Back
महाबळेश्वर MPG क्लब केस: सरकारी जमीन अग्रवाल परिवार के हवाले होने पर राजनीतिक दबाव का सवाल
TTTUSHAR TAPASE
Oct 05, 2025 06:32:07
Satara, Maharashtra
सातारा: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन समोर आल्यानंतर त्यांचं MPG club हे पंचतारांकित हॉटेल महाबळेश्वर मध्ये अनाधिकृत पद्धतीने उभं असल्याचं समोर आलं होतं. यानंतर प्रशासन खडबडून जागं होत कारवाई केली होती. शासकीय मिळकतीमध्ये तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यानं रहिवास वापराकरता घेतलेल्या जागेमध्ये पाँचतारांकित उभं असलेलं हे MPG club हॉटेल सील करत अनधिकृत पद्धतीने केलेलं बांधकाम पाडून या हॉटेलमधला बार सुद्धा सील केला होता. याला जवळपास एक वर्ष उलटून गेल आहे. मात्र सातारा जिल्हा प्रशासनान अगदी गुप्त पद्धतीने आदेश काढत हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिला आहे. शासकीय मिळकतीमध्ये भाडेपट्ट्याने असलेली या अग्रवाल कुटुंबाची जागा पुन्हा शासनाने माघारी घ्यावी अशी मागणी तेव्हापासून होत होती सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची फसवणूक करत उभारलेल्या या हॉटेलचं सील काढून ते पुन्हा अग्रवाल कुटुंबालाच का देण्यात आलं याबाबत उलट सुलट चर्चा सध्या सुरू झालेली आहे. मोठा राजकीय दबाव जिल्हा प्रशासनावर होता असं सुद्धा बोलले जातंय. जर राजकीय दबाव होता तर कोणत्या नेत्याचा होता हे सुद्धा समोर यावं असं लोकांचं म्हणणं आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉटेलचे सील उघडण्याच्या आदेश दिले आहेत यामध्ये या प्रॉपर्टी मधला वाणिज्य वापर तात्काळ बंद करावा आणि मिळकतीचा वापर केवळ मूळ जिमखाना या प्रयोजनासाठीच करावा असं सुद्धा या आदेशात म्हटलं आहे. मात्र दुसर्या बाजूला वादींना वापरात बदल करायचा असल्यास त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सुद्धा यात म्हटलं आहे यामुळे यामध्ये पुढील काही काळात अग्रवाल कुटुंबाला 30 वर्ष भाडेतत्वावर शासकीय जागेवर वाणिज्य वापर करता येईल की काय याबाबत शंका व्यक्त केली जातीये. महाबळेश्वर मधील शासकीय जागेत चुकीच्या नियमबाह्य पद्धतीने चालेल्या कामामुळे लिज प्रॉपर्टीची मागणी पाहणी करण्याची सुद्धा मागणी होताना पाहायला मिळते.या सर्व प्रकारणाबाबत mpg club हॉटेल या ठिकाणाहून आढावा घेत तक्रारदार अभय हवलदार यांच्यासोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report

0
Report
0
Report
0
Report
0
Report
BSBhanu Sharma
FollowOct 05, 2025 09:20:140
Report
LSLaxmi Sharma
FollowOct 05, 2025 09:20:020
Report
LSLaxmi Sharma
FollowOct 05, 2025 09:19:552
Report
LSLaxmi Sharma
FollowOct 05, 2025 09:19:450
Report
LSLaxmi Sharma
FollowOct 05, 2025 09:19:370
Report
ATAnuj Tomar
FollowOct 05, 2025 09:19:240
Report
ATAnuj Tomar
FollowOct 05, 2025 09:19:030
Report
SKSundram Kumar
FollowOct 05, 2025 09:18:480
Report

0
Report
KSKISHORE SHILLEDAR
FollowOct 05, 2025 09:18:370
Report