Back
जालना में ई-घंटा गाडियाँ बंद: नगर में कचरे का अंबार और प्रशासन पर सवाल
NMNITESH MAHAJAN
Feb 27, 2026 08:46:09
Jalna, Maharashtra
जालना : लाखोंच्या ई-घंटा गाड्या एकाच वर्षात बंद, शहरातील 130 भागात साचला कचरा, नागरीक त्रस्त (पॅकेज)
जालना महापालिकेने वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून ई-घंटा गाड्या खरेदी केल्या. पण वर्षभरातच या गाड्या बंद पडल्या. त्यामुळे शहरात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं असून दुर्गंधी पसरलीय नागरीक या समस्येने त्रस्त झाले आहेत.
व्हिओ: ई घंटा गाड्यांच्या निमित्तानं जालना महानगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलाय. महापालिकेनं वर्षभरापूर्वी 20 लाख रुपये खर्चून 13 ई घंटा गाड्यांची खरेदी केली होती. पण वर्षभरातच या गाड्या बंद पडल्यायत. सध्या या गाड्या महापालिका कार्यलयाच्या परिसरात उभ्या आहेत. या गाड्या शहरातील 130 भागात जाऊन कचरा संकलनाचं काम करीत होत्या पण गाडयाच बंद झाल्यानं कचरा संकलन बंद झाला आहे. त्यामुळे कचरा साचलेल्या भागात दुर्गंधी सुटल्यानं नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
बाईट: अनुज बाहेती, नागरीक,(भगव्या रंगाचा हाफ शर्ट)
व्हिओ: स्वच्छतेत शहराचा चांगला रँक आणण्यासाठी बाहेरच्या राज्यातून या गाड्यांची खरेदी करण्यात आली. महापालिकेनं खरेदी केलेल्या या गाड्या तीनचाकी आहेत. त्यामुळे शहरातील लहान मोठ्या गल्ल्यांमध्ये या गाड्या सहज प्रवेश करून कचरा संकलन करायच्या. पण वर्षभरातच या गाड्यांच्या बॅटरी निकामी झाल्या. ब्रेक फेल झाले. मोटारी बंद पडल्या तर काहींची पत्रे खराब झालीय. काही गाड्यांचे टायर खराब झाले आणि सर्व गाड्या महापालिका पार्किंगमध्ये कायमच्या उभ्या राहिल्यात. या गाड्यांचे पार्ट शहरात भेटत नसल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान या गाड्यांचा वापर फक्त बिलं दाखवून पैसे उकळण्यासाठी करण्यात आला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय.
बाईट: साद बिन मुबारक,सामाजिक कार्यकर्ते, जालना (पट्टे असलेला शर्ट)
व्हिओ: दरम्यान बंद पडलेल्या या ई-घंटा गाड्यांवर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रतिक्रिया दिलीय. इलेक्ट्रीक गाड्यांच्या चार्जिंग स्टेशनसाठी वीज कनेक्शनची समस्या आणि दुरुस्तीची कामे रखडल्यानं या गाड्या बंद झाल्यानं कबुली त्यांनी दिली तसेच होळी पर्यत गाड्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट: सुप्रिया चव्हाण,सहाय्यक आयुक्त, जालना महापालिका
व्हिओ: या ई-घंटा गाड्या बंद पडल्यानं जालना महानगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलाय. शहरातील नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. पण महापालिकेतील प्रशासनात सक्षम कारभारी नसल्यानं शहरातील स्वच्छतेचा सध्या बोजवारा उडालेला दिसून येतो हे नक्की.आता बिघडलेल्या या गाड्या दुरुस्त होऊन या गाड्या शहरातील नागरिकांच्या सेवेत पुन्हा कधी दाखल होतात याचेच वेध शहरातील नागरीकांना लागलेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 10:09:430
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 27, 2026 10:09:160
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 09:53:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 09:45:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 09:45:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:22:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 27, 2026 09:21:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 09:15:340
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 27, 2026 09:04:380
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:01:230
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 27, 2026 09:00:560
Report
AKAMAR KANE
FollowFeb 27, 2026 09:00:410
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 08:19:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 08:17:500
Report
