Back
14 जुलैला विधानभवनावर धडक छत्री मोर्चा: युवा प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचे संघर्ष!
SMSarfaraj Musa
FollowJul 09, 2025 01:01:31
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कर्मचारी धडकणार विधान भवनावर,14 जुलै रोजी काढणार धडक छत्री मोर्चा..
अँकर - राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी येत्या 14 जुलै रोजी मुंबईत विधानभवनावर धडक छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे.युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या
36 जिल्ह्यातील प्रमुखांच्या उपस्थित सांगलीत पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारकडून 6 आणि 5 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता,मात्र सदर कालावधी आता संपल्याने राज्यातल्या एक लाख 34 हजार कर्मचाऱ्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी सरकारसोबत आरपारचा संघर्ष करण्याचा निर्णय प्रशिक्षण योजनेचे राज्य नेते बालाजी पाटील-चाकूरकर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे.युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचारयांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातल्या कर्मचाऱ्यांना घेऊन 14 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनावर धडक छत्री मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
बाईट - तुकारामबाबा महाराज - पश्चिम महाराष्ट्र प्रमुख -युवा प्रशिक्षण योजना.
बाईट - बालाजी पाटील-चाकूरकर - नेते-युवा कार्य प्रशिक्षण योजना.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowJul 09, 2025 05:03:20Pune, Maharashtra:
pimpri tadipar
kailas puri pune 9- 7- 25
feed by 2c
Anchor - पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातून 33 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय, ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानंतर करण्यात आली, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मधून 15 आणि परिमंडळ 2 मधून 18 सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलय, काही जणांवर एक वर्षांकरिता ही कारवाई करण्यात आली, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 09, 2025 05:02:38Beed, Maharashtra:
बीड: हे राम; बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय? पुन्हा एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड, गुन्हा दाखल...
Anc- बीड जिल्ह्यात शाळकरी अल्पवयीन मुलींची छेडछाड काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. बीड शहरातील उमाकिरण या खासगी संस्थेतील शिक्षकांनी दोन अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याच्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर केज मध्ये नववीत शिकणाऱ्या मुलीची छेड काढण्यात आली.. ही घटना ताजीच असताना पुन्हा एकदा केज तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीला भक्ष्य करण्यात आले आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीला वर्षभर पाठलाग करून त्रास देत असल्याचा किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोजच्याच छेडखानीला असाह्य झालेल्या मुलीने हा प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने थेट केज पोलिस ठाणे गाठून मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी अखेर ऋषिकेश गलांडे या आरोपीविरुद्ध छेडखानी आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.. पोलिस आता आरोपीच्या शोधात आहेत.
दिवसेंदिवस मुलींच्या होत असलेल्या छेडखानी वरून बीड जिल्ह्यात दहशतीचे वातवरण पसरले असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 05:02:15Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_GAD_FLOOD
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, राष्ट्रीय महामार्गासह छोटे -मोठे 15 मार्ग बंद, पुराच्या पाण्यातून दोन बसेसची सुटका, जिल्हा व पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला पुराचा वेढा सुरू झाला आहे. गडचिरोली येथील गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी या दोन राष्ट्रीय महामार्गासह 15 जिल्हा मार्ग बंद असून ही पूर परिस्थिती गोसेखुर्दचे पाणी कमी न केल्यास सायंकाळपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून राष्ट्रीय महामार्ग बंद पडल्याने वाहनांच्या लांबाच लांब रांगा लागल्या आहेत.
पुरामुळे बंद असलेले मार्ग
1) गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 353 सी (पाल नदी, कोलांडी नाला, गाढवी नदी)
2) गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग 353 सी (गोविदपुर नाला)
3) कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग 377 तालुका आरमोरी / कुरखेडा
4) मांगदा ते कलकुली प्रजिमा 50 तालुका आरमोरी
5)कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7 ता.कुरखेडा (लोकल नाला )
6) चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा 36 तालुका आरमोरी
7) शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा 1 तालुका देसाईगंज
8) आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा 49 तालुका देसाईगंज
9) वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा 8 तालुका आरमोरी
10) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा 53 तालुका चामोर्शी
11) अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा 47 तालुका देसाईगंज
12) भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा 17 (हळदीमाल नाला, अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
13) शिवणी चंदागड शिरपूर रस्ता प्रजिमा 35 तालुका कुरखेडा
14) अमिर्झा मौसिखांब रस्ता प्रजिमा 57 तालुका गडचिरोली
15) मौसिखांब वैरागड कोरेगाव रस्ता प्रजिमा 41 तालुका देसाईगंज
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 09, 2025 04:38:18Pune, Maharashtra:
pimpri river
kailas puri Pune 9-7-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी 1556 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पवना नदी सुधार प्रकल्पासाठी गेले कित्येक वर्ष प्रयत्न सुरू होता. अखेर राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडून एनवायरमेंटल क्लिअरन्स मिळाल्याने हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची माहिती या प्रकल्पाचा पाठपुरावा करणाऱ्या भाजपच्या संदीप वाघेरे यांनी दिली. या प्रकल्पामुळे महापालिकेला हजारो कोटींचा फायदा होणार असतानाच या प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वाघेरे यांनी स्पष्ट केले.
Byte - संदीप वाघेरे, भाजप
12
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 09, 2025 04:37:32Nashik, Maharashtra:
nsk_gramsabha
feed by 2C
vidoe 5
anchor कळवण तालुक्यातील पुणेगाव मध्ये पेसा अध्यक्षांनीच ग्रामस्थांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांनी मीटिंग आयोजित केली तेव्हा गावकरी मंडळी, ग्रामसेवक सरपंच, सदस्य सर्व उपस्थित होते.यावेळी पेसा संदर्भात प्रश्न विचारत असल्याच्या कारणावरून ग्रामपंचायत पेसा निधीवर राहणारा अध्यक्ष रामा येवाजी पवार तसेच त्यांचे भाऊ,गुलाब येवाजी पवार, रमेश येवाजी पवार यांनी ग्रामपंचायत सदस्य विश्वास गायकवाड यांना हाणमार केले. थोडा वेळ तणावाचे वातावरण असताना पोलिसांना फोन करून कळल्यानंतर घटनास्थळी पोलीस येऊन पूर्ण चौकशी करून गुन्हा दाखल केलाय. गावकऱ्यांना शांत राहण्याची आव्हान करण्यात आले आहे. गावातल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर विकास कामामध्ये अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यांनी कामाच्या दर्जावर आणि खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित ग्रामस्थांनी केले. तसेच सदस्य हे कामामध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला असता ग्रामपंचायत सदस्य यांनी पेसा निधीतून गावाच्या विकासासाठी किती निधी खर्च केला याबाबत गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या निधीचा गैरव्यवहार झाला आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.पुढील कार्यवाही प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
12
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 09, 2025 04:36:11Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_DRON_SHORTS पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
टीप :– व्हिडिओ सौज्यन प्रतीक नरेटे नाव द्यावे
सततच्या पावसाने चिखलदऱ्यातील भीमकुंड धबधबा प्रवाहित; चिखलदऱ्यात पर्यटकांची तुफान गर्दी, पहा ड्रोन कॅमेरातून विहंगम दृश्य
अँकर :- गेल्या काही दिवसापासून चिखलदऱ्यात सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे चिखलदऱ्यातील भीम कुंड धबधबा हा प्रवाहित झाला असून ओसंडून वाहत आहे. सध्या संपूर्ण चिखलदऱ्यात अल्हाददायक वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र धुके धुके पाहायला मिळत आहे त्यामुळे चिखलदऱ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. भीमकुंड धबधबा हा प्रवाहित झाल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणात खुणावत असून धबधब्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत असून अल्लाददायक वातावरणाचा आनंद घेत आहे. ३ हजार ५०० फुटांवरून वाहणारा भिमकुंड धबधबाही प्रवाहित झाला असून ही मनमोहक दृश्य टिपण्यासाठी पर्यटक भिमकुंड पॉईंटवर गर्दी करत आहे. दरम्यान या धबधब्याचा उल्लेख महाभारत काळात असून या ठिकाणी विराट राजाचे राज्य होते. ते अज्ञात वासात असताना पांडव वेशांतर करून विराट नगरीत राहायला आले. त्यानंतर महाबली भीमाने किचकाचा वध करून त्याचा मृतदेह खोल दरीत फेकला आणि भीमाने स्वतःचे रक्तरंजित हात आणि पूर्ण शरीर स्वच्छ करण्यासाठी ज्या कुंडामध्ये स्नान केले ते भीमकुंड नावाने ओळखले जाते अशी आख्यायिका देखील आहे. या भीमकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य आपल्या ड्रोन कॅमेरा टिपले झी 24 तासचे प्रेक्षक प्रतीक नरेटे यांनी
7
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 09, 2025 04:34:23Akola, Maharashtra:
Anchor : अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाच्या पथकांच्या नेतृत्वात अकोल्यातील अकोट येथे छापे टाकण्यात आले. या ठिकाणावरून दस्तावेज, कोरे धनादेश आदी जप्त करण्यात आले. अकोट शहरात विना अनुज्ञप्ती अवैध सावकारी करत असल्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात छापा टाकण्यात आला. अर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार गजानन लक्ष्मणराव माकोडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम अंतर्गत धाड कार्यवाहीद्वारे शोध कार्य करण्यात आले.
1
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 09, 2025 04:32:54Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शासकीय कार्यालयात आता वाढदिवस साजरे करणे पडणार महागात, वाढदिवस साजरे न करण्याबाबत प्रशासनाकडून परिपत्रक जारी
- सोलापूर जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात वाढदिवस साजरे करणे पडणार महागात
- शासकीय कार्यालयातील विविध विभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढदिवस साजरे करण्याचे वाढले होते लोण
- मात्र आता सोलापूरचे जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी कार्यालयात वाढदिवस साजरे न करण्याबाबत काढले परिपत्रक
- सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला निर्णय
- कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक कार्यक्रम, समारंभ, वाढदिवस साजरे केले जात असल्याने कार्यालयीन वेळ जातोय वाया
- त्यामुळे आता शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयात आपला वाढदिवस साजरा करण्यावर आले निर्बंध
5
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 09, 2025 04:30:37Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे
-----
नागपूर
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले
अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि सोसायटी परिसरामध्ये पाणी साचले
आपण जे दृश्य पाहतो आहे ते पिपळा येथील काही सोसायटीमध्ये पाणी घुसल्याचे आहे अनेक गाड्या पाण्यात दिसत आहे व काही घरांमध्ये पाणी घुसले आहे
4
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 09, 2025 04:30:15Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरात रात्री 10 नंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर होणार कठोर कारवाई, पोलीस आयुक्त एम. राजकुमार ॲक्शन मोडवर
- सोलापूर शहरात रात्री 10 नंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर होणार कठोर कारवाई, पोलीस आयुक्त एम. राजकुमार ॲक्शन मोडवर
- सोलापुरातून रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार
- यासाठी पोलीस आयुक्तांसह, उपायुक्त, ठाणेदार यांच्यासह दोन तास पायी पेट्रोलिंग मोहीम असणार..
- सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी काढले आदेश
- सोलापूर शहरातील विविध भागात पेट्रोलिंग करण्यात येणार..
- शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी सुरु करण्यात आली मोहीम
Byte : एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर
2
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 04:04:41Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_CHP_VILLAGE_FLOOD
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिंपळगाव-भोसले गावात शिरले नदीचे पाणी
अँकर:-- गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या नदी नाल्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली. वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिंपळगाव-भोसले या गावात वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. याच तालुक्यातील भूती नाल्याचा रपटा वाहून गेल्याने ब्रह्मपुरी-अ-र्हेर नवरगाव मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सध्या या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे नाल्यावर रपटा टाकून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता मात्र पाण्याच्या प्रवाहाने हा रपटा वाहून गेलाय. हाच मार्ग पुढे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे जात असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 09, 2025 04:04:33Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातून आषाढी वारीसाठी सोडलेल्या ज्यादा गाड्यांच्या माध्यमातून एसटीला 83 लाख रुपयांचे उत्पन्न, यंदाच्या आषाढी वारीत एसटीची चांगली कमाई
- सोलापुरातून आषाढी वारीसाठी सोडलेल्या ज्यादा गाड्यांच्या माध्यमातून एसटीला 83 लाख रुपयांचे उत्पन्न, यंदाच्या आषाढी वारीत एसटीची चांगली कमाई..
- पाच दिवसात 1774 एसटी कडून करण्यात आल्या जादा फेऱ्या..
- एसटी महामंडळाकडून पाच दिवसात एक लाख 52 हजार किलोमीटरचा प्रवास, मागील वर्षे 58 हजार किलोमीटरचा करण्यात आला होता प्रवास
- आषाढीनिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी सोलापुरातून 260 एसटी बसेसची करण्यात आली होती सोय..
- सोलापूर जिल्ह्यातील गाव तिथे एसटी या योजनेतून वारकरी भाविकांची एसटी महामंडळाकडून करण्यात आली होती सोय..
- 3 जुलै ते 7 जुलैपर्यंत गाव तिथे एसटी या योजनेतून 83 हजार वारकरी भाविकांनी घेतला लाभ..
7
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 09, 2025 04:04:16Nashik, Maharashtra:
nsk_airservice
feed by 2C
ब्रेकिंग
नाशिककरांच्या हवाई सेवेला धावपट्टीच्या कामांची घरघर
तीन महिन्यात चार शहरांच्या हवाईसेवांमध्ये कपात
देखभाल दुरुस्तीचे कारण सांगत इंदूर, जयपुर, नागपूर आणि दिल्ली सेवेत कपात
कंपन्यांनी बुकिंग थांबवल्याने नाशिककरांची अडचण
उद्योजक पर्यटक भाविक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
नाशिकच्या पर्यटनावर विपरीत परिणाम
14
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 09, 2025 04:03:48Beed, Maharashtra:
बीड: वैद्यकिन्हीच्या जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली, मुलांना उघड्यावर बसवून ज्ञानार्जन..!!
Anc- बीड जिल्ह्यातील सुमारे पाचशेहून अधिक जिल्हा परिषद शाळा जीर्ण झाल्या आहेत. अशाच पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली. मध्यरात्रीच्या सुमारास भिंत कोसळल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. शाळेची भिंत पडल्यानंतर शिक्षकांनी उघड्यावर प्रांगणात शाळा भरवली आहे. या शाळेत 135 मुले शिक्षण घेतात. तर शाळेच्या इमारतीला सत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत. अनेक वेळा मागणी करून देखील जिल्हा प्रशासनाने शाळेच्या इमारतीकडे अद्याप लक्ष घातले नसल्याने पालक संतप्त झाले आहेत.
बाईट: महिला पालक. वैद्यकिन्ही
13
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 04:02:51Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_GAD_BUS_RESCUE_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी महामार्गावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसेस बाहेर काढण्यात प्रशासनाला यश, सुमारे 100 प्रवाशांची ठाणेगाव या छोट्याशा गावातील विविध घरात केली व्यवस्था, प्रशासनाच्या तत्परतेने प्रवाशांना मोठी मदत
अँकर:-- गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून नागपूरकडे निघालेल्या एका एसटी व एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन देवदूत ठरले. गडचिरोली जिल्ह्यात गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे. याशिवाय वरच्या भागात असलेल्या गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढविण्यात आल्याने वैनगंगा नदी व तिच्या उपनद्या फुगल्या आहेत. गडचिरोली- नागपूर महामार्गावर ठाणेगाव नजीक बस आल्यानंतर पुढे गाढवी नदीच्या पुराचे पाणी महामार्गावर आल्याने मार्ग रोखला गेला. तर दुसरीकडे याच नदीच्या पाण्याने मागचा मार्ग देखील बंद झाला. या दोन्ही बसेस व त्यातील शंभर प्रवासी अडकल्याची माहिती पोलीस व जिल्हा प्रशासनाला मिळाली. यानंतर आरमोरी येथून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात या प्रवाशांना मदतीचे अभियान सुरू झाले. सर्वप्रथम एका मोठ्या हायवातून पोलीस अधिकारी व बचाव पथक प्रवाशांपर्यंत पोहोचले. त्यानंतर ठाणेगाव येथे ग्रामपंचायत भवन ,जिल्हा परिषद शाळा व प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी या सर्व प्रवाशांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने या प्रवाशांना तातडीने मदत मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. हे सर्व बचाव अभियान रात्री आठ वाजेपासून अविरत सुरू राहिले.
बाईट १) अडकलेले।प्रवासी
बाईट २) उषा चौधरी, तहसीलदार, आरमोरी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
13
Share
Report