Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

मराठवाड़े में जलसाठा 99% तक: क्या पानी के लिए नई उम्मीद?

VKVISHAL KAROLE
Sept 27, 2025 03:18:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn dam level av Feed attached मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत. यंदा प्रथमच लघु आणि मध्यम प्रकल्पांत एवढा मोठा जलसाठा जमा झाला आहे. जायकवाडी प्रकल्पात ९९ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे शिवाय नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतून ३६ हजार ६१९ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाण्याचा वाढता वेग लक्षात घेत जायकवाडी प्रशासनाने प्रकल्पातून ४७ हजार १६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मराठवाड्यात जायकवाडीसह ११ मोठे प्रकल्प आहेत. यात शुक्रवारी ९७ टक्के जलसाठा जमा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. यातील मांजरा, उर्ध्व पेनगंगा, निम्न मनार, निम्न तेरणा शंभर टक्के भरली. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ९३ टक्के जलसाठा जमा आहे. त्यात बीड, थाराशिव जिल्ह्यातील २४ प्रकल्प १०० टक्के भरली आहेत. नांदेड जिल्ह्यातील ९ धरणांत २६ टक्के, लातूर जिल्ह्यातील ८ धरणांत २० टक्के, जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ९२ टक्के साठा आहे. केवळ संभाजीनगरमधील १६ मध्यम प्रकल्पांत ७८ टक्के साठा आहे मराठवाड्यात ७५४ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या पंचक्रोशीतील गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना यावर असतात. अशा या महत्त्वपूर्ण प्रकल्पांत ९१ टक्के जलसाठा आहे...
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 05:16:03
Washim, Maharashtra:वाशिम: File:2709ZT_WSM_ZP रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:राज्य निवडणूक आयोगाने वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीचाच आधार घेतला जाणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार, १ जुलै २०२५रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे विभाग आणि निर्वाचक गणनिहाय यादी तयार केली जाईल.त्यानंतर,८ ऑक्टोबर २०२५रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. नागरिकांना या यादीतील हरकती व सूचना८ ते १४ ऑक्टोबर २०२५दरम्यान सादर करण्याची संधी मिळणार आहे.अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर,२७ ऑक्टोबर २०२५रोजी अंतिम आणि अधिप्रमाणित मतदार यादी जाहीर केली जाईल.या दिवशीच मतदान केंद्रनिहाय मतदार यादीसुद्धा उपलब्ध होणार आहेत.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 27, 2025 05:03:06
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूर जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी... जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात.... AC ::- लातूर जिल्ह्यात आज हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून, अनेक ठिकाणी नदी-नाले वाहू लागले आहेत. एक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुफान पावसाने जिल्ह्याला झोडपायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागासह शहरातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: पूरग्रस्त भागातील स्थितीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 27, 2025 05:02:06
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 05:00:46
Yavatmal, Maharashtra:प्रतिकूल हवामान आणि पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस भिजून काळवंडला आहे. बहुतांश भागात हिरवी बोंड सडत असून, काही फुटलेल्या बोंडातला कापूस वेचून साठवण्याची धडपड करताना शेतकरी दिसत आहे. आर्णी तालुक्यातील पाभळ चे शेतकरी रामसिंग जाधव हे हतबल शेतकरी देखील जो मिळेल तो कापूस वाचवण्या साठी धडपडताना दिसत आहेत. सुरुवातीपासूनच पावसामुळे जमिनी चिबडल्याने कापूस उत्पादन घटण्याची स्थिती आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून कपाशीच्या पिकाला पावसाचे ग्रहण लागले असून, पीक वाढीच्या अवस्थेतही सारखा पाऊस सुरू असल्याने वाढीवर परिणाम झाला. जो कापूस बोंडातून बाहेर आला, तो पावसामुळे भिजला आहे. बोंडअळीचाही प्रादुर्भाव वाढला आहे. पावसामुळे कपाशीची प्रत खराब होऊन नुकसान होत आहे. बाईट: रामसिंग जाधव : शेतकरी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 04:30:58
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 04:19:31
Washim, Maharashtra:वाशिम: File:2709ZT_WSM_PAVANKHIND_DEKHAVA रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशीम शहरातील श्री नंदीकिशोर दुर्गोत्सव मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील पावन खिंडीची भव्य देखावा सकारून नागरिकांसमोर शौर्यगाथा उभी केली आहे.मंडपात प्रवेश करताच गुहेतून जाण्याचा आणि डोंगर-दऱ्यांमधून प्रवास करण्याचा अनुभव मिळत असून, ऐतिहासिक लढाईचे थरारक चित्रण पाहायला मिळत आहे.या देखाव्यामुळे मंडपात ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांना अभिमान, थरार आणि प्रेरणा मिळत आहे.तरुण पिढीला इतिहासाचे स्मरण करून देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या शौर्यगाथेचा देखावा पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते आबाल वृद्धापर्यंत गर्दी करीत आहेत.
1
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 27, 2025 04:00:52
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 27, 2025 03:51:49
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 03:50:38
Washim, Maharashtra:वाशिम: File:2709ZT_WSM_ILLEGALCATTLE_TRANSPORT रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:नागपूरहून हैदराबादला कत्तलीसाठी गुरांची अवैध वाहतूक सुरू असतानाच वाशिम पोलिसांनी मोठी कारवाई करत २२ गुरांना जीवनदान दिले आहे.वाशिम-हिंगोली मार्गावरील तोंडगाव नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली असता संशयित वाहन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र चालकाने वाहनाचा वेग वाढवत पळ काढला. पोलिसांनी तब्बल १० किलोमीटरपर्यंत पाठलाग करून अखेर वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत १४ लाखांचे वाहन आणि ४ लाख २५ हजारांची गुरे असा मिळून १८ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाचविण्यात आलेल्या गुरांना शिरपूर येथील गोशाळेत हलविण्यात आले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकचा तपास वाशिम ग्रामीणचे पोलीस करीत आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 27, 2025 03:50:29
Raigad, Maharashtra:स्लग - रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाची हजेरी ...... अधून मधून पावसाच्या सरी मात्र जनजीवन सुरळीत ....... जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट ......... अँकर - मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं रायगड जिल्ह्यात पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. आकाश अभ्राच्छादित असल्याने सर्वत्र दाट काळोख झालाय. मात्र या पावसाचा जनजीवनावर कुठलाही परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. रायगड जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडले होते. मात्र हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 27, 2025 03:50:18
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top