Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

मधुमाशा के अचानक हमले से किसान दंपति घायल, दो बकरियाँ मर गयीं

GMGANESH MOHALE
Feb 27, 2026 09:15:34
Washim, Maharashtra
मुंगळा शेतशीवरात मधमाशांच्या हल्ल्याची घटना घडली आहे. मुंगळा येथील शेतकरी पांडुरंग डोबळे व त्यांची पत्नी पुनम डोबळे हे शेतात बकऱ्या चारत असताना अचानक मधमाशांच्या थव्याने त्यांच्यावर आणि बकऱ्यांवर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मधमाश्यांचा हल्ला तीव्र असल्याने दोघेही पती-पत्नी जखमी झाले. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी अंगावर जाड कापडं घेतल्याने आणखी बकऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले जखमी पांडुरंग डोबळे आणि पुनम डोबळे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Feb 27, 2026 10:09:43
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 27, 2026 10:09:16
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील लाँग मार्चला मोठ यश... लाँग मार्चची यशस्वी सांगता.. पालकमंत्री विखे व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेनी VC द्वारे केले संबोधित.. वनजमिनी , तळ जमिनीच्या मागण्यांसह अर्ध वेळ कर्मचारी आणि शालेय पोषण कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय... अर्ध वेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार तर शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजारांची वाढ Raj्यातील बांधकाम कामगारांच्या मेडिक्लेम योजने सह चौदा मागण्या मान्य... वन जमिनी व तळ जमिनी बाबत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू... अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांच्या उपस्थितीत आंदोलनाची यशस्वी सांगता.... विखेंच्या गावात मोर्चा पोहोचण्यापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय...
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 27, 2026 09:53:39
Ahilyanagar, Maharashtra:मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी उपक्रम अहिल्यानगर जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील रामनाथ लेंडाळ यांनी आपल्या मुलीच्या लग्नात आवाजावी खर्च न करता गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी २१ हजार रुपयांची देणगी देत ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सध्या विवाह समारम्भांमध्ये वाढता दिखावा आणि अनावश्यक खर्च दिसून येत असताना, लेंडाळ यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत हा खर्च शिक्षणासाठी वळवण्याचा निर्णय घेतला. आपल्या बालपणी ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांनी शिक्षण घेतले, त्याच शाळेच्या विकासासाठी त्यांनी २१ हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे सुपूर्द केली. या निधीतून शाळेत सुसज्ज कुसुमाग्रज ग्रंथालय उभारण्यात येणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 09:45:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद... आज बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने मी आलेलो आहे, जगात अनेक विचारवंत झाले मात्र गौतम बुद्ध हे शांतीचे संदेश देणारे विचारवंत होऊन गेले आमची मागणी आहे की बोधी वृक्ष असलेल्या संस्थेत ट्रस्टी कुणीच नसावे, बाबासाहेबांनी सविधान देण्या अगोदरचा हा एक्ट आहे, त्यामुळे बिहार सरकारकडे विनंती केली आहे, कुणावर अन्याय करण्याची आमची भूमिका नाही, मात्र त्यात ट्रस्टी नसावे काल टाका नावाचे गाव आहे तेथील एका मुलीच्या घरी मी भेट दिली, तिथे तिच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, तिने गळफास घेतल्यावर तिच्या आई वडलांना बोलवायला हवे होते, म्हणून यामागे घातपात असल्याची शंका तिच्या आईला आहे ती बॉडी हॉस्पिटल मधे ठेवल्या नंतर तिच्या आई वडलांना बोलवण्यात आले, ती अत्यंत हुशार मुलगी आहे, आम्ही 1 लाख तर समाजकल्याण खात्याची 4 लाख मदत त्यांना मिळाली आहे. मात्र यामागे काही तरी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, म्हणून यात खुनाचा गुन्हा दाखल व्हावा आणि चौकशी व्हावी मनपा आणि इतर निवडणूक आम्ही पहिल्या अनेक ठिकाणी आमचे 2-3 लोक निवडून यायचे मात्र प्रभाग पद्धत रद्द करावी अशी मुख्यमंत्री यांना आमची मागणी आहे, सरकार मध्ये आम्ही असलो तरी न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे अजित दादा यांचे सर्व क्षेत्रात मित्र aa असणारा नेता आहे,CBI चौकशी कराची असेल तर राज्याने मागणी करायला हवी, यामागे काही घातपात आहे का याची चौकशी झाली पाहिजे, रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न निर्माण केला आहे घातपात असेल असे आम्हाला वाटत नाही, जे विमान होते अतिशय महाग असते, अनेक ठिकाणी घटना घडतात त्यामुळे अश्या गोष्टी घडू शकत नाही पाच राज्यांच्या निवडणुका निवडणूक आयोग जाहीर करेल, त्यामुळे त्यात पारदर्शकता असायला हवी , ज्यांची बोगस नावे आहेत किंवा जे डेथ झाले आहेत त्यांची नावे वगळावी, खोटे कागदपत्र देऊन लोक नाव नोंदून घेतात त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी ममता बॅनर्जी यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, राहुल गांधी यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, दुबार नाव असल्याच्या भूमिकेबाबत जवळपास बहुतांश राज्यात आम्हाला मान्यता आहे, दोन राज्यात आम्हाला नाही 4 पक्ष देशात आहेत, काँग्रेस, भाजपा, बसपा आणि आप हे पक्ष यात आहेत, त्यामुळे आम्हाला जर दोन राज्यात मिळाली तर आम्ही पण त्यात येऊ आमचे मनपा निवडणुकीत 50-60 लोक यावेळी निवडून आलेले आहेत, फक्त पक्ष चिन्ह वेगळी आहेत ON राहुल गांधी in AI समीट विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काही गोष्टींचे कौतुक करायला हवे होते, त्याला 30-40 देशाचे प्रतिनिधी होते, त्यामुळे काँग्रेस असच वागत राहिला तर त्यांना भविष्य नाही असं मला वाटत ON राज्यसभा माझा कार्यकाळ संपणार आहे मात्र पुन्हा राज्यसभा मिळेल असा मला विश्वास आहे, माझी पुन्हा हॅटट्रिक होईल,मोদি यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ON ट्विट माझी भूमिका आहेच, तुकड्या तुकड्या मध्ये राहणाऱ्यांना जोडण्याचे काम आपण केले पाहिजे बाळासाहेबांनी भूमिका घेतली तर ते शक्य आहे, गेल्या अनेक वर्ष ते स्वबळावर लढत आहेत आम्ही जर एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर अजून पुढे जातील ON बाळासाहेब आंबेडकर भूमिका आम्ही आंबेडकर वादी आहोत म्हणून एकत्र आहोत, मोदी पण आंबेडकरवादीला मानतात, ज्यांना देशात राहायचे त्यांना संविधान मानावे लागेल ON EVM बॅलेट बंद काँग्रेसने केले आहेत, भाजपने नाही माझ्या मता नुसार जश्या मशीनवर सुरू आहेत तश्या निवडणुका व्हाव्या, लोकसभेत आमचा चुकीचा प्रचार झाला तेव्हा आम्ही तक्रारी केल्या नाहीत ON भाजप सोबत फायदा काय? देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे एक विधान परिषद आणि 1-2 मंडळात आम्हाला जागा मिळेल. ON औरंगजेब इतिहास देवेंद्र फडणवीस त्यांनी बरोबर सांगितले आहे, इथेले मुस्लिम आणि तिथले मुस्लिम हे वेगळे वेगळे आहेत, औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा उदो उदो करण्याची गरज नाही. त्यांनी इथल्या मुस्लिम लोकांनी समजून घ्यावे की औरंगजेब आणि टिपू सोबत त्यांचा काही संबंध नाही ON एपस्टीन फाईल मोदी राजनामा मोदी देशाचे लोकप्रिय नेते आहेत, त्यांचा याशी काही संबंध नाही, काही लोकांना यात बदनाम केले जात आहे, त्यांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 27, 2026 09:45:31
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 27, 2026 09:22:35
Akola, Maharashtra:अकोला शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सिंधी कॅम्प परिसरातून एका चारचाकी गाडीची अत्यंत शिताफीने चोरी करण्यात आली आहे. खदान परिसरातील घरासमोर उभी असलेली ही चारचाकी गाडी चोरट्यांनी काही मिनिटांतच लंपास केली. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी गाडीतून आलेल्या चोरट्यांनी प्रथम गाडीचा काच फोडला , त्यानंतर त्यांनी लॅपटॉपच्या साहाय्याने गाडी सुरू केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरट्यांनी यापूर्वी एका शोरूममधून चारचाकी गाडी चोरी केली. त्याच गाडीचा वापर करून त्यांनी ही दुसरी चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी गाडी मालक नितीन नेभानी यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी आणि वाहनधारकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 27, 2026 09:21:51
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात एफआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक - सोलापुरात एफआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक - ऊस गाळप बंद होऊन दीड महिना लोटला तरी ऊस बील न दिल्याने स्वाभिमानी आक्रमक - साखर सहसंचालक कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर शेतकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन - जिल्ह्यातील एकाही कारखान्याने FRP नुसार अद्याप ऊस बील दिले नाही. - साखर सहसंचालकांनी जिल्ह्यातील कारखानदारांवर कारवाई करावी. - जिल्ह्यातील गोकुळ शुगर कारखान्याने सील तोडून गाळप केले त्यावर अधिकाऱ्यांनी कसलीही कारवाई केली नाही. बाईट - विजय रणदिवे ( स्वाभिमानी शेतकरी संघटना ) बाईट - अजित बोरकर ( स्वाभिमानी शेतकरी संघटना )
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 27, 2026 09:04:38
Malegaon, Maharashtra:राज्यात बनावट नोटांच्या जाळ पसरवणारा मुख्य सूत्रधार मालेगावच्या छावणी पोलिसांच्या ताब्यात. संभाजी नगरच्या बनावट नोटांच्या छाप कारखाना छावणी पोलिसांकडून उध्वस्त. 23.1.2026 रोजी एचडीएफसी बँक सटाणा नाका, मालेगाव येथे महिंद्रा फायनान्सच्या गणेश खरे या एजंटने 50 हजार रुपये च्या 500 च्या भारतीय चलनातील 100 नोटा या बनावट नोटांचा भरणा केला होता. पोलिसांनी सखोल केली असता जातेगाव येथील राठोड बंधूंना ताब्यात घेतलं. चौकशी केली असता त्यांना संभाजी नगर जवळील कन्नड येथील बन्सीलाल यादव यांनी फेक करन्सी चलनात आणण्यासाठी दिली होती. पोलिसांनी बन्सीलाल यादव ला ताब्यात घेतले असता त्याला कन्नडच्याच रेहान खान याने फेक करन्सी पुरवली होती. अशी लिंक छावणी पोलिसांनी लावली. यात आणखी समीर शेख, गोल्डन कुरेशी, अजिंक्य जाधव, शुभम थोरात यांची नावे समोर आली. मग शेवटी मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळसकर, जय भवानी नगर छत्रपती संभाजी नगर येथील व्यवसाय ग्राफिक डिझायनर यांच्या ताब्यात घेतल्यानंतर एकूण 200 बनावट 500 रुपये दराच्या नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच विनायक ग्राफिक्स नावाच्या दुकानातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी एकूण 01 लाख 36 हजार 700 रुपयांची साधनसामुग्री जप्त झाली. तपासात एकूण 385 बनावट 500 दाराच्या नोटा जमा झालेल्या आंढली आहेत. दरम्यान या संतोष केळसकरच्या मागावर राज्यातील विविध पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी असल्याचे समजते, मात्र नाशिक ग्रामीण छावणी पोलिसांनी अवघ्या एक महिन्यातच या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून मुख्य सूत्रधारास अटक केल्याने आणखी काही गुन्हे निष्पन्न होण्यास मदत होणार आहे. विशाल मोरे, झी मिडिया मालेगाव
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 27, 2026 09:01:23
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेतील स्थायी समिती सभागृहाला काही वर्षांपूर्वी टिपू सुलतान यांचं नाव देण्यात आलं होतं. मात्र या नामकरणावरून आता पुन्हा एकदा वाद पेटला आहे.शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने आज महापालिका परिसरात आंदोलन करत हा फलक हटवण्याची मागणी करण्यात आली.आठ दिवसांच्या आत बोर्ड काढला नाही, तर आम्ही स्वतः तो हटवू, आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. सभागृहाला काही वर्षांपूर्वी टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले होते,त्या वेळीही या निर्णयावरून शहरात मतभेद निर्माण झाले होते.दरम्यान, आज शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयात दाखल होत जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित फलक तात्काळ हटवावा, अशी मागणी त्यांनी केली.Aंदोलकांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर ठरलेल्या मुदतीत बोर्ड काढण्यात आला नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने तो हटवू, असा इशारा देण्यात आला.या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 27, 2026 09:00:41
Nagpur, Maharashtra:2c ला सदर पोलीस स्टेशन चा संग्रहित व्हिडिओ जोडला आहे नागपूर पेपर फुटी प्रकरणी अजून एक आरोपीला अजून एका ट्युशन क्लासेसमधील अजून एका शिक्षकाला करण्यात आली अटक पेपर फुटी प्रकरणी पाचवी अटक नागपुरात व्हाट्सअप वरून बारावीचे भौतिक शास्त्र रसायनशास्त्र आणि गणित पेपर फुटले सदर पोलीस करताय तपास, पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले असून पुढील काही दिवसात अजून काही आरोपींना अटक होणार आरोपीचे व्हिडिओ 2cला जोडला आहे. ही बातमी अपडेट करून घ्यावी नागपूर..... पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे... सहावा संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात असून त्याच्याकडून तपास सुरू आहे.. तो एका शाळेच्या शिक्षक असल्याची माहिती पुढे येत आहे ... तर सातवा आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती... आतापर्यंत तीन आरोपींना न्यायालयकोठडीत पाठवण्यात आलेला आहे....एका विद्यार्थ्यांका जामीन मिळाला आहे....
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 27, 2026 08:46:09
Jalna, Maharashtra:जालना : लाखोंच्या ई-घंटा गाड्या एकाच वर्षात बंद, शहरातील 130 भागात साचला कचरा, नागरीक त्रस्त (पॅकेज) जालना महापालिकेने वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून ई-घंटा गाड्या खरेदी केल्या. पण वर्षभरातच या गाड्या बंद पडल्या. त्यामुळे शहरात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं असून दुर्गंधी पसरलीय नागरीक या समस्येने त्रस्त झाले आहेत. व्हिओ: ई घंटा गाड्यांच्या निमित्तानं जालना महानगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलाय. महापालिकेनं वर्षभरापूर्वी 20 लाख रुपये खर्चून 13 ई घंटा गाड्यांची खरेदी केली होती. पण वर्षभरातच या गाड्या बंद पडल्यायत. सध्या या गाड्या महापालिका कार्यलयाच्या परिसरात उभ्या आहेत. या गाड्या शहरातील 130 भागात जाऊन कचरा संकलनाचं काम करीत होत्या पण गाडयाच बंद झाल्यानं कचरा संकलन बंद झाला आहे. त्यामुळे कचरा साचलेल्या भागात दुर्गंधी सुटल्यानं नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. बाईट: अनुज बाहेती, नागरीक,(भगव्या रंगाचा हाफ शर्ट) व्हिओ: स्वच्छतेत शहराचा चांगला रँक आणण्यासाठी बाहेरच्या राज्यातून या गाड्यांची खरेदी करण्यात आली. महापालिकेनं खरेदी केलेल्या या गाड्या तीनचाकी आहेत. त्यामुळे शहरातील लहान मोठ्या गल्ल्यांमध्ये या गाड्या सहज प्रवेश करून कचरा संकलन करायच्या. पण वर्षभरातच या गाड्यांच्या बॅटरी निकामी झाल्या. ब्रेक फेल झाले. मोटारी बंद पडल्या तर काहींची पत्रे खराब झालीय. काही गाड्यांचे टायर खराब झाले आणि सर्व गाड्या महापालिका पार्किंगमध्ये कायमच्या उभ्या राहिल्यात. या गाड्यांचे पार्ट शहरात भेटत नसल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान या गाड्यांचा वापर फक्त बिलं दाखवून पैसे उकळण्यासाठी करण्यात आला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय. बाईट: साद बिन मुबारक,सामाजिक कार्यकर्ते, जालना (पट्टे असलेला शर्ट) व्हिओ: दरम्यान बंद पडलेल्या या ई-घंटा गाड्यांवर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रतिक्रिया दिलीय. इलेक्ट्रीक गाड्यांच्या चार्जिंग स्टेशनसाठी वीज कनेक्शनची समस्या आणि दुरुस्तीची कामे रखडल्यानं या गाड्या बंद झाल्यानं कबुली त्यांनी दिली तसेच होळी पर्यत गाड्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बाईट: सुप्रिया चव्हाण,सहाय्यक आयुक्त, जालना महापालिका व्हिओ: या ई-घंटा गाड्या बंद पडल्यानं जालना महानगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलाय. शहरातील नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. पण महापालिकेतील प्रशासनात सक्षम कारभारी नसल्यानं शहरातील स्वच्छतेचा सध्या बोजवारा उडालेला दिसून येतो हे नक्की.आता बिघडलेल्या या गाड्या दुरुस्त होऊन या गाड्या शहरातील नागरिकांच्या सेवेत पुन्हा कधी दाखल होतात याचेच वेध शहरातील नागरीकांना लागलेत.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top