चाकू मारून केली हत्या पतीची हत्या तर पत्नीने केली आत्महत्या आरोपीला पोलिसांनी केली अटक Anchor घरातील कचरा इकडे तिकडे टाकू नकोस असे सांगितल्यावर कचरा टाकणारा आणि सफाई कर्मचारी यांच्यात नेहमी वाद होत होता. सोमवारी देखील हाच प्रकार घडला. नेहमी रागाने का बघतोस ? का वाद घालतोस? यावरुन कचरा टाकणाऱ्या दुर्गेश गुप्ता नावाचा व्यक्तीने कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप याची धारदार शस्त्राने हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. उल्हासनगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी दुर्गेश गुप्ता याला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे सफाई कामगार महादू याच्या हत्येची माहिती मिळताच महादूची पत्नी पूर्वी जगताप हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जगताप यांना दोन मुले आहेत. वडिलांची हत्या आणि आईची आत्महत्येमुळे दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. कचरा टाकणाच्या वादातून दोघांचा जीव गेल्याने जगपात कुटुंब उद्धवस्त झाले आहे. Byte सचिन काळे पोलीस उपयुक्त उल्हासनगर परिमंडळ 4 चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 09, 2026 13:01:39
Akola, Maharashtra:अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दीड वर्षाच्या चिमुकलीला पळवून नेण्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवत काही तासांतच आरोपीच्या तावडीतून चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर उर्फ फुलसिंग सोलंकी (वय ३०, रा. शाहूपूर, जिल्हा बुरहानपूर, मध्यप्रदेश) हा अकोल्यातील केळकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज सकाळी चारच्या सुमारास हॉस्पिटलमधून दीड वर्षाच्या मुलीला कोणालाही न सांगता सोबत घेऊन निघून गेला. यादव मुलीच्या आईने रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अकोट रोड परिसरातून त्याला ताब्यात घेत चिमुकलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले,पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 09, 2026 12:50:27
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 09, 2026 12:32:08
Satara, Maharashtra:सातारा: सातारातील एका शाळेतील हॉस्टेलमधील केयर टेकर कडून मुलांचा लैंगिक आणि मानसिक छळाचा आरोप झाल्यामुळे खळबळ उडाली असून यामध्ये संशयित आरोपी ऋषिकेश सुभाष चव्हाण याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. या घटनेत शाळेत सुरुवातीला तीन मुलांवर लैंगिक छळाचा प्रयत्न झाल्याची नोंद झाल्याने पोलीस तपासामध्ये 24 मुलांवर लैंगिक व मानसिक छळ झाला असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले. या प्रकरणात शाळा प्रशासनाने बोलण्यास नकार दिला आहे
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 09, 2026 12:31:49
Pimpri-Chinchwad, Maharashtra:लग्नासाठी माझ्यावर बळजबरी झाली नसली तरी मला प्रेमामध्ये संमोहित करण्यात आलं होतं आणि त्या संमोहनामध्ये मी माझ्या मर्जीने लग्न केले तरीही हा एक लव जिहाचाच प्रकार असल्याचं नुकत्याच हिंदू धर्मात घर वापसी केलेल्या अभ्यास सुर्वे हिने स्पष्ट केलं आहे... लग्न झाल्यानंतर घरामध्ये हिंदू रीत्या रिवाजाने वागण्याचा प्रयत्न केला तर विरोध होत होता असंही अद्यान स्पष्ट केले. लग्नानंतर काही दिवसातच मारहाण सुरू झाली मात्र मुलांसाठी अन्याय सहन केला पण शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि मी माझी चूक सुधारल्याचाही अद्याप स्पष्ट केलं. चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत असल्याचं सांगतानाच तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होता मात्र तिला तिच्या नवऱ्याची साथ असल्याचं अध्ययन स्पष्ट केले. अद्याने दहा वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार केली असून आता भीती वाटत नाही मुलांसाठी मी खंबीरपणे उभा असल्याचंही ती म्हणाली...! बाईट - अद्या सुर्वे
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 09, 2026 12:31:18
Satara, Maharashtra:सातारा - सातारा शहराजवळील सोनगाव येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे प्रचंड लोट आणि धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावरील वाहतुक करणाऱ्या नागरिकांना आणि आजू बाजूच्या गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या आगीमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात दिवसाढवळ्या पावसाळ्यासारखे दाट धुके पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. रस्त्यावर आलेल्या धुरामुळे वाहनचालकांना भर उन्हात देखील गाड्यांचे लाईट लावून प्रवास करावा लागत आहे.घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पाण्याचे टँकरही घटनास्थळी दाखल करण्यात आले आहेत. मात्र कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्यामुळे ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागू शकतात, अशी माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी या परिसरात सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 09, 2026 12:15:33
Baramati, Maharashtra:बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयास दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने देण्यात आलेल्या निर्णयाच्या बारामतीतल्या नेत्यांच्या युक्तिवादाचे विस्तार रुजला. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी कडाडून विरोध व्यक्त केला. या महाविद्यालयाला 2024 मध्ये राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्यात आले होते, परंतु यामध्ये छेडछाड झाली तर तीव्र आंदोलनाची धमकी देण्यात आली. बारामतीत धनगर समाजाच्या नेत्यांनी या प्रकरणाला वेगवेगळे विचार व्यक्त केले. बारामतीत काही नेते आणि समाजघटक या निर्णयाला पाठिंबा देत आहेत, तर काहींनी विरोध दर्शवला.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 09, 2026 11:51:14
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव–कोटमगाव रोडवरील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. उपकेंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वाळलेल्या गवताला आग लागून ती वेगाने पसरली होती. घटनेची माहिती मिळताच लासलगाव येथील सिद्धवीर हनुमान अग्निशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाने तत्पर कारवाई करत आग आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. उपकेंद्र परिसरात सुमारे १६३० सोलर पॅनल बसविण्यात आले असून आगीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती; मात्र वेळीच आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत वीज वितरण कंपनीचे किरكوळ नुकसान झाल्याची माहिती समोर आली.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 09, 2026 11:35:37
Junnar, Pune, Maharashtra:युद्धाचा फटका साखर उद्योगाला ही बसला असून आखाती देशातील साखर निर्णात ठप्प झाल्याने साखरेचे बाजारभाव किलोमागे चार ते पाच रुपयांनी गडगडलेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणी ही घटली असून साखरेला उठाव नाही तर दुसरीकडे यावर्षी साखर कारखान्यांना ऊस गाळपा साठी कमी प्रमाणात आल्याने साखरेचे गाळप ही कमी झालंय तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे,सततच्या पावसामुळे ऊसाचं वजन घटल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय साखर कारखान्यांना ही रिकवरी हि कमी प्रमाणात मिळाल्याने साखरेचं आर्थिक गणितचं कोलमडलं असून साखर उद्योग संकटात आल्याचं विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी म्हटलंय याच संदर्भात त्यांच्या शी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 11:35:00
Jalna, Maharashtra:जालना | लक्ष्मण हाके यांच्या बारामती येथे सुरूलेल्या आंदोलनाला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या पाठिंबाला घेणे... राजमाता अहिल्यादेवीं होळकर यांचे नाव पुसू देणार नाही... मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला स्व. अजीत पवार यांच्या नाव देण्याच्या हालचालीला विरोध.. पालकमंत्री पंकजा मुंडे यांना दिला गेला मोलाचा सल्ला, अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, वडिलांचा वारसा जपा - वाघमारे ओबीसी नेते अँकर- बारामती येथे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनात कारण या रुग्णालयाला आणि मेडिकल कॉलेजला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिलेले आहे, परंतु राज्य सरकार हे नाव मिटवून या ठिकाणी स्वर्गीय अजित पवार यांच्या नाव देण्याच्या हालचालीत आहे, हे प्रकरण प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या कानावर पडल्याच त्यांनी लोकशाही मार्गाने या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव पुसण्याला विरोध केला असून राजमाता अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण गोरगरिबांच्या तसेच जनतेच्या मनातील राजमाता आहे, त्यामुळे तेांचे नाव कदापि आम्ही उठवू देणार नाही, असा इशारा देत त्यांनी आंदोलन केले असून या आंदोलनाला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पाठिंबा दिलेला आहे. तसेच मनोज जरांगे यांनी शिंदे समितीवर आणि राज्यातील अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे, कारण या समितीकडून तसेच अधिकाऱ्यांकडून मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी दिरंगाई केली जात आहे, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, मात्र या पाचवी नापास मनोज जरांगेला कुठलाही कायद्याचा अभ्यास नाही , अधिकाऱ्यांना संवैधानिक मार्गाने आपली नोकरी करावी लागते, त्यामुळे अधिकारी आणि शिंदे समिती ही संविधानावर चालणारी समिती आहे, मात्र जरांगे हा जाणून-बुजून यामध्ये दुजाभाव तयार करून राज्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, असा टोला सुद्धा यावेळी त्यांनी जरांगेंना लगावला आहे.. नुकताच औरंगाबाद खंडपीठाने जालना डीपीटीसीत मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली आहे.जालनाच्या जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांना नोटीसा सुद्धा बजावले आहे,या नोटिसा अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे तसेच घेवरेपणामुळे आलेले आहे, त्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाकडे थोडे लक्ष द्यावे तसेच आपल्या लोकनेते वडिलांची वारसा जपावा, असा सल्ला सुद्धा यावेळी त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना दिला आहे..
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 09, 2026 11:30:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यातील अध्यात्मिक नगरी पैठण येथे नाथषष्ठी निमित्त लाखो वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या असून संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे. नाथसंप्रदायाचे संत संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळामुळे श्रीक्षेत्र पैठणला विशेष धार्मिक महत्त्व आहे. नाथषष्ठी निमित्त दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात वारकरी आणि भाविकांची गर्दी उसळते. यंदाही राज्यभरातून शेकडो दिंड्या टाळ-मृदंगाच्या गजरात पैठणमध्ये दाखल झाल्या आहेत. वारकऱ्यांच्या मुखी हरिनाम, हातात भगवे पताके आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून पाणी, आरोग्य आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 09, 2026 10:34:47
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात नशेखोर तरुणांचा सफाई कामगारावर चाकुने हल्ला , हल्ल्यात सफाई कामगाराचा मृत्यू सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद क CAMP क्रमांक ३ मध्ये ही धक्का दायक घटना घडली आहे. महादू जगताप असे त्या मृत कामगाराच नाव असून तो कोणार्क इन्व्हायरो कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. पॅनल क्रमांक ११ मध्ये कामावर असताना ही घटना घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 09, 2026 10:33:56
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा घेऊन तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. - एक लाख रुपये द्या अन तीन लाख रुपये मिळवा - होय ही ऑफर ऐकून तुम्ही देखील चक्रावलात ना ? - एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्यास तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणारी टोळी गजाआड - बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचे राज्यात रॅकेट ? ... सोलापूरात पोलिसांना देखील चक्रावून टाकणारी घटना समोर आलीय. एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्यानंतर त्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आम्हीच दाखवणाऱ्या टोळीला सोलापूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ... एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणारी टोळी सोलापुरात सक्रिय होत असतानाच शहर पोलिसांनी घटनेचे वेळीच गांभीर्य ओळखात दोघा जणांना अटक केलीय. पोलिसांच्या माहितीनुसार संशयीतांनी बनावट नोटा पांढऱ्या कागदावर कलर झेरॉक्स केल्या. दोन कागद एकमेकांना चिकटवून हुबेहूब नोटा तयार करण्यात अल्या होत्या. जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना त्या नोटा खराच वाटल्या पाहिजेत अशी पुरेपूर काळजी या प्रक्रियेत घेण्यात आली होती. नोटांवर सिरीयल क्रमांक होता पुढच्या आणि मागच्या बाजूला कलर झेरॉक्स असलेल्या 300 हून अधिक कागदाच्या पती सापडल्या आहेत. एकूण 1 लाख 10 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जपत केल्या आहेत. बनावट नोटा चलनात आणण्यात प्रयत्नात असलेल्या राजू चोरमोले आणि अतुल तावरे या दोघांना जेलरोड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आलाय. बाईट - एम. राजकुमार ( पोलीस आयुक्त सोलापूर शहर ) सदरच्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील व्यापारी चांगलेच धास्तावले असून या बनावट नोटांचे बळी आपण तरी नाही ना? अशी भिती त्यांच्या मनात निर्माण झालीय. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांची सिरीज जाहीर करण्याची मागणी चेंबूर ऑफ कॉमर्सच्या वतीने करण्यात आलीय. अत्यंत गंभीर प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणल्याबद्दल सोलापूर शहर पोलिसांचे अभिनंदन करत व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाईट - राजू राठी ( अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सोलापूर ) सध्या सदर प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अशा पद्धतीच्या बनावट नोटा त्यांनी कोणाकोणाला दिल्या आहेत ? सदरच्या रॅकेटमध्ये आणखीन कोणा कोणाचा हात आहे ? त्या पुढे कुठे चलनात गेल्या का? त्यांचे पुढे काय झाले? या सर्व बाबींचा सोलापूर शहर पोलीस कसून तपास करीत आहेत. End P2C अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर.
0
comment0
Report
Advertisement
Back to top