Back
चंद्रपूरमध्ये वैनगंगा नदीचा पूर: पिंपळगाव-भोसले गावात पाणी शिरले!
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 04:04:41
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0907ZT_CHP_VILLAGE_FLOOD
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिंपळगाव-भोसले गावात शिरले नदीचे पाणी
अँकर:-- गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या नदी नाल्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली. वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिंपळगाव-भोसले या गावात वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. याच तालुक्यातील भूती नाल्याचा रपटा वाहून गेल्याने ब्रह्मपुरी-अ-र्हेर नवरगाव मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सध्या या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे नाल्यावर रपटा टाकून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता मात्र पाण्याच्या प्रवाहाने हा रपटा वाहून गेलाय. हाच मार्ग पुढे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे जात असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowJul 09, 2025 09:44:28Shirdi, Maharashtra:
Anc - साईंच्या शिर्डीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे.आज उत्सवाचा पहिला दिवस असून आजपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे.यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिर परिसरात साई भक्तांचे लक्ष वेधून घेणारे साईबाबांच्या फोटोंचे प्रदर्शन गुजरात येथील साईभक्त जिज्ञेश रजपूत यांनी भरवलय.. साई भक्त रजपुत यांनी साईबाबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत साईबाबांचे हयातीत असताना पासूनच्या फोटोंची सामग्री करत त्याचबरोबर पुस्तकांमधून आणि सोशल मीडियाहून सर्व जुने आणि नवीन फोटो एकत्र करत जवळपास 1800 ते 2000 फोटोंचे प्रदर्शन या साईभक्तानी भरवलय.. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरत येथील साईभक्ताने साईबाबांच्या जुन्या आणि नवीन आठवणींना उजाळा दिलाय.. साई मंदिर परिसरामध्ये भरवलेलं हे प्रदर्शन सर्व साई भक्तांचे लक्ष वेधून घेतय..प्रदर्शनाच्या ठिकाणांहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
wkt/121 कुणाल जमदाडे साईभक्त
9
Share
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 09, 2025 09:43:59Palghar, Maharashtra:
पालघर - पालघरच्या डहाणू नरपड परिसरात बिबट्याचा वावर . बिबट्याचा मुक्त संचार नरपड येथील कल्पेश पाटील यांच्या वाडीत लागलेल्या कॅमेरात कैद . काल पहाटे याच बिबट्याकडून गोठ्यातील वासरावर जीवघेणा हल्ला . हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू . मागील अनेक महिन्यांपासून या परिसरात असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण . बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश .
4
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 09, 2025 09:43:46Yavatmal, Maharashtra:
Anchor : बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सततधार पावसामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहे. धो धो पावसात गाव खेड्यामध्ये शेतकरी या पदयात्रेत सामील होत आहेत. हिंदी सक्तीचा जीआर मराठी भाषिकांचा मोर्चा निघण्याआधीच रद्द झाला मात्र रोज शेतकरी मरत असताना सरकार मात्र किंतु परंतु ची भाषा करीत असल्याने, आता लाठीकाठी, रुमणे घेऊन एकजूट करा आणि सरकारला हिसका दाखवा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. उपोषण, पदयात्रा झाल्यावरही सरकार कर्जमाफी देत नसेल तर गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू असाही ईशारा बच्चू कडू यांनी दिला.
बाईट : बच्चू कडू
5
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 09, 2025 09:40:05Beed, Maharashtra:
बीड: खाकीतला चोर "अधिकारी"; पोलिस दलाची प्रतिमा डागाळली...!
Anc- अत्यंत विनम्र आणि संयमी म्हणून त्या अधिकाऱ्याची ओळख होती. मात्र तो चोरीच्या भूमिकेत आढळल्याने अनेक पोलीस अधिकारांच्या भवया उंचावल्या आहेत. ऑनलाइन गेम चा नादात कर्जबाजारी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच चक्क चोरीचा मार्ग पत्करला... मात्र म्हणतात ना पोलिसांचे हात चार हात पुढे त्याच प्रमाणे स्वतः पोलीस अधिकारी असून देखील स्वतःच्याच डिपार्टमेंटला चकवा देण्यात तो अपयशी ठरला. पाहुयात बीडच्या एका अधिकाऱ्याचा चोरटा प्रवास....!!
Vo 1 -----
खाकी वर्दीत फोटो दिसणारा हा अधिकारी बीड पोलीस दलाच्या तांत्रिक विभागात asi पदावर आहे... अत्यंत संयमी आणि विनम्र असा स्वभाव असलेल्या या अधिकाऱ्याच्या हातात बीड पोलिसांनीच बेड्या ठोकल्या आहेत. अमित सुतार असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. .. ऑनलाइन गेम खेळण्यात तो कर्जबाजारी झाला आणि त्याने चोरीचा मार्ग पत्करला .. कर्ज फेडण्यासाठी त्याने चक्क दुचाकी चोरीला सुरुवात केली. बीड परिसरात स्वस्त दराने दुचाकी विकली जात असल्याची खबर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रंगेहात दुचाकी विकताना आरोपीसह समान पकडले. त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. सदर गाड्या या इस्मानी नाही तर बीडमधल्या तांत्रिक पदावर असलेल्या अमित सुतार या अधिकाऱ्याने चोरले असल्याचे समोर आले.
बाईट: शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक बीड
Vo 2 ------
आरोपी अमित सुतार याचा दुचाकी चोरण्याचा हा पहिलाच गुन्हा नाही. तर या आधीही अमित सुतारने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तांत्रिक विभागातील तब्बल आठ बॅटऱ्या चोरून विक्री केल्या होत्या. याप्रकरणी त्याला बीड पोलिसांनी अटक देखील केली होती. त्याचे निलंबन ही झाले होते. अशातच आर्थिक परिस्थिती ढासळल्याने अमित सुताऱ याने पुन्हा एकदा चोरीचा मार्ग अवलंबला. पोलिसांनी आता त्याला बेड्या ठोकले आहेत. अमित सुतार आणि त्याचे दोन सहकारी सध्या बीड पोलिसांच्या कोठडीत आहेत. अमित सुतार याने आणखीन किती चोऱ्या केल्यात याचा तपास आता बीड पोलीस करत आहेत...
बाईट: शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक बीड
Vo 3 -----
सर्वसामान्यांना न्याय मिळावा आणि पोलिसांची प्रतिमा पारदर्शक व्हावी यासाठी बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी अनेक संकल्पना राबवून पोलीस दल पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे त्यांच्याच दलातील पोलीस अधिकारी आरोपीच्या कठड्यात उभा आहे. एखाद्या व्यक्तीला जुगाराचे व्यसन लागल्यानंतर तो गुन्ह्याची वाट कशी धरतो हे पोलिस अधिकारी अमित सुतार याच्याकडे पाहिले असता लक्षात येईल. त्यामुळे जुगारासारखे व्यसन किती घातक असते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे...
END PTC
MAHENDRAKUMAR MUDHOLKAR, BEED
2
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 09:35:25Ambernath, Maharashtra:
१२ वर्षीय मुलाला मारहाण ,लिफ्ट मध्ये केली मारहाण
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद,
Amb boy beating
Anchor एका बारा वर्षीय मुलाला लिफ्ट मध्ये मारहाण केल्याचा संताप जनक प्रकार समोर आला आहे , अंबरनाथ शहरातील पालेगावच्या पटेल जी १ या इमारतीतील लिफ्ट मध्ये एक इसम एका 12 वर्षे मुलाला मारहाण करत आहे . हा मारहाणीचा प्रकार लिफ्ट मधील सीसीटीव्ही कॅमेरा झाला , अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल झाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत ,मात्र त्या चिमुकल्याला मारहाण का करण्यात आली हे मात्र समजू शकले नाही
चंद्रशेखर भुयार , आंबरनाथ
2
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 09, 2025 09:33:57Manmad, Maharashtra:
अँकर :-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी आमदार गोपीचंद पडळकर यांनी गलिच्छ भाषेत वक्तव्य केले आहे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेचा अपमान केला आहे या दोघांवरही गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनमाड यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान या मागणीचे निवेदन मनमाड पोलिसांना देण्यात आले.
3
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 09, 2025 09:33:50Manmad, Maharashtra:
अँकर:-मुबंईत सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात महायुती सरकार जन सुरक्षा कायदा विधेयक आणण्याच्या तयारीत असून हा कायदा लागू करण्यात येऊ नये यासह इतर विविध मागण्या सोबत कामगार संघटनानी पुकारलेल्या आज भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मनमाडला सिटू कामगार संघटना आणि अखिल भारतीय किसान सभे तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. जन सुरक्षा कायदा अन्याय करणारा ठरणार आहे त्यामुळे हा कायदा लागू करण्यात येऊ नये, तसेच केंद्र सरकार सर्वच क्षेत्रात खाजगी कारण करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मोर्चात मोठया संख्येने कामगार, शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले होते..
3
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 09, 2025 09:33:02Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0907ZT_WSM_WATER_LEVEL
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सांतधार पावसाने हजेरी लावली आहे.या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. विशेषतः वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेली पैनगंगा नदी पूर्ण क्षमतेने वाहत असून, प्रकल्पांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे, जास्त पावसामुळे जरी जलसाठ्यात भर पडत असली,तरी दुसरीकडे शेतकरी मात्र चिंतेत आहेत.शेतात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली जातं आहे.
3
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 09, 2025 09:10:17Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Kidnapping
Feed on - 2C
---------------------------
Anchor - चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला महिना उलटूनही अटक न केल्याने नांदेड जिल्ह्यातील हदगाव मध्ये बजरंग दल आणि विश्व् हिंदू परिषदेतर्फे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. हदगाव तालुक्यातील एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे 6 जून रोजी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपिंवर अपहरणासह पोकसो आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली पण मुख्य आरोपीला महिना उलटूनही अटक करण्यात आली नाही. महिना उलटूनही आरोपीला अटक न करण्यात आल्याने बजरंग दल आणि विश्व् हिंदू परिषदेने हदगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. अपहरण आणि पोकसो सारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक होत नसल्याने पोलीस तपासावर प्रश्नचीन्ह निर्माण होत आहे. तपास अधिक-र्यावर कारवाई करावी अशी मगणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. लव्ह जिहाद मधून हे अपहरण झाल्याचा आरोपही करण्यात आला.
Byte - मोर्चेकरी
----------------------------
11
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 09, 2025 09:05:41Raigad, Maharashtra:
स्लग - सरकारी कर्मचारी , शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा .......
अँकर - सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटना सदन इथून निघालेल्या मोर्चाची हिराकोट तलावाजवळ सांगता झाली. सुधारित पेन्शन संदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करावी, विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा, तात्काळ पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, जनसुरक्षा विधेयक रद्द करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. कर्मचारी, शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर, कार्याध्यक्ष कैलास चौलकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केलं.
2
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 09, 2025 09:04:27Akola, Maharashtra:
4 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोला जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहेय..तर ९ जुलै ते १५ जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहेय..अकोला जिल्ह्यातील पूर्णा, मोर्णा, निर्गुणा, काटेपूर्णा, मन, पठार, गौतमा आदी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेय...पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणीसाठ्यात वाढ झालीय त्यामुळे पाण्यात शिरण्याचे अनावश्यक धाडस करू नये असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहेय...वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये तर या कालावधीत रस्त्याचे अंडरपास, नाल्या, खड्डे, सखल भाग किंवा पाणी साठते अशा जागेवर जाणे टाळावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत..तर पूर आलेल्या पुलावरून जाऊ नये तर जनावरांना झाडांना किंवा वीजेच्या तारेखाली बांधू नये ,वीज चमकताना मोबाईल व वीज उपकरणे बंद ठेवावी , वाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहेय..
Byte : राजेंद्र कौसल, हवामान विभाग , अधिकारी
1
Share
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 09, 2025 09:03:57Palghar, Maharashtra:
पालघर - कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा , विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या , सर्व कामगारांना 26 हजार रुपये किमान वेतन आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करा , शेतकऱ्यांना 12 तास अखंडित विज पूरवठा द्या , विजेची नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा , मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था यासह विविध मागण्यांसाठी सीपीएमच्या नेतृत्वाखाली पालघर मध्ये आज रास्ता रोको करण्यात आला . दुपारी बारा वाजल्यापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चारोटी येथे कार्यकर्त्यांनी आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली रोखून धरला होता . यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक साधारणतः तासभर ठप्प झाली असून दोन्ही वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याच पाहायला मिळालं . सरकार दडपशाही पद्धतीने कायदे आणत असून सरकारकडून संविधानाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आला . या रास्ता रोकोत सीपीएम सह आशा वर्कर आणि रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून देखील सहभाग दर्शवण्यात आला .
बाईट - विनोद निकोले - डहाणू आमदार सीपीएम .
3
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 09, 2025 08:37:29Dindori, Madhya Pradesh:
अँकर:-दिंडोरी भागात मे महिन्यात अवकाळी त्यानंतर जून महिन्यात सलग झालेल्या पावसाचा फटका डाळिंब बागाना बसला असून बागावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव तर वाढला आहेच शिवाय पावसाच्या संतातधरमुळे फळाना तडे जाण्या बरोबर फळ गळून पडू लागले आहे यांचा फटका तब्बल 300 हेक्टर वरील बागाना बसत असल्यामुळे शेकडो शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी डाळींब बागायतदारांनी केली आहे...
13
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 08:36:48Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_CHP_SCHOOL_ISSUE1
( single file sent on 2C)
टायटल:-- झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट, मे महिन्यात वादळाने छप्पर उडून गेल्यानंतर पावसाळी दिवसात खुल्या रंगमंचात शिक्षण घेणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोनापूरच्या शाळेसाठी जिल्हा परिषदेने मंजूर केले सहा लाख रुपये, याशिवाय गावातील सरपंच भवन येथे तात्पुरत्या स्वरूपात वर्ग खोल्यांची केली व्यवस्था, सोनापूरच्या जिल्हा परिषद मराठी शाळेची दुरावस्था झी 24 तासने पुढे आल्यानंतर शिक्षण विभागाने उचलली पावले
अँकर:-- झी 24 तासवर बातमी म्हणजे परिणामाची हमी. सोनापूरच्या शाळेला आता छप्पर मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या व्याहाड खुर्द परिसरातील सोनापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे छप्पर मे महिन्यात वादळाने उडून गेले होते. शाळा सुरू झाल्यानंतर पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने पावसाळी दिवसात त्यांना खुल्या रंगमंचात शिक्षण घ्यावे लागत होते. यासंबंधीची बातमी झी 24 तास ने लावून धरल्यावर चंद्रपूर ते मुंबई खळबळ उडाली होती. जि. प. शिक्षण विभागाने खडबडून जागे होत सोनापूर जि. प. मराठी शाळेसाठी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान या दोन वर्ग खोल्या गावातील सरपंच भवन येथे स्थानांतरित करण्यात येत असून एक महिन्याच्या कालावधीत छप्पर तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे सोनापूर येथील विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.
बाईट १) अश्विनी सोनवणे-केळकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 09, 2025 08:35:56Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
sangli breaking
Sng_shkatipith_
स्लग - शक्तीपीठ महामार्गाची मोजणी गव्हाण मध्ये शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी रोखली, अधिकारी शेतकऱ्यांच्या मध्ये वादावादी..
अँकर - नागपूर-गोवा महामार्गाला सांगली जिल्ह्यातुन प्रखर विरोध होत आहे.तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे दुसऱ्या दिवशीही शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखून धरली आहे.मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी शेतातून हाकलून लावले आहे.कालपासून शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी गव्हाण येथे प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.मात्र शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे,दुसऱ्या दिवशीही मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी पासून रोखून धरले,यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये वादावादीचा प्रकार देखील घडला आहे,मात्र आक्रमक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाकलून लावले आहे,त्यामुळे गव्हाण येथे महामार्गाची मोजणी दुसऱ्या दिवशीही होऊ शकली नाही.
बाईट - दिगंबर कांबळे - जिल्हाध्यक्ष - शेतकरी कामगार पक्ष - सांगली.
13
Share
Report