Back
भिवंडी नगर निगम के 23 प्रभागों में आरक्षण सोडत: महिलाओं को 45 सीटें
UJUmesh Jadhav
Nov 11, 2025 13:38:24
Thane, Maharashtra
भिवंडी महानगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत मोठ्या उत्साहात पार पडली...
शेकडो नागरिक, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते लावली हजेरी...
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११:०० वाजता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या २३ प्रभागांकरिता प्रभाग आरक्षण सोडत मानसी भारत गडा पदवी महाविद्यालय शांती चंदन सभागृह तळमजला, भिवंडी रोड रेल्वे स्टेशनजवळ, अंजूरफाटा, भिवंडी येथे आयोजित करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरण आरक्षण सोडत पार पडली.
सदर सोडतीमध्ये नगरविकास विभाग अधिसुचना क्रमांक एमसीओ २०२४/प्र.क्र.१८१/नवि १४ दि.२० मे २०२५ आणि मा. निवडणुक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/मनपा २०२५/प्र.क्र.४३/का ५, दि.२४/१०/२०२५ व समक्रमांकाचे पत्र दि.२७/१०/२०२५ मधील तरतुदी नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. एकुण ९० जागांसाठी सोड काढण्यात आली.
या सोडतीत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग २४ जागा असून महिलांसाठी १ ते ४, १३ ते १५, १८ व १९ तसेच २१ ते २३ या १२ प्रभागात आरक्षण पडले. तसेच सर्वसाधारण करीता एकुण ६२ जागा असून महिलांकरिता ३१ ठिकाणी आरक्षण पडले आहे. अनुसूचित जातीसाठी तीन जागा असून दोन जागांवर महिलांचं आरक्षण पडले आहे. अनुसूचित जमातीकरीता एक जागा आहे. म्हणजे यंदा ४५ जागांवर महिलांचे आरक्षण पडले आहे.
भिवंडी महानगरपालिका निवडणूकीत ४५ जागांवर महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
एकूण २३ प्रभागांचे आरक्षण यावेळी निश्चित करण्यात आले. या सोडतीसाठी शहरातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच सदर सोडत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यु ट्युब या समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आले होते. एकुण ११०० लोकांनी प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यु ट्युब या समाज माध्यमावर पाहिले. सदर सोडतीचा निकाल राज्य निवडणुक आयोगास मान्यतेकरिता पाठविण्यात आला आहे. तसेच सोडतीबाबत ज्यांना आक्षेप अथवा हरकती नोंदकवयाच्या असतील त्यांनी आपले हरकती अर्ज दि.१७/११/२०२५ ते दि.२४/११/२०२५ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत निवडणुक विभाग, नविन प्रशासकिय इमारत, पहिला मजला येथे सादर करावेत. असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DIDamodar Inaniya
FollowDec 12, 2025 07:05:130
Report
ARAmit Raj
FollowDec 12, 2025 07:04:560
Report
RMRam Mehta
FollowDec 12, 2025 07:04:450
Report
RVRaunak Vyas
FollowDec 12, 2025 07:04:300
Report
DIDamodar Inaniya
FollowDec 12, 2025 07:04:160
Report
JKJitendra Kanwar
FollowDec 12, 2025 07:03:540
Report
AGAdarsh Gautam
FollowDec 12, 2025 07:03:400
Report
RJRahul Joshi
FollowDec 12, 2025 07:03:200
Report
DIDamodar Inaniya
FollowDec 12, 2025 07:03:060
Report
RVRaunak Vyas
FollowDec 12, 2025 07:02:360
Report
DIDamodar Inaniya
FollowDec 12, 2025 07:02:200
Report
RKRAJESH KUMAR
FollowDec 12, 2025 07:02:030
Report
ASANIMESH SINGH
FollowDec 12, 2025 07:01:460
Report
AVArun Vaishnav
FollowDec 12, 2025 07:01:310
Report
SKSantosh Kumar
FollowDec 12, 2025 07:01:200
Report