Back
पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका में अजित पवार बनाम बीजेपी की भिड़ंत, भ्रष्टाचार पर घेराबंदी
KPKAILAS PURI
Jan 03, 2026 07:33:53
Pimpri-Chinchwad, Maharashtra
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण होणार अशी चिन्ह दिसत आहेत. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलत भाजपवर जोरदार टीका केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार विरुद्ध भाजपा असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. पाहुयात एक रिपोर्ट...
पुणे जिल्ह्यातल्या मत्त्वाच्या असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये अजित पवार विरुद्ध भाजप असा सामना रंगला... अजित पवारांनी या निवडणुकीत भाजपला शिंगावर घेण्याचा पक्का निर्धार केल्याचे स्पष्ट झाल आहे. महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त पिंपरी चिंचवड मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या कामकाजाची अक्षरशः पिसे काढत भाजपर सडकून टीका केली. पुणे
भ्रष्टाचारी राक्षसांचं दहन करण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहोत अशा शब्दांत, पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले... महापालिकेत लुटारू गँग कार्यरत असल्याची टीका त्यांनी केली... रिंग करत कामांची कंत्राटं काढून महापालिकेच्या तिजोरीतून भरमसाठ लूटमार करण्यात आल्याचा आरोप, अजित पवारांनी केला. काही लोकांच्या प्रॉपर्टी कशा वाढल्या, त्याचा असा कोणता व्यवसाय आहे जी एवढी प्रॉपर्टी वाढली असा सवालही त्यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता केला. महापालिकेच्या कामात पारदर्शकतेचा अभाव आहे. कोणाचाच कोणावर वचक नाही, शहरामध्ये लुटारू गँग फोफावल्याची टीकाही त्यांनी केली. तर गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपवरही पलटवार केला. एका गुन्हेगाराला परदेशात जाण्यासाठी कोणी मदत केली, कोणी पासपोर्ट काढून दिला असा सवाल त्यांनी गुंड निलेश घायवळ याचं नाव न घेता केला. भाजपला सत्तेची मस्ती माज नशा आल्याची जोरदार टीका त्यांनी केली..
बाईट - अजित पवार, उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी भाजप वर जोरदार टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी ही अजित पवार यांच्या भूमिकेचे स्वागत करत अजित पवार यांना वेगळा मार्ग निवडायचा आहे अस स्पष्ट दिसते अस म्हटलंय...!
अजित पवार यांनी भाजपची साथ सोडावी मूळ राष्ट्रवादीत सामील व्हाव अस ही राऊत म्हणाले....माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला, ज्यांनी आरोप केला त्यांच्या बरोबर मी सत्तेत असल्याच्या पवारांच्या विधानावर ही राऊत यांनी प्रतिक्रिया देत हा प्रश्न संपूर्ण देशाला असल्याचं म्हटलं...भाजप वॉशिंग मशीन तर अमित शहा पावडर असल्याचे राऊत म्हणाले...!
बाईट - संजय राऊत, नेते, शिवसेना
अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केल्यानंतर भाजपने हिंत्यांच्यावर पलटवार केलाय...अजित पवारांनी आरोप करण्यापूर्वी खुद की गिरेबान झाकके देखना चाहिए अस भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. अजित पवारांचे हे वक्तव्य राजकीय असल्याचं ते म्हणाले.
बाईट - रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष
एकंदरीतच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांनी ज्या आक्रमकतेने भाजपला शिंगावर घेतले आहे ते पाहता हा संघर्ष आणखी चिघळणार अशीच चिन्हे आहेत..!
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
MDMahendra Dubey
FollowJan 03, 2026 16:21:170
Report
MDMahendra Dubey
FollowJan 03, 2026 16:20:190
Report
HGHarish Gupta
FollowJan 03, 2026 16:18:060
Report
APAbhay Pathak
FollowJan 03, 2026 16:17:050
Report
PPPraveen Pandey
FollowJan 03, 2026 16:16:260
Report
NJNEENA JAIN
FollowJan 03, 2026 16:15:400
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
RJRahul Joshi
FollowJan 03, 2026 15:56:580
Report
ATALOK TRIPATHI
FollowJan 03, 2026 15:56:380
Report
BSBidhan Sarkar
FollowJan 03, 2026 15:56:070
Report