Back
भिवंडी मेट्रो अपघात: लोखंडी सळईने तरुणाचे जीवन धोक्यात!
UJUmesh Jadhav
Aug 07, 2025 00:46:44
Thane, Maharashtra
भिवंडी मेट्रो अपघात..
तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई अडकली...
अपघातानंतर एमएमआरडीए प्रशासनास आली जाग...
निष्काळजीपणाची जबाबदारी घेणार कोण..
भिवंडीकरांचा संतप्त सवाल...
ॲंकर...
मंगळवारी दुपारी भिवंडी शहरात झालेल्या भीषण अपघातामुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावरील कामाच्या पहिल्या टप्प्यादरम्यान, वरून एक जड लोखंडी रॉड पडला आणि चालत्या रिक्षा चालवणाऱ्या २० वर्षीय सोनू अली (रा. विठ्ठल नगर) याचे डोके फुटले. सुमारे ५ तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सोनूच्या डोक्यातून लोखंडी सळई काढली. सध्या तो आयसीयूमध्ये आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.
विवो-१
अपघातानंतर एमएमआरडीएची जाग आल्याचे चित्र दिसून येत आहे. घटनेनंतर लगेचच एमएमआरडीए विभागाने काम सुरू केले आणि कर्मचाऱ्यांना तैनात करून मेट्रो स्टेशन आणि मार्गावर बाहेर पडणाऱ्या सर्व लोखंडी सळई व इतर टाकाऊ वस्तू कापण्याचे काम सुरू केले. मात्र स्थानिक नागरिकांतून संतापाची लाट कायम. अपघात झाल्यानंतर कारवाई करण्याचा काय अर्थ आहे? एमएमआरडीए लोकांच्या जीवाशी किती काळ खेळत राहणार? असा संतप्त सवाल भिवंडीतील जनता करत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की जर सुरक्षा जाळ्या आणि खबरदारी आधी बसवली असती तर सोनू आज मृत्यूशी झुंजत राहिला नसता. भिवंडीतील जनतेतून विचारले जात आहे की एमएमआरडीएला अपघातानंतरच सुरक्षा व्यवस्था आठवतात का? या निष्काळजीपणाची जबाबदारी कोणी घेईल का? मेट्रोच्या वेगाची किंमत भिवंडीतील रहिवाशांच्या जीवातून वसूल केली जाईल का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. या अपघातात जखमी झालेल्या तरूणाला संबंधित प्रशासनाकडून नुकसान भरपाई व उपचाराचा संपूर्ण खर्च द्यावा अशी ही मागणी होत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
338
Report
390
Report
281
Report
420
Report
228
Report
मुख्यमंत्री छत्तीसगढ़ कि प्रेस कॉन्फ्रेंस : MMC जोन के सीसी मेंबर रामधर सहित 12 इनामी नक्सलियों का स
361
Report
169
Report
NSNivedita Shukla
FollowDec 08, 2025 19:01:43Noida, Uttar Pradesh:Japan - Fire near nursery school in Aomori City: Investigation into connection to earthquake underway - NHK
157
Report
NSNivedita Shukla
FollowDec 08, 2025 19:01:31Noida, Uttar Pradesh:Japan: The moment the M7.6 earthquake hit Hachinohe City - captured from the Aomori Asahi Broadcasting Hachinohe branch office
176
Report
NSNivedita Shukla
FollowDec 08, 2025 19:01:10Noida, Uttar Pradesh:Damage reported after a violent storm hit Yanbu, Saudi Arabia this evening...
153
Report
114
Report
138
Report
193
Report
HBHemang Barua
FollowDec 08, 2025 18:45:19274
Report