Back
अकोला में वाहन चोरी: सीसीटीवी फुटेज से चोरों की पूर्व नियोजन का खुलासा
JJJAYESH JAGAD
Feb 27, 2026 09:22:35
Akola, Maharashtra
अकोला शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सिंधी कॅम्प परिसरातून एका चारचाकी गाडीची अत्यंत शिताफीने चोरी करण्यात आली आहे. खदान परिसरातील घरासमोर उभी असलेली ही चारचाकी गाडी चोरट्यांनी काही मिनिटांतच लंपास केली. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी गाडीतून आलेल्या चोरट्यांनी प्रथम गाडीचा काच फोडला , त्यानंतर त्यांनी लॅपटॉपच्या साहाय्याने गाडी सुरू केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरट्यांनी यापूर्वी एका शोरूममधून चारचाकी गाडी चोरी केली. त्याच गाडीचा वापर करून त्यांनी ही दुसरी चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी गाडी मालक नितीन नेभानी यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी आणि वाहनधारकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 11:49:250
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 11:47:240
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 11:33:570
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 27, 2026 11:07:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 11:06:110
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 11:00:190
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 10:46:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 10:09:430
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 27, 2026 10:09:160
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 09:53:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 09:45:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 09:45:310
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 27, 2026 09:21:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 09:15:340
Report
